लॉक डाउनच असाही परिणाम

Prajakta२१'s picture
Prajakta२१ in काथ्याकूट
29 May 2020 - 1:23 am
गाभा: 

माझ्या चुलतभावाने बाहेरुन कुलूप लावलेय

ऑफिसच्या WFH च्या गडबडीत (२ मॉनिटर,cpu आणि सामान घेऊन यायच्या घाईत )मी आमच्या जुन्या घरी आले (तिथे range पण चांगली मिळते म्हणून पण ) माझे घर दुसरीकडे आहे जिथे माझे पेरेंट्स आणि बहीण राहते पण त्या वेळेस कामाच्या घाईत हे जवळ म्हणून इकडे आले
इकडे माझे काकाकाकू (ज्ये ना ) आणि मी'दोन वेगवेगळ्या घरात पण एक कॉमन दार आणि एंट्रन्स असे राहतो माझा चुलत भाऊ थोडे जवळच दोन बिल्डिंग सोडून वाहिनी भाच्यासोबत राहतो काका काकूंची जेवण्याची सोय तो करतो (तीन वेळेला डबे आणून देतो ) आणि इकडे machine मध्ये त्या सर्वांचे कपडे काका धुतात (mutual अडजस्टमेन्ट ) आमचे स्वैपाकपाणी वेगळे आहे (माझे मी करते त्यांचा डबा येतो) आमच्या घराला मागून एक जिना आहे पण तिथून ये जा करणे सुरक्षित नाहीये (त्याला लागून असलेलया चाळीतले मागे सांगितल्याप्रमाणे खोकत,शिंकत असतात म्हणून आणि इतरही कारणांनी ) सुरक्षिततेच्या दृष्टीने मागचे दार कुलूपबंद केले आहे त्यामुळे मला काकांच्या घरातून ये जा करावी लागते तसेही इतके वर्ष एक कॉमन एंट्रन्स म्हणूनच सगळे वापरायचे
सध्या लॉक डाऊन च्या काळात त्याचे आणि काका काकूंचे वाजत असते सारखे म्हणजे तोच दटावत असतो आणि ते निमूटपणे ऐकत असतात असो तो त्यांचा वैयक्तिक विषय
माझे काका ज्ये ना असून त्यांना घरी बसवत नाही म्हणून ते सारखे बिल्डिंगच्या खाली जाऊन थांबायचे त्यांना दम्याचा त्रास आहे ते या बाबतीत त्याचे ऐकत नव्हते आणि त्याची नजर चुकवून खाली जाऊन इतरांशी गप्पाटप्पा करायचे तर त्यांना रोखण्यासाठी माझ्या भावाने घराला बाहेरून कुलुप घातले आहे आणि माझी अडचण केली मी ३-५ दिवस किन्वा आठवड्याने सामान आणण्यासाठी बाहेर पडते (काका रोजच थोडा वेळ खाली जायचे आत्ता आम्ही तिघे कुलूपबंद आहोत) आणि हे पण मला रविवारी सामान आणण्याच्या वेळेस त्यांनी सांगितले मला जर बाहेर जायचे असेल तर त्याला फोन करून बोलवायचे आणि नंतर मी जायचे
काकांसाठी त्याने हे केले म्हणून मी काही बोलले नाही पण काल आणि आज एकंदर असे वाटले कि त्याने हे मुद्दामून माझी अडचण करण्यासाठी केले कि काय काकांचे नाव पुढे करून
काल त्याने माझ्या भाच्याला (वय-७वर्षे )एकट्यालाच इकडे दुपारी असेच पाठवले होते
तसेच रोज तो सकाळी ८-८. ३० दरम्यान येतो तेव्हा मी पर्वा दूध आणि इतर सामान घेऊन यायला वेळ लागला तर ओरडत होता
आज तो सकाळी ६. ४५ लाच आला जेव्हा मला दुकाने उघडी नसल्याने आणि कचरा गाडी देखील अली नसल्याने बाहेर जाताच आले नाही
दुपारी किराणावल्याने काही सामान खालच्या एका काकूंकडे ठेवले तो डबा घेऊन आल्यावर ते आणता येईल ह्या बेताने मी तयार होऊन बसले तर तो मुद्दाम उशिरा आला आणि किल्लीच आणली नाही शेवटी त्यांचा डबा खिडकीतून येईना आणि मलाही जायचे म्हणल्यार परत त्याने जाऊन किल्ली आणली आणि मग मी सामान घेऊन आले तेव्हा तो म्हणाला कि मी सारखे फोन केल्यावर येणार नाही त्याच्या यायच्या वेळेस च मी जायचे आणि आदल्या दिवशी त्याला फोन करून सांगायचे काही असले तर मी बर म्हटले (अडला नारायण गाढवाचे पाय धरी करणार काय शेवटी ?)
नंतर मी माझ्या घरात आले असता काकू त्याला बहुतेक माझ्याबद्दलच सांगत होती कि ती ३-४ दिवसात जाते किंवा तिला सामान द्यायचे का तर तो म्हणाला कि आपला काही संबंध नाही तिलाच अड्जस्ट करावे लागेल
लॉक डाऊन सुरु व्हायच्या काळात पण त्याने असाच त्रास दिला होता तेव्हा बाबांनी त्याला मलापण डबा देण्यास सांगितले असता तेव्हाही त्याने तिचे ती करेल/बघेल असे सांगितले होते आणि मुद्दामून इकडच्या दाराने ये जा करण्यास सांगितले होते पण आम्ही सुरक्षिततेचे कारण सांगून आणि मी तशीही रोज बाहेर पडतच नाही म्हणून कॉमन एंट्रन्स चालू ठेवला होता पण आत्ता काकांचे कारण पुढं करून तो मुद्दामून त्रास देत आहे आणि काका ऐकत नव्हते म्हणून काही बोलताही येत नाहीये लॉक डाऊन उठून माझ्या घरी जायला मिळेल म्हणून वाट बघतीये तर आमचा भाग containment झोन आणि रे झोन असल्यामुळे कठीणच होतेय आणि WFH चा पसारा घेऊन जाणे अवघडच आहे नाहीतर नोकरीवरून सुट्टी घ्यावी सरळ
आज ह्या सगळ्यामुळे फार ताण येऊन शेवटी मी कामावरून सुट्टी घेतली
घरी आई बाबांना फोन करून सांगत असते पण त्यांना ताण यायला नको बाबा त्याला फोनवरून झापतात पण त्याने परिस्थिती अजूनच बिघडते
लहानपणी एकत्र कुटुंब असताना माझ्या आईने त्याला असेच कशावरून तरी थोडेसे मारलं (पूर्वी एकत्र कुटुंबात ह्या गोष्टी कॉमन होत्या) आणि माझी आई नोकरी करणारी आणि काकू गृहिणी त्यामुळे मिळणाऱ्या सोयी सवलतीत फरक ह्या सगळ्याचा सूड तो आत्ता उगवतोय असे वाटतेय
काय करावे क्या परिस्थितीत?
लोकडाऊनचा असाही फायदा उचलणारी मानसिकता बघायला मिळाली

