Skip to main content

करोना विषाणू COVID-19 (Coronavirus disease 2019)

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 04/03/2020 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
करोना विषाणू हा एक साध्या सर्दीपासून मर्स आणि सार्स (Middle East Respiratory Syndrome (MERS) and Severe Acute Respiratory Syndrome (SARS) सारख्या श्वसनसंस्थेला सूज आणणाऱ्या विषाणूंच्या गटातील एक विषाणू आहे. COVID-19 (Coronavirus disease 2019) हे या विषाणूंचे नाव आहे आणि याचा आपल्याला शोध हा आता हि साथ आल्यामुळे लागला आहे. यामुळे होणाऱ्या रोगाची लक्षणे -- ताप, कोरडा खोकला आणि थकवा येणे. काही रुग्णांना सर्दी, अंग मोडून येणे, नाक बंद होणे, घसा दुखणे आणि काही रुग्णांना डायरिया पण होतो. हि सर्व लक्षणे हळूहळू दिसू लागतात. बऱ्याच लोकांना या विषाणूचा प्रादुर्भाव झाला तरी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत कि कोणताही त्रास होत नाही. ८५ टक्के रुग्ण कोणताही इलाज न करता स्वतःहून बरे होतात. १५ % रुग्णांमध्ये हा रोग गंभीर होतो आणि १ ते २% रुग्ण यात दगावतात. गंभीर आजार आणि मृत्यू हा साधारणपणे वृद्ध, प्रतिकारशक्ती कमी असणारे किंवा मधुमेह, रक्तदाब हृदयविकाराचे रुग्ण यांमध्ये दिसून येतो. रोग प्रसार -- या रोगाने आजारी रुग्ण जेंव्हा खोकतो किंवा शिंकतो तेंव्हा त्यातुन जो फवारा उडतो त्यात असलेल्या सूक्ष्म थेंबातुन हे विषाणू आजूबाजूच्या वस्तूंवर जाऊन बसतात. या वस्तुंना हात लावल्यावर जेंव्हा निरोगी माणूस आपल्या चेहऱ्याला डोळ्यांना नाकाला हात लावतो तेंव्हा हा विषाणू त्याच्या शरीरात शिरतो. यासाठीच आपण बाहेर जाऊन आल्यावर आपले हात साबणाने आणि भरपूर पाण्याने धुतले पाहिजेत आणि सारखा चेहऱ्याला हात लावणे बंद केले पाहिजे. आणि ज्याला खोकला किंवा सर्दी आहे त्याने मोठा हातरुमाल जवळ बाळगून त्यातच आपले खोकणे किंवा शिकणे नियंत्रित करणे आवश्यक आहे. अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझर हा साबणासारखेच काम करतो. (खरं तर साबण जास्त चांगला आहे). कोणताही साबण चालतो. डेटॉल किँवा सॅवलॉन सध्या साबणापेक्षा जास्त परिणामकारक असतो असा कोणताही पुरावा आढळलेला नाही. बहुसंख्य लोकांना हा रोग अतिशय कमी प्रमाणात होतो परंतु हे विषाणू त्यांच्या श्वसन मार्गात असल्यामुळे कोणीही( वारंवार निरोगी दिसणाऱ्या माणसानेही) खोकताना किंवा शिंकताना हातरुमालातच शिंकणे आवश्यक आहे. करोना विषाणू पासून आपला बचाव-- १) बाहेर जाऊन आलयावर प्रत्येक वेळेस आपण आणि आपल्या घरच्यांना साबण आणि पाण्याने हात धुण्याची सवय लावणे २) खोकला किंवा सर्दी असलेल्या माणसापासून १ मीटर दूर उभे राहणे ३) ज्याला खोकला किंवा सर्दी आहे त्याने मोठा हातरुमाल जवळ बाळगून त्यातच आपले खोकणे किंवा शिकणे नियंत्रित करणे. हि गोष्ट आपल्या माहितीतील सर्व लोकांना सांगणे आपल्याला हा रोग होण्याची शक्यता --आपण चीन इटली किंवा तशा रोगप्रसार झालेल्या देशात जाऊन आला नसाल तर हा रोग होण्याची शक्यता सध्या तरी फारच कमी आहे. हा विषाणू जन्य रोग असल्यामुळे या रोगावर प्रतिजैविके ( Antibiotics) काम करत नाहीत. अजून तरी यावर लास तयार झालेली नाही परंतु लवकरच ती उपलब्ध होईल अशी आशा आहे. आरोग्य कर्मचारी आणि ज्यांना खोकला किंवा सर्दी आहे अशानीच तोंडावर मुखवटा घेणे आवश्यक आहे. सामान्य माणसांनी मुखवटा घेणे हे अगोदरच कमी असलेल्या साधनसामग्रीचा अपव्यय आहे. चीन मधून आलेल्या पॅकेटमधून हा विषाणू येण्याची शक्यता फारच कमी आहे कारण शरीराच्या बाहेर हा विषाणू फार तर ४८-७२ तास जिवंत राहू शकतो ते सुद्धा थंड तापमानात अत्यंत महत्त्वाची गोष्ट --या रोगापासून काळजी घेणे हे योग्य आहे परंतु याबद्दल चिंता करणे(ANXIETY) किंवा घबराट पसरवणे ( PANIC) हे चूक ठरेल सार्स(२००३) मध्ये मृत्यूची शक्यता १० % होती . स्वाईन फ्लू( २००९) मध्ये मृत्यूची शक्यता ४.५ % होती इबोला(२०१४) मध्ये मध्ये मृत्यूची शक्यता २५ % होती तर करोना मध्ये हि १-२ % आहे मग आज इतकी भीती का पसरली आहे ? सार्स स्वाईन फ्लू किंवा इबोलाच्या वेळेस सोशल मीडियाचा ( आणि त्यामुळे गैरसमज आणि अफवांचा) प्रसार इतका झालेला नव्हता. आज जगात सोशल मीडिया ३०० कोटी लोक वापरतात. त्यामुळे अफवा दोन दिवसात जगभर पसरल्यामुळे या बद्दल अफवा आणि त्यामुळे घबराट फार लवकर पसरली आहे. भारतात या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता खूपच कमी आहे कारण हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जसे तापमान वाढते तसे लोक अतिथंडीमुळे घरात बसून राहतात त्याऐवजी बाहेर पडतात जेथे तापमान जास्त असते यामुळे विषाणूची वाढ कमी होते. वरील लेखातील बहुतेक साहित्य हे जागतिक आरोग्य संघटनेच्या अद्ययावत पत्रकातून घेतलेले आहे. यावर अजून संशीधन चालू आहे आणि अजून बरीच माहिती मिळणे बाकी आहे. हा लेख माझ्या नावासाहित किंवा नावा शिवाय पाठवले तरी चालेल. ही माहिती मी जागतिक आरोग्य संघटनेच्या अद्ययावत पत्रकावरूनच घेतलेली आहे. त्यात माझे कर्तृत्व काही नाही. पण जर लोकांना माहितीच्या स्रोता बद्दल खात्री वाटत नसेल तर खाली डॉ सुबोध खरे एम डी असे लिहिले तरी चालेल. लोकांमध्ये निर्माण होणारा "भयगंड"दूर करणे आणि आरोग्याची योग्य काळजी घेणे एवढाच माझा हेतू आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 148362
प्रतिक्रिया 253

