हळूवार वेच ती
प्राजक्ताची फुले
रानपाखरे वेलीवरती
घेती तेथे झुले.
मधुर गोजिरी होते किलबिल.
तुझ येण्याची देती चाहूल.
प्राजक्त ही मग बहरून येतो
शुभ्र फुलांची रास घालीतो
केस मोकळे शुर्भ वसने
पायावर ते अलगत बसणे
फुल फुलाशी घेते वेचून
असेच मजला वाटे पाहून
चोरुन घेई गंध नेटका
अंगणी वाहे वारा अवखळ
प्राजक्ताचा गंध सुगंधी
की आसे तो तुझाच दरवळ
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3833
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर!!
धन्यवद
In reply to सुंदर!! by जव्हेरगंज
छानच कविता!
धन्यवाद
In reply to छानच कविता! by चांदणे संदीप
सुंदर!
छान