Skip to main content

[शशक' २०२०] - छंद

लेखक स्मिताके यांनी गुरुवार, 16/04/2020 08:32 या दिवशी प्रकाशित केले.

छंद




"लायब्ररीचं खातं बंद करून आलो." "अरे कर्मा! अहो, पोरीला वाचनाचा छंद म्हणून आठवड्याला एखादं पुस्तक नेऊन द्यायचात ना तिच्यासाठी? ऑफिसमधून येऊन घरकाम आवरल्यावर थोडा वेळ वाचायला मिळालं की खुश असायच्या बाईसाहेब. पण हल्ली वेळ मिळत नाही म्हणत होती. सासूबाई पूर्वी स्वयंपाकाची सगळी तयारी करून ठेवायच्या. पण आताशा स्वयंपाकघराकडे फिरकत नाहीत म्हणे. पोरीचा छंद बंद झाला म्हणायचा!" "अग, ऐक तरी माझं. आज दुपारी गेलो होतो पुस्तक परत आणायला. सासरे म्हणतात कसे, आमच्या हिचा दिवस चांगला जातो हल्ली तुमच्या पुस्तकांमुळे. कंटाळून जायची बिचारी घरकाम करून. आता दुपारची जेवणं झाल्यावर जी पुस्तक घेऊन बसते, ती संध्याकाळी सिरियली पाहायलाच उठते. चांगला छंद लावलात तिला."


वाचने 30041
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

+१

In reply to by जव्हेरगंज

सासूबाई पूर्वी स्वयंपाकाची सगळी तयारी करून ठेवायच्या. पण आताशा स्वयंपाकघराकडे फिरकत नाहीत म्हणे. पोरीचा छंद बंद झाला म्हणायचा!"
आता दुपारची जेवणं झाल्यावर जी पुस्तक घेऊन बसते, ती संध्याकाळी सिरियली पाहायलाच उठते. चांगला छंद लावलात तिला."
करा विचार

In reply to by प्रशांत

पोरीचा छंद बंद झाला म्हणायचा!" आणि सासरे म्हणतात कसे, आमच्या हिचा दिवस चांगला जातो हल्ली तुमच्या पुस्तकांमुळे. कुछ कनेक्शन समझाही नहीं! म्हणजे सासूबाई अगोदरच स्वयंपाकघराकडे फिरकत नाहीत म्हणे. आणि आतातर दुपारची जेवणं झाल्यावर जी पुस्तक घेऊन बसते, ती संध्याकाळी सिरियली पाहायलाच उठते लय गोंधळ आहे. =))

In reply to by जव्हेरगंज

अहो सोप आहे.. मुलीचे वडील मुलीकरीता म्हणून लायब्ररीतून पुस्तक घेऊन तिच्या घरी द्यायचे पण ते पुस्तक मुलीची सासूच वाचायची त्यामुळे सासू स्वयंपाक घरात येईनाशी झाली आणि सगळा ताण मुलीलाच पडू लागला त्यामुळे मुलीच्या बाबांनी ते लायब्ररीचं खातंच बंद केलं .

+१ सासूबाईंची धमाल, व्याहीबुवांची कमाल! सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

+१ संदीप चांदणे, तुम्हांस धन्यवाद! :-) -गा.पै.

+1

+१

+1

+१.

+१

+१ एक नंबर ! डोकेबाज वडिल + १

+1

+१

+1

+1

+१

+१

.

+1

+१ छान ट्विस्ट

+१

+१

+१

आवडली ..

+१ मजेदार कथा. लहानपणी 'भली खोड मोड मोडली' वगैरे नावाच्या गोष्टी वाचायला मिळायच्या, त्याची आठवण झाली.

+१ आवडली!

+1

+१

+१