मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेम..

मन्या ऽ · · जे न देखे रवी...
काव्यरस
प्रेम.. प्रेम म्हणजे अथांग सागर प्रेम म्हणजे वाळवंटातील मृगजळ ज्याने तहानलेल्याची तहान काहीकेल्या भागत नाही प्रेम म्हणजे विश्वास प्रेम म्हणजे आपुलकी जो वेळप्रसंगी माणुसकीला जागलेच असे नाही प्रेम म्हणजे अटी प्रेम म्हणजे बंधन जे माणसाला एक माणुस म्हणुन वागवत नाहीत मुक्तपणे जगु देत नाही तरीही हे प्रेम वाटे मजला हवेहवेसे ते प्रेम जे एकमेकांच्या अबोल गोड शब्दांचे एकमेंकाच्या साथीचे समोरच्याच्या मंद गुढ हास्यातले ते प्रेम जे आयुष्यात देवघरातल्या नंदादिपाप्रमाणे अखंड तेवणारे स्वतः जळून काळोख मिटवणारे -दिप्ती भगत (२०जून,२०१९)

वाचने 9311 वाचनखूण प्रतिक्रिया 15

मोगरा Wed, 06/03/2020 - 00:36
तरीही हे प्रेम वाटे मजला हवेहवेसे ते प्रेम जे एकमेकांच्या अबोल गोड शब्दांचे एकमेंकाच्या साथीचे समोरच्याच्या मंद गुढ हास्यातले मस्त

मन्या ऽ Fri, 06/05/2020 - 09:44
अत्रुप्त आत्मा, मोगरा, अशोक, प्राजक्ता आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासुन धन्यवाद! वाचकांचे आभार! :)