मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पनीर उत्तपा

प्रशांत · · पाककृती
भाजीसाठी काही नाही त्यामुळे मी काल डोस्याचे पीठ बनवले आहे, सोबत बटाट्याची भाजी करणार असे आईने चहा पिताना सांगितले. डोसा खायची इच्छा नव्हती आणि थोडा वेळही होता म्हटल चला कांदा/चीज उत्तपा बनवूया. बघितलं तर दोनच छोटे कांदे होते, मग त्यात टोमॅटो टाकायचे म्हणुन फ्रिज उघडला तर पनीर दिसले. आणि म्हटल चला आजे "पनिर उत्तपा" बनवुन पाहू. साहित्यः - कांदे २ (तेवढेच होते) - टोमॅटो २ - पनीर १०० ग्रॅम (अंदाजे) - हिरव्या मिरच्या २ - चाट मसाला १ चमचा - कोथिंबिर - मिठ कापाकापी नंतरचा फोटो 1 सर्व एका भांड्यात मिक्स केलं 2 तव्यावर दोन डाव पीठ टाकुन गोलाकारात पसरवण्याचा प्रयत्न केला व त्यावर थोड मिश्रण टाकलं आणि गॅस सुरु केला. 3 एक मिनिट गॅस मोठाच ठेवला व नंतर कमी गॅसवर दोन मिनिट ठेवलं. नंतर पलटुन दुसर्‍या बाजुने दोन मिनिट ठेवला. 4 तयार झाल्यानंतर त्यावर थोड तूप टाकलं आणि... 5 कांदा / पनीर / टोमॅटो असल्याने याला कुठला उत्तपा म्हणावा ?

वाचने 11816 वाचनखूण प्रतिक्रिया 18

In reply to by जव्हेरगंज

प्रशांत गुरुवार, 05/07/2020 - 17:47
डोसा बनवणे सोप्प आहे, फक्त तयार पिठ मिळायला पाहिजे... (आयुष्य सुंदर आहे .... ). रच्याकन पिठ घरी बनवायचे असल्यास दावणगिरी लोणी स्पंज डोसा हि पाकृ बघा आणि हो बनवल्यावर फोटो शेअर करा

तुषार काळभोर गुरुवार, 05/07/2020 - 18:21
१) पहिले दोन फोटो - चिरलेले पदार्थ - गणपा शेठ च्या जवळ जाणारे. २) तयार उत्तपा फोटो - कडक ३) आयला, ही पण कला आहे वाटतं आपल्यात ;) ४) नाव देसी डिलक्स मार्गारिटा उत्तापा

Prajakta२१ गुरुवार, 05/07/2020 - 20:04
मला असाच करायचा होता पण पनीर धिरडे झाले https://misalpav.com/node/46616 चाट मसाल्याची आयडिया try करायला पाहिजे मी कांदा लसूण मसाला घातला होता नुसते मिश्रण पण छान लागत असेल फोटो छान आले आहेत

प्रशांत Sat, 05/09/2020 - 17:57
प्रतिसाद दिल्या बद्दल धन्स लोक्स.. @ गणपा ने सांगितल्या मुळे नाव पनीर उत्तपा...