प्रतिक्रिया

कुलुप बाहेरुन लावण्या ऐवजी आतुन लावा, व चावी तुमच्याकडे ठेवा.

बाहेरुन कुलुप लावणे अत्यंत धोकादायक आहे, जर आग लागली तर बाहेर पडता येणार नाही.

नाहीतर तुमच्या घराला दुसरा दरवाजा बनउन घ्या म्हणजे काकांच्या घरुन ये जा करायला नको.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2020 - 9:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>कुलुप बाहेरुन लावण्या ऐवजी आतुन लावा, व चावी तुमच्याकडे ठेवा.
चावी स्वतःकडे घेऊन ठेवा.

>>>>बाहेरुन कुलुप लावणे अत्यंत धोकादायक आहे,
होय. बाहेर कुलुप लावून जातोच कसा तो मूर्ख.

आणि शिस्तीत राहा म्हणून त्याला समजावून सांगा. मोठा आवाज करुन जमत असेल तर भांडा हो. (अंदाज पाहून)
किती गप राह्यचं माणसाने तरी.

-दिलीप बिरुटे

कुलुप बाहेरुन लावण्या ऐवजी आतुन लावा, व चावी तुमच्याकडे ठेवा.
आतुन कुलुप लावुन घ्यायला आतला माणुस तयार होइल का ? बरं चावी जर बाहेर दिली असणार असेल तर आगीचा धोका कमी कसा होइल ? बाहेरुन कुलुप लावले असेल तर एक वेळ ते तोडता देखील येउ शकेल्,आतुन लावले तर आणि चावीचा घोळ झाल्यास दरवाजा तोडण्या शिवाय दुसरा कोणताच पर्याय मिळत नाही.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Cheeni Kum Title Track... :- Cheeni Kum

माहितगार's picture

30 May 2020 - 9:50 am | माहितगार

इमर्जन्सी म्हणजे केवळ आग नव्हे, जगात इतरही इमर्जन्सी असू शकतात, शेजार्‍याच्या घराला आग लागली हि सुद्धा इमर्जन्सीच असते. किंवा ऐनवेळी श्वास घेण्यास त्रास होणे किंवा छाती दुखणे, हि केवळ उदाहरणे झाली इमर्जन्सी हजारो प्रकारच्या उद्भवू शकतात.

बाहेरुन कुलुप लावले असेल तर एक वेळ ते तोडता देखील येउ शकेल्,आतुन लावले तर आणि चावीचा घोळ झाल्यास दरवाजा तोडण्या शिवाय दुसरा कोणताच पर्याय मिळत नाही.

अहो मदनबाणरावजी हा कंचा घोळ हाय ? छातीत दुखले म्हणून डॉक्टरकडे पोहोचायचे असेल तर दार उघडायची व्यवस्था घराच्या आतल्या मंडळींकडे हवी की नको. आतून न उघडता येण्याच्या व्यवस्था या केवळ बालक आणि मतीमंदांसाठी मर्यादीत करता येते. कुलूप आतुन लावले काय किंवा बाहेरुन लावले काय किल्ल्या ऐनवेळी गहाळ होणे न मिळणे असे प्रकार होतातच त्यावर तुमच्या कुलुपास अधिक किल्ल्या हव्यात. कुलूप आणि दरवाजे आतुन बाहेरुन दोन्ही बाजूने तोडता येतात पण तो पहिला पर्याय नव्हे. सहसा घराच्या दरवाजाला आतून कडी लावणे पुरावयास हवे पण घरातली एखादी व्यक्ती झोपेत चालते, घरातील लहान मुलाला स्टूल घेऊन कडी उघडता येऊ लागलीए केवळ अशाच केसेस मध्ये आतून कुलूप लावण्याची गरज भासू शकते पण तेव्हाही तुमच्याकडे एका पेक्षा अधिक किल्ल्या उपलब्ध असणे अभिप्रेत असावे. सुज्ञ लोक विश्वासार्ह शेजार्‍यांकडे एखादी किल्ली देऊन ठेवतात. घरात कोंडवाड्याप्रमाणे माणसे कोंडलेली आहेत आणि किल्ली दोन बिल्डींगांपलिकडे आहे हा सुज्ञपणा नव्हे. असे कुणि गुरांशीही वागणार नाही.

कुणि किमान अंतर राखत नसेल तर एकदा नाही ह्जारदा सांगा पण कोंडवाड्याप्रमाणे कोंडण्यात काय हशिल आहे? समजा त्यांचा भाऊ तरुण पणी आईवडीलांचे न ऐकता स्मोकींग करत असेल तर आईवडील त्याला दिवसेन दिवस बाहेरून कुलूपात बांधून दोन बिल्डींगा पलिकडे राहण्यास जातील ? आईवडीलांचा जिव एवढा महत्वाचा आहे तर त्यांच्या सोबत जाऊन स्वतः रहावयाचे की ते तर त्यांच्या भावाला नको आहे करण्यासाठी.

आतुन कुलुप लावुन घ्यायला आतला माणुस तयार होइल का ?

कोणत्याही सजाण व्यक्तीने आतुन अथवा बाहेरुन कुलूप लावून घेण्याची सक्ती सहसा का म्हणून स्विकारावी? ते ही इमर्जन्सी मध्ये बाहेर पडण्यावर बंधने ओढवून घेऊन स्विकारावी? कमाल आहे?

