दिन मावळला, छाया दाटे
क्लांत मनाला भीती वाटे
दिवसभराचे रोकड संचित
कमावले, की कधीच नव्हते?
भवताली गर्दी ओसरते
स्तब्ध एकटे पंखे, पलिते
फडफड कोरी मेजावरली
काय कुणा ती सांगु पाहते..?
होते काही रेशिमधागे
आले कुठुनी मागे मागे
हातावरती विसावलेले
होते का, की कधीच नव्हते..?
सोबत होती तुझी सावली
खट्याळ, मोहक, श्यामसावळी
अखेरचा अंधार पसरता
असेल का, की साथ सोडते?
प्रवास आता मुक्कामाचा
शोधायाचा मार्ग स्वतःचा
सामानाचे ओझे टाळुन
घेतो सोबत हास्य तुझे ते
परतीचा रथ तयार आहे
काळ सारथी वळुनी पाहे
मिटू लागते किवाड, खिडकी
पैलतिरी घर वाट पाहते..
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4177
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाहवा!
धन्यवाद
In reply to वाहवा! by चांदणे संदीप
कवितेचा आशय नाही आवडला,
हो.
In reply to कवितेचा आशय नाही आवडला, by सतिश गावडे
आवडेश! पण पैलतीरी जायचंय यात
सहमत आहे
In reply to आवडेश! पण पैलतीरी जायचंय यात by राघव
सध्या जगन्नियंता रजेवर आहे.
In reply to सहमत आहे by चलत मुसाफिर
:-)
In reply to सध्या जगन्नियंता रजेवर आहे. by सतिश गावडे
गीत