ट्रम्प , ट्विटर , अभिव्यक्ती स्वातंत्र्य , पॉलिटिकल बायस आणि मिसळपाव

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in काथ्याकूट
28 May 2020 - 1:47 pm
गाभा: 

संदर्भः

ट्रम्प -
नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या काही ट्वीट्स वर फॅक्ट चेक मार्क लावला , अर्थात डोनाल्ड् ट्रम्प खोटे बोलत आहेत असे अपरोक्ष पणे सुचवण्याचा प्रयत्न केला.

t

अर्थातच ह्यावरुन डोनालड ट्रम्प ह्यांनी खालील प्रत्युत्तर दिले आहे :
Republicans feel that Social Media Platforms totally silence conservatives voices. We will strongly regulate, or close them down, before we can ever allow this to happen. We saw what they attempted to do, and failed, in 2016. We can’t let a more sophisticated version of that....

....Twitter is completely stifling FREE SPEECH, and I, as President, will not allow it to happen!

अर्थात रिपब्लिकन पार्टीला असे वाटते की सोशल मीडीया जाणीवपुर्वक त्यांचा आबाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे , असे असल्याने आम्ही त्यांचावर निर्बंध लादु किंव्वा त्यांना बंदच करुन टाकु .

ट्विटर विशिष्ट वर्गाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे , हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील घाला आहे आणि अमेरिकेचा अध्यक्ष म्हनुन मी हे कदापि होउ देणार नाही.

ट्विटर

ह्या वर ट्विटर चे सीईओ ह्यान्नी खालील मत दिले आहे :

"Fact check: there is someone ultimately accountable for our actions as a company, and that's me. Please leave our employees out of this. We'll continue to point out incorrect or disputed information about elections globally. And we will admit to and own any mistakes we make,"

अर्थात आम्ही सातत्याने काय चुक काय बरोबर काय विवादास्पद ह्याचा शोध घेत राहु आणि आमच्याकडुन चुका झाल्या तरी आम्ही त्या मान्य करु .

ह्यावर फेसबुक च्या झुकरबर्ग ने म्हणले आहे की - "I just believe strongly that Facebook shouldn't be the arbiter of truth of everything that people say online," . "Private companies probably shouldn't be, especially these platform companies, shouldn't be in the position of doing that."

अर्थात सत्य काय असत्य काय हे ठरवण्याच्या भानगडीत फेसबुक ने पडणे योग्य नाही ( अर्थात जे ट्विटर करत आहे ते चुकीचे आहे) कोणत्याही खाजगी कंपन्यानी सत्य असत्य काय हे ठरवण्याचा भानगडीत पडु नये !!!

मुद्दा:
अभिव्यक्ती स्वातंत्र्य , पॉलिटिकल बायस

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील असे एकांगी हल्ले हे केवळ अमेरिकेपुरते मर्यादित नाहीत , हे सारे भारतातही होत आहे . बहुतांश मीडीया विषिष्ट पोलिटिकल बायस घेऊन प्रचार अपप्रचार करत असतातच . अगदीच मागच्या वर्षी अब्प माझा ने स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्या जयंती निमित्त - " सावरकर - हिरो कि व्हिलन" अशा अर्थाचा वाद संवाद घेतला होता ! त्यावरील काही प्रतिसादात - गांधी जयंतीला गांधी हिरो कि व्हिलन अशी चर्चा घ्या असे सुचवले होते पण ते मात्र त्यांनी केले नाही !
आणि हे केवळ एक उदाहरण झाले अशी अगणित उदाहरणे देता येतील . काश्मीर मध्ये अतिरेकी मारले गेले की ते कसे साधे भोळे गणिताचे शिक्शक होते हे दाखवण्यात चॅनेल्स गुंग असतात अन हेच आपल्या मिल्ट्रीचे लोक चकमकीत मारले गेले तर त्यांना शहीद न म्हणता मारले गेले असे म्हणले झाले . काश्मीर पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करतानाचा फोटो काढणार्‍या माणसाला पुलिस्तर पुरस्कार मिळतो अन देशातील मोठ्ठे नेते त्याचे कौतुकही करतात ! त्यावर सर्व चॅनेल मिठाची गुळणी धरुन बसतात !
pu

