चाळीशी ओलांडली की जगण्याचं गणित थोडं सोपं होतं.
करिअरचा दुभाजक पार केलेला असतो.
बायकोमुळे अपूर्णांकाचा पूर्णांक झालेला असतो.
घरातले लसावि, मसावि होत असतात.
नाकावर चाळिशी आणि नाकासमोर सरssळ रस्ता असं एकरेषीय समीकरण असताना अचानक ..
प्रमेय बनून ती येते.
सुरवातीचं अवघडलेलं अनोळखीपण गेलं की जाणवतं ते "मी"पणा दशांशानेही नसलेलं तिचं निर्मळपण.
खाचाखोचा नसलेलं निरागस, प्रसन्न हास्य.. वाहता दहाचा पाढा जणू!
रुढार्थाने ती सुंदर असेलच असं नाही; पण तिच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण अमर्याद सुंदर ... प्रतलच..
तशीही कुठल्या रूढ चोकटीत ती मावतच नाही...मूळसंख्येसारखी..
मैत्रिणीच्या पलिकडली प्रेयसीच्या अलिकडली.
चूक बरोबरच्या व्याख्येत न बसणारी..
तिच्यात "डावी-उजवी बाजू" ठरवताच येत नाही.
तिच्या''सम" तीच!
खरं तर रोज भेटते असंही नाही. पण तिचा एखादा संदेश, फोन, हसू दिवस उजळून जातो. "हातचा" जणू रोजच्या रुक्ष जगण्यातला.
तिचा सुगंध सतत भवताली दरवळतो..अनंत काळ..
या नात्याचं वर्गमुळ घनमूळ शोधू नये..
बस् जीवापाड जपावं तिला..
.........
भले गणित सुटो वा न सुटो..
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
16711
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा अप्रतिम गणित
सेम टू सेम बोलतो.
In reply to व्वा अप्रतिम गणित by माहितगार
:). धन्यवाद.
In reply to व्वा अप्रतिम गणित by माहितगार
सुरेख
सुरेख
जबराव जबराव जबराव
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!_/\_
अनवट प्रमेय..
:)
In reply to अनवट प्रमेय.. by मायमराठी
नेहमीप्रमाणेच अत्यंत आवडली
:) खूप खूप छान वाटलं वाचून.
In reply to नेहमीप्रमाणेच अत्यंत आवडली by श्वेता२४
मस्त.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सावरकर सावरकर सावरकरमनापासून धन्यवाद
In reply to मस्त. by मदनबाण
नाही पटली
हरकत नाही.
In reply to नाही पटली by मानसी१
हे गणित
:) हा विषय डोक्यात कधीच नाही
In reply to हे गणित by अनन्त्_यात्री
शब्दयोजनेचं गणित चपखल जमलंय.
तिचा सुगंध सतत भवताली दरवळतो.
तिचा सुगंध सतत भवताली दरवळतो..अनंत काळ.. या नात्याचं वर्गमुळ घनमूळ शोधू नये.. बस् जीवापाड जपावं तिला..अत्यंत खरे लिहिले आहे तुम्ही.. मनापासून आवडले..धन्यवाद!:)
In reply to तिचा सुगंध सतत भवताली दरवळतो. by गणेशा
आवडलं गणित :)