कोरोना बद्दल किमान अंतरांचे पथ्य न पाळले जाण्याबद्दल मी सुद्धा कथा लिहीली ज्यात एक शेजारी दुसर्‍या शेजार्‍याशी किमान अंतर पाळत नाही पण फार फार तर कुणि कथा लिहिल किंवा डॉक्टरांमार्फत किंवा इतर कुणा मार्फत सुयोग्य गोष्ट करण्याची वारंवार विनंती करेल. समजा प्राजक्तांच्या भावाचे शेजारी किमान अंतर पाळत नसेल किंवा प्राजक्तांची वहिनी किमान अंतर पाळत नसेल किंवा प्राजक्तांच्या भावाचा बॉस किमान अंतर पाळत नसेल तर प्राजक्तांचे भाऊराया काय त्या सगळ्यांच्या घरांना बाहेरुन कुलुप लावणार आहेत ? ?

डझ इट रिअली मेक्स कॉमन सेन्स ?

माहितगार साहेब, माझा प्रतिसाद नेत्रेश यांच्या प्रतिक्रियेस आहे, कुलुप आतुन / बाहेरुन लावा,आगीचा धोका त्याने कमी जास्त होत नाही असे मला सुचवायचे होते.
मी कोणालाही कोंडुन ठेवण्याचे समर्थन अजिबात करत नाहीये...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Cheeni Kum Title Track... :- Cheeni Kum

स्वलिखित's picture

29 May 2020 - 5:32 pm | स्वलिखित

नाही म्हणजे कमाल आहे हो , आजची झाली तुमची कथा , नंतर त्याने काका काकुना सुद्धा असेच घरात कोंडणार नाही हे कशावरून ,

संजय क्षीरसागर's picture

29 May 2020 - 6:16 pm | संजय क्षीरसागर

आणि तिथून काम करा.

एका झटक्यात सगळे प्रश्न संपतील !

नावातकायआहे's picture

30 May 2020 - 8:52 pm | नावातकायआहे

सहमत!

रीडर's picture

31 May 2020 - 7:27 am | रीडर

+1

कानडाऊ योगेशु's picture

29 May 2020 - 6:33 pm | कानडाऊ योगेशु

तुम्ही नक्की कुणाच्या घरी राहताहेत. काका काकुंच्या घरात कि आजोबापार्जित घरात ज्यावर तुमच्या वडलांचा म्हणजे तुमचा सुध्दा अधिकार आहे?
त्यांच्याच घरात राहत असाल तर विनंतीशिवाय इतर फार काही करु शकाल असे वाटत नाही.

माहितगार's picture

29 May 2020 - 7:13 pm | माहितगार

१) वर कुणि म्हटल्या प्रमाणे इमर्जंसिं मध्ये काय करणार ? मागच्या कुलूपबंद दरवाज्याची किल्ली अलिकडे टेस्टकरून तुमच्या स्वतःकडे (व्यक्तिशः तुमच्याकडे काका/काकु नव्हे) आहे का ? नुसतीच किल्ली आहे पण कुलूपाला टेस्ट करुन पाहीले नसल्यास आधी टेस्ट करुन ठेवणे श्रेयस्कर असावे.

२) मागचा दरवाजा तुमचा आणि समोरचा दरवाजा काका काकुंचा अशी कायदेशीर वाटणी झालेली असल्यास तुम्हाला कायदेशीर दृष्ट्या स्वतंत्र मार्ग उपलब्ध असेल तर तुम्ही कायदा सहज दाखवू शकत नाही. (प्रत्येकवेळी माणूस कायद्याच्या भाषेत बोलत नाही पण कायदा माहित असणे श्रेयस्कर)

- समजा काही तांत्रिक कारणाने -भावनाधारीत कारणाने नव्हे- मागचा दरवाजा उघडत नसेल तर कायदा तुम्हाला काकाकाकुंच्या घरातन अ‍ॅक्सेसचा अधिकार देऊ शकतो .

३) तुमच्या भावाने कुलूप तुम्हाला लावू देऊन किल्ली आत तुमच्याकडे ठेवली तरचा प्रयत्न करुन पहावा हे अधिक श्रेयस्कर असावे. ते न जमल्यास

४) अगदी लॉकडाऊन काळातही पूर्व परवानगीने असुरक्षीत जागेतून बाहेर पडण्याचा अधिकारच नव्हे तर सुरक्षित स्थळी नेण्याची पोलीसांची जबाबदारी असते. हे लक्षात घ्या. अर्थात पोलीस व्यवस्थेवर आधीच ताण असताना अधिक ताण शक्यतोवर न टाकणे अधिक श्रेयस्कर पण पर्यायच नसेल - घरातून इमर्जन्सीत बाहेर पडण्याची व्यवस्था तुमच्याकडे नाही अशी स्थिती कधीच असू नये याचे महत्व लक्षात घ्या

५) काकुंशी बोलून पहा आणि किल्ली तुमच्याकडे ठेवण्याची व्यवस्था तरीही न होऊ शकल्यास पोलीसांना तुमच्या आईवडीलांकडे सुरक्षीत स्थळी पोहोचण्याच्या अधिकारांतर्गत सहकार्य मागू शकता. पोलीसांचे सहकार्य मिळाले नाहीतर वकीलाकडून पोलीसांना नोटीस देता येऊ शकते. पोलीसांना संपर्क करणार असल्यास आईवडीलांना पुर्वकल्पना द्या.

https://punepolice.in/ या संकेत्स्थळावर बाहेरपडण्याच्या विनंतीचे कारण देऊन त्यांचा परवानगी देणारा एसएमएस आल्यास तुम्ही तुमचेही बाहेर पडू शकता.

