[कविता' २०२०] - वसंत

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
7 May 2020 - 10:53 pm

वसंत

असा कसा वसंत हा दुरावतो स्थिरावतो.
जणू जसा भ्रमंत हा विराण स्वप्न पाहतो.
अशा कशा ग भेटल्या विदग्ध काळ यंत्रणा.
उरात आसमंत हा विसावतो सुखावतो.

उजाडले जसे नभी प्रकाशली तशी बने.
अधीर रक्त साकळे करावयास चिंतने.
उन्हास पावली धरा नदी उरक्त वाहते
जसा सुगंध लाधवी हवेत मुक्त वाहतो

विरुद्ध जाहल्या दिशा नि सांजवेळ भाळली
प्रशस्त चांदरात ही नभानभात माळली
उनाड मोगरा तिच्या बटांत धुंद माळला
ढगांत बंघ शिंपले, मनात चंद्र लाजतो

वृत्त- कलिंदनंदिनी

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 4500px;
}

प्रतिक्रिया

गणेशा's picture

7 May 2020 - 11:50 pm | गणेशा

+1

अधीर रक्त
नदी उरक्त
सुगंध लाघवी

हे शब्द विशेषणे खुप आवडली
आणि शेवटचे कडवे तर अप्रतिम...

विरुद्ध जाहल्या दिशा नि सांजवेळ भाळली
प्रशस्त चांदरात ही नभानभात माळली
उनाड मोगरा तिच्या बटांत धुंद माळला
ढगांत बंघ शिंपले, मनात चंद्र लाजतो

गामा पैलवान's picture

8 May 2020 - 12:22 am | गामा पैलवान

+१

वृत्तबद्धतेसाठी अधिकेक.

-गा.पै.

प्रचेतस's picture

8 May 2020 - 7:29 am | प्रचेतस

+१
उत्तम

मन्या ऽ's picture

8 May 2020 - 8:17 am | मन्या ऽ

अप्रतिम

साहित्य संपादक's picture

15 May 2020 - 9:42 pm | साहित्य संपादक

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.

नूतन's picture

8 May 2020 - 2:31 pm | नूतन

+१ वृत्तासाठी
कलिंदनंदिनी हे नाव माहित नव्हतं.
चालीवरून रावणरचित शिव तांडव स्तोत्र या वृत्तातील असावं.

नूतन's picture

8 May 2020 - 2:32 pm | नूतन

जटा कटा हसंभ्रम भ्रमन्निलिंपनिर्झरी ......

प्राची अश्विनी's picture

8 May 2020 - 6:29 pm | प्राची अश्विनी

+1
मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो...
याच वृत्तात का?

चांदणे संदीप's picture

9 May 2020 - 9:24 am | चांदणे संदीप

शेवटच्या कडव्याने अडवून धरले त्यामुळेच...
+१

विरुद्ध जाहल्या दिशा नि सांजवेळ भाळली
प्रशस्त चांदरात ही नभानभात माळली

हे खास!

उनाड मोगरा तिच्या बटांत धुंद माळला
ढगांत बंघ शिंपले, मनात चंद्र लाजतो

यात काहीतरी कमी आहे.

सं - दी प

तुषार काळभोर's picture

9 May 2020 - 1:39 pm | तुषार काळभोर

कविता छान

शक्य असतं तर वृत्त बद्ध कवितेसाठी +१० केले असते
(आपल्याला वृत्त आहे की नाही, अचूक आहे की नाही, ते कळत नाही. तुम्ही म्हणता म्हणून वृत्तात आहे असे गृहीत धरतो)

अधीर रक्त साकळे करावयास चिंतने.
उन्हास पावली धरा नदी उरक्त वाहते
जसा सुगंध लाधवी हवेत मुक्त वाहतो
हे छान

दोन शब्द स्पेलिंग मिस्टेक वाटले. सुगंध लाघवी हवेत मुक्त वाहतो असं हवं का?
आणि ढगात बंघ शिंपले हा शब्द कळला नाही.

सचिन's picture

11 May 2020 - 11:13 am | सचिन

अत्यंत आवडली. वृत्त- कलिंदनंदिनी - ही नवीन माहिती.

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

12 May 2020 - 12:24 am | सौ मृदुला धनंजय...

+1

राघव's picture

14 May 2020 - 10:47 am | राघव

चांगले गीत. धृवपद असते तर आणिक मझा आला असता. पण तरीही छान.

छ्या.. छंदोबद्ध कवितेची बातच न्यारी ब्वॉ. आपल्याला येतच नाहीत छंद/वृत्त/मात्रा/गण.. शिकावे का? :-)

बिपीन सुरेश सांगळे's picture

25 May 2020 - 1:04 pm | बिपीन सुरेश सांगळे

सुरेख नादरचना
मजा आया