Skip to main content

[कविता' २०२०] - सांजवेळ

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 07/05/2020 13:33 या दिवशी प्रकाशित केले.

सांजवेळ




( चैत्र महिन्यात खिडकीतून रोजच दिसणा-या दृष्याचे शब्दचित्र) आकाशाच्या पृष्ठावरती,मावळती ते रंग पसरवी डोंगरमाथ्यावरती शोभे,वृक्षांची ती झालर हिरवी ॥ सिरीसवृक्ष तो अपुली छत्री,वा-यासंगे हळु डोलवी लालगुलाबी तंतुफुलांवर,शत राव्यांचे दल झेपावी ॥ सांजदिव्यांची तिरीप घेऊन,उजळे गर्द-फिकी हिरवाई पर्णहीन त्या काष्ठतरूवर, बगळ्यांची मग फुले फुलावी ॥ तलम,चुरमुडी,पाचपाकळी,थरथरणारे परागकेसर पानापानांतून डोकावे,वसंतसाक्षी सुवर्णमोहर वसंतसाक्षी सुवर्णमोहर॥


वाचने 17147
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

In reply to by मन्या ऽ

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.


पुन्हा वाचली... पुन्हा पुन्हा वाचून पुन्हा पुन्हा ती वेळ अनुभवावी इतके सुंदर वर्णन.. इतके सुंदर चित्रण.. याला पुन्हा कवितेतून रिप्लाय लिहिला होता पण पुन्हा erase केला

In reply to by गणेशा

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.


क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे आठवली.

In reply to by तुषार काळभोर

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.


अप्रतीम !

+१


+१

सुंदर

नवे बालकवी! कवितेला.... + १ सं - दी - प

चैतीला लैच पालवी फुटलीय म्हणायची

,+1

कविता सुंदर झालीये. खूप आवडली. शिरीषवृक्ष म्हणजे कोणता हो? गूगललं पण समजलं नाही नीटसं. प्रचलीत नाव वेगळंय का? बाकी ते फॉरमॅटींग थोडंसं करावं, जेणेकरून वाचायला सोप्पं होईल अजून - आकाशाच्या पृष्ठावरती, मावळती ते रंग पसरवी डोंगरमाथ्यावरती शोभे, वृक्षांची ती झालर हिरवी ॥ सिरीसवृक्ष तो अपुली छत्री, वा-यासंगे हळु डोलवी लालगुलाबी तंतुफुलांवर, शत राव्यांचे दल झेपावी ॥ सांजदिव्यांची तिरीप घेऊन, उजळे गर्द-फिकी हिरवाई पर्णहीन त्या काष्ठतरूवर, बगळ्यांची मग फुले फुलावी ॥ तलम,चुरमुडी,पाचपाकळी, थरथरणारे परागकेसर पानापानांतून डोकावे, वसंतसाक्षी सुवर्णमोहर वसंतसाक्षी सुवर्णमोहर॥

In reply to by राघव

प्रतिसादाबद्दल आभार. नुसतं सांगून न थांबता फाॅरमॅट करून कविता लिहिलीत,आवडलं .

In reply to by राघव

प्रतिसादाबद्दल आभार. नुसतं सांगून न थांबता फाॅरमॅट करून कविता लिहिलीत,आवडलं . प्रतिसाद चुकून खाली टंकला.

In reply to by राघव

आपल्यासाठीचा प्रतिसाद दुसरीकडे कसा जातोय कोण जाणे

+१

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार

अतिशय सुंदर चितारलीये!