कोरोना पश्चातचे दैनंदिन जीवन

Prajakta२१'s picture
Prajakta२१ in काथ्याकूट
3 May 2020 - 4:19 pm
गाभा: 

कोरोना पश्चातचे दैनंदिन जीवन

सध्या हाहाकार माजवलेला कोरोना कधीतरी आटोक्यात येईल अशी आशा करू या
बऱ्याच ठिकाणी ह्यासोबतच पुढे बराच काळ जीवन जगावे लागण्याची शक्यता वर्तवत आहेत
अर्थव्यवस्था आणि इतर गोष्टींवर परिणामांची बऱ्याच ठिकाणी चर्चा झाली आहे
ह्या धाग्यात रोजचे दैनंदिन जीवन कसे बदलेल ह्यावर चर्चा करूया

१. रोजच्या जीवनात पण एक ताण जाणवेल दैनंदिन गरजेच्या वस्तू पण धुऊन पुसून घेण्याची सवय अंगी लावून घ्यावी लागेल
२. आपल्याला लागणाऱ्या सेवा जसे कि घरगुती मदतनीस ,सलून,parlour ,जिम ह्यावरचे अवलंबित्व कमी करून स्वावलंबनाची सवय वाढवावी लागेल
३. घरातून काम करणे वाढेल
४. घरातल्या तांत्रिक बाबतीत तसेच बिले भरणे इ. कामात इंटरनेटची मदत घेऊन ती स्वतः च करावी लागतील
५. प्रत्येक घरी संगणक,स्मार्ट फोन आणि इंटरनेट अनिवार्य होतील
६. हे विश्वची माझे घर /ग्लोबल village हि संकल्पना जाऊन social डिस्टंसिन्ग ने अलिप्तता आणि स्वतःपुरते बघण्याची वृत्ती वाढेल
७. सण समारंभ जसे कि लग्न,मुंज ,हळदी कुंकू ,वास्तुशांती ,सत्यनारायण हह्यांचे प्रमाण कमी होईल किंवा नुसते फोनवर शुभेच्छांच देवाणघेवाण होईल
अनावश्यक gossiping टळेल

अजून कोणाला जसे सुचेल मांडावे हि विनन्ती
तसेच दैनंदिन जीवन सुसह्य करण्यासाठी काही सूचना सल्ले असल्या तरी मांडावेत हि विनन्ती

आभार

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

3 May 2020 - 6:24 pm | चौकटराजा

करोना ने काही धडे जरूर दिले आहेत. पण ते आपल्या व सर्व देशांच्या राजकीय पुढार्यांच्या डोक्यात प्रकाश पडला तर ! वर्श दीडवर्ष काहीसा सावधगिरी मोड राहील .भारतीय लोक बदलणे कठीण आहे. जगात पैसा व चंगळ हीच मुख्य मुल्ये रहातील. सन्दीप वासलेकर म्हणतात काही काळ निम्न्स्तरीय रोजगारावर विपरित परिणाम घडेल. पण काही कालच ! आरोग्याची जाण ही सरकारमधे आली तर ती लोकामधे नक्की झिरपेल पण त्यालाही सुमारे ५० कोटी लोक भागीदार असणार नाहीत. आजदेखील " त्यातील" बरेचसे लोक रुमाल देखील चेहर्यावर न बान्धता वावरत आहेत. स्वतः पुरते बघण्याची वृत्ती १९९१ मधे अर्थव्यवस्था मुक्त झाली त्या धोरणाचे बाळ आहे. कारण कोणत्याही प्रकारची स्थिरता मुक्त अर्थ्व्यवस्था देउ शकत नाही ,निदान भारत देशात तरी.

सर टोबी's picture

3 May 2020 - 8:25 pm | सर टोबी

काही खाली नमूद केलेलया दृष्टिकोनांचा साक्षात्कार झाला तरी बरेच काही मिळवलं असे म्हणता येईल:

  • आपल्या आजूबाजूला लोक नरकमय जीवन जगात असताना आपण सुखी आणि खासकरून सुरक्षित राहू शकत नाही. सबब, आम्ही मिळवतो तेव्हा चैन करतो हि अभिमानयुक्त मुजोरी दूर व्हावी.
  • वर्गविरहित किमान सुखी जगण्याची हमी हि प्रत्येकाला विनाअट मिळाली पाहिजे आणि त्यासाठी जी काही तोशीस खाऊनपिऊन सुखी असणाऱ्या समाजाला बसेल ती सहन करावी लागेल.
  • स्वच्छता हा एरवी ऐच्छिक आणि व्यक्ती सापेक्ष असणारी बाब राष्ट्रीय महत्वाची समजली जावी. खुनी आणि बलात्कारी यांच्याइतकाच थुंकणारा माणूस समाजाच्या घृणेला आणि शिक्षेला पात्र ठरला पाहिजे.
चौकटराजा's picture

3 May 2020 - 8:44 pm | चौकटराजा

सर, सलाम !