प्रतिक्रिया

एक whats app forward --------------------------------------------------------- करोना व्हायरस यांव केल्याने मरेल आणि त्यांव केल्याने जगेल असे सर्वजण बोलत असतात. मात्र करोना व्हायरस किंवा कोणताही व्हायरस कशानेही मरू शकत नाही. कारण व्हायरस हा सजीव नसतोच. व्हायरस हा एक बायो पार्टीकल म्हणजे जैविक कण आहे. जसे शिंपल्यात एक वाळूचा कण गेल्यावर शिंपल्यातलेच मटेरीयल वापरून त्याचा मोती बनतो, तसेच कोणत्याही पेशीत हा व्हायरस नावाचा कण गेला की त्याच्या अनेक कॉपी तयार होतात. व्हॉट्सअप, फेसबुकवरच्या पोस्ट जशा खूप कॉपी पेस्ट होतात ना तसेच. व्हायरस स्वतः प्रजनन करत नाही तर ज्या पेशीत तो गेला आहे ती पेशीच त्याच्या खूप साऱ्या कॉपी तयार करते. व्हायरस हा एक छोटासा डीएनए किंवा आरएनए असलेला एक कण असतो आणि त्यावर एक प्रोटीनचे संरक्षक आवरण असते. ते प्रोटीनचे आवरण किती मजबूत आहे किंवा व्हायरस ज्या पेशीत जाणार आहे त्या पेशीशी ते किती समर्पक किंवा मिळतेजुळते आहे त्यावरून तो व्हायरस त्या पेशीत संक्रमित होणार की नाही ते ठरते. आपल्या पेशी नेहमी आपल्या डीएनएच्या कॉपी बनवत असतात. तेच मेकॅनिजम वापरून पेशीत गेल्यावर व्हायरस मधला डीएनए किंवा आरएनए पेशीतील मटेरियल वापरून स्वतःच्या खूप कॉपी बनवतो. ही प्रत्येक कॉपी हा एक नवा व्हायरस कणच असतो. आणि मग पेशीतील मटेरियल संपले की पेशींची वॉल फोडून हे सर्व व्हायरस कण बाहेर येतात आणि शरीरातील इतर पेशींत घुसून त्यांनाही मारतात. अशा प्रकारे मग अनेक पेशी बाधित झाल्या की मग होस्ट म्हणजे ज्याच्या शरीराच्या पेशींत व्हायरस संक्रमित झाला आहे तो प्राणी मग आजारी होतो. काही व्हायरसचा डीएनए हा होस्टच्या डीएनए सिक्वेन्स मध्ये घुसून त्या प्राण्यातच जेनेटिक चेंज आणू शकतो. हा जेनेटिक चेंज पुढच्या कित्येक पिढ्यांत ट्रान्स्फर होतो. किंबहुना एखादा व्हायरस नेमका कधी अस्तित्वात आला हे प्राण्यांच्या डीएनएतील या बदलावरूनच कळते. [3/11, 1:02 PM] Nanaso: व्हायरस हा सजीवच नसल्याने मग त्याला कोणत्याही औषधाने वा गोमूत्र वा कापूर वा धुराने किंवा पेस्टीसाईडने मारता येऊ शकत नाही. जो जिंदा ही नही है उसे कैसे मारोगे? मात्र कशानेही त्याचे बाह्य प्रोटीन आवरण नष्ट झाले की व्हायरसही नष्ट होतो. हे हवेमुळे, पाण्यामुळे, साबणामुळे, तापमानामुळे, उन्हामुळे असे कशामुळेही होऊ शकते. होस्टच मिळाला नाही की एखादा व्हायरस जगातूनच नष्ट होऊ शकतो. व्हायरस सजीव नसल्याने तो मरूच शकत नाही. काहीही सांगतो काय रे? जर व्हायरस मरुच शकत नाही तर मग डॉक्टर लोक जी औषधे देतात, करोनाची लस शोधण्यासाठी जी पराकाष्ठा चालू आहे ती कशाला? व्हायरस वर जी लस असते ती कशी काम करते त्या आधी व्हायरस कसा काम करतो ते पाहू. व्हायरस आधी शरीराच्या पेशींच्या वॉल वर रिसेप्टर्स असतात तिथे बॉण्ड बनवतो आणि तिथे चिकटून राहतो. त्या रिसेप्टर्स मधून मग तो हळूच पेशींच्या आत जातो. आत तो आपल्या डीएनएच्या स्ट्रेण्डचा प्रति डीएनए स्ट्रेण्ड (पट्टी) बनवतो. हे स्ट्रेण्ड मग सेपरेट होऊन अजून स्ट्रेण्ड बनवतात. हा प्रत्येक स्ट्रेण्ड मग एक नवा व्हायरस बनतो. मग या नव्या बनलेल्या व्हायरस कणांची भरपूर संख्या झाली की हे व्हायरस त्या पेशींची वॉल तोडून बाहेर येतात आणि बाजूच्या पेशींच्या रिसेप्टर्स वर जाऊन चिकटतात व त्यांना संक्रमित करतात. लस या सगळ्या स्टेप्स पैकी कोणत्याही एका स्टेपवर व्हायरसला ब्लॉक करते. हे ब्लॉकिंग रिसेप्टर्स वर असू शकते, ज्यात लसीत असे केमिकल्स असतात जे व्हायरसचे रिसेप्टर्सशी बॉंडींग होऊ देत नाहीत, किंवा काही लसी व्हायरसच्या डीएनएला केमिकल्सनी रोखून प्रति डीएनए स्ट्रेण्ड बनवू देत नाहीत, काही लसी व्हायरसला वॉल तोडून बाहेर येऊ देत नाहीत. काही लसी व्हायरसचा डीएनएच डॅमेज करून टाकतात आणि मग तो कॉपी होत नाही वगैरे. आताचा करोना कोविड-19 हा नवा व्हायरस आहे, त्याचे नेमके प्रोटीन्स आणि रिसेप्टर्सचे बॉण्ड कसे असतात, तो नेमका कोणकोणत्या मेकॅनीजमने शरीरात जातो, किंवा नेमका तो कोणत्या केमिकल्सनी डीएनए रेप्लिकेट बनवतोय तेच अजून कळत नाहीय. ते कळल्यावर मग कोणते केमिकल्स त्याच्या कोणत्या स्टेपला रोखू शकतील हे शोधायलाही वेळ लागेल. म्हणून त्याची लस लवकर बनत नाहीय. व्हायरस हे सहसा प्राण्यांतून माणसांत येतात. व्हायरस हे मुख्यत्वे होस्ट स्पेसिफिक असतात. त्यामुळे एका प्रजातीच्या प्राण्याला लागण झालेल्या व्हायरसची दुसऱ्या प्रजातीच्या प्राण्याला किंवा माणसाला लागण होईलच असे नाही. मात्र एका प्रजातीत असताना व्हायरसच्या डीएनएमध्ये काही बदल झाला आणि हा बदल एखाद्या दुसऱ्या प्रजातीच्या प्राण्याच्या शरीराशी संलग्न होण्यास योग्य असेल तर मात्र हा व्हायरस दुसऱ्या प्राण्यात संक्रमित होऊ शकतो. आताच्या कोविड-19 चे साधर्म्य वटवाघळे आणि खवल्या मांजरात असणाऱ्या करोना व्हायरसशी आढळले आहे. व्हायरस तयार करण्याइतकी टेक्नॉलॉजी अद्याप विकसित झालेली नाही त्यामुळे चीनने हा व्हायरस तयार केला असेल हे खरे नाही. बाकी तो लॅब मधून चुकून बाहेर गेला असू शकतो परंतु तीही शक्यता कमी आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत हा व्हायरस जेनेटिक बदल होऊन वटवाघूळांतून खवल्या मांजरांत गेला आणि खवल्या मांजरांतील व्हायरसमध्ये जेनेटिक बदल होऊन तो माणसांत आला अशी जास्त शक्यता आहे. मांस शिजवून खाल्ल्याने व्हायरस सहसा नष्ट होतात हे खरे, कच्च्या मांसालाही गरम पाण्यात टाकून मग धुवावे आणि मग शिजवून खावे. संक्रमित पृष्ठभागास स्पर्श केल्याने काही व्हायरसची लागण होऊ शकते. मात्र नव्या करोनाचे संक्रमण अशा प्रकारे होते का हे अद्याप आपल्याला नेमके माहीत नाही. उन्हाळ्यातील तापमानाने व्हायरसचे प्रोटीन नष्ट होऊन व्हायरस नष्ट होऊ शकतो, मात्र कोविड-19 करोना हा आताच आला असल्याने उन्हाळ्यात तो वाढतो की नष्ट होतो हे आपल्याला सांगता येऊ शकत नाही. हात चांगल्या सॅनिटायजरने धुतल्याने व्हायरसचे प्रोटीन कवच नष्ट होऊन तो नष्ट होऊ शकतो. याव्यतिरिक्त कुठेही अनावश्यक स्पर्श न करणे, जो कुणी शिंकत वा खोकत असेल त्याच्यापासून 3 फुट दुर राहणे हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत. करोना हवेतून पसरत नाही, शिंक किंवा खोकल्याच्या तुषारांतून पसरतो म्हणून 3 फूट दूर राहीले पाहीजे. या उपायांनी आपण लागण होण्यापासून वाचू शकतो. आपण स्वतः आजारी असू किंवा आजारी माणसाची सेवा करत असू, वा आजारी माणसाजवळ जात असू तरच मास्क वापरावा असे WHO ने सांगितले आहे. अन्यथा उगीच मास्क वापरू नये. या उपायांनी आपण लागण होण्यापासून वाचू शकतो. करोनाचा mortality रेट हा 3.4% आहे. म्हणजे हा आजार 1000 माणसांना झाला तर त्यातील 34 माणसांचा मृत्यू होऊ शकतो. यातही म्हाताऱ्या माणसांना जास्त रिस्क आहे. 80 पेक्षा जास्त वय असणारांत हा रेट 15% आहे. मात्र हा दर अजून कमी होईल असे WHO म्हणते. SARS या आजाराचा मृत्युदर हा 10% तर MERS चा 34% इतका म्हणजे करोनाच्या दहापट जास्त होता. व्हायरसने होणाऱ्या संसर्गजन्य आजारांचा एक ढोबळ नियम असा आहे की जो आजार जास्त पसरतो त्याचा मृत्युदर कमी असतो, आणि जो कमी पसरतो त्याचा मृत्युदर जास्त असतो. स्वच्छता राखणे, लक्षणे दिसणाऱ्या माणसांपासून दूर राहणे, खोकताना व शिंकताना नाक तोंड रुमालाने अथवा हाताच्या कोपराने झाकणे, संक्रमण झालेल्या शहरात न जाणे, संक्रमित माणसाच्या संपर्कात न येणे, जिवंत प्राण्यांस स्पर्श न करणे अशी काळजी घेतली की आपण करोनापासून वाचू शकतो.

