प्रसिद्धी

प्रसिद्धीसाठी काय केले नाही.
क्रिकेट मध्ये सेन्चुरी मारली.
लोक म्हणाले, “ पाटा पिच असणार.”
कथा लिहिल्या.
लोक म्हणाले, “ पकाऊ आहेत.”
कविता केल्या.
लोकांनी नाकं मुरडली, “ टाकाऊ आहेत.”
लेख लिहिले.
लोक म्हणाले, “ विकाऊ आहेत.”
आदळाआपट केली.
लोक म्हणाले, “ आडमाप आहे.”
कपडे फाडले.
लोक कुत्सितपणे म्हणाले, “ आहेरातले असणार.”
गाढवावर उलटे बसून, तीन पाट काढून, स्वतःची वरात काढली.
लोक म्हणाले, “आता मात्र ह्याला वेड लागले.”
पिऊन धिंगाणा घातला.
लोक खवळले, चप्पल घेऊन धावले, “ ह्याच्या आयला------”
मग प्रेम केले.
प्रतिसाद मिळाला.
लोक आश्चर्यचकित झाले , “ व्वा, वाटले नव्हते. शेवटी बाबल्याने आयुष्यांत काहीतरी केलं बरं का !”
पण ते ऐकायला उरलोच नव्हतो मी.
आता उरलो फक्त प्रेमा पुरता!

वाचने
5392
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१ मैने प्यार किया :-)
+१
मैने प्यार किया :-)
+१ लय भारी! मजा आली!!
+१
लय भारी! मजा आली!!
+१
+१
नक्की मजा काय आहे?
मला सिरियस कथा वाटली, मला समजलेला अर्थ : नायक मेल्यावर त्याचा मोठेपणा पटला
नायक मेल्यावर...
In reply to +१ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
आयुष्य प्रसिद्धीसाठी आटापिटा केला. आता प्रेमापुढे नायकाला प्रसिद्धीची काहि किंमत राहिली नाहि... पण मग प्रसिद्धी सुद्धा स्वतःहुन चालत आलि. प्रसिद्धी म्हणण्यापेक्षा, चार चौघात नायकाला मान सन्मान मिळु लागला असं म्हणुया.
हम्म, हा पण अर्थ लागतोय
In reply to नायक मेल्यावर... by अर्धवटराव
हम्म, हा पण अर्थ लागतोय
तुमचीच कथा हाय का काय ;)
खि खि खि
In reply to हम्म, हा पण अर्थ लागतोय by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मागच्या शशक स्पर्धेत एक कथा पाठवली होती... मिपाकरांच्या कमेण्ट्स बघुन परत हिंमत नाहि केली :ड
+१
+१ जबरदस्त!
सं - दी - प
+१
प्रेम रतन धन पायो वगैरे गाणं आठवलं.. पण सलमान आणि सोनमचा चेहेरा आठवुन लगेच सगळ्या आनंदावर पाणि पडलं :ड
+१
+१
+१
+१
+१
+१
आवडली!
+१
+१