मला आठवतयं कि आमची कॉलेजची पहिलीच Inter College First Class Cricket Match होती. आदल्या रात्री आईने झोपताना हनुमान – जांबुवंत कथा सांगितली. ज्यात जांबुवंत हनुमानाला त्याच्या शक्तीची जाणीव करून देतो. शेवट करताना ती म्हणाली होती कि आपल्या प्रत्येकात एक हनुमान दडलेला असतो, फक्त योग्य वेळी जांबुवंत भेटला पाहिजे. आता तस म्हटले तर त्या कथेचा आणि पुढे Match मध्ये लावलेल्या दिव्यांचा तसा काही सबंध नाही. पण त्या वेळेला आलेली मरगळ जाऊन हुरूप मात्र नक्कीच वाढला होता.
नंतर असच एकदा मोठा झटका खाल्यावर, आता काही खरं नाही असा विचार करत Computer मधले Video बघत असताना Pixar चा Boundin लावला.