Skip to main content

[कविता' २०२०] - वसंत

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 07/05/2020 22:53 या दिवशी प्रकाशित केले.

वसंत




असा कसा वसंत हा दुरावतो स्थिरावतो. जणू जसा भ्रमंत हा विराण स्वप्न पाहतो. अशा कशा ग भेटल्या विदग्ध काळ यंत्रणा. उरात आसमंत हा विसावतो सुखावतो. उजाडले जसे नभी प्रकाशली तशी बने. अधीर रक्त साकळे करावयास चिंतने. उन्हास पावली धरा नदी उरक्त वाहते जसा सुगंध लाधवी हवेत मुक्त वाहतो विरुद्ध जाहल्या दिशा नि सांजवेळ भाळली प्रशस्त चांदरात ही नभानभात माळली उनाड मोगरा तिच्या बटांत धुंद माळला ढगांत बंघ शिंपले, मनात चंद्र लाजतो वृत्त- कलिंदनंदिनी


वाचने 10692
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

+1 अधीर रक्त नदी उरक्त सुगंध लाघवी हे शब्द विशेषणे खुप आवडली आणि शेवटचे कडवे तर अप्रतिम... विरुद्ध जाहल्या दिशा नि सांजवेळ भाळली प्रशस्त चांदरात ही नभानभात माळली उनाड मोगरा तिच्या बटांत धुंद माळला ढगांत बंघ शिंपले, मनात चंद्र लाजतो

+१ वृत्तबद्धतेसाठी अधिकेक. -गा.पै.

In reply to by मन्या ऽ

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.


+१ वृत्तासाठी कलिंदनंदिनी हे नाव माहित नव्हतं. चालीवरून रावणरचित शिव तांडव स्तोत्र या वृत्तातील असावं.

+1 मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो... याच वृत्तात का?

शेवटच्या कडव्याने अडवून धरले त्यामुळेच... +१
विरुद्ध जाहल्या दिशा नि सांजवेळ भाळली प्रशस्त चांदरात ही नभानभात माळली
हे खास!
उनाड मोगरा तिच्या बटांत धुंद माळला ढगांत बंघ शिंपले, मनात चंद्र लाजतो
यात काहीतरी कमी आहे. सं - दी प

कविता छान शक्य असतं तर वृत्त बद्ध कवितेसाठी +१० केले असते (आपल्याला वृत्त आहे की नाही, अचूक आहे की नाही, ते कळत नाही. तुम्ही म्हणता म्हणून वृत्तात आहे असे गृहीत धरतो) अधीर रक्त साकळे करावयास चिंतने. उन्हास पावली धरा नदी उरक्त वाहते जसा सुगंध लाधवी हवेत मुक्त वाहतो हे छान दोन शब्द स्पेलिंग मिस्टेक वाटले. सुगंध लाघवी हवेत मुक्त वाहतो असं हवं का? आणि ढगात बंघ शिंपले हा शब्द कळला नाही.

अत्यंत आवडली. वृत्त- कलिंदनंदिनी - ही नवीन माहिती.

+1

चांगले गीत. धृवपद असते तर आणिक मझा आला असता. पण तरीही छान. छ्या.. छंदोबद्ध कवितेची बातच न्यारी ब्वॉ. आपल्याला येतच नाहीत छंद/वृत्त/मात्रा/गण.. शिकावे का? :-)