६) भावाला जुना राग वगैरे असेल असे पुर्वग्रह शक्यतोवर धरु नयेत. पुर्वग्रह मनात ठेऊन संवाद साधणे अधिक कठीण जाते. संवाद साधण्यापुवी सकारात्मक उत्तर येणारच नाही असे आग्रही पुर्वग्रह टाळणे सहसा श्रेयस्कर असते. वर कायद्याची माहिती दिली आहे पण माझ्या मते संवादाचा अभाव आहे. वर लिहीलेल्या कायदा आणि पोलीस विषयक बाबी विसरुन पुन्हा एक प्रेमळ भाऊ बहीण संवाद होऊन जाऊ द्या फार तर काकु आणि वहीनींशी भावूक न होता इमर्जंसीत बाहेर पडण्यास येणार्‍या अडचणी बद्दल बोलून पहा. तेवढ्याने न जमल्यास जेव्हा भाऊ बाहेर पडू देतो तेव्हा बाहेर परिस्थीती ढिली असेल आणि आईवडीलांकडे निघून येता येत असेल तर तसेही हरकत नसावे. पण ते सहज जमणारे नसल्यास पोलीस कायदा तुमच्यापाठीशी असणे अभिप्रेत असावे हे लक्षात घ्या.

उत्तरदायकत्वास नकार लागू

माहितगार's picture

29 May 2020 - 7:40 pm | माहितगार

१) भावाच्या घरी इंटरनेट आणि काँम्प्युटरची व्यवस्था असेल तर त्याला त्याच्या मुला सोबात अजून काही दिवस वडीलांसोबत राहुन काढ म्हणावे आणि तुम्ही वहिनी सोबत राहून काम करुन पहा तुमच्या भावाला तेवढीच वडीलांची जवळून काळजी घेता येईल आणि तुम्हालाही बदल :) (थट्टेत म्हणून तर पहा कदाचित मनमोकळा संवाद उघडणे कदाचित सोपे जाईल)

२) तुमच्याकडे टेस्ट झाल्यात का कल्पना नाही पण, सर्दी खोकला झालेल्यां आवाज करणार्‍यांना कोविड असेलच असे नाही, आणि बाहेर किमान अंतर न ठेवणार्‍या काकांना लक्षणे नसूनही कोविड असू शकेल. खोकल्याचा आवाज करणारी मंडळी परिचयाची असल्यास भेट म्हणून सूपची पाकीटे आणि भाजलेल डाळ/ डाळव (फुटाणे ) आणि मधुकंठ सारखी चघळण्याच्या टॅब्लेट्स भेट म्हणून पाठवून पहा.

सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद
@डॉ दिलीप बिरुटे सर -भांडण्याएवढाही संवाद नाहीये भांडणातून काहीतरी पेटायला नको अजून
@कानडाऊ योगेषु -पूर्वी वाड्यातले घर असताना एकत्र होते नंतर ownership चे दोन वेगळे फ्लॅट आहेत पण मध्ये एक दार आहे
@माहितगार सर-सर्व बाबींचे मार्गदर्शन केल्याबद्दल खूप धन्यवाद सध्या मागच्या दाराची किल्ली हरवलेली आहे आणि एकंदर सुरक्षिततेच्या दृष्टीने ते बंदच होते आणि आहे संवादाचा फारच अभाव आहे आणि सगळ्यात भाऊच dominate करतो काकू वाहिनीशी बोलले तरी तेवढ्यापुरते बोलले तरी निर्णय भावाच्याच हाती राहणार आहे काकूने आणि इतरांनीही सुचवून झाले आहे पण उपयोग नाही
संवाद संपलेला आहे जरी गोड बोलले किंवा प्रेमळ संवाद झाला तरी कृतीतून फरक दिसणार नाही करायच्या वेळेस करायचे तेच करणार पूर्वग्रह नाहीचे मनात पण त्याच्या प्रत्येक कृतीतून जाणवते
@नेत्रेश,अलिखित,संजय क्षीरसागर सर -मार्गदर्शनबद्दल धन्यवाद . हो घरी जाण्याचेच ठरवत आहे पण WFH चा पसारा घेऊन जाणे manage करावे लागेल
माझे काका शांतच बसून आहेत त्यांनी काहीच विरोध केला नाही कधी कधी वाटते कि त्यांनी हि वेळ ओढवून आणली घरी शांत बसले असते तर त्याने कुलूपबंद केले नसते
आलीय भोगासी असावे सादर

संजय क्षीरसागर's picture

30 May 2020 - 12:37 pm | संजय क्षीरसागर

शाब्बास !

> पण WFH चा पसारा घेऊन जाणे manage करावे लागेल

इतर त्रासांपुढे ते काम गौण आहे.

शिवाय घरच्या वातावरणात आणि जेवणामुळे तुमचा उत्साह वाढून काम चांगलं होईल.

चौकस२१२'s picture

30 May 2020 - 10:17 am | चौकस२१२

आलीय भोगासी असावे सादर
याच्या पलीकडले आहे
चुलत भावाबरोबर बोलू नाही शकत? काकांना तुम्ची अडचण नाही सांगू शकत? जर त्यांनी बाहेर पडणार नाही हि हमी दिली तर तुमच्या कडे किल्ली दिली गेली पाहिजे
? तुम्ही दोघेही सज्ञान आहात असे बाहेरून कुलूप लावून तुम्हाला तो परावलंबी नाही करू शकत
तुम्हाला तुमचं वेळे प्रमाणे बाहेर जाता आलेच पाहिजे
पण अडचण सगळ्यांचीच आहे हे हि खरे
काका ऐकत नाहीत बाहेर जातात म्हणून त्यांचं मुलाने हा उपाय केला त्यात त्याची चूक नसेलही
चुलत भावाला तुम्ही सांगाल तेव्हा येता येईलच असे नाही .. ते हि बरोबर

एकाच उपाय , हा सगळा प्रश्न मुळात काकांच्या ना ऐकण्याचं स्वभावामुळे निर्माण झालेला दिसतोय
फ्लॅट तुमचाच आहे ना मग यावर एकच तोडगा
१) सगळ्यांशी एकदम बोलण्याचा प्रयत्न
२) सदनिका आपलीच असेल तर हककने भावाला सांगणे कि "काका ऐकत नाहीत " हा प्रश्न त्यांच्या कुटुंबाचाच आहे आणि तो त्यांनी सोडवायचा त्यासाठी मला वेठणीला धरू शकत नाहीस
३) शक्य असल्यास एक एक करून वर्क फ्रॉम होम सामान वडिलांच्या घरी नेने
४) काहीच नसेल तर वडील किंवा इतर लोकांमार्फत मध्यस्थी करणे

माहितगार's picture

30 May 2020 - 12:16 pm | माहितगार

कंटेनमेंट एरीआ असल्यामुळे सामान बहुधा एकाच झटक्यात न्यावे लागेल. फार फारतर सामान उचलण्यासाठी आणि ट्रान्सपोर्टसाठी कुणाचे तरी सहकार्य मिळवावे लागू शकते.

