Skip to main content

भेट .....

लेखक फिझा यांनी सोमवार, 01/06/2020 06:03 या दिवशी प्रकाशित केले.

भेट .....

सागर गोटे अन भातुकली
आठवते का ग आता ?
किनाऱ्यावर गोळा केलेले शिंपले
असतील अजून पण ......

तुझ्या वहीतल्या पहिल्या
पानावर माझे नाव लिहिताना
किती खाडाखोड ? ...पहिल्याच ओळीत !
आणि नंतर, पान भरून लिहिलेलं ... !

जेव्हा पुन्हा भेटशील तेव्हा
'ती वही' घेऊन ये .....
पानावरची 'तारीख ' सोडली तर ...
अजून काही जसंच्या तसं शिल्लक आहे का
हे तपासून पाहूया ......

नसेल तर .........

तर .....
मला कसलेही प्रश्न नको विचारू ... ... !
तुझ्या मनातल्या प्रश्नांपेक्षा ....
माझ्या डोळ्यांसमोर उभे असलेले प्रश्न .....
खूप मोठे असतील कदाचित .......

एवढंच समजून घे ........ नेहमीसारखेच !

अन ,
'ती वही', तू अजूनही जपली आहेस ,
हाच दिलासा घेऊन परत निघेन मी ......

...........नेहमीसारखीच !

........ फिझा

लेखनविषय:

वाचने 5870
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

'ती वही', तू अजूनही जपली आहेस ,
हाच दिलासा घेऊन परत निघेन मी ......

वा वा.. काय लिहिले आहे..
मनापासून आवडले..
----

अजून सगळे तसेच आहे त्या वहीत...
तूझी लिहिलेली फुलाची कविता हि तशीच...

शेवटच्या पाणावर, तू 'आते जाते हसते गाते ' लिहिलेलं
अजून वाचतो मी, तुझ्या नावासहित...

तू जाणार त्यावेळी.. चित्र तुझे मी काढलेलं..
अजून तसेच आहे, तुझ्या सुगंधा सहित...


आवडली कविता. लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे


ती वही आणि त्यातील पाने

ते क्षण आणि तो इतिहास

तू दिसलीस कि पहिले हात बघतो

हातात ती डायरी तर नाही ना

हसतो असाच आव आणून

पळ काढतो शोधून बहाणा

आजही मला आमची विचारते

ती भेटली कि तुमची हातभर का फाटते ?

मी पुन्हा हरवतो त्या इतिहासात

पुन्हा मला ती डायरी दिसते