Prajakta२१'s picture

3 May 2020 - 10:15 pm | Prajakta२१

+१

धर्मराजमुटके's picture

3 May 2020 - 8:57 pm | धर्मराजमुटके

लॉकडाऊन आता शिथिल होईल तेव्हा भारतीय काय गुण उधळतील आणि परत किती रुग्णसंख्या वाढेल याची कल्पना करवत नाही. मागील आठवड्यात शिधा आणावयास बाजारात गेलो तर एका फळाच्या गाडीवर एक व्यक्ती आंबे घेण्यासाठी आला. त्याने नाकाचा महागडा मास्क काढून निदान ८-१० आंबे नाकाला लावून वास घेऊन बघीतले आणि परत ठेऊन दिले. फळवाला त्याला एक शब्दसुद्धा बोलला नाही. मी त्याच्यावर वैतागलो मात्र तरीही तो ढिम्मच होता. या मोसमात आंबे खरचं खावेत काय असा प्रश्न पडला मला ! रांगेत उभे राहिले तरी अजून काही जण जवळ येऊन चिकटताच.

मराठी कथालेखक's picture

4 May 2020 - 12:01 am | मराठी कथालेखक

कोरोनापश्चातचे जग असे काहीतरी खूप वेगळे असेल असे चित्र सध्या मांडले जात आहे. पण मी तरी त्याच्याशी सहमत नाही
स्पॅनिश फ्लूच्या साथीने जग किती बदलले ?स्पॅनिश फ्लूच्या साथीची तर आठवणही सहसा निघत नाही. त्या साथीने तर जगभरात सुमारे ५ कोटी लोक तर भारतात दीड कोटी लोक दगावले असा निष्कर्ष आहे. असो.. एकेका मुद्द्याकडे बघू.

१. रोजच्या जीवनात पण एक ताण जाणवेल दैनंदिन गरजेच्या वस्तू पण धुऊन पुसून घेण्याची सवय अंगी लावून घ्यावी लागेल

चार सहा महिने ही सवय टिकेल फारतर.. एकदा का साथ ओसरली किंवा आपले दैनंदिन जीवन नियमित चालू झाले की हळूहळू "वेळ नाही, कंटाळा आला" म्हणत या अतिरिक्त सवयी मागे पडतील.

२. आपल्याला लागणाऱ्या सेवा जसे कि घरगुती मदतनीस ,सलून,parlour ,जिम ह्यावरचे अवलंबित्व कमी करून स्वावलंबनाची सवय वाढवावी लागेल

हे शक्य नाही. लोक तर आताही सोसायटीच्या जिममध्ये जात आहेत, सलूनमध्ये जाता येत नाही तर न्हाव्याला बोलवायचा प्रयत्न करत आहेत. केस (व्यवस्थितपणे) कापणे ही काही सोपी गोष्ट नाही त्यासाठी न्हावीच हवा. फारतर उठसूठ दाढीकरताही सलूनमध्ये जाण्याच चैन करणार्‍यांचे प्रमाण कमी होईल. लॉकडाऊन संपल्यावर घरगुती मदतनीसही दिसू लागतील एक दोन महिन्यांतच.

३. घरातून काम करणे वाढेल

किती क्षेत्रात हे शक्य होईल ? आय टी मध्ये काही प्रमाणात शक्य आहे.. ते ही १००% नव्हे. आणि साथ जगभरात आलीये म्हणून अनेक ग्राहकांनी ODC च्या बाहेर काम करण्यास तात्पुरती परवानगी दिली आहे.. ग्राहक कंपन्याही त्याच संकटातून जात आहेत म्हणून त्यांनी ही परवानगी दिलीये. पण ही तात्पुरती आहे.

४. घरातल्या तांत्रिक बाबतीत तसेच बिले भरणे इ. कामात इंटरनेटची मदत घेऊन ती स्वतः च करावी लागतील

बरेच लोक हे आता करुन लागलेत. नोटाबंदी नंतर प्रमाण वाढत चालले आहे, गुगल पे, पेटीएम यांच्या विविध ऑफर्समुळेही हे प्रमाण वाढते आहे. केवळ कोरोनामुळे पडणारी भर अल्पच असेल.

५. प्रत्येक घरी संगणक,स्मार्ट फोन आणि इंटरनेट अनिवार्य होतील

स्मार्टफोनतर आहेच अनेकाकंडे. म्हणजे स्मार्टफोन विकत घेण्याची अर्थिक कुवत असूनही "वापरायला जमत नाही वा आवडत नाहि" या वृत्तीने न घेणारे अगदी १०% लोक असावेत (ते ही बहूधा ज्येष्ठ नागरिकच) अथवा ज्याला विकत घ्यायला जमते अशा ९०-९५% लोकाकंडे तरी आताही स्मार्टफोन असावा (हा माझा अदाज आहे, माझ्याकडे विदा नाही)

६. हे विश्वची माझे घर /ग्लोबल village हि संकल्पना जाऊन social डिस्टंसिन्ग ने अलिप्तता आणि स्वतःपुरते बघण्याची वृत्ती वाढेल

अमेरिकेचा H1 Visa किंवा green Card यांचा लोभ फारतर ४-५ % ने कमी होईल. खुद्द अमेरिकेत जे अनिवासी भारतीय राहतात त्यातले किती भारतात परत येतात हे पाहणे रंजक ठरेल पण मला वाटते अशांची टक्केवारीही काही फार मोठी नसेल.