शेखर's picture

30 May 2020 - 12:04 pm | शेखर

तुमच्या ह्या लेखाची लिंक तुमच्या भावाला आणी नातेवाईकांना पाठवा किंवा कौटुंबिक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप वर टाका...

माहितगार's picture

30 May 2020 - 12:12 pm | माहितगार

मलाही हेच सुचले पण तसे स्पष्ट लिहावे की नाही या विचारात होतो. दोन्ही होऊ शकते शहाण्याला शब्दाचा मार बसेल किंवा एखादा चारचौघात चर्चा का केली म्हणून रूसेल.

तो शहाणा आहे असे समजायचे.... आणी समजा रुसला तरी ह्या पेक्षा वाईट काय होईल.... असेही त्या नात्यात आता काय गोडवा उरलाय...

Prajakta२१'s picture

30 May 2020 - 7:20 pm | Prajakta२१

नवीन प्रतिसाद आणि मार्गदर्शकांना धन्यवाद

ह्यामागची एक पार्श्वभूमी अशी आहे कि त्याने डिसेंबर २०१९ मध्ये २ bhk फ्लॅट विकत घेतलाय (त्या सर्वांनी एकत्र राहण्यासाठी )आणि तिथे सजावटीचे वगैरे काम चालू होते
भाच्याच्या परीक्षा संपून त्याच्या उन्हाळी सुटटीत (म्हणजे या एप्रिल/मे ) मध्ये ते सगळे तिकडे शिफ्ट होणार होते आणि इथे त्यांच्या इकडच्या म्हणजे आत्ता मी राहतेय त्या घरात रेंट वर मुले ठेवणार होते एक मुलगा एक आठवडा PG राहत पण होता
पण नेमके जानेवारीत आमच्या इथे रस्त्याचे काम निघाले आणि नंतर करोनामुळे लॉक डाऊन ह्यामुळे तिकडे जाणे लांबले आहे आणि तो मुलगा पण त्याच्या गावी निघून गेला
म्हणून आत्ता त्याचे frustration असे निघत आहे बाहेरच्या परिस्थितीचे काही भान नाही उलट ह्यांचा सूड कसा घेता येईल ते बघायचे आणि ती बाजू बघितली तरी माझ्या बाबांनी त्यांना मदत केली आहे आणि आम्ही पण काकूंच्या काड्यांवरुन बाबांचा मार खाल्लाय
आजच सामान आणण्यासाठी त्याला दहा सव्वा दहाला फोन केला असता नाही येणार म्हणाला (दुकाने १० वाजता उघडतात आणि तो सकाळी ८ च्या सुमारास येतो )साडेबाराला आल्यावर जा म्हणाला मी बरे म्हणाले आणि साडेबाराला तो आल्यावर मला एक तास लागणार आहे असे सांगून निघाले त्याने तणतण केली पण मी एका तासाने परत आल्यावर हे चालणार नाही असे म्हणाला आणि तिकडच्या जिन्याने जा ये करण्यास सांगितले आहे (नाहीतर मग आदल्यादिवशी फोन करून पुर्वकल्पना द्यायची जाण्याबद्दल)
रोज नवनवीन variations निघतात त्याचे आईवडील काहीच बोलत नाहीत म्हणजे एकंदरच काकांचे नाव पुढे करून आम्हाला हाकलवण्याच्या हालचाली चालू आहेत
त्यामुळे मी तरी इथे आहे असे वाटते आम्ही कोणी नसताना घराचा काही कारभार केला नाही म्हणजे मिळवली

कानडाऊ योगेशु's picture

31 May 2020 - 8:22 pm | कानडाऊ योगेशु

त्यामुळे मी तरी इथे आहे असे वाटते आम्ही कोणी नसताना घराचा काही कारभार केला नाही म्हणजे मिळवली

मला ही असे वाटले होते पण अगदी वैयक्तिक झाले असते म्हणुन लिहिण्याचे टाळले. आता तुम्ही लिहिलेच आहेत म्हणुन लिहितोय. अगदी एकता कपूर सिरियल स्टाईल मधल्या दुष्ट पात्रांसारखा विचार केला तर असे वाटले कि तुम्हाला तिथुन सहजगत्या पिटाळण्याचा डाव असु शकतो. उद्या ह्या सर्व समस्या पाहिल्या तर तुम्ही स्वस्तात तुमचा फ्लॅट विकायला काढाल व काकांची फॅमिलीच तो विकत घेतील. मला वाटते ह्या सर्व प्रकारात तुमच्या काकांचे मूक अनुमोदन असावे. तुम्ही एक परिक्षा घेऊ शकता. जर काकांना उठसूठ खाली जायची एका व्यसनाधीन माणसाप्रमाणे सवयच आहे तर तुम्ही तुमच्या फ्लॅटचा दरवाजा उघडला तरीही ते जातीलच. सर्व खबरदारी घेऊन तुम्ही तुमच्या फ्लॅटचा दरवाजा चालु करा आणि पाहा. जर काकांना खाली जायची उबळ आलीच नाही तर ह्याचा अर्थ सर्वजण व्यवस्थित आपल्या भूमिका पार पाडताहेत. (काही चुकीचे लिहिले आहे असे वाटल्यास आगाऊ माफि.)

चौकस२१२'s picture

31 May 2020 - 7:16 pm | चौकस२१२

आम्ही कोणी नसताना घराचा काही कारभार केला नाही म्हणजे मिळवली
प्राजक्ता हे फारच गंभीर होत चाललंय .. आपण का सहन करताय?
खडसावून का नाही wicharta?
किंवा जसे आपण येथे अनोळखी लोकांसमोर व्यथा मांडलीत तसे प्रथम आपले आई वडील, काका काकू आणि नंतर इतर नातेवाईक यांचेकडे का नाही बोलत?

