[शशक' २०२०] - वनवास
वनवास

टीव्हीवर रामायण बघताना प्रश्न विचारून बाबाला भंडावून सोडलं तिने. नीट जेवूही नाही दिलं.
जमतील तेवढी उत्तरं बाबाने दिली. तिला जवळ घेत, "तू माझा लक्ष्मण आहेस." असं लाडाने म्हटलं.
जेवल्यानंतर, आई बाबांचं, सध्याच्या कोरोनाच्या काळात कामाला जाणं म्हणजे वनवासाला जाणं असं काहीतरी चालू होतं.
रात्री झोपताना रामायणातल्या गोष्टी ऐकत झोपली आणि सकाळी ती उठायच्या आधीच बाबा कामासाठी गेला होता.
दिवसभर तिने उशीला, पडद्याला, रावण करून त्यांच्याबरोबर लढाई केली. आईचे धपाटेही खाल्ले.
संध्याकाळी दाराची बेल वाजताच, धावत जाऊन तिने दरवाजा उघडला. बाबाच्या पायांना बिलगून डोळ्यात पाणी आणून तिने विचारले,
"मी तुझा लक्ष्मण आहे ना? मग तू मला वनवासात सोबत का नाही नेलं?"

वाचने
28888
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
+१ फारच गोड!!
+१ सुंदर
+१
+१
+१
+१
+1
! चिमुकलीचे रामायण!
In reply to ! चिमुकलीचे रामायण! by शशिकांत ओक
मतदान पद्धत : सदस्यांनी
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल. 'आवडली', 'छान' या प्रतिक्रिया मतदानात मोजल्या जाणार नाहीत.
In reply to ! चिमुकलीचे रामायण! by शशिकांत ओक
+1
+ १
+1
+1
+१
+१
+१
+१
+१
+१
+1
आवडली आणि याच बरोबर सगळ्या
+१
+१
+१
निव्वळ अप्रतिम
+1
+१
+1
+१
+१
+१
+1
+१
+१
+१
आवडली....
सुन्दर
अभिनंदन चांदणे!!!
अभिनंदन!!