शून्य मी.. अनंत मी

पहाटवारा गाऊन जातो,
ऊन सोनसळी जरा विसावे,
मध्यान्हीची सरता काहिली,
कातरवेळी डोळा पाणी
अवचित वाटे हीच वेदना,
हीच कल्पना, हीच कविता,
विरून जाती शब्द परंतु,
गोडगुलाबी धुक्यापरी
मिटल्या डोळ्यातून आता,
कुणा दिसू दे चंद्र चांदवा,
मला न वाटे आस तयांची,
मीच सावळी रात्र काळी
माझे दुःख, माझे सुख,
माझे प्रश्न, माझे उत्तर,
माझी जीत,माझी हार,
माझे जीवन,माझे मरण
माझे माझे, माझे मीपण
सारेकाही असून माझे,
तरीही फक्त माझीच मी,
शून्यही मी अन् अनंतही मीच..

वाचने
10260
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्थ समजला नाही. मिपाकर
वा सुंदर कविता..
मिटल्या डोळ्यातून आता, कुणा दिसू दे चंद्र चांदवा, मला न वाटे आस तयांची, मीच सावळी रात्र काळीहे तर अप्रतिम सहज जुणे आठवले.. अजून मी माझ्यातच जगते कुठे किनारा धरणी माते.. जाणीव नाही कुणास माझी प्रवास मी एकटीच करते..कुठून कुठे गेली कविता...
तेच वाटले. भावूक कविता.
In reply to कुठून कुठे गेली कविता... by चांदणे संदीप
सुंदर +१
+1
+१
सुरेख.....!
+१
छान!