Skip to main content

[शशक' २०२०] - कातरवेळ

लेखक तुषार काळभोर यांनी रविवार, 19/04/2020 12:28 या दिवशी प्रकाशित केले.

कातरवेळ




तीनचार तास रडून रडून तिच्या डोळ्यातलं पाणीसुद्धा आता वाहायच थांबलं होतं. ती भिंतीला टेकून मांडी घालून जमिनीकडे डोळे करून बसली होती. नजर मेल्यासारखी झालेली. तिच्या शेजारी चारपाच जणी बसल्या होत्या, पण त्या तरी किती सांत्वन करणार. मध्येच त्यातली एक उठली, बाहेर जाऊन नजर टाकून आली. अजून कुणीच आलं नव्हतं. जरा अंधार व्हायला लागला तसं दुसरीने जाऊन बाहेरची लाईट लावली. तेव्हढ्यात बाहेर कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली. दोन पुरुष असावेत. घरातल्या सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. तिने तर श्वास घेणंच जवळजवळ बंद केलेलं. "झालं ऑपरेशन. शुद्धीवर नाही आली अजून, डॉक्टर म्हणाले होईल व्यवस्थित. पण आता सहा जणांनी नासवल्यावर जगून तरी काय करंल!"


वाचने 7766
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

मला कळलंय ते बरोबर आहे का -  जी भिंतीला टेकून बसली होती ती रेप झालेल्या मुलीची आई आहे का?

सहा जणांनी नासवली हे सुन्न करणारे आहे. पण जगून काय करेल... हे पटत नाही. जगल्यास करण्यासारखे खूप काही असते. अशी उदाहरणे समाजात आहेत.

फुल स्टोरी लिहीली आहे त्यामुळे गंडलीये. ऑपरेशन झालंय म्हटल्यावर घरचे हॉस्पिटलमधे हवेत, ते घरी बसून कुणाची वाट पाहातायंत ?