करोना विषाणू
हा एक साध्या सर्दीपासून मर्स आणि सार्स (Middle East Respiratory Syndrome (MERS) and Severe Acute Respiratory Syndrome (SARS) सारख्या श्वसनसंस्थेला सूज आणणाऱ्या विषाणूंच्या गटातील एक विषाणू आहे.
COVID-19 (Coronavirus disease 2019) हे या विषाणूंचे नाव आहे आणि याचा आपल्याला शोध हा आता हि साथ आल्यामुळे लागला आहे.
यामुळे होणाऱ्या रोगाची लक्षणे -- ताप, कोरडा खोकला आणि थकवा येणे. काही रुग्णांना सर्दी, अंग मोडून येणे, नाक बंद होणे, घसा दुखणे आणि काही रुग्णांना डायरिया पण होतो. हि सर्व लक्षणे हळूहळू दिसू लागतात.
बऱ्याच लोकांना या विषाणूचा प्रादुर्भाव झाला तरी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत कि कोणताही त्रास होत नाही. ८५ टक्के रुग्ण कोणताही इलाज न करता स्वतःहून बरे होतात.
१५ % रुग्णांमध्ये हा रोग गंभीर होतो आणि १ ते २% रुग्ण यात दगावतात.
गंभीर आजार आणि मृत्यू हा साधारणपणे वृद्ध, प्रतिकारशक्ती कमी असणारे किंवा मधुमेह, रक्तदाब हृदयविकाराचे रुग्ण यांमध्ये दिसून येतो.
रोग प्रसार -- या रोगाने आजारी रुग्ण जेंव्हा खोकतो किंवा शिंकतो तेंव्हा त्यातुन जो फवारा उडतो त्यात असलेल्या सूक्ष्म थेंबातुन हे विषाणू आजूबाजूच्या वस्तूंवर जाऊन बसतात. या वस्तुंना हात लावल्यावर जेंव्हा निरोगी माणूस आपल्या चेहऱ्याला डोळ्यांना नाकाला हात लावतो तेंव्हा हा विषाणू त्याच्या शरीरात शिरतो.
यासाठीच आपण बाहेर जाऊन आल्यावर आपले हात साबणाने आणि भरपूर पाण्याने धुतले पाहिजेत आणि सारखा चेहऱ्याला हात लावणे बंद केले पाहिजे.
आणि ज्याला खोकला किंवा सर्दी आहे त्याने मोठा हातरुमाल जवळ बाळगून त्यातच आपले खोकणे किंवा शिकणे नियंत्रित करणे आवश्यक आहे.
अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझर हा साबणासारखेच काम करतो. (खरं तर साबण जास्त चांगला आहे).
कोणताही साबण चालतो. डेटॉल किँवा सॅवलॉन सध्या साबणापेक्षा जास्त परिणामकारक असतो असा कोणताही पुरावा आढळलेला नाही.
बहुसंख्य लोकांना हा रोग अतिशय कमी प्रमाणात होतो परंतु हे विषाणू त्यांच्या श्वसन मार्गात असल्यामुळे कोणीही( वारंवार निरोगी दिसणाऱ्या माणसानेही) खोकताना किंवा शिंकताना हातरुमालातच शिंकणे आवश्यक आहे.
करोना विषाणू पासून आपला बचाव--
१) बाहेर जाऊन आलयावर प्रत्येक वेळेस आपण आणि आपल्या घरच्यांना साबण आणि पाण्याने हात धुण्याची सवय लावणे
२) खोकला किंवा सर्दी असलेल्या माणसापासून १ मीटर दूर उभे राहणे
३) ज्याला खोकला किंवा सर्दी आहे त्याने मोठा हातरुमाल जवळ बाळगून त्यातच आपले खोकणे किंवा शिकणे नियंत्रित करणे. हि गोष्ट आपल्या माहितीतील सर्व लोकांना सांगणे
आपल्याला हा रोग होण्याची शक्यता --आपण चीन इटली किंवा तशा रोगप्रसार झालेल्या देशात जाऊन आला नसाल तर हा रोग होण्याची शक्यता सध्या तरी फारच कमी आहे.
हा विषाणू जन्य रोग असल्यामुळे या रोगावर प्रतिजैविके ( Antibiotics) काम करत नाहीत. अजून तरी यावर लास तयार झालेली नाही परंतु लवकरच ती उपलब्ध होईल अशी आशा आहे.
आरोग्य कर्मचारी आणि ज्यांना खोकला किंवा सर्दी आहे अशानीच तोंडावर मुखवटा घेणे आवश्यक आहे. सामान्य माणसांनी मुखवटा घेणे हे अगोदरच कमी असलेल्या साधनसामग्रीचा अपव्यय आहे.
चीन मधून आलेल्या पॅकेटमधून हा विषाणू येण्याची शक्यता फारच कमी आहे कारण शरीराच्या बाहेर हा विषाणू फार तर ४८-७२ तास जिवंत राहू शकतो ते सुद्धा थंड तापमानात
अत्यंत महत्त्वाची गोष्ट --या रोगापासून काळजी घेणे हे योग्य आहे परंतु याबद्दल चिंता करणे(ANXIETY) किंवा घबराट पसरवणे ( PANIC) हे चूक ठरेल
सार्स(२००३) मध्ये मृत्यूची शक्यता १० % होती .
