Skip to main content

पाऊस

लेखक प्रमोद देर्देकर यांनी रविवार, 14/06/2020 16:15 या दिवशी प्रकाशित केले.

! पाऊस !

नभ आलं अंधारुन वाराही झाला बेभान टप टप टपोर्‍यांची झाली भुमीवर पखरण,

जाणुनी भेटी लागी आस भुमी कुशीत घेई त्यास मृदगंध तो दरवळे लागे एकमेका सहवास,

थेंब कुशीत हो निजला रोपें अंकुर हो धरला नवथर अवनीने शेला हिरवाईचा हो ल्याला,

वीज कडाडुन घेई तान रानी मोरपंखी कमान ढवळ्या पवळ्याच्या हो घुंगरांसंगे शेते नांगरु वेगानं,

आला पाऊस पाऊस वारा सांगे दाहो दिशांनी धान पेरा रे धान पेरा बळीराजाच्या हो कानी बळीराजाच्या हो कानी.

लेखनविषय:

वाचने 3869
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

थेंब कुशीत हो निजला रोपें अंकुर हो धरला नवथर अवनीने शेला हिरवाईचा हो ल्याला,
मस्त.. हा नविन format कसा केलाय?

आणि मी जे CSS box shadow चे उदाहरण दिले होते त्याचा कल्पक वापरही.

हिरवा शेला ल्यालेली ही पाउस कविता आवडली पैजारबुवा,

वाह!