नका जाऊ बाहेर लॉकडाऊनमधी राया (लावणी)

नका जाऊ बाहेर लॉकडाऊनमधी राया..
पुन्हा नाही मिळणार असा एकांत कधी राया..
कोरसः
उठाबशा काढतो हातापाया पडतो.. नका भाईर जावा ओ दाजी
पोलिस मारतील,क्वारंटाईन करतील घरातह्च र्हावा ओ दाजी.
तुम्हा पाहुनि सैरभैर झालेय विसरले क्षुधा अन शांती
पण सोय लावते तुमची सारी हक्काची घ्या विश्रांती
सावज पाहे बाहेर मेला तो करोना पारधी राया....
घेऊ काळजी तब्बेतीची मिळून आपण दोघं
किती असू दे करोना बाई भलताच डेंजर रोगं
काया माझी तुमच्यासाठी बनवली मी औषधी राया...

वाचने
10563
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुन्हा नाही मिळणार असा एकांत कधी राया..
औषध चांगलं आहे!! ;) +१
घेऊ काळजी तब्बेतीची मिळून आपण
झोपताना 2 शब्द, (ह्या पहिल्या
In reply to घेऊ काळजी तब्बेतीची मिळून आपण by गणेशा
घेऊ काळजी तब्बेतीची मिळून आपण दोघं किती असू दे करोना बाई भलताच डेंजर रोगंतुमच्यासाठी देह सारा..औषध झाला रामबान हा काढा..अस्सल ठसका थेंब थेंब हा अमृत झाला अन ऐका कि, अवो ऐका कि रोज रातीला झोपताना.. ओठास लावा मलाघेऊ काळजी तब्बेतीची मिळून आपण दोघं किती असू दे करोना बाई भलताच डेंजर रोगंखतरनाक
In reply to झोपताना 2 शब्द, (ह्या पहिल्या by गणेशा
+1
काया माझी तुमच्यासाठी बनवली मी औषधी राया...
वा वा वा
वा वा वा
+१
.
मंग आमचा नंबर कवा येनार?
वाह