७. सण समारंभ जसे कि लग्न,मुंज ,हळदी कुंकू ,वास्तुशांती ,सत्यनारायण हह्यांचे प्रमाण कमी होईल किंवा नुसते फोनवर शुभेच्छांच देवाणघेवाण होईल
अनावश्यक gossiping टळेल

हे पण फक्त काही महिनेच. जर सप्टेंबर २०२० पर्यंत बिषाणूचा फैलाव कमी झाला तर जान २०२१ चे हळदी कुंकू केवळ फोनवर साजरा होईल असे वाटत नाही. आणि जर सप्टेंबरच्या आधीच रोग आटोक्यात आला तर २०२० च्या गणपतीत कोरोनाचे , लॉकडाऊनचे, चीनचे कल्पक (!) देखावे नक्कीच बघावयास मिळतील. देखावे बघायला येणार्‍यांची आणि मिरवणुकीतली गर्दी काहीशी कमी असेल इतकंच.

तुषार काळभोर's picture

4 May 2020 - 7:31 am | तुषार काळभोर

कोरोना मुळे होणारे हे जे सामाजिक परिणाम आहेत ते फक्त तात्पुरते असणार आहेत.
वरती धर्मराजमुटके साहेबांनी मास्क काढून आंब्याचा वास घेणाऱ्या महाभारत ची घटना लिहिली आहे. आंबे घेणारा माणूस सध्या किमान मध्यमवर्गीय तरी नक्कीच असेल आणि तो किमान सुशिक्षित तरी नक्कीच असेल. तरीही जर लोक काहीजणांनी हाताळलेली वस्तू स्वतःच्या नाकाला लावून बघत असतील तर याचा अर्थ आधीच मूर्खपणा कंटिन्यू करण्यासाठी लोक फक्त लॉक डाऊन उठण्याची वाट बघत आहेत.

रांगेत उभे राहिले तरी अजून काही जण जवळ येऊन चिकटताच.

ही तर भारतीयांची जन्मसिद्ध घाणेरडी सवय आहे. कोणत्याही रांगेत जाउन उभे रहा. तुमच्या पुढचा माणूस एक पाऊल पुढे सरकला आणि तुम्ही दोन सेकंद पुढे सरकला नाहीत , तर मागचा म्हणतो सरका की पुढे. लोकांना एक फुटाचं ही शारीरिक अंतर सार्वजनिक ठिकाणी सहन होत नाही.
लॉक डाऊन संपल्यावर लोकांचा मूर्खपणा, कॉरोना रुग्णांचे प्रमाण आणि मृत्यू याला पारावार उरणार नाही अशी भीती वाटतेय.

हे आकाशातल्या बापा , माझ्या देशातील लोकांना सुबुद्धी दे.

नावातकायआहे's picture

11 May 2020 - 7:08 pm | नावातकायआहे

हे आकाशातल्या बापा , माझ्या देशातील लोकांना सुबुद्धी दे.

Prajakta२१'s picture

4 May 2020 - 9:08 pm | Prajakta२१

चांगला प्रतिवाद केला आहे

आनन्दा's picture

4 May 2020 - 8:36 am | आनन्दा

बाकी माहीत नाही, पण व्यवसायांचे विकेन्द्रिकरण करणे वाढायला लागेल..
महानगर संस्क्रुती बाजूला पडेल आणि छोटी चूटी बरीच शहरे तयार व्हायला लागतील असे वाटते..
अर्थात उद्या लगेच नव्हे, पण साधारण पुढच्या ५-१० वर्षात हा शिफ्ट नक्की दिसेल असे मला वाटते.

मराठी_माणूस's picture

4 May 2020 - 11:49 am | मराठी_माणूस

गणरायाने , वारेमाप व अनावश्यक खर्च टाळण्याचि सुबुध्दी मंडळांना दीली आणि त्यातुन आवाजाचे प्रदुषण जरी कमी झाले तरी हे वाइटात चांगले म्हणावे लागेल.

प्रकाश घाटपांडे's picture

4 May 2020 - 12:02 pm | प्रकाश घाटपांडे

अगदी अगदी. पुढचा गणेशोत्सव गणपतीला मास्क लावून

नि३सोलपुरकर's picture

4 May 2020 - 12:59 pm | नि३सोलपुरकर

" स्वच्छता हा एरवी ऐच्छिक आणि व्यक्ती सापेक्ष असणारी बाब राष्ट्रीय महत्वाची समजली जावी. खुनी आणि बलात्कारी यांच्याइतकाच थुंकणारा माणूस समाजाच्या घृणेला आणि शिक्षेला पात्र ठरला पाहिजे. " .....१०० % सहमत

शाळेत नागरिक शास्त्र हा विषय १०० मार्काचा आणी सक्तीचा करावा .( पास होण्यासाठी किमान ६० मार्क आवश्यक )

नि३

मूकवाचक's picture

4 May 2020 - 6:24 pm | मूकवाचक

कुठलीही आपत्ती आली की झपाट्याने वाढत असलेली लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कठोर उपाय योजना करायला हवी असे प्रकर्षाने वाटते. पण त्या दिशेने कुठलीच घडामोड घडताना दिसत नाही. बाकी कोरोनानंतरचे जग फारसे वेगळे नसेल. सगळ्या गोष्टी 'पूर्वपदावर' येतील अशी खात्री वाटते.

