राम राम मंडळी. चिन्यांच्या उपद्याप या विषयावर मिपावर दोन हजार तेराला चर्चा सुरु होती. आताही तोच प्रश्न नव्याने समोर आला आहे. आपण अगोदरच कोरोनाने परेशान आहोत. रुग्ण वाढत आहेत बरे होत आहेत. आपण आपल्या जींदगीशी व्यक्तीगत पातळीवर समझोता करुन जरा हळुहळु आपलं मार्गक्रमण सुरु करत होतो की चिन्यांनी सीमेवर कुरापती सुरु केल्या. एलएसीवर चीनने जे कृत्य केलं त्यामुळे देशभर संताप उमटला आहे. अशा परिस्थितीत काल पंतप्रधानांची काल जी सर्वपक्षीय बैठक झाली त्यात चिन्यांनी घुसखोरी केलीच नाही अशी सर्वांना माहिती दिली आहे. (बातमी मटा) परंतु भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता यात भारताचे २० जवान शहीद झाले त्याच वेळी चिन्यांचेही ४३ पेक्षा अधिक सैन्य ठार झाल्याचे म्हटल्या जाते. खिळे असलेले दंडु़क्यांचे चित्र माध्यमात फिरत आहेत. अतिशय संताप यावा असे हे चिन्यांचे कृत्य आहे. मात्र ग्लोबल टाइम्समधे किंवा चिन्यांकडून अशी काही बातमी येत नाही, असे झाले असेल तर चीन्यांना धडा शिकवणे गरजेचेच आहे. चिन्यांना धडा शिकवलाच पाहिजे. काल सर्वपक्षीय बैठकीत अनेकांनी अनेक प्रश्न विचारले आणि मा. पंतप्रधानांनी ”भारताला मैत्री आणि शांतता हवी आहे. पण देशाच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला ठेच पोहोचू देणार नाही. कुठल्याही परकीय दबावापुढे भारत झुकणार नाही. देशाच्या सुरक्षेसाठी जे काही आवश्यक असेल त्यासाठी वेगाने पावलं उचलली जातील”’ असे म्हटले आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने किंवा आणि अन्य काही कारणांमुळे असेल सर्वच गोष्टी जाहीर सांगता येत नसतील तरीही चिन्यांचा हा किडा ठेचला पाहिजे ही भारतीयांच्या मनातली इच्छा आहे, असे करतांना अनेक गोष्टी असतील येत्या काळात आपण कदाचित काही कार्यवाही करणारही असू पण चिन्यांचं आता पुरे झालं.
मंडळी, चिन्यांच्या एकूणच कोणत्याही गोष्टींवर आपण विश्वास ठेवणार नाही. चिन्यांच्या कुरापतीला वेगवेगळे कंगोरे असतील. गलवान क्षेत्रातील पुलाच्या कामामुळे चीनी भडकले असतील. गलवान खो-यातील काही वादग्रस्त क्षेत्र असेल ते आपल्या परत मिळालेच पाहिजेत असे एक भारतीय म्हणून वाटते. जगाचं लक्ष कोरोनावरुन हटवून अन्यत्र वळवणे असेल किंवा जे काही असेल त्या विषयांची चर्चा धाग्यात अपेक्षित आहेत. उत्तम संदर्भ, लिंका आणि व्हीडीयो टाळत असलेल्या व्हीडीयो-बातम्यांचा मजकूर टंकून एकूण्च चर्चा अपेक्षित आहे. देशातून चिन्यांचे विविध कामांचे कंत्राट, वस्तूंच्या ऑर्डर्स रद्द होत आहेत एका दृष्टीने आता चिन्यांची कोंडी करण्याचा थोडाफार प्रयत्नही होतांना दिसत आहे.
आत्ताच एक जूनला ग्लोबल टाइम्समधे चीनच्या वतीने म्हटलं गेलं होतं की अमेरिका आणि आमच्या वादापासून भारताने दूर राहावे. चीन अमेरिकावादात भारताने फायदा उठवू नये. आणि दोन राष्ट्राच्या (चीन-अमेरिका) वादात भारत पडल्यास भारताला मोठी किंमत मोजावी लागेल असे म्हटले होते त्याच बरोबर भारतात सध्या चीन विरोधात आवाज उठविण्यात येत आहे, मोदी सरकारने देशात चीन विरोधात उठवला जाणारा आवाज कमी करण्याकडे लक्ष द्यायला हवे असे चीनने म्हटले होते. (बातमी- ग्लोबल टाइम्स आणि सकाळ )आणि म्हणून त्यांनी कालचं कृत्य केलं असावं का ?
''भारताला शांतता हवी आहे. पण याचा अर्थ भारत दुबळा आहे असा होत नाही. चीनचा मूळ स्वभाव हा विश्वासघातचा आहे. भारत बलवान आहे आणि दुबळा नाही. शत्रूचे डोळे काढून हातात देण्याची सरकारमध्ये क्षमता आहे'' असे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले त्यात चुकीचं काही नाही. चिन्यांच्या या कृत्याला आता आपण देश एकत्र होऊन चिन्यांंचा योग्य बंदोबस्त झालाच पाहिजे या मतावर येऊन ठेपलो आहोत.
