छंद

"लायब्ररीचं खातं बंद करून आलो."
"अरे कर्मा! अहो, पोरीला वाचनाचा छंद म्हणून आठवड्याला एखादं पुस्तक नेऊन द्यायचात ना तिच्यासाठी? ऑफिसमधून येऊन घरकाम आवरल्यावर थोडा वेळ वाचायला मिळालं की खुश असायच्या बाईसाहेब. पण हल्ली वेळ मिळत नाही म्हणत होती. सासूबाई पूर्वी स्वयंपाकाची सगळी तयारी करून ठेवायच्या. पण आताशा स्वयंपाकघराकडे फिरकत नाहीत म्हणे. पोरीचा छंद बंद झाला म्हणायचा!"
"अग, ऐक तरी माझं. आज दुपारी गेलो होतो पुस्तक परत आणायला. सासरे म्हणतात कसे, आमच्या हिचा दिवस चांगला जातो हल्ली तुमच्या पुस्तकांमुळे. कंटाळून जायची बिचारी घरकाम करून. आता दुपारची जेवणं झाल्यावर जी पुस्तक घेऊन बसते, ती संध्याकाळी सिरियली पाहायलाच उठते. चांगला छंद लावलात तिला."

वाचने
30041
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
गुगली आहे खरी पण कळली नाही.
+१ (कथेसाठी)
In reply to गुगली आहे खरी पण कळली नाही. by जव्हेरगंज
पोरीचा छंद बंद झाला म्हणायचा!
In reply to +१ (कथेसाठी) by प्रशांत
पोरीचा छंद बंद झाला म्हणायचा!"आणिसासरे म्हणतात कसे, आमच्या हिचा दिवस चांगला जातो हल्ली तुमच्या पुस्तकांमुळे.कुछ कनेक्शन समझाही नहीं! म्हणजे सासूबाई अगोदरचस्वयंपाकघराकडे फिरकत नाहीतम्हणे. आणि आतातरदुपारची जेवणं झाल्यावर जी पुस्तक घेऊन बसते, ती संध्याकाळी सिरियली पाहायलाच उठतेलय गोंधळ आहे. =))अहो सोप आहे..
In reply to पोरीचा छंद बंद झाला म्हणायचा! by जव्हेरगंज
+१
आता कळलं!
In reply to +१ by चांदणे संदीप
"लायब्ररीचं खातं बंद करून आलो
In reply to आता कळलं! by गामा पैलवान
"लायब्ररीचं खातं बंद करून आलो."हे वाचल्यावर ट्यूब पेटली!! कळली बहुतेक मलाही शेवटी. +१+1
+ १
+1
+१.
मस्तच
+१
+१
+1
+१
+1
बिचारी
बिचारी
+1
+१
+१
+१
+1
हा हा हा निव्वळ अप्रतिम
+१
+१
+१ आवडली आहे !
+१
+१
+1
+१
+१
+1
+१
+१
अभिनंदन!!
धन्यवाद