Skip to main content

प्राजक्ताची फुले

लेखक मनोज यांनी बुधवार, 29/04/2020 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
हळूवार वेच ती प्राजक्ताची फुले रानपाखरे वेलीवरती घेती तेथे झुले. मधुर गोजिरी होते किलबिल. तुझ येण्याची देती चाहूल. प्राजक्त ही मग बहरून येतो शुभ्र फुलांची रास घालीतो केस मोकळे शुर्भ वसने पायावर ते अलगत बसणे फुल फुलाशी घेते वेचून असेच मजला वाटे पाहून चोरुन घेई गंध नेटका अंगणी वाहे वारा अवखळ प्राजक्ताचा गंध सुगंधी की आसे तो तुझाच दरवळ
लेखनविषय:

वाचने 3833
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

भेट सजविण्या तिची एकांती, ये पुन्हा पुन्हा बहरूनि धवल केसरी गालिचा तू ठेव तिथे पसरूनि अशा ओळी आठवल्या. सं - दी - प

मस्तच मनोज..