[कविता' २०२०] - सांजवेळ

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
7 May 2020 - 1:33 pm

सांजवेळ

( चैत्र महिन्यात खिडकीतून रोजच दिसणा-या दृष्याचे शब्दचित्र)

आकाशाच्या पृष्ठावरती,मावळती ते रंग पसरवी
डोंगरमाथ्यावरती शोभे,वृक्षांची ती झालर हिरवी ॥
सिरीसवृक्ष तो अपुली छत्री,वा-यासंगे हळु डोलवी
लालगुलाबी तंतुफुलांवर,शत राव्यांचे दल झेपावी ॥
सांजदिव्यांची तिरीप घेऊन,उजळे गर्द-फिकी हिरवाई
पर्णहीन त्या काष्ठतरूवर, बगळ्यांची मग फुले फुलावी ॥
तलम,चुरमुडी,पाचपाकळी,थरथरणारे परागकेसर
पानापानांतून डोकावे,वसंतसाक्षी सुवर्णमोहर
वसंतसाक्षी सुवर्णमोहर॥

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 4500px;
}

प्रतिक्रिया

गणेशा's picture

7 May 2020 - 1:45 pm | गणेशा

+1

अप्रतिम

मन्या ऽ's picture

7 May 2020 - 1:58 pm | मन्या ऽ

सुं-द-र!

साहित्य संपादक's picture

7 May 2020 - 3:53 pm | साहित्य संपादक

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.

+१,
राहुन गेला होता द्यायचा!

प्रचेतस's picture

7 May 2020 - 2:07 pm | प्रचेतस

+१

सुंदर

पुन्हा वाचली... पुन्हा पुन्हा वाचून पुन्हा पुन्हा ती वेळ अनुभवावी इतके सुंदर वर्णन.. इतके सुंदर चित्रण..

याला पुन्हा कवितेतून रिप्लाय लिहिला होता पण पुन्हा erase केला

साहित्य संपादक's picture

7 May 2020 - 3:53 pm | साहित्य संपादक

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.

तुषार काळभोर's picture

7 May 2020 - 2:22 pm | तुषार काळभोर

क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे आठवली.

साहित्य संपादक's picture

7 May 2020 - 3:53 pm | साहित्य संपादक

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.

मोहन's picture

7 May 2020 - 4:13 pm | मोहन

अप्रतीम !

तुषार काळभोर's picture

7 May 2020 - 6:16 pm | तुषार काळभोर

+१

पलाश's picture

7 May 2020 - 6:25 pm | पलाश

+१

कौस्तुभ भोसले's picture

8 May 2020 - 9:34 am | कौस्तुभ भोसले

सुंदर

चांदणे संदीप's picture

9 May 2020 - 9:05 am | चांदणे संदीप

नवे बालकवी!

कवितेला.... + १

सं - दी - प

स्वलिखित's picture

9 May 2020 - 8:08 pm | स्वलिखित

चैतीला लैच पालवी फुटलीय म्हणायची

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

12 May 2020 - 12:30 am | सौ मृदुला धनंजय...

,+1

राघव's picture

14 May 2020 - 11:05 am | राघव

कविता सुंदर झालीये. खूप आवडली.

शिरीषवृक्ष म्हणजे कोणता हो? गूगललं पण समजलं नाही नीटसं. प्रचलीत नाव वेगळंय का?

बाकी ते फॉरमॅटींग थोडंसं करावं, जेणेकरून वाचायला सोप्पं होईल अजून -

आकाशाच्या पृष्ठावरती,
मावळती ते रंग पसरवी
डोंगरमाथ्यावरती शोभे,
वृक्षांची ती झालर हिरवी ॥

सिरीसवृक्ष तो अपुली छत्री,
वा-यासंगे हळु डोलवी
लालगुलाबी तंतुफुलांवर,
शत राव्यांचे दल झेपावी ॥

सांजदिव्यांची तिरीप घेऊन,
उजळे गर्द-फिकी हिरवाई
पर्णहीन त्या काष्ठतरूवर,
बगळ्यांची मग फुले फुलावी ॥

तलम,चुरमुडी,पाचपाकळी,
थरथरणारे परागकेसर
पानापानांतून डोकावे,
वसंतसाक्षी सुवर्णमोहर
वसंतसाक्षी सुवर्णमोहर॥

मनिष's picture

21 May 2020 - 12:19 am | मनिष

शिरीषवृक्ष = raintree

rain tree

नूतन's picture

25 May 2020 - 2:10 pm | नूतन

प्रतिसादाबद्दल आभार.
नुसतं सांगून न थांबता फाॅरमॅट करून कविता लिहिलीत,आवडलं .

नूतन's picture

25 May 2020 - 2:12 pm | नूतन

प्रतिसादाबद्दल आभार.
नुसतं सांगून न थांबता फाॅरमॅट करून कविता लिहिलीत,आवडलं .
प्रतिसाद चुकून खाली टंकला.

नूतन's picture

25 May 2020 - 2:15 pm | नूतन

आपल्यासाठीचा प्रतिसाद दुसरीकडे कसा जातोय कोण जाणे

सर्वसाक्षी's picture

22 May 2020 - 4:23 pm | सर्वसाक्षी

+१

बिपीन सुरेश सांगळे's picture

25 May 2020 - 1:23 pm | बिपीन सुरेश सांगळे

वाह
काय सुंदर चित्रमय वर्णन !

नूतन's picture

25 May 2020 - 2:06 pm | नूतन

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार

सत्यजित...'s picture

2 Jun 2020 - 4:28 pm | सत्यजित...

अतिशय सुंदर चितारलीये!