कोरोनाचा दीर्घकालीन परिणाम लोकांच्या वर्तनावर होईल का ? याचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करण्याचा प्रयत्न करु..
स्पेनमध्ये कोरोना रुग्णाचे अत्यंत जास्त प्रमाण आहे. पण जास्त म्हणजे किती तर दहा लाख लोकसंख्येत 5,285 केसेस. म्हणजे १००० लोकसंख्येमागे सुमारे ५ ते सहा लोकांना हा आजार आहे असे म्हणता येईल. अजून काही दिवस नवीन रुग्ण सापडतील आणि एकूण प्रमाण हे समजा दहा लाख लोकसंख्येत सात ते आठ हजार होईल असे मानले तरी त्याचा अर्थ दर १००० लोकसंख्यमागे सुमारे ७ ते ८ रुग्ण.
आता मृत्यूचे प्रमाण बघूयात. स्पेनमध्ये हे प्रमाण दहा लाख लोकसंख्येमागे 540 इतके आहे तर बेल्जियममध्ये 684 आहे. मानूयात की हे प्रमाण अजून वाढेल आणि स्पेन वा बेल्जियम यापैकी कुठेतरी ते दहा लाख लोकसंख्येमागे १००० मृत्यू इतके होईल. म्हणजे एक हजार इतक्या लोकसंख्ये मागे सुमारे एक मृत्यू या रोगामुळे.
मी ज्या सोसायटीत राहतो तिथे सुमारे २५० घरे आहेत. म्हणजे लोकसंख्या अंदाजे १०००. आता माझ्या सोसायटीत ७ ते ८ लोकांना हा आजार झाला आणि त्यातला १ जण समजा दगावला तर मी नक्कीच काहीसा घाबरेन, त्यातही काही रुग्ण माझ्याच इमारतीत राहणारे असतील तर मी जास्तच काळजी करेन (कारण मी पण तिच लिफ्ट वापरतो जी त्यांनी वापरली). पुढचे काही दिवस मी खूप जास्त काळजी घेईन खास करुन लिफ्ट वापरताना, जिममध्ये तर जाणारच नाही (खास करुन जर आढळलेल्या रुग्णांपैकी कुणी जिममध्ये जाणारे असतील तर). थोड्याश्या सर्दी, खोकला, खवखव ई मुळे मी घाबरलेला असेन. पण जसे जसे दिवस जातील आणि मी ठणठणीत आहे मला काहीही झालेले नाही. सोसायटीतले रुग्णही बरे झाले आणि पुन्हा नवीन रुग्ण आढळले नाही तर हळूहळू काही महिन्यात मला या गोष्टींचा विसर पडेल. आणि ते नैसर्गिकही आहे ना ?
हे पण मी सांगितले ते स्पेन / बेल्जियम इथले रुग्णांचे वा मृतांचे प्रमाण (ते ही काही दिवसांनी आणखी वाढलेले) गृहीत धरुन. भारतातले रुग्णांचे प्रमाण दहा लाख लोकसंख्येमागे ३१ इतके तर मृत्यूचे प्रमाण दहा लाख लोकसंख्येमागे १ इतके आहे. समजा हे प्रमाण वाढून अगदी दसपट जरी झाले तरी दहा लाख लोकसंख्येमागे ३०० रुग्ण आढळतील. याचा अर्थ माझ्या सोसायटी सारख्या (१००० लोकसंख्या असलेल्या) १० सोसायट्यांमध्ये मिळून एकूणात ३ रुग्ण असतील. तर मग माझ्या मानसिकतेवर वा वर्तनावर या गोष्टीचा काही दीर्घकालीन परिणाम होणे शक्य आहे का ? वस्तुनिष्ठपणे काय वाटते ?
काही विशिष्ट भाग हे हॉटस्पॉट झाले आहेत. तिथले हे प्रमाण जास्त असेल. उदा. धारावी. समजा इथे एकूणात ७००० रुग्ण आढळलेत (सध्या ७०० पेक्षाही कमी आहेत) तर इथल्या ७ लाख लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णांचे प्रमाण हे हजारी एक इतके असेल. म्हणजे तुलनेकरिता माझ्या एक हजार लोकसंख्येच्या सोसायटीत एक रुग्ण.
विचार करा ? काय वाटते ? माणसाच्या वर्तनावर किती दूरगामी परिणाम होतील ? त्यातही ज्यांनी स्वतः वा ज्यांच्या कुटूंबियांनी या रोगाचा सामना केला त्यांची मानसिकता सोडली तर जो एकाही रुग्णाला जवळून ओळखतही नाही त्याच्यावर कितपत परिणाम होईल?
माझ्या सोसायटीत एका व्यक्तीला फ्लू / मलेरिया वा डेंग्यू झाला तर मी किती काळजी करतो ? परिचयातला कुणी कॅन्सरने दगावला तरी एखादा व्यक्ती सिगरेट /तंबाखू खाणे सोडतो का ? बघण्यातले कुणी रस्ता लोक अपघाताने मेले तरी माणूस हेल्मेट घालतो का ? परिचयातले कुणी हृदयविकाराने गेला तरी माणूस खाण्यापिण्याच्या सवयी सुधारतो वा व्यायामच्या सवयी लावून घेतो का ? आणि असे जर नसेल तर कोरोनाच तेवढा वेगळा कसा ? वा तो वेगळा ठरावा अशी अपेक्षा तरी कशी काय करावी ?