करोनाचा प्रसार व्हायच्या आधीच "ठाकरे सरकार अन केजरीवाल मोदींपेक्शा भारी काम करत आहेत असे सर्वत्र सोशल मिडीयावर प्रसार सुरु असतो " अन महाराष्ट्र देशात नंबर १ आला तरीही कोणी चुकीबद्दल माफी मागत नाही उलट करोना सोडुन इतर गोष्टीवर वाद विवाद घालत बसतत.

एकुणच सर्वत्र सोशल मिडीयावर उजव्या विचारसरणीच्या लोकांचे विचार दाबण्याचा प्रयत्न होताना दिसतो . आणि डाव्या किंववा न्युट्रल विचार्सरणीच्या लोकांच्या चुका हळुच कार्पेट खाली सरकवल्या जातात , दुर्लक्शित केल्या जातात. हे अगदी सुर्यासारखे ढळढ्ळीत सत्य आहे !

आणि मिसळपाव

आणि मराठी सोशल मीडीयाही काही ह्याला अफवाद नाही - तुर्तास तुलनेने कमी असले तरी पुर्वी असे एकांगी सेन्सॉरिंग प्रचंड पाहिले आहे . एका विषिष्ठ धर्माच्या श्रधास्थानांवर आरोप करणे , त्याला प्रत्युत्तर दिले तर ते प्रतिसाद संपादित करणे हे पाहिले आहे . एक दहावी नापास महाभागांना लोकमान्य टिळकांवर बेसलेस आरोप प्रत्यारोप करताना पाहिले आहे ! बाकी सावरकर संघ हे तर अगदी चुकला घाव ऐरणीच्या माथी झालेले आहेत ! हिंदुराष्ट्राविषयी बोलणे तर अगदीच महापाप असल्यासारखे झाले आहे . आणि जे मुळातच नाही असे काल्पनिक बागुलबुवे उभे करुन उजव्या विचारसरणीच्या लोकांची बदनामी बहुतांश सोशल मीडीया वर चालु असतेच !
असो

चर्चा

१. सोशल मीडीया हे असे एकांगी संपादन कितपत योग्य आहे ?
२. फेसबुक ट्विटर ची कार्यालये कॅलिफोर्निया मध्ये आहेत तस्मात त्यांचे बहुतांश एम्प्लॉयी हे लेफ्ट लिबरल विचारसरणीचे असणे स्वाभाविक आहे , त्यांच्या कडुन निष्पक्ष पणे कंपनी चालवली जाण्याची शक्यता जवळपास नाहीच . भारतातही स्थिती थोड्याफार फरकाने तशीच आहे , बहुतांश मीडीया जाणीवपुर्वक उजव्याविचारसरणीचे विचार दाबण्यात अग्रकमावर असतात , अशावेळी उजव्या विचारसरणीच्या लोकान्नी काय करावे ?
३. आणि हा उजव्या आणि डाव्या विचारर्सरणीच्या लोकांमधील संघर्ष अगदीच पुरातन आहे , किमान फ्रेंच राज्यक्रांती पासुनचा तरी नक्कीच ! अशावेळी अलिप्त रहाणे कितपत शक्य आहे ? निर्दयी खुनी चे गव्हेरा चे टीशर्ट घालुन लोकं अभिमानाने मिरवत असताना केवळ भगवे कपडे घातले आहेत म्हणुन ३ साधुंची पोलिसांदेखत हत्या होत असेल अन मीडीया तेही दाबत असेल तर आपण कुठवर अलिप्त राहु शकु ?
४. डाव्यांकडुन होणार्‍या सोशल मीडीयावरील अशा एककल्ली संपादनाचा उद्रेक समाजात उमटला तर त्याला जबाबदार कोण ? उजवे की डावे ?

