Skip to main content

मौनाचे गुपित

लेखक चलत मुसाफिर यांनी मंगळवार, 21/04/2020 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
मौनामागे दडुनी असती नाना परिची किती कारणे कुठे व्यग्रता, कुठे खिन्नता वरुन दाखवी 'नको बोलणे' मौनाच्या वाटांचे वळसे वाटसरूला होई चकवा निबिड शांतता चहुबाजूला असह्य होई अबोल थकवा मौन राखते दाट अरण्ये अनेक गुपिते अनेक आख्या वरवर जे दिसते डोळ्यांना खरे भासते असून मिथ्या मौन पाहते सूचक, रोखुन धारदार भेदक डोळ्यांनी एका एका प्रश्नासंगे यक्षाची तलवार परजुनी प्रश्नहि ऐसे महाकठिण ते सापडता सापडे न उत्तर चकव्यामधुनी सुटण्याइतके नशिब कुणाचे की बलवत्तर? कुणास होतो मोह अनावर मौनाशी दो हात करावे मौनाला मौनाने उत्तर नजर भिडवुनी आपण द्यावे करू नये कधि दुस्साहस हे समोर येइल भयाण खाई शरणागतिचा एकच रस्ता मौनासंगे नको लढाई लिहून देता क्षमायाचना मौनाचा पारा ये खाली गायब होतो लगेच चकवा क्षणात दिसते वाट आपुली मौनालाही वाटत असते कुणितरि यावे अन् बोलावे मौनाचे हे गुपित परंतू नसते बहुतेकांना ठावे!!
लेखनविषय:

वाचने 4056
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

In reply to by चांदणे संदीप

हो, कविता थोडी लांब झाली खरी. प्रतिसादासाठी धन्यवाद.

In reply to by प्राची अश्विनी

प्रतिसादासाठी धन्यवाद