विजुभाऊ's picture

4 May 2020 - 7:24 pm | विजुभाऊ

नाटक सिनेमा सार्वजनीक कार्यक्रम बंद होतील काही महीनेतरी
सरकार मेडिकल काॅलेज ची संख्या वाढवले
पॅरामेडीक कोर्सेसही वाढतील
केस कापणे हे कदाचित होम डिलीवरी सारखे होईल
हाॅटेलिंग कमी होईल.
कदाचित रे डी टू इट थाली मिळु लागेल

आणि आवाक यांचा ताळमेळ बिघडणार हे नक्की

Prajakta२१'s picture

4 May 2020 - 9:04 pm | Prajakta२१

आवाक?

केस कापणे आणि इतर सौदंर्य सेवा यापूर्वी होमडेलिव्हरी सारखी सर्विस होती urbanclap तर्फे
सारखी जाहिरात पण यायची

सचिन's picture

9 May 2020 - 9:24 pm | सचिन

या धाग्यावर फारच उत्तम चर्चा चालू आहे. विषयाच्या दोन्ही बाजूंची मत-मतांतरे वाचायला मिळाली.
कोरोनानंतरचे जीवन , अर्थात कोरोनासहित जीवन ही वस्तुस्थिती आहे, आणि ती मान्य करावीच लागेल.
हा झपाट्याने पसरत असल्यामुळे थोडी जास्त काळजी घेणे क्रमप्राप्त आहे, परन्तु, हे ही तितकेच खरे, की
आकडेवारीनुसार कोरोना फार भयानक वाटत नाही.
आज आपल्या लोकसंख्येच्या सुमारे ०.१% टेस्टिंग झाले आहे, आणि त्या ०.१%च्या -४% कोरोना बाधित, आणि ०.१% मृत्यू.
पण मूळ मुद्दा संक्रमणाच्या वेगाचा आहे. त्यामुळे आकडेवारी दिशाभूल करू शकते. स्वतः स्वतःची काळजी घेणे केव्हाही श्रेयस्कर.
... नाहीतर दररोज ४०० आणि वर्षाला १ लाखाहून जास्त मृत्यू (अ‍ॅट लीस्ट फॉर लास्ट थ्री इयर्स) भारतात रस्त्यांवरील अपघातांत होत असताना
आपण किती जागरूक असतो वा काळजी घेतो हे सर्वश्रुतच आहे !!

Prajakta२१'s picture

10 May 2020 - 2:30 pm | Prajakta२१

अन्य एका संस्थळावर कोरोना नंतरच्या संधी असा एक चांगला आशादायी धागा काढलाय
तिथे खूप चांगल्या नवीन व्यवसायांच्या कल्पना मांडल्या आहेत
इथेही अशा काही कल्पना मांडाव्यात हि सर्वांना विनंती
घरपोच डिलिव्हरी हा सगळ्यात मागणी असलेला व्यवसाय होणार आहे आत्ता
तसेच औषधे आणि स्वच्छतेचि साधने उत्पादकांना पण चांगली संधी आहे

खरं तर कोरोणा नंतरच्या संधी हा धागाच काढायला आलो होतो, पण इथं वरचा प्रतिसाद आणि हा धागा आधीच आहे त्यामुळे परत दुसरा धागा नको.

कोरोना‌ नंतर नपितकर्म हे पुर्वीसारखं राहणार नाही.
कमीत कमी गुंतवणुकीत होणारा हा धंदा आता वेगळ्या लेवल ला जाईल. लोकांनी स्वत: जर हे काम करायचं म्हटलं तर लागणारं साहित्य कुणालाही एक पॅकेज करून विकता येईल
(कातरी, कंगवा,लोशन,पावडर,ट्रीमर,स्प्रेपंप,ब्लेड).

ज्यावेळी सगळंच चालू करायला लागेल, त्यावेळी सेफ्टी साठीची परिधाने हा एक वेगळा धंदा होईल.
सध्या डॉक्टर घालत आहेत तसे कपडे, सॅनिटायझर,ग्लोव्हज,फेस शिल्ड इत्यादी तयार करने, तयार माल ग्राहकांना विकने (कमी पैशात चांगल्या दर्जाचा).