In reply to by मराठी कथालेखक

वरील नावाच्या पुस्तकात डॉ जॉन डवायेर यांनी अशीच माहिती दिली आहे ! एकेका व्हायरसची एक " लाडकी " पेशी असते व एका पेशीचा एक लाडका पाहुणा एक विशिष्ट व्हायरस असतो .असे त्यांचे प्रतिपादन होते.

In reply to by मराठी कथालेखक

हे ढकलपत्र बरेचसे योग्य आहे. परंतु विषाणू हा सजीव आणि निर्जीवतेच्या उंबरठ्यावर असलेला अर्धजीवीत जीव आहे. म्हणजे विषाणूचे स्फटिक बनून वर्षानुवर्षे तसेच राहू शकतात परंतु योग्य पेशींच्या संपर्कात आले तर हेच विषाणू / स्फटिक कार्यरत होऊ शकतात. परिस्थिती( तापमान आर्द्रता इ) अनुकूल असेल तर विषाणू अशा पेशींच्या पृष्ठभागावर असलेल्या रिसेप्टरच्या मार्फत त्या पेशीच्या आत शिरून आपले पुनरुत्पादन सुरु करतात. निर्जीवतेचे काही गुणधर्म असलेले पण स्वतः पुनरुत्पादन करू शकणे आणि उत्क्रांत होणे हे सजीवांचे अत्यंत महत्त्वाचे गुणधर्म असलेले विषाणू हे निर्जीव नक्कीच म्हणता येणार नाही. त्यामुळे विषाणू मारला जाऊ शकत नाही हेही चूक आहे. covid -१९ विषाणू ५६ अंश तापमानाच्या वर विघटन पावतो आणि पुनरुत्पादन करू शकत नाही तसेच साबण किंवा अल्कोहोल मुळे त्याच्या शरीराच्या पृष्ठभागावर असलेला मुकुट विघटन पावतो, सोडियम हायपोक्लोराइट किंवा ब्लिचिंग पावडरने किंवा क्लोरीन /आयोडीनने त्याच्या मुकुटाचे ऑक्सिडेशन होते आणि विषाणू मृत्यू पावतो.

In reply to by सुबोध खरे

फार डोकं खाजवल्यावर ढकलपत्र म्हणजे फॉर्वर्डेड मेसेज असा साक्षात्कार झाला. पण ढकलसंदेश जास्त योग्य वाटेल... उगा टेन्शन वाढतेय म्हणून ही अवांतर पोस्ट... :D

घर / सोसायाटी च्या आवारातील दरवाजे / खिडक्यां चे हँडल , टेबल वगैरे स्वच्छ / निर्जंतुक करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईट वापरावे असे ऐकले. हे कसे मिळवावे आणी वापर कसा करावा ?

In reply to by बोका

आजुबाजुच्या दुकानात साधारण तिनशे रु. पाच लिटर मिळते 80% concentration असते. ५% dilute करून वापरावे लागते, carcinogenic आहे, काळजीपुर्वक वापरावे.

In reply to by बोका

सोडियम हायपोक्लोराइट मिळत नसेल तर ब्लिचिंग पावडर( हि कॅल्शियम हायपोक्लोराइट आहे) पाण्यात टाका. त्याचा गाळ खाली बसला कि वरचे पाणी घर / सोसायाटी च्या आवारातील दरवाजे / खिडक्यां चे हँडल , टेबल वगैरे स्वच्छ / निर्जंतुक करण्यासाठी वापरता येतील.

ऐकीव माहितीनुसार ताप येणे, घसा धरणे, सर्दी होणे, डोके दुखणे, इत्यादि दुखण्यांवर आयबूप्रोफेन ही गोळी टाळावी. करोना + आयबूप्रोफेन यामुळे घातक शारीरिक प्रतिक्रिया होऊ शकते. या औषधाची भारतातली प्रचलित नावे : Brufen, Combiflam (https://en.wikipedia.org/wiki/Combiflam), Unafen. या प्रचलित नावांसाठी संदर्भस्रोत : https://en.wikipedia.org/wiki/Ibuprofen_brand_names इथे भारतातल्या नावांची आजूनेक यादी आहे : http://www.medlineindia.com/musculoskeletal/ibuprofen.htm ही माहिती पूर्णपणे ऐकीव आहे. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आपल्याला होणाऱ्या सर्दी खोकला ताप अंग मोडून येणे अशा फ्ल्यू सारख्या लक्षणांसाठी( ना जाणो हा करोना मुळे असल्यास) आयबुप्रोफेन असलेली औषधे टाळा उदा कॉम्बीफ्लॅम ब्रुफेन इ. सर्वात सुरक्षित म्हणजे पॅरासेटेमॉल किंवा क्रोसिन. Avoid ibuprofen for coronavirus symptoms, WHO says https://www.france24.com/en/20200318-avoid-ibuprofen-for-coronavirus-sy…

काहीच वायरस काहीच पेशीमधे का जावू शकतात ? मानवी देहाचे शत्रु कोण ! सर्व इथे समजेल !