चौकस२१२'s picture

31 May 2020 - 7:19 pm | चौकस२१२

चुलत भावाचा हा जर दावा असले कि काका ऐकत नाहीत म्हणून मी बाहेरून कुलूप लावतोय तर त्याला म्हणावं कि ठीक आहे तसे असेल तर मी घेते ती जबाबदारी
आणि दुसरा असे कि दर्वाजावंचे स्वरूप / कुलूप कसे आहे म्हणजे लॅच कि कडी कोयंडा ?

Prajakta२१'s picture

31 May 2020 - 11:03 pm | Prajakta२१

@कानडाऊ योगेशु - आमचे दार उघडले तरी ते तिकडून ये जा नाही करणार तशी त्यांना काही गरजच नाही आमचा एंट्रन्स मागच्या बाजूने आहे
सर्वसाधारणपणे फ्लॅटची रचना म्हंटले तर २ bhk (४ खोल्या)अख्खा किंवा मधले दार लावले तर २ वन RK वेगवेगळे अशी आहे
आणि आत्ता वेगवेगळे असल्यामुळे ते तिकडून येऊन इकडून जायची काहीच गरज नाहीये,ते तसे काहीच करणार नाहीत
मागच्या जिन्याच्या खाली एक कॉमन टॉयलेट आहे आणि बिल्डिंग च्या खाली राहणारे एक मारवाडी कुटुंब ते वापरते ते बऱ्याचदा लॉक नसते
त्यामुळे तिथून ये जा नको वाटते आणि ladies च्या दृष्टीने पण तिथून ये जा सोयीस्कर /safe वाटत नाही
माझ्या बाबांना ते तिकडूनच ये जा करायला लावतात पण आम्ही ladies म्हणून आम्हाला इकडची परवानगी आहे
@चौकशी २१२-कुलूप- कडीला गोल कुलूप किल्ली आहे latch नाहीये कडी कोयंडा type
नातेवाईकांत सांगितले आहे पण काकांसाठी (काकांचे नाव पुढे केले ते सारखे खाली जातात ) म्हणून त्याने ते केल्याने कोणी काही objection घेत नाहीये आणि काही काही जण मागच्या बाजूने ये जा करायला सांगत आहेत किंवा मग सरळ तिकडे निघून जाणे (तिकडे जाण्याची दुसरी बाजू हि अशी आहे जी फक्त आम्हालाच माहितीये म्हणूनच कोणाचातरी वावर आहे हेच बरे असे वाटते एकदंर घराची रचना अशी आहे कि त्यांच्या पुढच्या दोन खोल्या सहजी भाड्याने जाऊ शकतात पण आमच्या खोल्या भाड्याने जाणे थोडे अवघड आहे आणि अख्खा फ्लॅट भाड्याने देऊन/विकून येणारे उत्पन्न निम्मे घेण्यास तो तयार नाही आणि त्याच्या प्रामाणिकपणाचा विश्वास नाहीये )

संवाद नाहीये आज एक तास गेले तर हे चालणार नाही असे म्हणाला त्यामुळे आतून कुलूप लावून मला किल्ली देणे फार लांबची गोष्ट आहे

प्रतिसादांबद्दल धन्यवाद

असो अरेबियन सुरस कहाण्यांपेक्षा चमत्कारिक कहाणी आहे

कानडाऊ योगेशु's picture

31 May 2020 - 11:13 pm | कानडाऊ योगेशु

आमचे दार उघडले तरी ते तिकडून ये जा नाही करणार तशी त्यांना काही गरजच नाही

इथे प्रश्न गरजेचा नाही. काकांच्या सवयीला लगाम लागावा ह्यासाठी त्यांच्या फ्लॅटचे दार बाहेरुन लॉक केलेले असते ही गोष्ट कितपत खरी आहे ह्याची शहानिशा करण्याचा उद्देश आहे. कारण काकांना जर बाहेर जाऊन गप्पाटप्पा करण्याचे व्यसन असेल तर ते तुमच्या फ्लॅटचे दार आता उघडलेले पाहुन नक्कीच तिथुन खाली जायचा प्रयत्न करतील. जर तसे करतील तर तेव्हा तुम्हीच सांगु शकाल कि इथुन जाणे तितके सेफ नाही वगैरे. जर तरीही नाही गेले तर नक्कीच काकांची त्यांचा मुलगा जे काही करतोय त्याला मूक संमती आहे असे समजायला वाव आहे.

आपल्या लक्षात आले नाहीये कदाचित मागचा दरवाजा हा बॅकयार्ड type आहे
मागचा दरवाजा हि एक राखीव टाईप सोय म्हणून केली होती आणि सगळे एकच दार वापरत होते पुढचे एकत्र कुटुंब असल्यामुळे पण नंतर वेगवेगळे होत गेले
त्याचे लग्न झाले तसे त्याने प्रथम माझ्या बाबांना मागच्या दाराने ये जा करावयास भाग पाडले पण लेडीज साठी म्हणून आमचे main एंट्रन्स ने चालू ठेवले
नंतर आम्ही दुसरीकडे शिफ्ट झालो तसे त्यांच्या दोन खोल्यांचे renovation केले आमच्या अनुपस्थितीत काही भलतेसलते करायला नको म्हणून इथे आमच्यापैकी कोणी ना कोणी तरी असलेलेच बरे आणि आत्ताच्या WFH च्या गडबडीत ऑफिसपासून हे घर जवळ म्हणून मी इकडेच आले
पण मागे हे सगळे विचार पण कुठेतरी होतेच
मागचा दरवाजा हा बॅकयार्ड type आहे त्यामुळे तो उघडला तरी काका तिकडून नाही ये जा करणार हे निश्चित

चौकस२१२'s picture

1 Jun 2020 - 5:41 am | चौकस२१२

आत्ता उलगडा झाला कि हे घर एकच आहे केवळ दोन भाग केलं आहेत दोन स्वतंत्र " टायटल " नाहीये आणि ते आपल्या वडिलनचं आणि काकांचं नावावर आहे किंवा आजून ते आजोबांच्या नावावरच असेल ..बरोअबर ना
तसे असेल तरीही सध्या तो तुम्हाला असा परावलंबी नाही करू शकत . पण आपला प्रश्न फक्त सध्या पुरता नाहीये तर आपली भीती तो घर बळकावले कि काय हे दिसतंय ..
संवाद नाही तर आपल्या वडिलांमार्फत किंवा इतर तरुण नातेवाइकांमार्फत गदारोळ करता नाही का येणार
?
दूरदृष्टीतेने तर वाटणी हाच एक उपाय...
पण एकूण अवघड आहे परिस्थिती कोणी ओळखीतील वकील आहे का ?

