ग्राहकमंच : सामान्यांचा हक्क !
लेखनप्रकार
बँक ऑफ इंडीयाचा नॅशनल इंशुरन्सबरोबर मेडी-क्लेमचा टाय-अप होता.
बँकेच्या कस्टमर्सना माफक प्रिमियममधे मेडि-क्लेम कवर अशी योजना होती.
फॉर्म भरतांनाच तिथे असलेल्या स्टँडींग इंस्ट्रक्शनवर सही करणं
(प्रिमियम ड्यू डेटला खात्यातून परस्पर नॅशनल इंशुरन्सला पाठवला जाईल) अनिवार्य होतं.
त्याशिवाय तो फॉर्म वॅलीड नव्हता.
सात वर्ष प्रिमियम योग्य वेळी बँकेतून परस्पर खात्याला डेबीट होऊन पॉलिसी ऑटोमॅटीक रिन्यू होत होती.
आठव्या वर्षी बँकेच्या गफलतीनं प्रिमियम भरायचा राहिला आणि पॉलिसी लॅप्स झाली.
नेमक्या त्याच वर्षी पत्नीला हॉस्पिटलाइज करावं लागलं.
पॉलिसी लॅप्स झाल्याची मला कल्पनाच नव्हती.
तीला डिसचार्ज मिळाल्यावर क्लेम लॉज करायला गेलो तेंव्हा
ही भानगड उघडकीला आली !
________________________________
यावर बँकेनं खालील प्रमाणे सुरुवात केली :
१. अशी स्टँडींग इंस्ट्रक्शन नव्हतीच !
२. प्रिमियम भरला की नाही हे पाहणं खातेदारीची जवाबदारी आहे.
३. आम्ही तुम्हाला फोन केला होता ! ( भिकारचोट वकिली सल्यानं धादांत खोटं )
४. तुम्ही पूर्ण बिल मिळण्यासाठी बँकेला फसवून प्रिमियम चुकवला ! ( वकिली हलकटपणाची परिसीमा)
____________________________________
मी झोनल मॅनेजरला रितसर मेल पाठवली (तक्रार अर्ज) आणि भेटायला गेलो.
कारण ग्राहकमंचाकडे तक्रार करण्यापूर्वी बँकेला रिड्रेसलची संधी मिळावी अशी अट आहे.
त्यानं केबिनमधे असून पिएमार्फत भेट टाळली आणि
माझा तक्रार अर्ज फेटाळला !
आता बँकेला अश्वदर्शन घडवल्याशिवाय सुधारणार नाही, हे लक्षात आल्यावर
ग्राहकमंचाकडे दावा दाखल केला.
___________________________________
या कामाला बरीच चिकाटी लागते कारण बँकेचा वकील तद्दन हलकट आणि मुरलेला असतो.
तारीख-पे-तारीख आणि बरीच काऊंटर आर्ग्युमंटस होतात.
__________________________________________
मला दोनच गोष्टी प्रूव करायच्या होत्या :
१. स्टँडींग इंस्ट्रक्शन असतांना बँकेनी प्रिमियम भरला नाही,
त्यामुळे पॉलिसी लॅप्स झाली.
(माझा ओरिजिनल फॉर्म, जो मी नॅशनलकडून मिळवला)
२. ड्यू डेटला माझ्या खात्यात प्रिमियमपेक्षा जास्त बॅलन्स होता.
(माझ्या बँक स्टेटमंटची कॉपी)
_____________________________________
याच्या जोडीला मी आणखी दोन गोष्टी मिळवल्या :
१. सात वर्ष पॉलिसी रिन्यू झाल्याची नॅशनल इंश्युरन्सचं हिस्ट्री स्टेटमंट आणि
२. नॅशनल इंश्युरन्सनी बँकेला माझ्या पॉलिसीचा प्रिमियम भरण्यासाठी महिनाभर आधी पाठवलेली नोटीस !
हा सर्वात महत्त्वाचा पुरावा होता कारण त्यामुळे इंशुरन्स कंपनी जवाबदारीतून मोकळी होत होती आणि
बँकेच्या गहाळपणाचा आरोप सिद्ध होत होता.
_________________________________
मी सर्व कागदपत्र आणि माझं आर्ग्युमंट रितसर दाखल केल्यावर बँकेच्या वकिलाला तो पुरता कॉर्नर झाल्याचं लक्षात आलं.
मग त्यानं तारखा मागायला सुरुवात केली.
दुसर्या वेळी मी जजेसनां विनंती केली की जर बँकेचा वकिल पुढच्या वेळी हजर झाला नाही
तर तुम्ही एकतर्फी सुनावणी करावी.
_____________________________________
सुनावणीला भारी मजा आली !
वकिलानी आणखी सहा/सात खातेदारांचे अकाऊंटस आणले आणि असा स्टँड घेतला की
इतर खात्यातून प्रिमियम्स वेळच्या वेळी गेलेत.
बँकेची फिर्यादीशी दुश्मनी नाही.
पण बँकेनं वेळोवेळी फोन करुन फिर्यादीनी पॉलिसी रिन्यू करण्याबाबत काहीच न सांगितल्यानं त्याची पॉलिसी लॅप्स झाली !
__________________________________
मी पॉलिसी हिस्ट्रीकडे निर्देश करुन सांगितलं की खातेदाराला फोन करण्याचा प्रष्णच येत नाही.
माझी स्टँडींग इंस्ट्रक्शन होती आणि
बँक सात वर्ष त्याच बेसिसवर प्रिमियम भरत होती.
मला कुणाचाही फोन आला नव्हता.