मंडळी, कोमल यांच्या पहिल्या धाग्यातील प्रतिसाद लांबत गेले, दुसर्या पानावार जातांना प्रतिसाद लिहितांना अडचणी येत होत होत्या, सर्वाअर्थाने चीन्यांच्या कुरापती, आपले सीमा प्रश्न आणि त्यांच्या बंदोबस्तावर चर्चा व्हावी यासाठी हा धाग्याचा प्रपंच. आपण योग्य अशी माहितीची देवान-घेवाण व्यक्तीगत पातळीवर न जाता तटस्थपणे चर्चा कराल अशी अपेक्षा.
मिसळपाव
प्रतिक्रिया
कायप्पावरचं एका तज्ञांच
मस्त...!
In reply to कायप्पावरचं एका तज्ञांच by शाम भागवत
चिन्यांचं हेच म्हणणं होत की,
In reply to मस्त...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आंजावर जुजबी शोध घेतला असता
In reply to कायप्पावरचं एका तज्ञांच by शाम भागवत
नो मॅन्स लँड फक्त
In reply to आंजावर जुजबी शोध घेतला असता by चौथा कोनाडा
..... त्यातूनच एक नो मॅन्स
In reply to नो मॅन्स लँड फक्त by शाम भागवत
बरोबर....
In reply to आंजावर जुजबी शोध घेतला असता by चौथा कोनाडा
आपल्यासारखाच जरा युट्यूबवर शोधाशोधा केल्यावर लक्षात येते की आपला सीमेचा प्रदेश अरुणाचल प्रदेशापासून ते दौलत बेग ओल्डी जो विमानतळाचा बेस आहे, पुढे अक्साईन चीनचा प्रदेश सुरु होतो त्यावरही आपण हक्क सांगतो पण आता तो मिळविणे म्हणजे युद्धच करावे लागेल असे दिसते. सर्व वादग्रस्तच राहीलेले आहे. पहिल्या छायाचित्रात 'पॅगॉग त्सोवर' आपला हक्क आपण फिंगर ८ पर्यंत सांगतो. पण चिन्यांनी आपल्या पाच पर्यंत घुसखोरी केली आहे आणि तिथेच सध्या वाद सुरु आहे. कोणी कितीही नाही म्हटलं तरी चिन्यांची घुसखोरी केलीच आहे. आपल्याला आपण पॉइंटपर्यंत आपला हक्क सांगितलाच पाहिजे आणि चिन्यांना मागे रेटलेच पाहिजे. चिन्यांचे तंबू म्हणा पेट्रोलिंग म्हणा सध्या ते आपल्या हद्दीत येऊन केली आहे. आणि आपल्याला मागे जावे लागते किंवा दुर्लक्ष होते. चिन्यांच इतिहास असाच आहे की जेव्हा जेव्हा आपण आपल्या भूभागावर दुर्लक्ष केले तिथे तिथे त्यांनी तो भाग आपला म्हणून घ्यायला सुरुवात केलेली दिसते.
सिमारेषा निश्चित नसल्यामुळे दौलतबेग ओल्डी जे आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने मजबूत ठिकाण आहे, तिथून पाकड्यांवर आणि चिन्यांवर लक्ष ठेवता येते. म्हणून सध्या ओल्डीबेग पासून ते दरबगपर्यंत भारताने रस्त्याचे काम सुरु केले त्यात चिन्यांनी खोडा घालायचे काम केलेले दिसते कारण आपल्या जसजशा सीमा मजबूत होत तसतसे सीमारेषा स्पष्ट होत जातील. माहिती नाही केव्हा होईल ते पण अक्साई चीनवर आपलं नियंत्रण यावे असे मनापासून वाटते. आपण म्हणता तसे सीमेवर सतत अशीच वादग्रस्त ठिकाणे असल्यामुळे नेहमी वाद होतांना दिसतात. एकमेकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन्हीही देश आपला सीमा प्रदेश मजबूत करतांना दिसत आहेत. आपला इतिहास सर्व असा मोकळाढोकळा असल्यामुळे नव्या काळात आता अधिक मजबुत व्हावेच लागणार आहे.
-दिलीप बिरुटेधन्यवाद सर. _/\_
In reply to बरोबर.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
> पहिल्या छायाचित्रात गलवान
In reply to बरोबर.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्स.
In reply to > पहिल्या छायाचित्रात गलवान by मनो
धन्यवाद, डॉ. साहेब !
In reply to धन्स. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वर ठळक केलेले अमेरिकन
In reply to कायप्पावरचं एका तज्ञांच by शाम भागवत
रिकाम्या तंबूला काय एवढं
In reply to वर ठळक केलेले अमेरिकन by मराठी_माणूस
चिनी वस्तूंवर बहिष्कार घातला
(No subject)
In reply to चिनी वस्तूंवर बहिष्कार घातला by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
सुरुवात महत्वाची आहेच.
In reply to चिनी वस्तूंवर बहिष्कार घातला by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मिसळपाववर अजूनही ही चर्चा का
पहिल्या लिंक बद्दल धन्यवाद.