माहितगार's picture

2 Jun 2020 - 12:26 pm | माहितगार

...आणि ते आपल्या वडिलनचं आणि काकांचं नावावर आहे किंवा आजून ते आजोबांच्या नावावरच असेल...

दोन्ही कुटूंबे रहाणार नाहीत तर रॅशनल मार्ग एकाच किंवा वेगवेगळ्या मालकांना सेल ऑफ करणे होऊन जावयास हवे होते. एकमेकांना पाडून दोघांनाही घरांचे रेट कमी येण्याची शक्यता असू शकते.

काका आणि वडील आधीच्या पिढीतले एकीकडे भाऊ बंदकीपासून मनाने दूर पण आपापल्या घरातील दबावाने झाकली मुठ सव्वालाखाची मोड मध्ये असण्याची शक्यता असू शकते.

असो, एकुण लॉकडाऊन मध्येच कडमड्ल्याने कौटुंबीक कथेला लहानसे उपकथानक मिळाले. 'ज्याचे त्याचे सहन करणे ज्याचे त्यालाच कळते'

त्रयस्थ मिपाकर मिळून प्राजक्ता आणि समस्त कुटुंबीयांना सगळे सुखरूप पार पडून सुखांतिका होवो ही शुभेच्छा देऊया.

@चौकस २१२- नाही टायटल क्लिअर आहे नॉर्मल परिस्थितीत वाटणी किंवा त्यांचे घर भाड्याने देऊन आम्हाला इकडून ये जा करणे एकवेळ ठीक होते पण आत्ताच्या परिस्थितीत देखील असे वागणे खटकले म्हणून लेखनप्रपंच आपल्याला मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद
@माहितगार सर-<<<काका आणि वडील आधीच्या पिढीतले एकीकडे भाऊ बंदकीपासून मनाने दूर पण आपापल्या घरातील दबावाने झाकली मुठ सव्वालाखाची मोड मध्ये असण्याची शक्यता असू शकते. >>>.थोडेफार असेच आहे माझे बाबा वेगळे होण्याच्या विरुद्ध आहेत त्यांना एकत्र कुटुंब ठेवायचे होते
काका आपली सोय जिथे होईल तसे त्यांचा कसलाच आग्रह नाही आत्ता मुलगा म्हणेल तसे,मुलाच्या हाती सर्व सूत्रे. एकत्र असण्यातून वेगळे होण्याची प्रक्रिया
सहजसुलभ नाही झाली

असो, एकुण लॉकडाऊन मध्येच कडमड्ल्याने कौटुंबीक कथेला लहानसे उपकथानक मिळाले. 'ज्याचे त्याचे सहन करणे ज्याचे त्यालाच कळते'>>>>धन्यवाद
लॉक डाऊन काळात देखील असे वागू शकतात ह्याचे सखेद आश्चर्य वाटले

सर्वांच्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
आणि सर्वांना शुभेच्छा

विजुभाऊ's picture

3 Jun 2020 - 7:28 am | विजुभाऊ

पोलिसात कम्प्लेन करा. सगळा प्रॉब्लेम संपेल
एकदाच काय होइल तो त्रास . त्य अनंतर एकदम सरळ होईल भाउ.
उगाच भीडे भीडे पोट वाढे .

माहितगार's picture

3 Jun 2020 - 8:18 pm | माहितगार

गीतेचे पाठ रोज वाचले किंवा अगदी ज्ञानेश्वरी लिहीली तरीही रामायणीय आदर्शांची मंडळींचा कृष्णायनीय आदर्शात परिवर्तन एवढे सहज साध्य नसावे, - न भेटता किंवा अनेक भेटीत किंवा सोबत राहूनही- लोकांना ओळखणे कठीण पण ओव्हरऑल माझ्या अंदाजाने भीड एक भाग झाला प्राजक्ता आणि वडीलांचे रामायणीय आदर्शांच्या मर्यादा हा दुसरा भाग झाला. आदर्शांच्या कंगोर्‍याचा एक परिणाम सहन करणे फार फार तर मनमोकळे करणे असते प्राजक्तांनी त्यांचे मन मोकळे केले बाकी त्यांचा संघर्ष त्यांनाच करावा लागणार असावा.

Prajakta२१'s picture

3 Jun 2020 - 10:04 pm | Prajakta२१

पुनःश्च एकदा धन्यवाद

काही केलेत यावर की अजून तीच परिस्थिती आहे

अजून नाही -आहे तीच परिस्थिती
सध्या तो घरात पण येत नाहीये खिडकीतूनच त्यांना डबा आणि धुण्याचे कपडे देतो (मागच्या रविवारी त्याला फोन करून सांगून गेले होते तरी पण आत्ता ह्या आठवड्यात मला जाता येऊ नये म्हणून कदाचित किल्लीच आणत नसेल )
पण माझ्या घरी जाण्याचेच ठरवत आहे आत्ता हळूहळू चालू झाल्यावर जाता येईल
बाहेरचे कुलूप काढण्याचे काही चिन्ह नाहीये कारण बाकी सर्व चालू झाले तरी काका ज्ये ना असल्याने त्यांचे नाव पुढे करून फायदा करून घेतलाय
लॉक डाऊन उठल्यावर त्याच्या नवीन जागेत जाण्याचे चालू होते बहुतेक त्यासाठीचीच तयारी आहे
आत्ता पासून कुलूप घातले असल्याने मग नंतर मला न सांगता बाहेरून कुलूप घालून त्यांना (काका काकूंना ) नवीन जागेत घेऊन जाण्याची पण शक्यता आहे
त्यामुळे इकडून बाहेर पडणेच क्रमप्राप्त आहे हाच एकमेव उपाय आहे त्यांना तेच हवेय पण जाऊदे आत्ता

