अशा सुंदर लेखाला आजपावोत एक ही प्रतिक्रिया नाहि
पण उदय साहेब आम्हाला आवडला तुमचा हा लेख फार सुंदर
**************************************************************
एखाद्याला देव मानला कि तो आमचा देवच !
आणी छत्रपती शिवाजी महाराज आमचे देव !!
येऊन प्रतिसाद द्यायला वेळ लागतो.
अतिशय सुंदर लेख..
जी कलाकृती तुम्हाला २ क्षण नि:शब्द करू शकते ती उत्तम. असं माझं मत आहे.
आणि माझ्या लेखी हा लेख त्या कसोटीला नक्कीच पात्र आहे..
उत्तम लेख..
अतिशय उत्तम लेखन!!
राजाराम - तो तर एक अशक्त मुलगा ! महाराणींच्या वटारलेल्या डोळ्यांत विरघळून जाणारे त्यांचे धैर्य आलम् गीर ला थोपवू शकेल काय?नि:संशय नाही, त्रिवार नाही ! हां एक मात्र खरं की राजारामाच्या निष्ठा सत्याच्या बाजूने आहेत - महाराणी नसताना ती चमक आम्ही त्यांच्या डोळ्यांत पाहिली अहे ! त्यांना सत्तेची हाव नाहे, नव्हे तेव्हढी आपली कुवतच नाही हे ही ते जाणतात ! या "राम्"राजाचे हे "भरत"प्रेम त्यांच्या दादामहाराज अर्थात् शंभुराजांसाठी असेच कायम राहो हीच "श्रीं"च्या चरणी प्रार्थना !
"तळे राखी तो पाणी चाखी" या उक्तीप्रमाणे अण्णाजी वा इतर मंत्र्यांनी केलेले गैरव्यवहार नजर अंदाज करण्याचं धोरणीपण जे आमच्याकडे आहे ते तुमच्याकडे नाही,
इतरही काही उल्लेख वादग्रस्त आहेत पण त्यांना काही भविष्यातल्या घटनांचा आधार आहे. महाराजांचं राजाराम या आपल्या मुलाबद्दल काय मत होतं शेवटच्या क्षणी हे सांगता येणं कठीण आहे. महाराज स्वतः असताना या निष्ठावंतांनी काय गैरव्यवहार केले होते जे अशा नि:स्पृह आणि न्यायदक्ष राजाने नजरेआड केले?
अवांतरः जनाना, जनानी हा अरबी किंवा फारसी शब्द असावा. तुमच्या सुंदर भाषेत आणि शैली मध्ये तो वेगळा बोचतो..
आयुश्याची दोरी बळकट करण्यासाठी जपाच्या माळेचा नव्हे तर धनुष्याचा दोराच सहाय्य करील
सुहास..
एरवी माकड सगळे सारखेच,फक्त माकडाच शेपुट उपटल की त्याचा माणुस होतो.
उदयजी!
शब्द कमी पडतायत अभिप्राय देण्यास.
तुमची "झंझावात" ही कदंबरी खरच एक मोठा "झंझावात" निर्माण करेल महाराष्ट्रात याची मनापासुन खात्री आहे.
तुमच्या "झंझावाताला" मुजरा आणि मनःपुर्वक शुभेच्छा!
"अनामिका"
अप्रतिम लेखन...
<<राजाराम - तो तर एक अशक्त मुलगा ! महाराणींच्या वटारलेल्या डोळ्यांत विरघळून जाणारे त्यांचे धैर्य आलम् गीर ला थोपवू शकेल काय?>>
महाराजांच्या राजारामांबद्दल काय भावना होत्या ते कळायला मार्ग नाही. पण राजारामा महाराजांनीदेखील आपल्या परीने कमी प्रयत्न केले नाहीत. दुर्दैवाने त्यांच्या शरीराने साथ दिली नाही आणि माता व कारभार्यांनी त्यांना त्यांची बुद्धी कधी वापरुच दिली नाही. पण त्यांनी आपल्या काळात एक खुप मोठी घोडचुक केली. शिवबांनी बंद केलेली वतने द्यायची पद्धत त्यांनी परत सुरु केली त्यामुळे पुन्हा छोटे मोठे वतनदार, देशमुख माजले. संभाजीराजांनी राज्य हातात घेतल्यावर या पद्धती परत बंद केल्या, ज्या पेशवाईत छत्रपती शाहुमहाराजांनी पुन्हा चालु केल्या.
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार !
पण प्रतिक्रिया नाहित याचा अर्थ कुणाला तो लेख नीट समजलाच नाही की माझ्या लेखातच काही कमी आहे अशी शंका मला खूपच भेसडावत होती इतके दिवस , पण आपल्या सर्वांच्या प्रतिसादाने ती शंका दूर पळून गेली आहे आता !
पुन्हा हुरूप आला आहे लिहिण्याचा !
प्रतिसादावर लिहिण्यासारखे खूप काही आहे पण वेळ कमी आहे , म्हणून इथेच थांबत आहे.
सप्रेम
प्रतिक्रिया
एव्हडा मस्त लेख
अगदी असेच म्हणतो..
लेख पूर्ण वाचून भानावर
इतिहास आणि साहित्य
काय सांगू?
क्या बात हे
झंझावात
शब्द कमी पडतायत अभिप्राय देण्यास.
अप्रतिम
अप्रतिम
आभार