दिवस चाैथा.
काय मंडळी? कसे आहात?
घरात बसताय ना? बसायलाच पाहिजे.
आज जरी देशासाठी लाॅकडाऊनचा चाैथा दिवस असला तरी आमचा सहावा दिवस आहे. गेल्या आठवड्यात गावी गेलेलो, अन अचानक रविवारी जनता कर्फ्यु लागला. काही महत्वाच्या कामांमुळे परत येणं भाग होतं. सोमवारी पहाटे पाचला कर्फ्यु संपताच परत निघालो. रस्ते तसे मोकळेच होते. नेहमीपेक्षा अर्धातास लवकरच घरी पोहोचलो.
11च्या सुमारास कामासाठी स्टेशनवर गेलो तर तिथे पोलिसांनी रोड ब्लाॅक केलेले. शहरातुन बाहेर पडण्याचे आत येण्याचे मार्ग पोलिसांनी रोखुन ठेवलेले. नशीब तेव्हा पोलिसांना फ्री हँड दिला नव्हता. हाडं शाबुत राखुन माघारी फिरलो. डिमार्ट अन् बिगबझारच्या बाहेर लोकांच्या रांगा दिसल्या. साैला म्हटलं सकाळी आठला गर्दी कमी असते तेव्हा उद्या सकाळीच जाईन.(या शहाणपणाचा दुसऱ्या दिवशी बराच त्रास सहन करावा लागला.) तो दिवस बातम्यां बघण्यात अन कोरोनाला चीनला शिव्या घालण्यात घालवला. ज्या कामासाठी खास गावाहुन आलो ते तर झालं नाहीच,अन् त्याचाच राग जास्त होता. उगा इथे येऊन अडकल्याची भावना मनाला टोचु लागली.
होता होता दुसऱ्या दिवशी लगेच 144 लागु झालं. पंप्रनी 21 दिवसांच लाॅकडाऊन घोशीत केलं. आज त्याचा चाैथा दिवस. थोडं बहुत जुजबी सामान भरलेलं आहे. त्यामुळे लगेच बाहेर पडण्याची गरज नाहीये.
मला तशी परदेशी असताना एकटं, एकांतात राहायची सवय होती. त्यामुळे लाॅकडाऊनचा मला फार बाऊ वाटत नाही. पण लेकीची नुकतीच दहावीची बोर्डाची परिक्षा आटोपली. (तेही मोठं नशिबच म्हणायच. तिचा शेवटचा पेपर झाला अन रात्री सर्क्युलर आलं की बाकी उर्वरीत पेपर/परिक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत.) तीचे बरेच प्लॅन्स होते सुट्टीचे. ते सगळे बोंबलले. त्यामुळे तिनेही चीनचा उद्धार करून रागाला थोडी वाट करून दिली. सध्या खा, प्या, झोपा, टिव्ही बघा & रिपीट यया आवडत्या गोष्टींवर जोर. पण आवडत्या असल्या तरी त्याच त्याच गोष्टींचाही एका ठराविक काळाने कंटाळा येऊ लागतो. इथे तर तिसऱ्या दिवशीच ही लक्षणं आहेत. तरी बरं जोडीला संगीत आहे तिच्या.
या सुट्टीत तिचा गिटार शिकायचा प्लॅन होता पण सध्या तो बोंबलला आहे. घरात गिटार नाही नाहीतर आॅनलाईन धडे गिरवले असते. त्यातल्या त्यात लाॅकडाऊनी चांगी बाजु म्हणजे काल बऱ्याच महिन्यांनी संवादिनी बाहेर आली. सिंथेसायजर वरची धुळ झटकली गेली. कोपऱ्यातला तंबोरा गवसणीतुन बाहेर आला. बाबाचा तबला बाहेर आला. सध्या माय लेकीची एक नवीन नाट्यगीत ऎकुन ते बसवण्याची तयारी चालू आहे. हा विरंगुळा नक्कीच मनाला आनंद देणारा आहे.
ही सगळी मंडळी बाहेर आलेली पाहुन टिव्ही खालच्या शेल्फमधे पडलेला तो karaoke हाका मारतोय. त्याला म्हलटं 'आयेगा, तेरा भी नंबर आयेगा.'
हे झालं आमचं.. तुमचं काय मंडळी?
तुम्ही काय करताय घरी बसुन?
वेळ कसा सत्कारणी लावताय?
काही चांगल्या आयडिया असतील तर जरूर शेयर करा.
वाचने
20323
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
" बॉन्ड " च्या चाहत्यासाठी..
सव्वाआठ ते ९ arrow चा एक भाग
मी पण....
In reply to सव्वाआठ ते ९ arrow चा एक भाग by प्रचेतस
तुम्ही चांगलं खेळताय सध्या.
In reply to मी पण.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त हो गंपासेठ, खरं तर
च्यायला
११ वाजता व्योमकेश बक्षी लागलं
In reply to च्यायला by ज्ञानोबाचे पैजार
विक्रम वेताळ आणि दादा दादी की कहानी आठवण झाली.
In reply to ११ वाजता व्योमकेश बक्षी लागलं by प्रचेतस
विक्रम और वेताल पण रामानंद
In reply to विक्रम वेताळ आणि दादा दादी की कहानी आठवण झाली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
२१ दिवसांची प्रतीक्षा आहे !
लॉक डाऊनचा चाैथा दिवस निवांत
एकट्याने ऑनलाइनसाठी ...
कुलुपबंदी
टाकाऊतून टिकाऊ निर्मिती ....
त्या पेक्षा लिनक्स का नाही
In reply to टाकाऊतून टिकाऊ निर्मिती .... by गामा पैलवान
विचार चालू आहे
In reply to त्या पेक्षा लिनक्स का नाही by टीपीके
ते पण सहज शक्य आहे, एस एस एच
In reply to विचार चालू आहे by गामा पैलवान
बघतो कसं ते ....
In reply to ते पण सहज शक्य आहे, एस एस एच by टीपीके
जर प्रयोग केलात आणि यशस्वी
In reply to बघतो कसं ते .... by गामा पैलवान
मी लॉकडाऊन फोल्डर बनवून त्यात
सरांशी परत एक डाव खेळता आला.
मस्त....
In reply to सरांशी परत एक डाव खेळता आला. by प्रचेतस
.
निवांत दिवस
वोडाफोन मोबाइलमधलं इंटरनेट
जियो...
In reply to वोडाफोन मोबाइलमधलं इंटरनेट by कंजूस
शुक्रवार दि. २० मार्च ...
गणपा शेठ,