Skip to main content

[शशक' २०२०] - ताळेबंद

लेखक मधुका यांनी रविवार, 26/04/2020 21:27 या दिवशी प्रकाशित केले.

ताळेबंद




वर्ष २०२०. नेहमीपेक्षा खूपच जास्त काम आले होते हल्ली. खरं तर सुखवस्तू देश, कमी काम, म्हणून उषाने या शाखेवर बदली मागितली. पण आता उसंत नव्हती. एवढे सगळ्यांचे जमाखर्च तपासून ती दमली. तिचा जुना सहकारी भरत मात्र स्वदेशीच. तो मात्र एकदम खूश! एरवी काही हजार केसेस रोजच्या - ते काम हजारच्या आत निपटायचं आजकाल. शिवाय नेहमी सतराशेसाठ प्रकारच्या केसेस - तसं नव्हतं हल्ली. दिवस संपला. दोघांनी आपआपला अहवाल बॉसकडे पाठवला. उषा- २११९ केसेस. भरत- ५४०. परंतु दोन्ही अहवालांतील शेवटच्या रकान्यात मुख्यत्वेकरुन एकच शब्द होता: "कोरोना". सर्व ताळेबंद नीट तपासून बॉसने दोन्हीही – 'अमेरिका' (USA) नि 'भारत' - अहवालांवर सही केली - "चित्रगुप्त"! ...आणि अहवाल यमाकडे पाठवले.


वाचने 7492
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

+१

उषा अन् भरत नावांची कल्पकता आवडली.

+१

:)

+1 कथा आवडली शब्दांच्या ताळेबंदा वरून writer कोण आहे हे मला बहुतेक कळाले आहे, बघू बरोबर होते आहे का? चुकले तर चुकले..

+१

+१

+१ आवडली..

+१

+१ आवडली!

+१

+१

+१

+1

.

+१

+१ आवडली

उषा आणि भरत ही कन्सेप्ट आवडली