सॅनिटायझेशन हे एक सर्वात: नविन क्षेत्र म्हणून बघता येईल.
सॅनिटायझेशन स्टेशन (फुल बॉडी+ फक्त हात) तयार करने व त्याची ग्राहकांपर्यंत विक्री. सॅनिटायझेशन स्टेशन चे ग्राहक भरपूर तयार होतील. सोसायट्या, मॉल, कंपन्या, कॉम्पलेक्स आणि भरपूर.

इलेक्ट्रॉनिक वस्तू जसे की ट्रीमर, थर्मल स्कॅनर हे सुद्धा विकने अल्पकालीन धंदा होईल.

पान खाणारे थुंकनार कुठे? आजोबांचं थुंकीच गाडगं आठवतंय का कोणाला? स्पिटींग बॉक्स (त्यात थुंकलं की आतल्या आत द्रवाची वाफ आणी पानाला कॉम्परेस करणारे). जेवढे पान/तंबाखू खातात त्यांच्या साठी हे उपकरण खूप उपयुक्त होईल.

अजून बघा काय सुचतंय कुणाला.

दाट लोकवस्तीच्या शहरात फिजिकाल अंतर राखणे शक्य नाही.
प्रति वर्ग फूट लोकसंख्येची घनता असले ल्या
शहरात physical antar राखण्याची अपेक्षा ठेवणे ह्या सारखा कोणता जोक नाही. लोकल ट्रेन मध्ये physical antar rakhne शक्यच नाही.
ह्या साठी पहिला घाव शहरीकरण वर घातला पाहिजे.
उंच इमारती बिलकुल नकोत.
उद्योग व्यवसाय चे केंद्री कारण झाले आहे ते नष्ट करावे लागेल.
विकेंद्रीकरण करून प्रती चौरस किलोमीटर लोकसंख्या ५० व्यक्ती chya var नसावी .
हा कायम स्वरुपी उपाय आहे.
आपण सोडून बाकी लोक बेशिस्त आहेत हा विचार करणे बंद करावे.
शहरीकरणाचा फायदा घेणारे विकेंद्रीकरण मान्य करणारच नाहीत.

तुषार काळभोर's picture

11 May 2020 - 8:26 pm | तुषार काळभोर

नमस्कार बीनराव!

The population density in India is 464 per Km2
डोंगरदर्‍या, जंगलं, वाळवंटं, नद्या, शेती, रस्ते सगळं मोजून भारतात प्रति चौ किमी ४६४ लोक राहतात. फक्त शहरात नाही, तर पूर्ण भारतात जरी प्रति चौकिमि ५० एवढी लोकसंख्येची घनता असण्यासाठी, प्रति चौकिमी ४१४ लोकांना मारावं लागेल किंवा भारतातून हाकलावं लागेल. म्हणजे ८९% पेक्षा थोडे जास्त लोक.
म्हणजे एकूण १२० कोटींपेक्षा अधिक लोकांना मारावं लागेल किंवा भारतातून हाकलावं लागेल.
जगाची सरासरी लोकसंख्या घनता ५२ व्यक्ती प्रचौकिमी आहे.
तर...
१२० कोटी लोकांना मारलं तर, १२० कोटी प्रेतांची विल्हेवाट कशी लावायची?
राहिलेल्या १५ कोटी लोकांना हे काम जमेल का?
त्याला किती वेळ, पैसा, लागेल?
त्याने किती प्रदूषण होईल?

त्यांना बाहेर हाकललं तर (समुद्रात ढकलून दिलं नाही असं समजतो), कोणता देश १,२०,००,००,००० लोकांना स्वीकारेल?

कोणाला ठेवायचं अन कोणाला मारायचं/हाकलायचं हे कोण ठरवणार? कशावर? तुम्ही टॉप ११% वाले का बॉटम ८९% वाले?

Rajesh188's picture

11 May 2020 - 7:21 pm | Rajesh188

मुंबई ची लोकसंख्या घनता 33850 प्रती चौरस किलोमीटर आहे.
तिथे सवाजनिक वाहतुकीत,सार्वजनिक ठिकाणी physical antar ठेवणे शक्य तरी आहे का.
अगदी लोकांचे मेंदू हॅक केले आणि त्यांच्या वर पूर्ण नियंत्रण ठेवले तरी practically te shakya nahi.
Corona cha shahri bhagat tya मुळेच जास्त प्रसार झाला आहे.

मग ती अमेरिका असू नाही तर भारत.
बिनडोक पने राबवलेली शहरीकरण बऱ्याच समस्येचे कारण आहे.
शहरीकरण म्हणजे विकास हा मार्गच चुकीचा होता हे ह्या व्हायरस मुळे सिद्ध झाले आहे.
तरी सुद्धा डोळे उघडणार नाहीत .
भविष्यात असंख्य संकट शहरीकरण मुळे निर्माण होणार आहेत
आणि ती संकटच प्रती चौरस किलोमीटर लोकसंख्या ठरवतील.

तुषार काळभोर's picture

11 May 2020 - 8:31 pm | तुषार काळभोर

मग ३३८५० वरून ५० लोक प्रति चौरस किलोमीटर घनता कशी करायची?

म्हणजे अख्ख्या मुंबईत पंचवीस तीस हजार लोक ठेवावे लागतील. (मुंबई + उपनगरे)

बाकीचे एक - दीड - पावणे दोन कोटी कुठे पाठवायचे?

राहिलेल्या तीस हजार लोकांना शहर सांभाळणे जमेल का?

कोणत्या तीस हजार लोकांनी मुंबईत राहायचे ते कोण v कशाच्या आधारावर ठरवणार?

Rajesh188's picture

11 May 2020 - 8:51 pm | Rajesh188

Lockdown संपल्या नंतर सवय म्हणून किंवा गरज म्हणून गरज म्हणून सुद्धा physical antar rakhne shakya nahi .
Karan त्याला खूप मर्यादा आहेत.
लोकल ट्रेन मध्ये लोक प्रवास करतात त्यांच्या मध्ये 1 mm सुधा अंतर राखलं जात नाही .
आणि राखता पण येणार नाही.
मग काळजी कशी घेणार मास्क वापरता येईल.
आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवणे,उपचार सहज होतील त्याची काळजी घेणे( त्याच्या वर पण मर्यादा आहेत),.
त्या मुळे बाधित लोकांची संख्या प्रचंड वाढू शकते.

तुषार काळभोर's picture

12 May 2020 - 2:21 am | तुषार काळभोर

मग लोकसंख्येची घनता पन्नास पर्यंत कशी आणायची?

मुंबईत तीस हजार लोक कसे ठेवायचे?
बाकीचे एक दीड कोटी लोक कुठे पाठवायचे?
मुंबई + उपनगरे मिळून तीस हजार लोकसंख्या असेल तर ते शहर कसे चालेल?
भारतातील १,२०,००,००,००० लोकांनी कुठे जायचे?

जाऊ द्या हो पैलवान भाऊ.
त्यांच्या आय डी मध्ये अंक असला तरी अंकगणित चुकत असावे, आशय लक्षात घ्या.

Prajakta२१'s picture

12 May 2020 - 10:02 pm | Prajakta२१

कोरोना नंतरच्या संधी ह्या विषयावर प्रतिसादांच्या प्रतीक्षेत

भीमराव's picture

12 May 2020 - 11:22 pm | भीमराव

One person company नावाचा एक प्रकार दिसतोय. रजिस्ट्रेशन ची पद्धत कोणाला ठाऊक आहे का? कागदपत्रे काय लागतात? कोणात्या प्रकारचे उद्योग यात येऊ शकतात?

नक्की काय व्यवसाय करायचा आहे त्यानुसार उत्तर देता येईल. शक्यतो प्रोप्रायटरी फर्म चालू करुन व्यवसाय करता येत असेल तर बघा. भारतातले कायदे पाहता मोठी कंपनी स्थापन करणे म्हणजे भीक नको पण कुत्रा आवर अशी परिस्थिती आहे.

Prajakta२१'s picture

13 May 2020 - 4:27 pm | Prajakta२१

http://www.mca.gov.in/MinistryV2/onepersoncompany.html ह्या लिंकवर faqs आहेत बरीच माहिती दिली आहे

तसेच https://cleartax.in/s/one-person-company-registration-procedure-india ह्या लिंकवर जास्त सोप्या शब्दात माहिती दिली आहे
ह्याच लिंक वरून -
A new concept has been introduced in the Company’s Act 2013, about the One Person Company (OPC). In a Private Company, a minimum of 2 Directors and Members are required whereas in a Public Company, a minimum of 3 Directors and a minimum of 7 members. A single person could not incorporate a Company previously.
फक्त भारतीय नागरिकानाच उपलब्ध आहे

What is the mandatory compliance that an OPC needs to observe?

The basic mandatory compliance are:-

a. Atleast one Board Meeting in each half of calendar year and time gap between the two Board Meetings should not be less than 90 days.

b. Maintenance of proper books of accounts.

c. Statutory audit of Financial Statements.

d. Filing of business income tax return every year before 30th September .

e. Filing of Financial Statements in Form AOC-4 and ROC Annual return in Form MGT 7.

Who cannot form a One Person Company?

A minor shall not eligible becoming a member

a. Foreign citizen

b. Non Resident

c. Any person incapacitated by contract

Prajakta२१'s picture

13 May 2020 - 4:34 pm | Prajakta२१

https://cleartax.in/s/one-person-company-registration-procedure-india

But now as per Section 2(62) of the Company’s Act 2013, a company can be formed with just 1 Director and 1 member. It is a form of a company where the compliance requirements are lesser than that of a private company.

