असे काही चित्रपट असतात जे आपण कितीही वेळा न कंटाळता बघू शकतो चॅनेल surfing करताना हे picture असतील तर रिमोट खाली ठेवून तो चित्रपट बघितलाच जातो,PC वर डाउनलोड करून ठेवतो असे
ऑल टाइम फेवरीट सारखे
माझे
१. कल हो ना हो - ह्यात सगळेच जमून आले आहे मध्ये मध्ये मेलोड्रॅमटिक केले असले तरी पूर्ण मूवी वाहता ठेवलाय आनंद ह्या जुन्या चित्रपटावर आधारित असला तरी पूर्ण वेगळी हाताळणी केली असल्यामुळे आणि NRI लोकांचे जीवन दाखवल्यामुळे तेवढे कळून येत नाही नाही म्हणायला बऱ्याच चित्रपटांमध्ये NRI जीवन दाखवले आहे पण ह्या चित्रपटासारखे वास्तववादी तरीही उदास न करणारे कुठेच नाही दाखवले थोडा आचरट पणाकडे झुकलेला असला तरी
२००३ सालाप्रमाणे गल्ला जमवायला तेवढे दाखवणे चालवून घ्यायचे (करण जोहर चा चित्रपट आहे शेवटी)
२. मुंबई पुणे मुंबई भाग १ -फक्त दोन पात्रांवर अक्खा चित्रपट खेचला आहे अर्थात mukta बर्वे आणि स्वप्नील जोशी ची acting पण तेवढीच चांगलीये.दिग्दर्शन,अभिनय हे दोन्ही जमून आलेय
३. वेलकम - एकदम टाईमपास चित्रपट
४. अंदाज अपना अपना - वेगळ्या धाटणीचा कॉमेडी चित्रपट
५. छोटी सी बात - आजच्या काळात पण लागू होणार चित्रपट विशेषतः अशोककुमार चे training
६. परिचय - गुलज़ार यांचा अप्रतिम चित्रपट.साऊंड ऑफ music चे बेमालूम भारतीयीकरण . उत्तम कथा आणि सगळ्यांचे तोडिस तोड काम
७. the कराटे kid - लहान मुलाच्या जिद्दीचा आणि त्याच्या प्रवासाचा चित्रपट
८. OMG -ओह my गॉड -आवडतो असाच एकदम वेगळ्या विषयावरचा
९. pk -विरंगुळा
१०. विकी डोनर -हटके तरीही entertaining चित्रपट
असेच चित्रपट आणि त्यांची थोडी ओळख share करावी हि विनन्ती
ह्याच विषयावर आधी धागा पाहिल्याचे आठवतेय पण धागा सापडत नाहीये म्हणून नवीन
अवांतर-मिपावर चित्रपट गाणी हे विषय थोडे बॅकसीट वरच असतात असे वाटते माझ्या आधीच्या गाण्यांविषयीच्या धाग्यावर जास्त प्रतिसाद नाहीयेत ज्यांनी दिलेत त्यांचे आभार तरी पण हा धागा काढतीये
धन्यवाद
वाचने
10380
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमची आणि माझी लिस्ट जवळपास
धन्यवाद
धन्यवाद!
you ट्यूब
...
यादी देणे अवघड
आहे कठीण तरी...
आभारी आहे
In reply to आहे कठीण तरी... by Nitin Palkar
Fight Club (1999 ) अगणित वेळा
chopsticks
पडोसन
दे दे प्यार दे
बोल्डवरुन आठवलं...
१.इस रात कि सुबह नही
माझी लिष्ट
अजून एक- पंगा
सोनू के टिटू कि स्विटी
आवडते दुःखी/रडायला लावणारे
छान धागा
मला आवडलेले सिनेमे