ज्या वेळी इंशुरन्स कंपनीनं महिनाभर आधी बँकेला पाठवलेली नोटीस, बँकेच्या सही-शिक्यासहित दाखवली गेली;
तेंव्हा जजेसनं त्यावर वकिलाला त्याचा काऊंटर विचारला !
वकिल तोंडात मारल्यागत चूप झाला.
आणि निकाल माझ्या बाजूनं लागला !
_________________________________
साधारण एक वर्ष ही प्रोसेस कंप्लीट व्हायला लागलं,
पण माझं संपूर्ण बील (चाळीस हजार),
इंशुअर्ड रकमेच्या आत असल्यानं,
फक्त सात दिवसात माझ्या खात्यात जमा झालं !
वाचने
14023
वाचनखूण
प्रतिक्रिया
54
ग्रेट अनुभव.गचाळ सिस्टीमच्या
In reply to ग्रेट अनुभव.गचाळ सिस्टीमच्या by कानडाऊ योगेशु
ग्राहकमंचच्या फिर्यादी
जो मनस्ताप झाला त्याची परतफेड
In reply to जो मनस्ताप झाला त्याची परतफेड by मराठी_माणूस
ग्राहकमंच आर्थिक नुकसान भरपाई
In reply to ग्राहकमंच आर्थिक नुकसान भरपाई by संजय क्षीरसागर
अभिनंदन. दावा लढवायला आलेला
In reply to अभिनंदन. दावा लढवायला आलेला by अभिजीत अवलिया
हो मिळेल
मस्त...
In reply to मस्त... by ज्ञानोबाचे पैजार
कारण त्या सँडींग इंस्ट्रक्शनवर
भारी काम केलेत.
In reply to भारी काम केलेत. by कंजूस
नाही ते नॉर्मले
चामुंडरायनी > काऊच्या पोस्टवर मला
इंशुरन्स कंपनीनं महिनाभर आधी
In reply to इंशुरन्स कंपनीनं महिनाभर आधी by अनन्त्_यात्री
स्टँडींग इंस्ट्रक्शन असल्यामुळे
सरकारी बँका आणि सरकारी विमा
आपण बँकेला धडा शिकवला याबद्दल
In reply to आपण बँकेला धडा शिकवला याबद्दल by सुबोध खरे
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
पार वरपर्यंत जातो
छान!
In reply to छान! by दादा कोंडके
मला वाटतं तुमचा व्यक्तिगत दृष्टीकोनच
योग्य धडा शिकवला.
अभिनंदन संक्षी साहेब.
तुमची हरकत नसल्यास ह्या
In reply to तुमची हरकत नसल्यास ह्या by तेजस आठवले
ही सगळी माहिती
In reply to तुमची हरकत नसल्यास ह्या by तेजस आठवले
तुम्ही कॉन्फोनेटला जाऊन
आणि हो अभिनंदन सुद्धा. चिकाटी
यासाठी काय करावे लागले
In reply to यासाठी काय करावे लागले by रीडर
ती इंटीमेशन मी
In reply to ती इंटीमेशन मी by संजय क्षीरसागर
माहितीबद्दल धन्यवाद.
In reply to माहितीबद्दल धन्यवाद. by रीडर
इंशुरन्स कंपनीत
In reply to इंशुरन्स कंपनीत by संजय क्षीरसागर
अच्छा आले लक्षात. माहितीसाठी धन्यवाद.
ह्या धाग्याची लिंक काही ग्रुप
In reply to ह्या धाग्याची लिंक काही ग्रुप by वीणा३
चिकाटी लागते हे खरंय
In reply to चिकाटी लागते हे खरंय by संजय क्षीरसागर
एक प्रश्न, किती वेळ लागला
In reply to एक प्रश्न, किती वेळ लागला by वीणा३
साधारण एक वर्ष ही प्रोसेस कंप्लीट व्हायला लागलं
चिकाटी !
In reply to चिकाटी ! by पहाटवारा
अन्यायाविरूद्ध लढायला
तुमचे अभिनंदन!
सगळ्याच बँका असे काही नाही
In reply to सगळ्याच बँका असे काही नाही by Prajakta२१
स्टँडीग इंस्ट्रक्शन
In reply to स्टँडीग इंस्ट्रक्शन by संजय क्षीरसागर
स्टँडिंग instruction
In reply to स्टँडिंग instruction by Prajakta२१
@ Prajak : या टेक्नीकल माहितीबद्दल धन्यवाद !
In reply to @ Prajak : या टेक्नीकल माहितीबद्दल धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
एखाद्या व्यक्तीची विमा
In reply to एखाद्या व्यक्तीची विमा by Prajakta२१
पुन्हा एकदा धन्यवाद !
In reply to सगळ्याच बँका असे काही नाही by Prajakta२१
सहकारी बँकात अशी वैयक्तिक
झालेल्या चुकीचा योग्य तो
ग्रेट सर
कौतुकास्पद आणि अभिनंदनीय अनुभव
मला तर ही रचलेली कथा वाटत आहे
In reply to मला तर ही रचलेली कथा वाटत आहे by Rajesh188
@ Rajesh188 : तुम्ही त्याचू आहात का ?
In reply to @ Rajesh188 : तुम्ही त्याचू आहात का ? by संजय क्षीरसागर
चूक कबूल
In reply to चूक कबूल by Rajesh188
@ Rajesh188 : दॅटस द स्पिरीट !
माझा अनुभव ही असाच आहे
In reply to माझा अनुभव ही असाच आहे by Vivekraje
+१
+१
In reply to माझा अनुभव ही असाच आहे by Vivekraje
@ Vivekraje : माझा अनुभव ही असाच आहे !