साऊथ कोरीया पेक्षा इटलीत COVID19 मृतांची टक्केवारी अधिक का? या बद्दल सिएनएन वरील हा उत्तम विश्लेषण लेख जिज्ञासू आणि जाणकारांनी आवार्जून वाचावा. इटली लोकसंख्येत वृद्धांची संख्या अधिक असणे कारण असू शकेल हे बरोबर मानले तर वृद्धांची टक्केवारी अधिक असलेल्या चीनच्या बाजूस असलेल्या जपानचे नाव मृत्यू टक्केवारीत पुढे का नाही किंवा मला माहित नाही हा प्रश्न मला लेख वाचताना पडला. इटलीती वृद्धांचा प्रवास संपर्क शेक हँड या गोष्टी अधिक आहेत का ? पण इटली विकसीत देश असेल तरी वृद्धांचा प्रवास आणि संपर्क सहसा कमी झालेला असतो मग इटलीती वृद्धांमधून अधिक प्रसार कशामुळे ह्याचे कोडे मला नीटसे उमगले नाही. याच लेखात वीषाणू टेस्टींग सुविधांची साउथ कोरीयापेक्षा आमेरीकेतही कशी कमतरता आहे याची माहिती आहे. या वरुन आठवले की अशात एन डि टिव्हीवर प्रायव्हेट हॉस्पिटल आणि टेस्टींग चेन असलेल्यां प्रमुखंडळींना तुमच्याकडे (खासगी क्षेत्रात) या टेस्टींग सुविधा का नाहीत ह्या प्रश्नाला त्यांना नीटसे उत्तर देता आले नाही असे दिसले. पेशंट कडून प्रचंड पैसा उकळूनही स्वतःच्या स्वतंत्र टेस्टींग सुविधा खासगी क्षेत्राकडे का नसाव्यात म्हणजे सार्वानिक सेवेवरील ताण तेवढाच कमी राहून सामान्यांच्या टेस्टची संख्या वाढेल? असा एक सहाजिक प्रश्न मनात आला. त्या सोबत त्याच लेखातील केवळ टेस्टींग नव्हे तर आजारी आणि वृद्ध व्यवस्थापन पद्धती अधिक प्रभावी असण्याची गरज या विश्लेषणाने दाखवून दिली संदर्भ आमेरीकेचा असला तरी मुद्दा भारतीयांनाही तेवढाच लागू पडावा किंवा कसे?

बऱ्याच आयांना आपल्या लहान मुलांची फार काळजी वाटत असते कारण मुले कुठे हात लावतात काय तोंडात घालतात कोणाला जाऊन चिकटतात यावर २४ तास नियंत्रण ठेवणे अशक्य आहे. त्यातून आता सुट्ट्या असल्यामुळे मुलं २४ तास घरीच असतात अशा आयांसाठी खास लहान बालके आणि करोना As of today, there have been no known deaths reported in the 0-9-year-old age group and there have been lower hospitalization rates compared with adults. The disease seems to primarily impact older adults and those with underlying health problems For reasons that nobody fully understands, COVID-19 does not appear to cause severe disease in children. “The first, and most likely scenario, is that children are contracting COVID-19 but are getting a milder version of the disease,” says Thomas Murray, MD, PhD, a Yale Medicine pediatric infectious disease specialist Keep kids away from people who are sick, especially if they have respiratory symptoms. And if your kids are sick, keep them home. For COVID-19, one of the most important things for containment is to isolate https://medicine.yale.edu/news-article/22996/ एक लक्षात ठेवा मुलांची प्रतिकार शक्ती पहिले 5-6 महिने आईकडून आलेल्या प्रतिपिंडामुळे असते आणि साधारण 8 ते 9 महिने पर्यंत त्यांची स्वतः ची प्रतिकारशक्ती विकसित होते। या मधील कालावधी मध्ये मुलांना बारके बारके आजार जास्त होत असतात. 9 महिन्यानंतर मुलांची प्रतिकारशक्ती बऱ्यापैकी विकास पावलेली असते त्यामुळे आपल्या मुलाला केवळ आजारी माणसे किंवा आजारी मुले यांच्या पासून लांब ठेवा आणि वारंवार हात धुवायची सवय लावा. बाकी काळजी करण्याचे कारण अजिबात नाही. लक्षात ठेवा विषाणूमुळे होणारे आजार बालकांमध्ये नेहमीच सौम्य असतात उदा गोवर कांजिण्या तर हेच आजार प्रौढांमध्ये जास्त गंभीर असतात. तेंव्हा आपल्या मुलाबरोबर स्वतःची सुद्धा काळजी घ्या

करोना विषाणू विरुद्ध लस तयार होण्यात इतका उशीर का लागतो आहे? आधुनिक तंत्रज्ञानाने काही महिन्यात लस का तयार होत नाही? एखादी लस तयार केली तरी प्रथम तिच्या चाचण्या गिनिपिग, उंदीर, माकडे यांच्या वर कराव्या लागतात. या प्राण्यांच्या शरीत प्रतिपिंडे(ANTIBODIES) तयार झाली कि ती प्रतिपिंडे खरोखरच रोगप्रतिबंध करतात हे पाहावे लागते. ( HIV / AIDS मध्ये हि प्रतिपिंडे काम करत नाहीत याचमुळे अजूनही HIV / AIDS वर लस निर्माण करण्यात यश मिळालेलं नाही) मग त्या प्राण्यांना प्रत्यक्ष विषाणूंचा संसर्ग झाल्यावर त्याना रोग होत नाही हे पाहावे लागते. अशी साखळी संपूर्ण झाली कि लस मानवी स्वयंसेवकांच्या शरीरात चाचणी करावी लागते. लस दिल्यावर त्या स्वयंसेवकांना प्रत्यक्ष विषाणूंच्या संपर्कात आणले जाते. हे करताना अनेक कायदेशीर बाबी त्या कंपनीला पाळाव्या लागतात कारण चुकून कोणाचा त्या रोगाने मृत्यू झाला तर सदोष मनुष्यवधाचा खटला होऊ शकतो आणि कंपनीची कीर्ती रसातळाला जाऊ शकते. एवढे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर ती लस प्रयोगशाळेतून प्रत्यक्ष औषधांच्या दुकानात पोहोचेपर्यंत त्याची परिणामकारकता(POTENCY) राहते कि नाही. किती काळापर्यंत हि लस प्रभावी राहते आणि किती काळानंतर त्याची परिणामकारकता वाजवी पेक्षा कमी होते हे पाहावे लागते. यानंतर त्या लसीचा दूरगामी परिणाम (LONG TERM EFFECT) काय होतो हे पाहावे लागते. यानंतर धंद्याचा भाग येतो. तो म्हणजे यासाठी लागणारी भांडवली गुंतवणूक, त्या लसीचा प्रसार करण्यासाठी विपणनासाठी खर्च किती येतो एवढे सगळे सोपस्कार केल्यावर त्यातून फायदा किती होणार आणि तोटा किती होणार. हे सगळ त्रैराशिक जमलं तर लस बाजारात येते आणि अशा करोना सारख्या इन्फ्लुएंझा गटातील विषाणू दर काही कालावधी मध्ये आपला बाह्य मुकुट बदलत असतात त्यामुळे मागच्या वर्षीची लस यावर्षी उपयुक्त ठरेल असे नाही. ( H१N१ ची लस H२N१ किंवा H१N२ ला चालेल असे नाही) तेंव्हा आपण कायम काळजी घेत राहणे( चांगल्या सवयी लावून घेणे) आणि आपली प्रतिकार शक्ती वाढवणे हाच एक खात्रीचा उपाय शिल्लक राहतो

