गणित..

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
19 Feb 2020 - 9:55 am

चाळीशी ओलांडली की जगण्याचं गणित थोडं सोपं होतं.
करिअरचा दुभाजक पार केलेला असतो.
बायकोमुळे अपूर्णांकाचा पूर्णांक झालेला असतो.
घरातले लसावि, मसावि होत असतात.
नाकावर चाळिशी आणि नाकासमोर सरssळ रस्ता असं एकरेषीय समीकरण असताना अचानक ..
प्रमेय बनून ती येते.
सुरवातीचं अवघडलेलं अनोळखीपण गेलं की जाणवतं ते "मी"पणा दशांशानेही नसलेलं तिचं निर्मळपण.
खाचाखोचा नसलेलं निरागस, प्रसन्न हास्य.. वाहता दहाचा पाढा जणू!
रुढार्थाने ती सुंदर असेलच असं नाही; पण तिच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण अमर्याद सुंदर ... प्रतलच..
तशीही कुठल्या रूढ चोकटीत ती मावतच नाही...मूळसंख्येसारखी..
मैत्रिणीच्या पलिकडली प्रेयसीच्या अलिकडली.
चूक बरोबरच्या व्याख्येत न बसणारी..
तिच्यात "डावी-उजवी बाजू" ठरवताच येत नाही.
तिच्या''सम" तीच!
खरं तर रोज भेटते असंही नाही. पण तिचा एखादा संदेश, फोन, हसू दिवस उजळून जातो. "हातचा" जणू रोजच्या रुक्ष जगण्यातला.
तिचा सुगंध सतत भवताली दरवळतो..अनंत काळ..
या नात्याचं वर्गमुळ घनमूळ शोधू नये..
बस् जीवापाड जपावं तिला..
.........
भले गणित सुटो वा न सुटो..

काहीच्या काही कवितामुक्तक

प्रतिक्रिया

माहितगार's picture

19 Feb 2020 - 2:09 pm | माहितगार

प्राची - अश्विनींच्या कविता म्हणजे प्लॅटॉनिक उत्कट, प्रणयाच्या जवळ पण कामभावनेपासून दूर, नात्यानात्यातील निर्मळ भावनांनी, भारतीय संस्कृतीतील सकारात्मकतेवरील विश्वासाने ओतप्रोत, नेटक आणि सुंदर काव्य निर्मितीचा आनंद घेत कवियत्री आपल्या कवितांचा पुनःश्च आनंददायी प्रत्यय या नव्या मुक्तकातूनही वाचकांना येतो म्हणजे मला आला इतर वाचकांनाही मिळेल असा विश्वास आणि शुभेच्च्छा आहेच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2020 - 2:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कविता आपल्याला आपल्याच अनुभवाच्या जवळ, वगैरे वाटतात.

लिहितं राहावे. पुलेशु

-दिलीप बिरुटे

प्राची अश्विनी's picture

20 Feb 2020 - 8:12 am | प्राची अश्विनी

:). धन्यवाद.

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Feb 2020 - 2:33 pm | ज्ञानोबाचे पैजार

आवडली
पैजारबुवा,

प्रचेतस's picture

19 Feb 2020 - 4:34 pm | प्रचेतस

सुरेख

खिलजि's picture

19 Feb 2020 - 4:56 pm | खिलजि

कितीही गुणिले किंवा भागिले

या पूर्णांकास ( म्हणजे मला ) मूळसंख्येने

तरी बाकी शून्यच राहणार

मी ते विष आहे , जे हवंहवंसं वाटतं

पण प्राशनांती , वाढू लागते तळमळ

आताही वाईट , आणि दूरही वाईट

कारण , आपले आधीच अप्रूव्ह केलेले

प्रोटोकॉलच असतात टाईट...

प्राची अश्विनी's picture

20 Feb 2020 - 8:14 am | प्राची अश्विनी

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!_/\_

मायमराठी's picture

24 Feb 2020 - 9:13 pm | मायमराठी

न सुटणारी तरीही आनंद देणारी अशीकाही प्रमेय असतात
सिद्ध काहीच करायचं नसतं तरीही 'रचना'करून बघाव्या लागतात.

काव्यातलं गणित आणि गणितातील काव्य खूप भावलं.

प्राची अश्विनी's picture

2 Mar 2020 - 8:49 am | प्राची अश्विनी

धन्यवाद.

श्वेता२४'s picture

25 Feb 2020 - 10:51 am | श्वेता२४

आपलं नाव पाहून लगेचच वाचायला घेतलं आणि दिवसाची सुरुवात मस्त झाली. मी तुमची जबरदस्त पंखा झालेय.

प्राची अश्विनी's picture

2 Mar 2020 - 8:44 am | प्राची अश्विनी

:) खूप खूप छान वाटलं वाचून.

मदनबाण's picture

26 Feb 2020 - 7:24 pm | मदनबाण

मस्त.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सावरकर सावरकर सावरकर

प्राची अश्विनी's picture

2 Mar 2020 - 8:49 am | प्राची अश्विनी

मनापासून धन्यवाद

मानसी१'s picture

27 Feb 2020 - 3:04 pm | मानसी१

बायको ने पण असे नाते शोधले तर चालेल का?

प्राची अश्विनी's picture

2 Mar 2020 - 8:43 am | प्राची अश्विनी

ती सुद्धा कुणाची तरी बायको असेलच. आणि काही गैर नाही वाटत यात.

अनन्त्_यात्री's picture

27 Feb 2020 - 9:28 pm | अनन्त्_यात्री

Binomial integral च्या वाटेनं चाललंय का? :)

प्राची अश्विनी's picture

2 Mar 2020 - 8:42 am | प्राची अश्विनी

:) हा विषय डोक्यात कधीच नाही शिरला.

प्रसाद साळवी's picture

25 May 2020 - 3:09 pm | प्रसाद साळवी

आशयावर वैयक्तिक प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे, विषय वैयक्तिक आहे.

तिचा सुगंध सतत भवताली दरवळतो..अनंत काळ..
या नात्याचं वर्गमुळ घनमूळ शोधू नये..
बस् जीवापाड जपावं तिला..

अत्यंत खरे लिहिले आहे तुम्ही.. मनापासून आवडले..

प्राची अश्विनी's picture

13 Jun 2020 - 9:31 am | प्राची अश्विनी

धन्यवाद!:)

रातराणी's picture

13 Jun 2020 - 11:29 am | रातराणी

आवडलं गणित :)