स्वाईन फ्लू( २००९) मध्ये मृत्यूची शक्यता ४.५ % होती
इबोला(२०१४) मध्ये मध्ये मृत्यूची शक्यता २५ % होती
तर
करोना मध्ये हि १-२ % आहे
मग आज इतकी भीती का पसरली आहे ?
सार्स स्वाईन फ्लू किंवा इबोलाच्या वेळेस सोशल मीडियाचा ( आणि त्यामुळे गैरसमज आणि अफवांचा) प्रसार इतका झालेला नव्हता. आज जगात सोशल मीडिया ३०० कोटी लोक वापरतात. त्यामुळे अफवा दोन दिवसात जगभर पसरल्यामुळे या बद्दल अफवा आणि त्यामुळे घबराट फार लवकर पसरली आहे.
भारतात या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता खूपच कमी आहे कारण हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे जसे तापमान वाढते तसे लोक अतिथंडीमुळे घरात बसून राहतात त्याऐवजी बाहेर पडतात जेथे तापमान जास्त असते यामुळे विषाणूची वाढ कमी होते.
वरील लेखातील बहुतेक साहित्य हे जागतिक आरोग्य संघटनेच्या अद्ययावत पत्रकातून घेतलेले आहे. यावर अजून संशीधन चालू आहे आणि अजून बरीच माहिती मिळणे बाकी आहे.
हा लेख माझ्या नावासाहित किंवा नावा शिवाय पाठवले तरी चालेल. ही माहिती मी जागतिक आरोग्य संघटनेच्या अद्ययावत पत्रकावरूनच घेतलेली आहे.
त्यात माझे कर्तृत्व काही नाही.
पण जर लोकांना माहितीच्या स्रोता बद्दल खात्री वाटत नसेल तर खाली डॉ सुबोध खरे एम डी असे लिहिले तरी चालेल.
लोकांमध्ये निर्माण होणारा "भयगंड"दूर करणे आणि आरोग्याची योग्य काळजी घेणे एवढाच माझा हेतू आहे.
वाचने
148341
प्रतिक्रिया
253
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्यांची गल्लत झाली असेल.
https://en.wikipedia.org/wiki
लस निर्माण होईल किंवा होणार नाही
लस निर्माणच होणार नाही ह्याची
In reply to लस निर्माण होईल किंवा होणार नाही by Rajesh188
करोनाचा प्रसार वाढल्यानंतर
अनुभव.
In reply to करोनाचा प्रसार वाढल्यानंतर by चौथा कोनाडा
बरीच गोर गरीब जनता अद्याप
In reply to अनुभव. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक वेगळा विचार
छान.
In reply to एक वेगळा विचार by मराठी_माणूस
भाईयो और बहनो... आणि अर्थातच
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=))
In reply to भाईयो और बहनो... आणि अर्थातच by चौथा कोनाडा
हा डोक्यावर पडलाय
In reply to एक वेगळा विचार by मराठी_माणूस
बेवडा मारून लिहिलंय कि काय संपादकाने
In reply to एक वेगळा विचार by मराठी_माणूस
स्वीडनच्या प्रख्यात
In reply to एक वेगळा विचार by मराठी_माणूस
आभार...!
In reply to स्वीडनच्या प्रख्यात by मराठी_माणूस
हर्ड ईम्युनीटी चा प्रयोग
हर्ड ईम्युनीटीचा प्रयोग
In reply to हर्ड ईम्युनीटी चा प्रयोग by ऋतुराज चित्रे
आपला मुद्दा सिद्ध करायला
In reply to हर्ड ईम्युनीटी चा प्रयोग by ऋतुराज चित्रे
माधव गडकरी,आणि भरत राउत
ईझी लिक्वीड डीटर्जंट वीषाणूंवर प्रभावी ठरते का?
हात धुवायच्या साबणात पण सोडा
Arsenicum Album 30
जिज्ञासू/जाणकारांनी जरूर
अत्यंय चुकीची माहिती
झंप्यासेठ....
In reply to अत्यंय चुकीची माहिती by झम्प्या दामले
लस
परंतु काही कठोर सत्य
बँक हे वयसाय आहेत त्यांना
In reply to परंतु काही कठोर सत्य by चौकस२१२
खाजगी बँक सुद्धा चुकीची कर्जे देतात
In reply to बँक हे वयसाय आहेत त्यांना by मराठी_माणूस
एक प्रश्न आहे
Who...
कोरोनाशी कसं लढायचं ते आता
https://twitter.com
In reply to कोरोनाशी कसं लढायचं ते आता by शाम भागवत
आरोग्यसेवांवरील अनावश्यक ताण
* मी /(तुम्ही) / (आपण).. ..
In reply to आरोग्यसेवांवरील अनावश्यक ताण by गामा पैलवान
करोना प्राणघातक कसा?
* मी /(तुम्ही) / (आपण).. ..
In reply to करोना प्राणघातक कसा? by गामा पैलवान
हा विषय एका प्रतिसादाचा नसून
In reply to * मी /(तुम्ही) / (आपण).. .. by माहितगार
हे शेवटचे पँडेमीक की शेवटची आपत्ती ?
In reply to हा विषय एका प्रतिसादाचा नसून by सुबोध खरे
धडधाकट माणसाला विलगीकरणाची
In reply to करोना प्राणघातक कसा? by गामा पैलवान
पूर्वव्याधी व करोनाचे प्राणघातक्य
In reply to धडधाकट माणसाला विलगीकरणाची by सुबोध खरे
करोणा family मधील sarse आणि covid
वैद्य सुविनय दामले कोरोना