ISOLATION & QUARANTINE - म्हणजे वेगळे काढणे. संसर्गजन्य रोगात ज्यांना रोग झाला आहे त्यांना याला ISOLATION म्हणतात आणि त्यांच्याशी संपर्क झाला आहे अशाना (QUARANTINE) निरोगी लोकांपासून त्यांचा आजार बरा होईपर्यंत वेगळे ठेवणे. आपल्याला हा रोग झाला असेल तर सरकार आपल्याला रोग पूर्णपणे बरा होऊन त्याचा इतरांना संसर्ग होणार नाही या स्थितीत येईपर्यंत संपूर्णपणे वेगळे संसर्गजन्य रुग्णालयात ठेवते. याला ISOLATION म्हणतात. परंतु आपल्याला रोग झालेला नाही परंतु आपण अशा भूभागातून आला असाल उदा( इटली इराण चीन) तर या रोगाचा (INCUBATION PERIOD) उबवणी कालावधी संसर्ग झाल्यापासून ते प्रत्यक्ष रोग होईल इतक्या कालावधी पर्यंत आपल्याला जनतेपासून वेगळे ठेवले जाते. आपल्या चाचण्या व्यवस्थित येईपर्यंत आपल्याला सर्वांपासून वेगळे ठेवले जाते आणि मग घरी जाऊ दिले जाते. जर आपल्या संपर्कातील व्यक्तीला कॉरोना विषाणूचा रोग झाला आहे असे कळले तर आपण आपल्या चाचण्या करून घेणे आवश्यक आहे आणि त्यांचा निकाल येईपर्यंत स्वतःला अलग (QUARANTINE) करणे. आवश्यक आहे. आपला असा संपर्क कोणाशी येऊशकतो? आपण कोणाच्या मागे(किंवा आपल्या मागे) दुचाकीवर बसला असेल. आपण कुणाचा (किंवा उलट) संगणक वापरला असेल किंवा कोणत्याही रांगेत(उदा रेल्वेच्या सिनेमाच्या तिकिटाच्या) आपल्यापुढे मागे उभा असून खोकत किंवा शिंकत असेल तर.आपल्या कॅन्टीन मध्ये शाळेत, कार्यालयात असलेली टेबल खुर्ची इ एखाद्या रुग्णाच्या संपर्कात आली तर. कार्यालयात आपल्या यबरोबर काम करणाऱ्या व्यक्तीला जर करोनाची लागण झाली असेल तर. अशा स्थितीत आपण स्वतःला विलग करणे आवश्यक आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आपली चाचणी करून घेणे आवश्यक आहे. असा संपर्क आला असेल आणि आपल्याला घरी बसावे लागत असेल तर घ्यायची काळजी अशी आहे. १) आपला रुमाल, जेवल्यानंतर हात पुसायला आणि स्नानानंतर अंग पुसायला घेतलेले नॅपकिन/ टॉवेल हे वेगळे ठेवणे आणि वेगळे धुणे आवश्यक आहेत. यासाठी आपण वापरात असलेला साबण पुरे आहे. डेटॉल/सॅवलोंन सारख्या औषधी साबणाची अजिबात गरज नाही. संशोधनात डेटॉल/सॅवलोंन सारखे साबण हात धुण्यासाठी सुद्धा साध्या साबणापेक्षा जास्त परिणामकारक आहेत असा कोणताही पुरावा अजिबात मिळालेला नाही येथे बहुसंख्य मध्यमवर्गात जेवल्यानंतर हात पुसायला एकच नॅपकिन/ टॉवेल वापरला जातो. CONJUNCTIVITIS किंवा डोळे येणे हा आजार एकाला झाल्यावर घरातल्या सर्वाना होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे २) आपण मिरची चिरली आहे आणि यानंतर आपल्या डोळ्यात काहीतरी गेलंय असे असताना आपण जितक्या काळजीपूर्वक हात धुवू तितक्याच काळजीने साबण आणि भरपूर पाणी वापरून हात धुणे आवश्यक आहे. ३) नळ चालू केल्यावर आपण हात धुतो तेंव्हा सुरुवातीला नळावरही थोडा साबण आणी पाणी टाकुन पुसून घेतले तर नळ बंद करताना त्यावरील जंतू परत आपल्या हातावर येणार नाहीत. हि काळजी आपण सार्वजनिक शौचालय वापरताना सुद्धा घ्यावी. ४) घरातील किंवा कार्यालयातील शौचालयाच्या दाराचे हॅन्डल हे अस्वच्छ असते त्याला शक्यतो हात न लावताच उघडावे/ बंद करावे. घरच्या शौचालयाच्या दाराचे हॅन्डल सुद्धा वरीलप्रमाणे नळ स्वच्छ करतो तसे करावे आणि कार्यालयातील शौचालयाच्या दाराचे हॅन्डल ला हात न लावता टिशू पेपरने उघडावे आणि टिशू पेपर कचरापेटीत टाकून द्यावा. ५) आपल्या संपर्कातील गोष्टी ज्यात मोबाईल आणि चष्मा वापरणार्यांनी चष्मा हा वारंवार स्वच्छ करणे आवश्यक आहे. मोबाईल आणि चष्मा हे अजिबात धुतले जात नाहीत त्यामुळे ते अनेक धोकादायक जंतूंचे आगर बनलेले असते असे अनेक संशोधनात आढळलेले आहे. मोबाईल आणि चष्मा हॅन्ड सॅनिटायझर (ते नसल्यास आफ्टर शेव्ह लोशन) मध्ये भिजवलेल्या कापसाच्या बोळ्याने दिवसातून दोनदा विशेषतः बाहेरून आल्यावर हात धुतो त्याबरोबर स्वच्छ करणे आवश्यक आहे. अन्यथा हात धुतले पण मोबाईल धुतला नाही तर त्याचा उपयोग नाही. ६) जिना चढता उतरताना लावलेल्या बारला हात लावणे टाळा तसेच लिफ्टचा दरवाजा स्वयंचलित नसेल तर टिशू पेपरने उघडा/ बंद करा आणि टिशू पेपर कचरापेटीत टाकून द्या. ७) जर आपला रुग्णाशी संपर्क आला असेल तर घरातील कुत्रा किंवा मांजरापासून दूर राहा. त्यांना या रोगाचा संसर्ग होत नाही पण त्यांच्या पासून घरच्यांना हा रोग पसरण्याची तुरळक असेल तरी थोडीशी शक्यता आहे. ८) आपला संगणक/ लॅपटॉप वेगळा ठेवा आणि घरच्यांना शक्यतो वापरू देऊ नका. जर वापरायला द्यायचा असेल तर लॅपटॉप सॅनिटायझर वेगळा मिळतो त्याने लॅपटॉप सॅनिटाईझ करून द्या/ घ्या. तो नसेल तर हॅन्ड सॅनिटायझर (ते नसल्यास आफ्टर शेव्ह लोशन) वापरू शकता. ९) बारसे डोहाळे जेवण लग्न मुंज ग्रहशांती इ. घरगुती/ सार्वजनिक ठिकाणी जाणे तर आवर्जून टाळा. १०) सामाजिक दृष्ट्या विलग झाल्यावर लोकांमध्ये कंटाळा नैराश्य आणि आत्मविश्वास कमी होणे यासारखी लक्षणे काही दिवसात दिसू लागतात. अर्थात आपल्याला वाचन करणे, संगीत ऐकणे, दूरदर्शन पाहणे, लोकांशी फोन वर संपर्क करणे/ गप्पा मारणे असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत ज्यांचा आपल्याला मोबाईल संगणक काळात विसर पडलेला आहे. याशिवाय अशा वेळेस आपले आर्थिक व्यवस्थापन मार्गी लावणे हा एक असाच मागे टाकलेला परंतु अत्यावश्यक भाग आपण पूर्ण करून घेऊ शकता. काळजी घ्या, सुरक्षित रहा, निरोगी आणि आंनदी जीवन जगा

In reply to by सुबोध खरे

हे खूप छान, अनेक बाजूने विचार करून लिहिले आहे आणि सध्या सर्वात जास्त महत्त्वाचे सुद्धा आहे. मूळ लेख अर्थात खूप माहितीपूर्वक आणि आश्वासक. धन्यवाद डॉकसाब.

