Skip to main content

[कविता' २०२०] - नका जाऊ बाहेर लॉकडाऊनमधी राया (लावणी)

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 14/05/2020 18:18 या दिवशी प्रकाशित केले.

नका जाऊ बाहेर लॉकडाऊनमधी राया (लावणी)




नका जाऊ बाहेर लॉकडाऊनमधी राया.. पुन्हा नाही मिळणार असा एकांत कधी राया.. कोरसः उठाबशा काढतो हातापाया पडतो.. नका भाईर जावा ओ दाजी पोलिस मारतील,क्वारंटाईन करतील घरातह्च र्‍हावा ओ दाजी. तुम्हा पाहुनि सैरभैर झालेय विसरले क्षुधा अन शांती पण सोय लावते तुमची सारी हक्काची घ्या विश्रांती सावज पाहे बाहेर मेला तो करोना पारधी राया.... घेऊ काळजी तब्बेतीची मिळून आपण दोघं किती असू दे करोना बाई भलताच डेंजर रोगं काया माझी तुमच्यासाठी बनवली मी औषधी राया...


वाचने 10563
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

घेऊ काळजी तब्बेतीची मिळून आपण दोघं किती असू दे करोना बाई भलताच डेंजर रोगं काया माझी तुमच्यासाठी बनवली मी औषधी राया... लावणी कार कोण आहे कळाले मला +1

In reply to by गणेशा

झोपताना 2 शब्द, (ह्या पहिल्या 2 ओळी वाचताना सुलोचना बाई आठवल्या ) तुमच्या लावणीच्या पुढे लिहिण्याचा प्रयत्न करतोय.. घेऊ काळजी तब्बेतीची मिळून आपण दोघं किती असू दे करोना बाई भलताच डेंजर रोगं तुमच्यासाठी देह सारा..औषध झाला रामबान हा काढा..अस्सल ठसका थेंब थेंब हा अमृत झाला अन ऐका कि, अवो ऐका कि रोज रातीला झोपताना.. ओठास लावा मला घेऊ काळजी तब्बेतीची मिळून आपण दोघं किती असू दे करोना बाई भलताच डेंजर रोगं

+1

+१ भारी ! पण सोय लावते तुमची सारी, हक्काची घ्या विश्रांती ही ओळ विशेष आवडली !

चांगला प्रयत्न. पुलेशु! सं - दी - प

वाह वेगळा प्रकार अन सुरेख हाताळला