५. आणि मुळातच अभिव्यक्ती स्वातंत्र्य असणे कितपत प्रॅक्टिकल आहे, कारण प्रत्येक माणसाला स्वत:चे अभिनिवेश थोड्याफार प्रमाणात असणारच की . आणि तो पॉवर पोजिओशन मध्ये असला कि तो दुसर्‍याचा आवाज दाबणारच की ! आजवर डाव्या विचारसरणीचे लोक मीडीया हाताळत आहे म्हणुन उजवे विचार दाबले जात आहेत, उद्या उजवे मीडीयामध्ये पॉवर पोजिशन मध्ये आहे अन डावे विचार दाबायला लागले तर त्यांना दोष का द्यावा ?

?

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

28 May 2020 - 1:55 pm | प्रचेतस

मिपाबाबत तर काहीसे उलटे मत आहे, कित्येक लोक मिपास उजव्या विचारसरणीचे समजतात, आणि डावे लोक येथे कांगावा करतात :)

शेवटी काहीएक व्यवस्था आहे आणि कुठल्याही व्यवस्थेत दोन्ही बाजूंचे पूर्ण समाधान कधीच होणार नै.

प्रसाद गोडबोले's picture

28 May 2020 - 2:04 pm | प्रसाद गोडबोले

माझा अनुभव वेगळा आहे.

मी फ्रान्सिस्को डी गोयाचे एक चित्र इथे टाकले होते, त्या चित्रात काही उजवे किंव्वा डावे नव्हते , ते चित्र इतर मोनालिसा , सॅल्व्हतोर मुंडी किंवा राजा रवीवर्माच्या चित्रांसारखे गुडीगुडी नव्हते, बीभत्स होते क्रुर होते पण तरीही ते चित्र चित्रकलेच्या इतिहासातील एक महत्वाचे माईल्स्टोन मानले जाते अन तो कलाकारही अफलातुन मानला जातो !

आणि तरीही ते चित्र उडवले गेले होते !

ते बहुतेक मी उजव्या विचारसरणीचा आहे म्हणुन ऊडवले गेले होते असा माझा आजही ठाम समज आहे .

खरे म्हणजे मिपाच्या जन्माच्या अख्यायिकेचा आणि अभिव्यक्ती स्वांतत्र्याचा संबंध आहे. वरीजनल मिपामालकांची अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीतली भूमिका वरीजनल होती. सद्य मिपामालक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत एकतर कन्फ्युज्ड आहेत किंवा जिकडून जास्त लोक दाबतात किंवा बोलतात त्यांचे बरोबर धरून चालतात किंवा तो दबाव स्विकारून चालतात या पैकी काही एक होत असावे.

माझ्या आतातरी भानावर या या धाग्याचा उजवा डावा असा काहीच संबंध नाही, केवळ आरोग्य विषयक सामाजिक बांधीलकीतनं केलेली वेळीच केलेली अधिक सावधानता बाळगण्याची खणखणीत टिका वजा सूचना आहे. त्यानंतर मागच्या तीनेक आठवड्यात करोनामुळे खरोखरही महाराष्ट्रातील मृत्यूचा टक्का वाढला हे वास्तव आहे. मालक की संपादक कुणि माहित नाही अगदीच धागा सेन्सॉर केला नाही पण माझ्या संपादकीय सुविधा कमी केल्या. अजवे डावे नसलेले निव्वळ सामाजिक बांधीलकी मानणारी खणखणीत टिका झेपू नये याचे नवल वाटते.

तुम्ही संपादक, साहित्य संपादक किंवा व्यवस्थापनात कुठल्याही प्रकारे सहभागी नसता तुम्हाला संपादकीय सुविधा कशा होत्या?

कदाचित हा बग असावा आणि मालकांनी तो दूर केला असावा.