"हे करताना अनेक कायदेशीर बाबी त्या कंपनीला पाळाव्या लागतात कारण चुकून कोणाचा त्या रोगाने मृत्यू झाला तर सदोष मनुष्यवधाचा खटला होऊ शकतो आणि कंपनीची कीर्ती रसातळाला जाऊ शकते." याबाबत कुतूहल आहे , खास करून औषधाचे बाबतीत... जर विषाणू दिला गेला असेल तर रोग होणारच ना? वेळ मिळेल तेव्हा जरूर प्रकाश टाकावा हि विनंती मी पूर्वी शरीराशी संबंध येणाऱ्या उपकरणे उदाहरणार्थ "इम्प्लांटेबल डिवाइस" क्षेत्रात थोडे काम केले आहे पण औषधे अशी पडताळून पाहणे उपकरणाच्या चाचणी पेक्षा अवघड असावे असे वाटते ! तसेच यातील "शरीरात चाचणी" हि भारत किंवा मेक्सिओ सारखया देशात औटसोर्स केली जाते असे ऐकले आहे ? तसे असेल तर...पण बहुतेक औषधी उद्योगांचे पहिले विपणन लक्ष हे पाश्चिमात्य देश/ जपान असे असते ज्यात सुद्धा बर्फाळ कॅनडा पासून ते दमट दक्षिण जपान एवढी विविधता मग जे भारतीय माणसावर तपासले जाते ते इतर देशात लागू कसे होते? त्या त्या देशातील माणसाची प्रतिकारशक्ती / तिथलं वातावरण वेगळे ! अजून एक ऐकले आहे ते खरे का? कि लस बनवण्यासाठी कोंबडीचे अंडे हे माध्यम सर्वात उत्तम "घर" समजले जाते ? थोड्या विषयांतराबद्दल क्षमस्व

पण बहुतेक औषधी उद्योगांचे पहिले विपणन लक्ष हे पाश्चिमात्य देश/ जपान असे असते ज्यात सुद्धा बर्फाळ कॅनडा पासून ते दमट दक्षिण जपान एवढी विविधता मग जे भारतीय माणसावर तपासले जाते ते इतर देशात लागू कसे होते भारतीय माणसाचे रक्त अमेरिकी किंवा आफ्रिकेतील माणसाला कसे चालते? कारण सर्व माणसांचे डी एन ए एकच आहेत. अर्थात केवळ भारतीय ते सुद्धा तुम्ही फक्त ९६ कुळी मराठा किंवा कुलीन बंगाली भद्रलोक घेतले तरी त्यांच्यात त्यांचे शरीर औषधास प्रतिसाद कसा देईल हे वेगवेगळे असते. त्यामुळे औषध प्रत्यक्ष बाजारात आले तरीही कंपन्या ते देणाऱ्या डॉक्टरांच्या संपर्कात असतातच आणि काही दुष्परिणाम आढळले तर ते औषध बाजारातून परत मागवले जाते. आता भारत किंवा इतर गरीब देशात यांची चाचणी घेतली जाते याचे कारण अमेरिकेतील स्वयंसेवकांना डॉलर मध्ये पैसे द्यावे लागतात आणि काही वाईट घडले तर दशलक्ष डॉलर्स मध्ये नुकसान भरपाई द्यावी लागते. याउलट भारत बांगला देश येथे स्वयंसेवकांना डॉलर्स मध्ये नव्हे तर रुपये किंवा टका मध्ये पैसे द्यावे लागतात आणि जर काही मोठा झोल झाला तर मामला "सेट" करून घेता येतो जसं भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये झालं. गरीब देशात मानवी आयुष्याची किंमत बरीच कमी असते

CoVID19 शैक्षणिक सुट्टी कालावधीत सोशल डिस्टन्सींग राखले जाईल असे शालेय आणि महाविद्यालयीन मुला (मुलींसाठी) खेळ सुचवा. कदाचित क्रिकेट ?

In reply to by माहितगार

हाच उपाय दिसतो. क्रिकेट मधे बॉलला सर्रास थुंकी लावतात, ओरडून बोलतात तेव्हा तुषार उडू शकतात. सध्या तरी पुर्ण अलगीकरण हेच योग्य वाटते. * पुण्यातील कालची एका महिलेची केस community infection असण्याची भिती आहे,* सावधपणा राखायला हवा. चित्रे काढणे, वाचन, संगीत ऐकणे, गाणे, वाद्य वाजवणे, आवडत्या विषयावर संशोधनपर माहिती गोळा करणे, भेंड्या लावणे(हे कुठे गायब झालय सध्या), dumb charade, वैदिक गणित, एखादी भाषा शिकणे अशा गोष्टी करता येतील. कोरोनाच्या data चे statistical analysis करण्याचा प्रयत्न करता येईल, prediction किती बरोबर येते लवकरच कळेल.

In reply to by आवडाबाई

होय बरोबर आहे तुमचे. मी लिहिण्यापुर्वी सोसायटीतील मुलांना फुटबॉल आणि डब्बा ऐसपैस का काय खेळताना पाहीले यात सोशल डिसटंसींगचा रुल अमलात येत नाही. क्रिकेट सुद्धा परफेक्ट नाही कदाचित बॅटमिटंन मध्ये एकमेकांवर पडण्याचे प्रमाण कमी व्हावे असे वाटते. अर्थात बॅटचे हँडल स्वच्छ ठेवणे आलेच आणि फुलाला एका पेक्षा अधिक व्यक्तींचा स्पर्ष ही आला. बैठ्या खेळात पत्त्यांचे खेळ, बिजनेस व्यापार सोंगट्या ज्यात खेळातील वस्तुची देवाण घेवाण होते सगळे हात लावतात ते टाळणे श्रेयस्कर असेल असे वाटते. जे खेळ खेळणी प्रत्येकाची स्वतंत्र ठेऊन खेळता येतील ते बरे. जी खेळणी साबणाच्या गरम पाण्यात धुऊन घेता येतील ती धुऊन वापरणे श्रेयस्कर असेल. चेस सारखा खेळ एकाने कायम एकाच रंगाच्या सोंगट्या वापरुन खेळल्यास श्रेयस्कर असावे. बाकी तुम्ही सोलो अ‍ॅक्टीव्हितीजचे पर्याय सांगितलेत त्यात शब्द कोडी सोडवणे हे ही असू शकेल. टिव्हीवर भरपूर पिक्चर आणि कार्टून्स बघण्याचेही स्वातंत्र्य काही कालावधीसाठी मुलांना देऊ शकता यावे असे वाटते.

चायना मध्ये सलग तिसर्या दिवशी एकहि नविन केस आलेली नाही. पण ज्या वेगाने हा पसरत आहे त्यावरुन हा ह्वायरस वातावरणात जास्त वेळ जिवंत राहत असावा असे वाटते.

या धाग्यावर खरच खूप छान माहिती मिळत आहे. आता मी माझा लॅपटॉप एकदा सॅनटायझरने साफ करुन घेतो कारण नाही म्हटले तरी बाहेर जावे लागते. मोबाईल करीत होतो. जे औषधाच्या बाबतीत सांगितले आहे मला वाटते ते सुद्धा सध्या ट्रायल या प्रकारात मोडतात. क्लोरोक्वीन किवा एचआयव्हीची औषधे वगैरे. जयपूर कॉकटेल म्हणत आहेत ते. हे इतरत्रही प्रयत्न करण्यात आले.