In reply to मिसळपाववर अजूनही ही चर्चा का by श्रीगणेशा
भारत-चीन युद्ध सुरू झाले तर रशिया तटस्थ असेल की भारताबरोबर
मिमांसा करण्याचा स्तुत्य
In reply to भारत-चीन युद्ध सुरू झाले तर रशिया तटस्थ असेल की भारताबरोबर by अर्जुन
गावात एक म्हण आहे, वेळेला
मी काय म्हणतो....
राजकारण
In reply to मी काय म्हणतो.... by mrcoolguynice
@ अर्जुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Poongathave | Nizhalgal | Ilaiyaraaja Live In Concert Singaporeबाणासेठ...
In reply to @ अर्जुन by मदनबाण
मदनबाण जी,
आपल्या प्रतिसादातील खालील ओळी
In reply to मदनबाण जी, by mrcoolguynice
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Poongathave | Nizhalgal | Ilaiyaraaja Live In Concert Singaporeआपल्या इथे लोकशाही असुन
In reply to आपल्या प्रतिसादातील खालील ओळी by मदनबाण
केवळ हयात पंतप्रधान मोदीजी
In reply to आपल्या इथे लोकशाही असुन by mrcoolguynice
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Poongathave | Nizhalgal | Ilaiyaraaja Live In Concert Singaporeवरील २ नावात तुम्ही अजुन २
In reply to केवळ हयात पंतप्रधान मोदीजी by मदनबाण
आपण दिलेला दुवा, व त्याचे
In reply to वरील २ नावात तुम्ही अजुन २ by mrcoolguynice
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- En Jodi Manja Kuruvi | Vikram | Ilaiyaraaja Live In Concert Singaporeबेकायदेशीर असेल तर पोलिसात जावा
In reply to आपण दिलेला दुवा, व त्याचे by मदनबाण
आपण दिलेल्या नवीन दुव्याबद्दल
In reply to आपण दिलेला दुवा, व त्याचे by मदनबाण
अवांतर...
In reply to आपण दिलेल्या नवीन दुव्याबद्दल by mrcoolguynice
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- LYRICAL: Ghamand Kar | Tanhaji The Unsung Warrior"B &D" journalism, my friend,
In reply to अवांतर... by मदनबाण
What is B & D media ?
In reply to "B &D" journalism, my friend, by mrcoolguynice
इलेक्टोरल बॉन्ड
In reply to What is B & D media ? by mrcoolguynice
ओक्के, लिंक बद्धल धन्यवाद.
In reply to इलेक्टोरल बॉन्ड by गोंधळी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- In 2020, can India pretend to be weaker than it was in 1967, despite building a nuclear arsenal and despite its longstanding status as one of the world’s largest importers of weapons?५६-२६
भारताने काय काय केले पाहिजे?
मला वाटते हे सर्व करावे, पण
In reply to भारताने काय काय केले पाहिजे? by एस
अहो, मी वेगळे काहीही सुचवत
In reply to मला वाटते हे सर्व करावे, पण by शाम भागवत
वाह !
In reply to भारताने काय काय केले पाहिजे? by एस
अहो, मी वेगळे काहीही सुचवत
In reply to वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरंय. प्रतिसाद पटला. चीनने
In reply to अहो, मी वेगळे काहीही सुचवत by शाम भागवत
उत्कृष्ट प्रतिसाद
In reply to भारताने काय काय केले पाहिजे? by एस
चीन लडाखमध्ये भारतीय
ह्या प्रतिसादाचा.........
In reply to चीन लडाखमध्ये भारतीय by mrcoolguynice
चीन लडाखमध्ये भारतीय
In reply to ह्या प्रतिसादाचा......... by विनोद१८
सरकार खरी माहिती
In reply to चीन लडाखमध्ये भारतीय by mrcoolguynice
भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी
In reply to सरकार खरी माहिती by अनिरुद्ध.वैद्य
ह्याबाबतच क्लारिफिकेशन
In reply to भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी by mrcoolguynice
रोचक चर्चा
चीनने भारतीय भूमीवर आक्रमण केले नाही
भारत आणि चीन दरम्यान पारंपरिक
खरंय.
In reply to भारत आणि चीन दरम्यान पारंपरिक by अर्जुन
सीमा वाद
बजेट
नकाशा
आशिया-१९५०
In reply to नकाशा by कपिलमुनी
देश असतील किंवा व्यक्ती
चीनच्या बाॅर्डरवरील
काही गावांच्या नावांचा उच्चार
In reply to चीनच्या बाॅर्डरवरील by शाम भागवत
कृपया सोशल मिडीया वर भारताचे संरषण धोरणावर चचाॆ करू नका.
आता हा प्रतिसाद नक्की कोणत्या
In reply to कृपया सोशल मिडीया वर भारताचे संरषण धोरणावर चचाॆ करू नका. by फुकनी
नेपाळी पण...
नाही हो
In reply to नेपाळी पण... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आस कोणी म्हणलं
In reply to नेपाळी पण... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चीनचे 'न्यु नॉर्मल' चिनी खेळीचे सद्य गणित
हा घ्या