One Person Company (OPC): Process of Registration

Step 1: Apply for DSC *

Step 2: Apply for DIN **

Step 3: Name Approval Application

Step 4: Documents Required

Step 5: Filing Forms with MCA

Step 6: Issue of certificate of Incorporation

* For Name availability under RUN Web service, there is no prior requirement to obtain DSC and DIN . It can be done with account login on MCA portal.

one person company

1. Apply for DSC: The first Step is to obtain the Digital Signature Certificate (DSC) of the proposed Director which required the following documents:
•Address Proof
•Aadhaar card
•PAN card
•Photo
•Email Id
•Phone Number

2. Apply for DIN: Once the Digital Signature Certificate (DSC) is made, the next step is to apply for the Director Identification Number (DIN) of the proposed Director in SPICe Form along with the name and the address proof of the director. Form DIR-3 is the option only available for existing companies. It means with effect from January 2018, the applicant need not file Form DIR-3 separately. Now DIN can be applied within SPICe form for up to three directors.

3. Name Approval Application: The next step while incorporating an OPC is to decide on the name of the Company. The name of the Company will be in the form of “ABC (OPC) Private Limited”.

There are 2 options available for getting name approved by making application in Form SPICe 32 or by using RUN Web service of MCA by giving only 1 preferred name along with the significance of keeping that name. However, with effect from March 23, 2018, Ministry has decided to permit two proposed Names and one re-submission (RSUB) while reserving Unique Names (RUN Service) for the Companies.

Once the name is approved by the MCA we move on to the next step.

4. Documents Required: We have to prepare the following documents which are required to be submitted to the ROC:

a. The Memorandum of Association (MoA) which are the objects to be followed by the Company or stating the business for which the company is going to be incorporated.

b. The Articles of the Association (AoA) which lays down the by-laws on which the company will operate.

c. Since there are only 1 Director and a member, a nominee on behalf of such person has to be appointed because in case he becomes incapacitated or dies and cannot perform his duties the nominee will perform on behalf of the director and take his place. His consent in Form INC – 3 will be taken along with his PAN card and Aadhar Card.

d. Proof of the Registered office of the proposed Company along with the proof of ownership and a NOC from the owner.

e. Affidavit and Consent of the proposed Director of Form INC -9 and DIR – 2 resp.

f. A declaration by the professional certifying that all compliances have been made.

5. Filing of forms with MCA: All these documents will be attached to SPICe Form, SPICe-MOA and SPICe-AOA along with the DSC of the Director and the professional, and will be uploaded to the MCA site for approval.

After uploading, Form 49A and 49B will be generated for the PAN and TAN generation of the Company which have to be uploaded to MCA after affixing the DSC of the proposed Director.
6. Issue of the certificate of Incorporation: On verification, the Registrar of Companies (ROC) will issue a Certificate of Incorporation and we can commence our business.

विटेकर's picture

14 May 2020 - 2:31 pm | विटेकर

योग आणि आयुर्वेद याला सुगीचे दिवस येतील.. देशी , अस्सल गावरान, खास भारतीय , घरगुती .. या शब्दाना मार्केट येणार आहे. शुद्ध शाकाहारी पदार्थान्ची चलती असेल !

Prajakta२१'s picture

14 May 2020 - 10:07 pm | Prajakta२१

फारच निराशा वाटतेय आज
आमच्या इथे नवग्रह मंदिरापाशी सापडले तसेच २ बिल्डिंग सोडून च्या बिल्डिंग मध्ये सापडले
आत्ता किराणा आणि दूध वाल्यांचा पण संशय यायला लागलाय चांगली गोष्ट म्हणजे सगळे बंद आहे
सामान संपत चालले आहे
सामान कसे आणावे दूध तर जास्त साठवू शकत नाही ना ऑनलाईन आमच्या भागात उपलब्ध नाही
अजूनही इथे औषध फवारणी झाली नाहीये आणि घरपोच देण्याची व्यवस्था पण नाही नुसतेच बंद करून ठेवलेय
सदाशिव पेठेत पण मेडिकल दुकानात सापडले त्यामुळे मेडिकल पण ३ दिवस बंद आहेत
काय होणार कळत नाही
त्यात who वाल्यांनी पण निराश केले अजून

Prajakta२१'s picture

1 Jun 2020 - 12:30 am | Prajakta२१

https://www.esakal.com/mumbai/mission-begin-again-start-maharashtra-chie...

अनलॉक १.-
हळूहळू सर्व सुरु करणार आहेत
लोकांनी स्वयंशिस्तीने वागण्याची फार गरज आहे
अनलॉक १.-
हळूहळू सर्व सुरु करणार आहेत
लोकांनी स्वयंशिस्तीने वागण्याची फार गरज आहे
स्वयंशिस्त
१. मास्क वापरणे
२. मास्क काढावा लागला तरी नंतर लगेच हात sanitize करणे
३. सार्वजनिक ठिकाणी without कव्हर न शिंकणे,न खोकणे ,न थुंकणे
४. गर्दी न करणे (whatsapp सारख्या माध्यमांचा उपयोग करून वार ठरवून घेणे सामान खरेदीसाठ,शक्यतो दुकानदारांना फोन करून जाणे)
५. ऑनलाईन ,घरपोच डिलिव्हरीला प्रोत्साहन देणे ,प्राधान्य देणे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jun 2020 - 1:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लॉकडाऊन 5.0 अर्थात अनलॉक 1.0 असा धागा पाहिजे होता.
दोन विषय एकत्र होत आहेत असे वाटते.

-दिलीप बिरुटे