कातरवेळ

तीनचार तास रडून रडून तिच्या डोळ्यातलं पाणीसुद्धा आता वाहायच थांबलं होतं. ती भिंतीला टेकून मांडी घालून जमिनीकडे डोळे करून बसली होती. नजर मेल्यासारखी झालेली. तिच्या शेजारी चारपाच जणी बसल्या होत्या, पण त्या तरी किती सांत्वन करणार.
मध्येच त्यातली एक उठली, बाहेर जाऊन नजर टाकून आली. अजून कुणीच आलं नव्हतं. जरा अंधार व्हायला लागला तसं दुसरीने जाऊन बाहेरची लाईट लावली.
तेव्हढ्यात बाहेर कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली. दोन पुरुष असावेत. घरातल्या सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
तिने तर श्वास घेणंच जवळजवळ बंद केलेलं.
"झालं ऑपरेशन. शुद्धीवर नाही आली अजून, डॉक्टर म्हणाले होईल व्यवस्थित. पण आता सहा जणांनी नासवल्यावर जगून तरी काय करंल!"

वाचने
7752
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
:( फारच तीक्ष्ण! +१
+1
+1
+१
:(
+१
+१
+1
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
सहा जणांनी नासवली हे सुन्न
फक्त लास्ट लाईनसाठी
+१
+१
+१
+1