बाकी हे संस्थळ पूर्णपणे खाजगी आहे, मिपा मालकांनी कुणाला सुविधा द्यायच्या, अभिव्यक्तीस्वातंत्र्य द्यायचे हा पूर्णपणे त्यांचाच निर्णय असावा.

प्रचेतस's picture

18 Aug 2020 - 3:04 pm | प्रचेतस

उत्तरदायित्वास नकार लागू :)

माहितगार's picture

18 Aug 2020 - 4:49 pm | माहितगार

:)

मालकमंडळींनी प्रतिसादानंतर व्यनिने संवाद साधला, आणि जी काही सुविधा होती ती अधिकृतपणे का कशि आणि केव्हा आली त्याचे स्पष्टीकरण मी दिले आणि त्यांच्या कृतीचा संबंध माझ्या धाग्याशी नसल्याचे ते म्हणाले.

(अनुषंगिक विषयांतराबद्दल क्षमस्वः आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्यांना मी दिले हे खरे , पण आपल्या प्रश्नाने आणि नंतरच्या स्मायलीने वेगळाच विचार गंमत म्हणून आला. मी स्वतःहून इतर कुणाची करोनाकालीन व्यवस्थापकीय संपादक म्हणून भलावण केली होती. आता माझ्यासारख्या चौप्जेर टिकाकाराची भलावण कुणि करणे दुरापास्त आहे. माझ्याकडे किंवा इतर कूणा कुणाकडे व्यवस्थापकीय अधिकार आलेच तर नेमके काय होईल हा विचार गंमत म्हणून करून बघण्यास हरकत नसावी तेव्हा तुर्तास तसा विचार करुन पहावा असे सुचवू इच्छितो :)

ट्रंपचा उल्लेख आला म्हणून - ( ऐकीव आणि जालावरच्या , पेपरातल्या बातम्यां आधारे मांडतो. दुरुस्त करावे.)
१) निवडणुका जवळ आल्या आहेत.
२) ट्रंप निवडून आल्यावर बऱ्याच लोकांना शॉक बसलेला,
३) त्याच्या काही निर्णयामुळे विरोधकांचा विरोध मावळला आहे.
४) तो मुळात व्यापारी आहे, राजकारणी नाही.
५) अमेरिकी कारखानदारांचे हित पाहण्यासाठी निर्णय घेतोय.
६) कडक बोलतोय पण नंतर गप्पही बसतो.
७) बेरोजगार भत्ता बराच वाटला जात आहे सध्याच्या परिस्थितीत.
८) इतर देशांची मदत बंद.
.
.
तर आता बऱ्याच जणांना धास्ती वाटतेय ट्रंप/ त्याचा माणूसच निवडून येईल. ट्विटर वॉर यातूनच सुरू झाले असावे.

पुढच्या वेळेस चित्रांसाठी सर्च "****" द्या. होतकरू, उत्साही वाचक तिकडे शोधून पाहतील.

प्रसाद गोडबोले's picture

17 Aug 2020 - 10:47 am | प्रसाद गोडबोले

आणि अखेर भारतातल्या रडक्या लोकांनीही रडायला सुरुवात केली आहे !! =))))

https://www.esakal.com/desh/congress-and-bjp-battle-over-wall-street-jou...

आधी निवडनुक आयोगाच्या नावाने रडुन झाले ,
(व्होटिंग मशीन हॅक केलीली आहेत असे आरोप झाले , अन नंतर त्याआरोपात काहीही तथ्य नाही हे कळाल्यावर एकानेही खोटेनाटे आरोप केल्याबद्दल माफी मागितल्यचे आठवत नाही !! ),

आता फेसबुक ट्विटर अन सोशल मिडीयाच्या नावाने रडा =))))

पण सोशल मिडिया सर्व समावेशक तसेच दूर पोहोचते त्यामुळे थोडे डावे उजवे होते. फार झाले की बाद करतात.

