✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दास

क — क्रान्ति, Wed, 04/01/2009 - 20:21

प्रतिक्रिया द्या
3461 वाचन

💬 प्रतिसाद (17)

जबरदस्त!!!!

प्राजु
Wed, 04/01/2009 - 22:09 नवीन
क्रांती... हॅट्स ऑफ!!! अप्रतिम लिहिले आहेस. कोणती ओळ जास्त आवडली हे सांगणं कठीण आहे... सगळ्याच ओळी..अप्रतिम आहेत. जियो!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

+१

शितल
Wed, 04/01/2009 - 22:15 नवीन
सहमत. तुमच्या कविता नेहमी खुप सुंदर असतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

सुंदर!

प्रमोद देव
Wed, 04/01/2009 - 22:14 नवीन
:) आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments

सुंदर

अनामिक
Wed, 04/01/2009 - 22:50 नवीन
सुंदर कविता! -अनामिक
  • Log in or register to post comments

रसग्रहण

मीनल
गुरुवार, 04/02/2009 - 00:00 नवीन
शिर्षक वाचूनच देवभाव असलेली कविता आहे हे कळत. कारण `दास`हा शब्दच ते दर्शवतो.पुढे कवितेते तो भाव अधिक उलगडत जातो. मनाला इतका ध्यास लागला आहे की कुठेही फक्त तू आणि तूच दिसतो आहेस.मन वेड झाल आहे तुझ्यासाठी. केवळ मनच नाही तर हे संपूर्ण शरीर हे माझ राहिलेले नाही. ते`तू`च बनले आहे. तू या शरीराचा प्राण बनला आहेस. आणि या मनात, मुखात तू सतत रहावास अशी इच्छा आहे. या जिवनात येणा-या कठीण प्रसंगाच्या वेळी तूझाच आधार असतो.माझ्या जवळपास तूझ अस्तित्व सदा जाणवत राहते.हे मुरलीधरा, त्यावेळी तूझी विविध रूपे डोळ्यासमोर साकारतात.तूझी सारी शक्ती आठवते आणि असा विश्वास देते की आता तूच एक तारणारा आहेस. हे देवा, मी तूझी/तूझा दास आहे. या दासाला तूझ्या चरणी जागा दे. सर्व परीचित अर्थाची पण उत्तम शब्दात बांधलेली भावनापूर्ण अशी कविता आहे. अष्टाक्षरीतल्या दुस-या आणि चवथ्या ओळीच्या शेवटी अक्षराचा यमक जुळलेला आहे. `तुझा`या शब्दच्या पुनरावृती मुळे `त्याचे` म्हणजे देवाचे (इथे तो श्री कृष्ण आहे) महत्व दर्शवून जातो.यात आपुलकी दिसते.तिथे 'आपला', किंवा 'तुमचा' हा शब्द वापरला असता तर आदर जास्त दिसला असता. या देवावर अतिशय श्रध्दा आहे,विश्वास आहे आणि वेळ प्रसंगी तोच राखण करेल अशी खात्री आहे. `माझ्यावर प्रसंग कोसळला आहे म्हणून तूझा ध्यास आहे आणि म्हणून तूझा धावा करते आहे' अस वाटत नाही कारण ती भावना व्यक्त करणा-या ओळी कवितीच्या मध्यावर आल्या आहेत. त्या जर सुरवातीला आल्या असत्या तर तसे वाटल असत. सुरवात होते ती मनाच्या स्थितीचे वर्णन करणारी -- 'तूझा न आवरता येणारा ध्यास, जळी-तळी `तूच तू` असण्याचा मनाला होणारा भास' या तून एक प्रकारचे पछाडले पण दिसते. आकर्षण दिसते. काही साध्य केले की त्याचा ध्यास नसतो, त्याचे आकर्षण रहात नाही. ती मिळेपर्यंत मात्र त्याचा ध्यास लागतो.अगदी असाच ध्यास असतो तो. 'ध्यास' या शब्दा मुळे मनात काही तरी कमी आहे अस वाटत. म्हणजे`तूच मनी, तू नयनी, प्राण तुझे, श्वास तुझा` अस असल तरी ही तूझा ध्यास मनाला लागला आहे. ही मनातली कमी पुढिल ओळी अधिक स्पष्ट करतात. 'नाम तुझे मुखी राहो, ध्यानी मनी तुझा वास राहो' यात तूझा विसर होईल,कदाचित ही स्थिती कायम राहणार नाही,, अशी भिती दिसते आणि म्हणून ते तस होऊ देऊ नकोस अशी विनंती आहे. मग कवितेत दिसतो तो देवावर संपूर्ण विश्वास आणि कवितेचा शेवट होतो लीन आर्जवाने. मनाला लागलेला देवाचा ध्यास,विनंती, श्रध्दा आणि आर्जव या टप्प्यात भावनापूर्ण कविता संपन्न झाली आहे. मीनल.
  • Log in or register to post comments

सुरेख..

प्राजु
गुरुवार, 04/02/2009 - 00:20 नवीन
मीनल.. सुरेख रसग्रहण केलं आहेस.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

+१

अनिल हटेला
गुरुवार, 04/02/2009 - 06:20 नवीन
उत्तम कविता आणी रसग्रहण !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

जबरा...

चंद्रशेखर महामुनी
गुरुवार, 04/02/2009 - 00:14 नवीन
यावर काय बोलु हे मला सुचत नाहि.. अप्रतिम... !
  • Log in or register to post comments

रसग्रहण

क्रान्ति
गुरुवार, 04/02/2009 - 06:05 नवीन
मीनलताई, खूप सुरेख रसग्रहण केलंस. अगदी तंतोतंत! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

कविता तर

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 04/02/2009 - 11:15 नवीन
कविता तर सुरेखच आणि मीनलचे रसग्रहण म्हणजे दुधात साखर ! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments

मस्त!

राघव
गुरुवार, 04/02/2009 - 11:30 नवीन
तूच मनी, तू नयनी, प्राण तुझे, श्वास तुझा नाम तुझे मुखी राहो, ध्यानी मनी वास तुझा हे खास! त्यात जर असे असेल तर? - राहो मुखी नाम तुझे, ध्यानी मनी वास तुझा राघव
  • Log in or register to post comments

कविता आणि

जयवी
गुरुवार, 04/02/2009 - 13:16 नवीन
कविता आणि रसग्रहण.... दोन्ही छान :)
  • Log in or register to post comments

खुप छान.

जागु
गुरुवार, 04/02/2009 - 14:34 नवीन
खुप छान.
  • Log in or register to post comments

आवड्ली :)

पल्लवी
गुरुवार, 04/02/2009 - 18:15 नवीन
कविता खूप आवडली :)
  • Log in or register to post comments

सुंदर कविता !

मनीषा
गुरुवार, 04/02/2009 - 19:50 नवीन
आप, तेज, वायु, धरा, सार्‍यांतच भास तुझा ... तूच मनी, तू नयनी, प्राण तुझे, श्वास तुझा नाम तुझे मुखी राहो, ध्यानी मनी वास तुझा .......खूपच छान !
  • Log in or register to post comments

दास

चन्द्रशेखर गोखले
गुरुवार, 04/02/2009 - 22:41 नवीन
सुंदर भवार्थ दिपिका.. साधी सरळ सोज्वळ कविता.. अभिनंदन !! इश्वर करो या सुंदर कवितेचे कोणी विडंबन न करो .
  • Log in or register to post comments

सुरेख

मदनबाण
Fri, 04/03/2009 - 04:38 नवीन
सुरेख कविता... :) मदनबाण..... मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी जालावरुन सभार...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा