Skip to main content

[शशक' २०२०] - वनवास

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 15/04/2020 18:48 या दिवशी प्रकाशित केले.

वनवास




टीव्हीवर रामायण बघताना प्रश्न विचारून बाबाला भंडावून सोडलं तिने. नीट जेवूही नाही दिलं. जमतील तेवढी उत्तरं बाबाने दिली. तिला जवळ घेत, "तू माझा लक्ष्मण आहेस." असं लाडाने म्हटलं. जेवल्यानंतर, आई बाबांचं, सध्याच्या कोरोनाच्या काळात कामाला जाणं म्हणजे वनवासाला जाणं असं काहीतरी चालू होतं. रात्री झोपताना रामायणातल्या गोष्टी ऐकत झोपली आणि सकाळी ती उठायच्या आधीच बाबा कामासाठी गेला होता. दिवसभर तिने उशीला, पडद्याला, रावण करून त्यांच्याबरोबर लढाई केली. आईचे धपाटेही खाल्ले. संध्याकाळी दाराची बेल वाजताच, धावत जाऊन तिने दरवाजा उघडला. बाबाच्या पायांना बिलगून डोळ्यात पाणी आणून तिने विचारले, "मी तुझा लक्ष्मण आहे ना? मग तू मला वनवासात सोबत का नाही नेलं?"


वाचने 28889
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

+१ सुंदर

+१

+१ सं - दी - प

+१

+१

+1

In reply to by शशिकांत ओक

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल. 'आवडली', 'छान' या प्रतिक्रिया मतदानात मोजल्या जाणार नाहीत.


+ १

+1

आवडली कथा

+१

आवडली पैजारबुवा,

+१

+१

+१

+१ नि:शब्द!

+1

+१

वाह... किती गोड आहे ही छोटीशी कथा.

खूप गोड 

+1

+१

+1

+१

+१ आवडली!

+१

+1

+१

+१

+१

सुन्दर कथा. ही माझ्या नजरेतुन निसटली होती +१