प्रसाद गोडबोले's picture

6 Dec 2022 - 3:26 pm | प्रसाद गोडबोले

हा हा हा

हा सुर्य हा जयद्रथ =))))

प्रसाद गोडबोले's picture

6 Dec 2022 - 3:32 pm | प्रसाद गोडबोले

ईंतरेस्टिंग >>>

ट्विटर वरील डाव्या विचारसरणीच्या लिब्रांडूंचा प्रतिसाद उडवण्याचा , खाते गोठवण्याचा विशेषाधिकार गेल्यानंतर दिसुन आलेला हा ट्रेंड अतियंत इंटरेस्टिंग आहे >>
ज्या झपाट्याने उजव्या विचारसरणीच्या लोकांचे फॉलोअर्स वाढत आहेत त्यावरुन सरळ सरळ दिसुन येते कि निर्बंध हटवले की कोणती विचारसरणी लोकांना जास्त भावते ते

सत्य हे गंगास्त्रोतगति आहे, तुम्ही काही काळ , काही लोकांचा आवाज दाबुन ठेवु शकता , सर्वकाळ सर्व लोकांचा नाही !! >>

a

प्रसाद गोडबोले's picture

10 Dec 2022 - 12:31 pm | प्रसाद गोडबोले

ट्विटर फाईल्स ३

https://twitter.com/elonmusk/status/1601395677845544960?s=20&t=3tnbO5q6H...

येथे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रंप ह्यांना कसे अनैतिक पध्दतीने ट्विटर वरुन उडवले गेले ह्याची सविस्तर माहीती पुरवण्यात आलेली आहे ! !

आणि हा व्हिडीयो ही पहा >>>
https://twitter.com/i/status/1601351788715986944

ह्यात विजया गड्डे जी की ट्विटर वरील संपादन करण्याच्या विभागाची प्रमुख होती , तिने स्वतःच कबुल केलेले आहे की आम्ही लोकांचे वैयक्तिक संदेश वाचायचो !!
हे पाहुन एका मराठी संकेतस्थळावर लोकांचे वैयक्तिक मेसेज वाचण्याचा जो प्रकार झाला होता त्याची आठवण झाली !!

श्री ट्रंप यांच्यावर खुप अन्याय झाला आहे. श्री ट्रंप पुन्हा निवडुन येऊन अमेरीकेत लोकशाही आणतील अशी अपेक्षा आहे.

प्रसाद गोडबोले's picture

11 Dec 2022 - 12:10 pm | प्रसाद गोडबोले

सीरीयसली!

कॉर्पोरेट कंपन्या अगदी खाजगी कंपन्या असल्या तरी कॉन्स्टिट्युशन संविधानाच्या बाहेर असतात का ? मग जे संविधानानुसार गुन्हा नाही त्याला गुन्हा ठरवण्याचा ह्या संकेतस्थळांना काय अधिकार ?
ट्रंप कदाचित परत निवडुन येणार नाहीत , पण तो मुद्दा नाही , मुद्दा हा आहे की ट्विटर सारख्या संकेतस्थळांना मोजक्याच लोकांचा आवाज दाबण्याचा अधिकार असावा कि नसावा !
आणि फक्त ट्रंपच नव्हे तर त्यांने अशा अनेक उजव्या विचारसरणीच्या लोकांवर हेतुपुरस्सर कारवाई केलेली दिसुन येते . प्रो. जॉर्डन पीटर्सन ह्यांचे अकाऊंट उडवण्याचा काही संबंधच नव्हता . अ‍ॅन्ड्र्यु टेट ह्याला तर रीतसर बाजुला करण्यात आलेले आहे . अनेक उदाहरणे आहेत . जो रोगन ह्याला स्पॉटीफाय ने हटवले होते काही काळ.

मुळात कॉम्प्युटर इन्टरनेट च्या जमान्यात सोशलमीडीया हा सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे , त्यात सर्वांना फ्रीडम ऑफ स्पीच असायला हवे. जो पर्यंत कोणी सरेआम हिंसेला प्रोत्साहन देत नाही तो पर्यंत त्यावर कारवाई करण्याचे काहीच कारण नाही .