इथे लिहून त्रास कमी झाला त्याबद्दल मिपाला आणि मिपाकरांना परत धन्यवाद
धन्यवाद

Prajakta२१'s picture

8 Jun 2020 - 12:12 am | Prajakta२१

अपडेट : आज मीटिंग झाली
आज त्याने माझ्या बाबांसोबत फोनवरून मीटिंग केली आणि जुलै च्या सुरवातीस ते सगळे तिकडे जाण्याचे सांगितले
त्यांच्या दोन खोल्या कठल्यातरी कुटुंबाला भाड्याने देणार असल्याने आम्हाला आमच्या मागच्या दरवाजाने ये जा करण्यास सांगितले आहे

त्यामुळे आत्ता जसे वाहतूक चालू होईल तसे तिकडे माझ्या घरी जायचे

काकांचे नाव पुढे करून हाच डाव होता हे अनुमान बरोबर ठरले (कुलूप घालण्यापाठीमागे )
इतकी वर्षे माझ्या बाबांचा फायदा घेतला आणि आत्ता स्वतःचे सगळे नीट settle झाल्यावर माझ्या बाबांना काहीच किंमत नाही ह्याचा त्रास होतो
आणि माझ्या बाबांना त्यांचेच बरोबर वाटते एकत्र कुटुंबात असताना बाबांनी त्यांचे बरेच केले पण तेव्हाही आणि आत्ता पण ते फक्त त्यांचा स्वार्थ बघत आहेत
मागच्या जन्माची देणी आहेत कि काय असे वाटते
ह्या जन्मात कर्मसिद्धांत खोटा पाडणारे इतके बघितले आहे कि खरेच भगवद्गीता ओव्हररेटेड आहे

चौकस२१२'s picture

8 Jun 2020 - 3:05 am | चौकस२१२

माफ करा प्राजक्ता पण जर काकांच्या मालकीच्या खोल्या त्यांना ( पुतण्याला) भाड्याने द्यायच्या आहेत तर हे सगळे उपद्व्याप कशाला केलं असते त्याने? तो त्यांचा हक्क असणार !
मुळात आधी हे स्पष्ट नाही कि हे दोन स्वतंत्र सनदीका आहेत का? कि सनदीका एकच आणि अशी अर्धी मालकी ?
काझी असो परंतु असे मोठ्या माणसाला ( तुम्हाला) कोंडून ठेवणे हे बरोबर नाही

हा खरा तर खासगी विषय आहे पण आपण उघडपणे मांडलेत म्हणून उघड पाने विचारत आहे .. आपण खमके पानाने विचारलात का य अमिटिंग मध्ये निदान तुमच्या बाबांना तरी

इट्स a बिट कॉम्प्लिकेटेड

२ स्वतंत्र सदनिका कागदोपत्री आहेत पण प्रत्यक्ष व्यवहारात एवढे स्वतंत्र नाही मधले दार असल्याने आणि प्रवेश दरवाजा पुढच्या साईडला असल्याने
वरती एका ठिकाणी म्हटल्याप्रमाणे म्हंटले तर २ bhk अख्खा किंवा २ वेगवेगळे १ RK असे कसेही वापरू शकतो (थोडी सोयीची आणि भावनिक बाजू)

प्रवेशद्वार--हॉल --kitchen --बाथरूम ---दार --परत एक हॉल /बेडरूम --त्याच्या डाव्या बाजूला अजून एक kitchen (या kitchen च्या मागच्या साईडला अजून एक बाथरूम ) अशी फ्लॅटची रचना आहे त्यात बेडरूम कम हॉल ला मागच्या बाजूने एक दार आणि जिना आहे

वरती बाकीच्या फ्लॅट्समध्ये हीच रचना २ BHK फ्लॅट सारखी आहे (जिना ,दार वेगळे kitchen नाही )

मीटिंग मध्ये मला सामील केले नव्हते आणि मीटिंग नावालाच खरे तर आमचे असे ठरले आहे आत्ता तुमचे तुम्ही बघा ये जा करण्याचे हे सांगायचे होते फक्त.
technically त्यांचे बरोबर आहे (मागे वेगळा दरवाजा असल्यामुळे पण तो वापरात नाही त्यामुळे अडचण वाटतीये ) पण ते कुठल्या परिस्थितीत आणि कशा पद्धतीने सांगितले आहे ते त्रासदायक आहे आणि अशा काळात कुलूप घालून ठेवणे आणि हिची मजा बघणे हा हेतू दिसतोय म्हणूनच लहानपणीच्या घटनांचा
सूड उगवल्यासारखेच आहे
नातेवाईकांत सांगितले असता त्यांनी पण मागून ये जा करण्याचा सल्ला दिला आत्ता त्यांचा मुलगा सर्व बघत आहे तर तुम्ही कशाला अजून त्यांच्यात अडकून आहात असे सगळे बाबांना समजावत आहेत
थोडे अवांतर -
माझ्या काकूला गुडघेदुखीचा आणि मधुमेहाचा त्रास असल्यामुळे तिला रात्री बेरात्री उठावे लागते कधी कधी झोपेत असल्यामुळे किंवा तोल जाऊन त्या पडल्या असत्या मलाच हाक मारून त्यांनी तिला उचलायला सांगितले आहे (मी आणि काका मिळून )आणि ह्यात काही गैर नाही
पण एकंदर आत्ताचे त्यांचे वर्तन पाहता आपण तरी कशाला त्यांना मदत करायची असे वाटते पण असे डेरिंग होणार नाही (काका काकू भावाला घाबरून असल्याने पडल्याची घटना त्याच्यापर्यंत पोचत नाही बरयाचदा )
सर्वांना प्रतिसाद आणि मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद

रातराणी's picture

11 Jun 2020 - 11:18 am | रातराणी

बापरे. भयानक आहे हे सगळं.

Prajakta२१'s picture

27 Jun 2020 - 12:47 am | Prajakta२१

मी माझ्या घरी आले आहे
आणि तिकडे ते सर्व पण त्यांच्या नवीन घरी शिफ्ट झाले आहेत
एक दिवस मी थांबले होते तेव्हापण सामान हलवताना मशीनचे पाणी सांडलेले तसेच ठेवले होते मी तिथून ये जा करणार म्हणून

कितीही दुर्लक्ष करायचे म्हंटले तरी मुद्दामून खोड्या काढणारे असल्यावर काय करणार?

जाऊ दे शेवटी ह्या सगळ्यावर पडदा पडला

सगळ्यांना परत एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा