कर्फ्यू , कॉफी आणि बरंच काही......

सरनौबत's picture
सरनौबत in जनातलं, मनातलं
31 Mar 2020 - 12:51 am


कर्फ्यू, कॉफी आणि बरंच काही......

२२ मार्चला मोदीजींनी एक दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर केला. फक्त एक दिवस देखील बाहेर न पडता घरीच राहायचे ही कल्पना अनेकांना अशक्य वाटू लागली. ह्या एका दिवसात घरी पासून काय करत येईल ह्याचे मेसेजेस यायला लागले. हा शिंचा कोरोना लवकर आटोक्यात येणार नाही असे दिसताच '"न भूतो न भविष्यती" असा चक्क २१ दिवसांचा लॉकडाऊन २५ मार्चपासून भारतभर जाहीर झाला. समर्थांच्या "जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांसी सांगावे । शहाणे करून सोडावे, सकळ जन" उक्तीनुसार लोकांनी व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड करण्याचा धडाका लावला.

गेल्या काही दिवसांत माझ्या व्हाट्सऍप वर पुल देशपांडेच्या कथाकथनाच्या शेकडो mp3 फाइल्स, मिरासदारांपासून मतकरीपर्यंत अनेक लेखकांची pdf पुस्तके, मराठी नाटकांच्या Youtube लिंक्स असा प्रचंड ऐवज जमा झालाय. भरीस भर म्हणून आता परवा पासून रोजची ४-५ वर्तमानपत्रे pdf स्वरूपात येऊ लागली आहेत. Social Distancing वर निर्बंध असले तरी अजून Social Media Distancing सारखा प्रकार नसल्याने लोकांची कल्पनाशक्ती फारच बहरात आली आहे. मारीच्या बिस्किटाला २२ छिद्रे असतात इथपासून ते पत्त्यातील बदाम राजाला मिश्या नसतात असे अनेक महत्वपूर्ण शोध लोकं लावीत आहेत.

मुळात Work from Home आणि घरी दोन लहान मुली असल्याने मला दिवस कसा संपतो तेच कळत नाही. संध्याकाळी थोडा वेळ काढून व्हाट्सअँप मधील कोरोनाचे मेसेजेस आणि गॅलरी मधले असंख्य फोटो आणि व्हिडीओ डिलीट करत बसतो. लॉकडाऊनच्या आदल्या दिवशी असेच जंक इमेल्स डिलीट करत असताना Flipkart चा ई-मेल थोडा वेगळा वाटलं म्हणून वाचला. पुढचे २१ दिवस रोज एक नवीन ऍक्टिव्हिटी (21 Days of Safe Living) देणार अश्या आशयाचा ई-मेल होता. "योगासने, प्राणायाम करा, बायकोला मदत करा" असल्या बोरिंग ऍक्टिव्हिटीज असतील म्हणून फारसं लक्ष दिलं नाही. परंतु पहिल्याच दिवशी ई-मेल आला "आवडत्या मित्र/मैत्रिणीशी वेळ ठरवून व्हिडीओ कॉल द्वारे कॉफी पीत गप्पा मारा". म्हणलं "क्या बात है"!
.
.
Flipkart (1)
.
.
आमचे मिपावरील परममित्र किल्लेदार गेल्या काही महिन्यांपासून कामानिमित्त कॅनडाला तळ ठोकून आहेत. वेळेतील फरकामुळे गेल्या काही महिन्यांत साधा फोन सुद्धा झाला नव्हता. किल्लेदारांना ताबडतोब व्य.नि. करून "कॅनडातील दुपार आणि इकडची रात्र" अशी कॉफी पिण्यासाठी सोयीस्कर वेळ निश्चित केली. ठरल्या वेळेला मस्तपैकी कॉफी बनवून व्हर्च्युअल चियर्स करून गप्पा सुरु केल्या. पुढचा एक तास हसण्या-खिदळण्यात कसा गेला समजलं देखील नाही. आता उरलेले २० दिवस रोज हाच कार्यक्रम करायचा असे ठरवूनच व्हिडिओ कॉल बंद केला.
.
.Capture
.
.
दुसऱ्या दिवशी देखील अशीच काही इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटी असेल म्हणून सकाळीच उत्साहाने इ-मेल बघितला. "आवडती गाणी लावा आणि कपाट आवरा" अशी कामगिरी! बराच वेळ नुसती आवडती गाणीच ऐकली. मग ठरवलं सगळं कपाट आजच आवरण्यापेक्षा रोज २-४ कपड्याच्या घड्या घालू ,म्हणजे कर्फ्यू संपेपर्यंत कपाटही आवरुन होईल. २ टी -शर्ट्स आणि एका जीन्स ची घडी घालून पुन्हा "कॉफी विथ किल्लेदार " च्या तयारीला लागलो.
परवा तिसरा दिवस होता. कामगिरी नं. ३ "Rearrange your furniture". हॉल मधला सोफा थोडा मागे ढकलला आणि गॅलरीतल्या कुंड्या थोड्या हलवल्या. अशा रीतीने जमेल तसा रुटीनमध्ये वेगळेपणा आणणे चालू आहे.

ज्या नशीबवान लोकांना Work from Home शक्य आहे त्यांना पगाराचे फारसे टेन्शन नसावे, पण इतरांची परिस्थिती गंभीर आहे.
सरकारी यंत्रणा आपापल्या परीने ह्या व्हायरसला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सामसूम रस्ते आणि दूरदर्शनवर रामायण बघून काळ खरंच २०-२५ वर्ष मागे गेल्यासारखा वाटत आहे. असा २१ दिवस सक्तीचा आराम ह्यापुढे कधीच मिळणार नाही (आणि मिळू देखील नये!).

चर्चिल म्हणतो तसं "Never let a good crisis go to waste". ह्या कमर्शियल ब्रेक चा जितका चांगला वापर करता येईल तितका करून घ्या!

.............सरनौबत

समाजलेख

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

31 Mar 2020 - 7:07 am | सस्नेह

Coffee eith a friend आयडिया मसत आहे. बाकीच्या वरचेवर होतच असतात.
रच्याकने फोटो आणि व्हिडिओ ऑटो डाउनलोड बंद करुन ठेवा. डिलीटण्याचा वेळ वाचेल.

सरनौबत's picture

31 Mar 2020 - 10:36 am | सरनौबत

धन्यवाद स्नेहांकिता! आपल्या सूचनेप्रमाणे आत्ताच काही कायप्पाग्रुप्सना Save to Camera Roll = Never असं सेटिंग करून टाकलं.

राघव's picture

31 Mar 2020 - 8:32 pm | राघव

आम्ही सुद्धा किल्लेदारासमवेत अधून मधून गप्पा मारत असतो.. अर्थात् असे ठरवून खास केलेले नाही. कल्पना आवडली.
बाकी पसारा आवरणे हे आमचे आणि पसारा करणे हे पोरीचे आवडते काम असल्याने आणिक काही खास नवीन करणे सध्यातरी काढत नाही.. :-)

व छान वाटला, नाही तर मिपा जवळजवळ सोडलेच होते.

सरनौबत's picture

1 Apr 2020 - 5:07 pm | सरनौबत

धन्यवाद जालीम लोशन! तुमच्या नावावरून प्रेरणा घेऊन लवकरच कोरोनावर जालीम लस लवकरात लवकर निघावी हीच इच्छा

किल्लेदार's picture

1 Apr 2020 - 4:38 pm | किल्लेदार

कोरोनाच्या वेढ्यामुळे किल्ल्यातच अडकून पडलेल्या किल्लेदारास, सरनौबतांशी केल्लेल्या मसलतीमुळे संतोष जाहला !!!
लवकरच हा वेढा उठावा ...

सरनौबत's picture

1 Apr 2020 - 5:05 pm | सरनौबत

वेढा उठेपर्यंत प्रतिदिनी सल्लामसलत (कॉफी) चालू ठेवणे :-)

प७९'s picture

1 Apr 2020 - 6:15 pm | प७९

_/\_ ;-)

टीपीके's picture

2 Apr 2020 - 2:06 am | टीपीके

छान, काहीतरी वेगळं

तसही एकसुरी काम, एकसुरी आयुष्याचा अनेकांना कंटाळा येतो, पण त्याच एकसुरी मुळेच नवीन काय ते सुचत नाही. असं कोणीतरी वेगळं, छान, करण्यासारखं सुचवलं तर रंगत वाढेलच. फक्त केलं पाहिजे :)

zoom.us वर ४० मिनीटाची मीटिंग फुकट करता येते. सध्या बरेचदा ते अनलिमीटेड मीटिंगही ऑफर करतात.