मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[कविता' २०२०] - शून्य मी.. अनंत मी

साहित्य संपादक · · स्पर्धा

शून्य मी.. अनंत मी




पहाटवारा गाऊन जातो, ऊन सोनसळी जरा विसावे, मध्यान्हीची सरता काहिली, कातरवेळी डोळा पाणी अवचित वाटे हीच वेदना, हीच कल्पना, हीच कविता, विरून जाती शब्द परंतु, गोडगुलाबी धुक्यापरी मिटल्या डोळ्यातून आता, कुणा दिसू दे चंद्र चांदवा, मला न वाटे आस तयांची, मीच सावळी रात्र काळी माझे दुःख, माझे सुख, माझे प्रश्न, माझे उत्तर, माझी जीत,माझी हार, माझे जीवन,माझे मरण माझे माझे, माझे मीपण सारेकाही असून माझे, तरीही फक्त माझीच मी, शून्यही मी अन् अनंतही मीच..


वाचने 10253 वाचनखूण प्रतिक्रिया 10

गणेशा 21/05/2020 - 06:53
वा सुंदर कविता.. मिटल्या डोळ्यातून आता, कुणा दिसू दे चंद्र चांदवा, मला न वाटे आस तयांची, मीच सावळी रात्र काळी हे तर अप्रतिम सहज जुणे आठवले.. अजून मी माझ्यातच जगते कुठे किनारा धरणी माते.. जाणीव नाही कुणास माझी प्रवास मी एकटीच करते..

प्राची अश्विनी 22/05/2020 - 11:34
+1

मन्या ऽ 23/05/2020 - 00:34
नितांत सुंदर!

prajaktatoongar 24/07/2020 - 11:04
कवितेत भावनिकता आहे.