Skip to main content

[शशक' २०२०] - प्रसिद्धी

लेखक भागो यांनी बुधवार, 15/04/2020 15:01 या दिवशी प्रकाशित केले.

प्रसिद्धी




प्रसिद्धीसाठी काय केले नाही. क्रिकेट मध्ये सेन्चुरी मारली. लोक म्हणाले, “ पाटा पिच असणार.” कथा लिहिल्या. लोक म्हणाले, “ पकाऊ आहेत.” कविता केल्या. लोकांनी नाकं मुरडली, “ टाकाऊ आहेत.” लेख लिहिले. लोक म्हणाले, “ विकाऊ आहेत.” आदळाआपट केली. लोक म्हणाले, “ आडमाप आहे.” कपडे फाडले. लोक कुत्सितपणे म्हणाले, “ आहेरातले असणार.” गाढवावर उलटे बसून, तीन पाट काढून, स्वतःची वरात काढली. लोक म्हणाले, “आता मात्र ह्याला वेड लागले.” पिऊन धिंगाणा घातला. लोक खवळले, चप्पल घेऊन धावले, “ ह्याच्या आयला------” मग प्रेम केले. प्रतिसाद मिळाला. लोक आश्चर्यचकित झाले , “ व्वा, वाटले नव्हते. शेवटी बाबल्याने आयुष्यांत काहीतरी केलं बरं का !” पण ते ऐकायला उरलोच नव्हतो मी. आता उरलो फक्त प्रेमा पुरता!


वाचने 5383
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

+१ नक्की मजा काय आहे? मला सिरियस कथा वाटली, मला समजलेला अर्थ : नायक मेल्यावर त्याचा मोठेपणा पटला

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

आयुष्य प्रसिद्धीसाठी आटापिटा केला. आता प्रेमापुढे नायकाला प्रसिद्धीची काहि किंमत राहिली नाहि... पण मग प्रसिद्धी सुद्धा स्वतःहुन चालत आलि. प्रसिद्धी म्हणण्यापेक्षा, चार चौघात नायकाला मान सन्मान मिळु लागला असं म्हणुया.

In reply to by अर्धवटराव

हम्म, हा पण अर्थ लागतोय तुमचीच कथा हाय का काय ;)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

मागच्या शशक स्पर्धेत एक कथा पाठवली होती... मिपाकरांच्या कमेण्ट्स बघुन परत हिंमत नाहि केली :ड

प्रेम रतन धन पायो वगैरे गाणं आठवलं.. पण सलमान आणि सोनमचा चेहेरा आठवुन लगेच सगळ्या आनंदावर पाणि पडलं :ड