डॉकसाब, बाजारातून आणलेली फळे खाताना कोणती काळजी घ्यावी, मुख्यत्वे सफरचंद वगैरे जी आपण साल न काढता खातो. नेहेमीप्रमाणे थंड पाण्याने धुवून घेतली तर पुरेसे राहिल का? आधी त्यांना कोण कोण हात लावून गेले माहित नसते - ह्या संदर्भात.

In reply to by आवडाबाई

मुळात जी फळे आपण सालासकट खातो उदा सफरचंद द्राक्ष ती घरी आणल्यावर थोड्याशा साबणाच्या पाण्यात काढून पाण्याने धुऊन घ्यावीत. कारण त्यावर मारलेली कीटकनाशके आपल्या पोटात जाऊ शकतात. बाकी साल न खातो तशी फळे उदा कलिंगड केळे इ सध्या तरी साबणाच्या पाण्याने धुवून खावी. एकदा हि करोनाची साथ संपली कि कलिंगड सारखी फळे निदान तरी पाण्याने धुवावीत कारण कापताना त्याच्या खायच्या भागाला आपला हात लागतोच तेंव्हा तेथे असलेली माती किंवा कीटक नाशके पोटात जाऊ शकतात. बाकी केळं खाताना आतल्या गराला हात न लावता खा आणि मग आपले हात धुवा

In reply to by सुबोध खरे

सालासकट खातो ती पण फळे कधी साबणाने धुवून खात नव्हतो. चला अजून एक लाईफस्टाईल बदल ह्या निमित्ताने . खूप आभार.

आजचा दिवस हा प्रत्येक देशाच्या हलगर्जीपणामुळे पहावा लागतो आहे असे आढळले. इथे रोग हवेमार्फत पसरता आजचे निर्बंध योग्य ठरते पण परदेशी पर्यटक वा प्रवासी यांना अटकाव केला नाही, घरी जाऊन झोपा एकटेच असे नुसत्या सूचनेवर विसंबून स्मार्ट सरकारने झोपा केला. स्मार्ट सुशिक्षीत, ऊच्च आर्थिकदृष्ट्या सक्षम जनतेला सरकार आवरू शकले नाही. आज त्या उद्दाम, मुद्दाम वागण्याचे गंभीर परिणाम सर्व जनता भोगतेय. १२ मार्च रोजी बाहेरच्या विमान वाहतूक प्रतिबंध केला तोच महीनाभर आधी केला असता तर साधारण १०लाख परदेशी वा देशी लोकांना थोडी गैरसोय झाली असती पण संपूर्ण भारत देशात १२५कोटी लोकसंख्या सुरक्षित रहाती. गेला बाजार फक्त देशी नागरिक जे बाहेरच्या देशातून आलेले होते त्यांना सक्तीने विलगीकरण कक्षात सरकारने सोय करून ठेवले असते १४ दिवस तरी चालले असते. पण श्रीमंतांच्या यादीत मोडणारा मोकाट रोग घेऊन फिरताना दिसतात पण गरीबांना कामधंदा सोडून घरी बसवतात हे सरकारी अधिकारी व नेते. निव्वळ निष्कलंक राहिले सर्व रोगी व राजकीय सत्ताधारी निर्धास्त. काय वाट्टेल ते चालले आहे भाऊ इतकं टरकून ठेवले आहे आमची धडगत नाही कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी बळजबरीने डांबण्यात आले आहे. बिनडोक पणा सगळा, एखाद्या राजकीय पक्षाने बंद पुकारला तर देशाचं किती लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले, दंगलखोर पकडून भरपाई वसूल करण्यात येते. कोरोना पसरविणारे व पसरवू देणारे सरकार विरोधात भरपाई वसूल केली पाहिजे. श्रीमंतांच्या गुर्मीचा भुर्दंड सहन करतेय गरीब बिचारी जनता.

In reply to by नमकिन

" इतकं टरकून ठेवले आहे "... कोणी? सरकारने? उगाच सगळं खापर का फोडताय सरकारवर? अश्या प्रसंगी जनतेने आणि माध्यमाने सरकार काय करत आणि नाही याच्यावर लक्ष ठेवले पाहिजे हे मान्य .. सिंहावलोकन करून सल्ला देना सोप्पं असतं जगभर च्या सरकारांना आज याला सामोरे जावे लागतंय... सरकार चालवणारे, मोठे उद्योग किंवा मोठ्या संस्था चालवणारे नेते/ अधिकारी यांचा काम अश्याप्रसन्गी सोप्पं आहे असे वाटते का? किती गोष्टी एकावेळी सांभाळाव्या लागत असतील अश्यावेळी याची यादी केली तर चक्कर येईल स्वतःला त्याखुर्चीत बसवा क्षणभर... आणि मग टीका करा... मी बसवले क्षणभर त्या खुर्चीत मला आणि माझी वीतभर फाटली ( चड्डी)

In reply to by चौकस२१२

मास (मास्क) हिस्टेरिया चार प्रकार आहे हा. अहो आज विमानतळ बंद करून काय उपयोग, विषाणू शरीरात घेऊन १०लाखावर प्रवासी शिरले पूर्ण देशातील जनतेला संसर्ग वाटायला. उगीचच सगळ्यांच्या उल्लेखाने विषय भरकटत जातो. सिंहावलोकन नाही तर पुढच्यास ठेच मागचा शहाणा हे तत्व शिकवण आहे. पंचतंत्र इसापनीती बोधकथा आठवा. १२५ कोटी घरी बसवतात जनतेला. कारखाने, उत्पादन, वितरण ठप्प करून हूकूमशाही चे प्रयत्न करत आहेत सरकार. दूरदृष्टी अभावामुळे होणारे आजार असे वर्णन करताना दोषी मात्र भयभीत झालेल्या भाबड्या जनतेला टाळ्या, ताटल्या बडवायला लावून कर्मचारी कौतुक केले ही भावना प्रबळ करण्याचे चलाख महापुरुष आहे. इथे भावनांना कुरवाळत भ्रमिष्ट केले जात आहे. विषाणू पसरवण्यास पूरक धोरण राबवले म्हणजे मंदी, अर्थव्यवस्था, कर ऊत्पन्न, परराष्ट्र नीती वगैरे गोष्टी बाजूला पडल्यात आपोआप. मूळात जिथे संसर्ग पोचले ते परदेशातून आलेल्या लोकांनी जाणते -अजाणतेपणी हे तरी खरं आहे ना. संपूर्ण १ महिना वेळ होता आपल्या सरकारला. चीन येथे लागण पसरल्याच्या बातम्या आपण २०-२५ जानेवारी पासून वाचतोय. तेथील प्रतिबंधक उपाय, शहरे बंद करणे हे व इतर प्रकार आज २ महिन्यांनी आपण भारतात करतोय हे मोठा कालावधी हातात असूनही सरकार नाकर्तेपणा चा परिणाम.

In reply to by नमकिन

विमान सेवा २ महिन्ाभरापूर्वी बंद केली असती तर आता ही वेळ आलीच नसती

In reply to by Rajesh188

11 मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेने विमान प्रवासावर बंदी घालण्याची गरज नाही असे वूहान च्या साथीबद्दल केलेल्या शिफारशीत म्हटलेले आहे. यानंतर इतक्या दिवसांनी आता त्यांना असेवाटते आहे की हवेतील सूक्ष्म कणांमध्ये करोनाचा विषाणू जिवंत राहू शकतो त्यामुळे आपल्याला कदाचित मुखवट्याचा फायदा होईल. इतके दिवस मुखवट्या चा फायदा होणार नाही अशीच शिफारस होती. जसे जसे रोगाबद्दल जास्त समजत जाते तसे आपण त्याबद्दल आपली माहिती अद्ययावत करत जातो. Retrospectively all are wise.

