झटकून टाक जीवा दुबळेपणा.........

शेर भाई's picture
शेर भाई in काथ्याकूट
2 May 2020 - 2:07 am
गाभा: 

मला आठवतयं कि आमची कॉलेजची पहिलीच Inter College First Class Cricket Match होती. आदल्या रात्री आईने झोपताना हनुमान – जांबुवंत कथा सांगितली. ज्यात जांबुवंत हनुमानाला त्याच्या शक्तीची जाणीव करून देतो. शेवट करताना ती म्हणाली होती कि आपल्या प्रत्येकात एक हनुमान दडलेला असतो, फक्त योग्य वेळी जांबुवंत भेटला पाहिजे. आता तस म्हटले तर त्या कथेचा आणि पुढे Match मध्ये लावलेल्या दिव्यांचा तसा काही सबंध नाही. पण त्या वेळेला आलेली मरगळ जाऊन हुरूप मात्र नक्कीच वाढला होता.

नंतर असच एकदा मोठा झटका खाल्यावर, आता काही खरं नाही असा विचार करत Computer मधले Video बघत असताना Pixar चा Boundin लावला. त्याची English आणि हिंदी दोन्ही प्रकार होते. पहिल्यांदा हिंदी लावला त्यात जावेद जाफरीचा आवाज आहे. त्यातल्या कोकराच्या जागी नकळत मी स्वत:ला बघायला लागलो, मग तो मस्त कलंदर भेडसिंगा येतो आणि विचारतो काय बा झाल तरी काय? आणि कोकराच रडगाणे ऐकून तो जे उत्तर देतो ते बघून मला माझा जांबुवंत परत एकदा नव्याने भेटला. (भाषेची गंमत अनुभवण्यासाठी नंतर English पण ऐकला, तो पण तितकाच Impact देतो) मग काय अजून दिवे लावायला मी पुन्हा सुटलो.

असाच अजून एक जांबुवंत मी मा‍झ्या जवळ ठेवला आहे, Walt Disney चा Bedtime stories. त्यात जेव्हा हिरो सगळं हरून डोक्याला हात लावून बसलेला असतो तेव्हा त्या कथेचा सूत्रधार म्हणजेच हिरोचा बाप त्याला विचारतो “Is this the end of your story Son?” आणि त्या नंतर त्यांचे संवाद ऐकून आणि पुढची कथा बघून तुमची मरगळ उडालीच पाहिजे.

जर तुमच्याकडे पण असे जांबुवंत असतील तर नक्की सांगा.

Pixar Boundin Hindi Inspiration
https://www.youtube.com/watch?v=cjB8ZQ8Z140 (१.५७ पासून)

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

2 May 2020 - 10:10 am | चांदणे संदीप

Boundin आवडला. :)

सं - दी - प

Nitin Palkar's picture

2 May 2020 - 12:18 pm | Nitin Palkar

लेख आणि शीर्षक दोन्ही आवडले.

गामा पैलवान's picture

2 May 2020 - 5:40 pm | गामा पैलवान

राजन नरहरी राणे,

मिपावर स्वागत आहे. लिहिते रहा! :-)

आ.न.,
-गा.पै.

शेर भाई's picture

2 May 2020 - 9:38 pm | शेर भाई

संदीपG, नितीनG, पैलवानG आपले मनापासून आभार.
आपल्याला भेटलेले जांबुवंत जाणून घ्यायला आवडेल.

टर्मीनेटर's picture

14 May 2020 - 12:17 am | टर्मीनेटर

झकास लिहिलय..
मला भेटलेला जांबुवंत म्हणजे किशोर कुमार.
त्यांनी गायलेली गाणी माझ्यासाठी कायम प्रेरणादायी ठरली आहेत!

चांदणे संदीप's picture

26 May 2020 - 9:27 am | चांदणे संदीप

सेम पिंच!

सं - दी - प

शेर भाई's picture

3 Jun 2020 - 3:02 pm | शेर भाई

@ टर्मीनेटर आणि चांदणे संदीप धन्यवाद
गाणी खरच हुरुप वाढवतात, लहानपणापासून मला अभ्यास करताना किंवा आता काम करताना Motivational गाणी ऐकत काम करताना खूप मजा येते.

निनाद's picture

4 Jun 2020 - 6:21 am | निनाद

सुंदर धागा, विषय आवडला.
जांबुवंत हनुमानाला त्याच्या शक्तीची जाणीव करून देतो ही कथा मराठीमध्ये पूर्ण कुठे मिळेल?

पाषाणभेद's picture

5 Jun 2020 - 1:19 am | पाषाणभेद

आता लागलेल्या रामायण या मालीकेत असा उल्लेख आल्याचे आठवते. तो भाग शोधण्याचा प्रयत्न केला परंतु सापडला नाही.
बहूदा हनुमान सिता शोधासाठी पहिल्यांदा समुद्रावरून जाण्याच्या आधी त्याच्या शक्तीचा त्याला अंदाज येत नाही तेव्हा जाबुंवत त्या हनुमंताचे उद्बोधन करतात.

शेर भाई's picture

4 Jun 2020 - 1:29 pm | शेर भाई

मराठीत कथा कुठे मिळेल माहित नाही, पण रामायणातील अनेक प्रसंगात बऱ्याच बोधकथा दडलेल्या आहेत अस मला वाटत.
आमच्या लहानपणी लक्ष्मणरेखा आणि संयम याचं रूपक साधून, आठवड्यातले काही दिवस शाकाहारी रहाणे का आवश्यक आहे ह्याची एक गोष्ट लहानपणी आईने सांगितलेली आठवते.