In reply to by सुबोध खरे

शिफारस करून त्यांनी त्यांचे काम केले. आपण जागरूक राहून आपल्या देशातील सोयी, सवयी माहीतच असलेल्या सरकारने वेळेत योग्य प्रतिबंधक उपाय केले नाही. २१ दिवस देशं बंद केला, २५मार्च पासून. २०जानेवारी वूहान चार विषाणू प्रसार सर्व जगाला कळला होता, इटली प्रकोप मार्च सुरूवात झाली तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणवला पण केंद्रीय मंत्री व नेतृत्व इतर स्थानिक राजकीय घडामोडीत गुंतलेले होते. ६० दिवस होते सरकार कडे. चूका होतात पण त्या मान्य केल्या तरंच पुढे सुधारणा होईल अन्यथा तेच योग्य ठरवण्याची धडपड ही अशी मारक ठरत असते, सर्व सामान्य जनतेला.

In reply to by Rajesh188

आता हरेक छोट्या शहरात कोरोना पसरविणारे शिरले ते परदेश प्रवास केलेले आहेत हे वारंवार दिसले तरी सरकारने रोज जुजबी तपासणी करून घरी सोडले. लोकशाही जनता एवढी आज्ञाधारक आहे का नुसत्या विनंती चा मान ठेवून घरीच राहील या भाबड्या आशेवर सरकार विसंबून राहीले ही दुसरी चूक. जनता कर्फ्यू लावून हेच चालू होते. संशयित मोकाट, सामान्य जनता घरात. टाळ्या वाजवत. २३मार्चला विमान प्रवास वाहतूक थांबवली जेव्हा संसर्ग ३०० लोकांना झालेला. कहर केला.

In reply to by नमकिन

जागतिक आरोग्य संघटनेने इतके पुढे मागे (FLIP FLOP) केले आहे कि नक्की त्यांच्यावर विश्वास ठेवावा कि नाही हे कठीण आहे. ११ जानेवारीला त्यांच्या साईट वर होते कि वूहान मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांवर काही विविक्षित खबरदारी घ्यायची गरज नाही १४ जानेवारीला होते कि विमान सेवा बंद करण्याची गरज नाही. १६ जानेवारीला लिहिले होते कि एका माणसाकडून दुसऱ्याला संसर्ग होण्याची शक्यता फारशी नाही. १० फेब्रुवारी ला होते कि लॉक डाऊन करून काही फायदा होणार नाही. इतके दिवस सांगत होते कि तोंडावर मुखवट्याची गरज नाही आता सांगत आहेत कि मुखवटा आवश्यक आहे कारण खोकले किंवा शिंकले कि सूक्ष्म कण हवेत धुरळले(AEROSOL) जातात आणि त्यापासून पण हा रोग होउ शकेल. त्याच संघटनेचा दुजोरा देत मी हा लेख लिहिला आहे. यात मी तोंडघशी पडलो आहे. सामान्य माणसे तर सोडाच आमच्या सारखे अनेक वैद्यकीय क्षेत्रात आहेत ते पण तोंडघशी पडत आहेत. सरकारने एकदम एखादं मोठं पाऊल उचललं आणि नंतर जागतिक आरोग्य संघटनेने घुमजाव केले तर सरकार ची अवस्था फार बिकट होईल. शेवटी शाहीन बागच्या लोकांना हाकललं. त्यांची मागणी होती कि आम्हाला मुखवटे आणि हॅन्ड सॅनिटायझर द्या. आंदोलन यांनी करायचं आणि सरकारकडून अशा मागण्या करायच्या. याबद्दल काही बोलायचं तर सगळे लिब्रान्डु अंगावरच येतात. सरकारला शिव्या देणं फार सोपं आहे. ज्यांनी तेथे काम केलेलं असतं त्यांना प्रत्यक्ष काय समस्या आहेत ते लक्षात येतं.

In reply to by सुबोध खरे

जागतिक आरोग्य संघटनेने इतके पुढे मागे (FLIP FLOP) केले आहे कि नक्की त्यांच्यावर विश्वास ठेवावा कि नाही हे कठीण आहे. ११ जानेवारीला त्यांच्या साईट वर होते कि वूहान मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांवर काही विविक्षित खबरदारी घ्यायची गरज नाही १४ जानेवारीला होते कि विमान सेवा बंद करण्याची गरज नाही. १६ जानेवारीला लिहिले होते कि एका माणसाकडून दुसऱ्याला संसर्ग होण्याची शक्यता फारशी नाही. १० फेब्रुवारी ला होते कि लॉक डाऊन करून काही फायदा होणार नाही. इतके दिवस सांगत होते कि तोंडावर मुखवट्याची गरज नाही
जागतिक आरोग्य संघटना देशभराकडून प्रचंड डोनेशन मिळवत असते, मला वाटतं असेच असेल तर आवरलं पाहिजे यांना. जागतिक नागरिकांच्या आरोग्यासाठी अशी संघटना धोकादायक वळणावर उभी आहे, असे वाटते. -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

या सगळ्यातलं आंतरराष्ट्रीय राजकारण कुणीतरी उलगडून समोर ठेवायला हवं.. खूप भयंकर आहे हे सगळं... सामान्य लोकांना वेठीस धरुन खेळ खेळले जात आहेत असं मला वाटतं.. पुर्वी बंदूका तोफांनी युद्ध व्हायची आता राजकारण, अर्थकारण, व्यापारयुद्ध आणि कदाचित व्हायरस-व्हायरस खेळून समोरच्याला जेरीस आणायचे प्रयत्न चालत असावेत अशी शंका मनात येते... एकूणातच या प्रकरणात खच्चून नाट्य भरलेले आहे. आणि अर्थकारणही.. लस आली की तिची किंमत काय असेल ? ती कंपनी किती बिलियन्स कमवेल याचा काही अंदाज ? बाकी ब्लॉक ब्लस्टर चित्रपट, खळबळजनक माहितीपटे, बेस्ट सेलर पुस्तके यांना खूप मटेरियल मिळेल हे नक्की.

In reply to by सुबोध खरे

सरकारला शिव्या देणं फार सोपं आहे. सहमत पण काय आहे कि हि मस्त संधी आहे राजकारण खेळण्याची थोडे महिने नंतर तर आगडोंब उसळणार आहे ...या वैद्यकीय साथीचा परिणाम अर्थव्यवस्थेवर तर होणारच आणि मग फक्त भारत ह एक देश असेल कि सगळं खापर फक्त सरकारवर फोडला जाईल... जगात जणू काही अर्थव्यवस्थेवर परिणाम झालाच नाहीये जिथे हेल्मेट सक्ती वर विरोध होतो तिथे काय बोलायचे.. मरा लेको ..

In reply to by चौकस२१२

भारतीय अर्थव्यवस्थाGDP 1.3% = 3.3 लाख कोटी रुपये कमी होईल असे भाकीत काल झी मीडिया हिंदी वाहिनी वर सांगितले. पण रोजचा इंधन व देखभाल खर्च वाचतोय की. त्यात इंधन दर गडगडले आहे ती बचत फार मोठी आहे.

In reply to by नमकिन

हो बरोबर , मोदी. सीआयए आणि ट्रम्प दादा आणि जगातील बलाढ्य भांडवलशी उद्यानगी यांनी काहीतरी जागतिक कट रचूनच हे सगळं केलाय.. आणि आता बारामतीचा जाणता राजा आणि पप्पू राजकुमार हे यातून वाचवणार हात टेकले ह्या मोदी द्वेषाला ....

रोगप्रतिकारशक्ती वाढवावी यासाठी कोणकोणते प्रॅक्टिकल उपाय / इलाज आहेत? डॉक्टरांनी / तज्ज्ञांनी इथे माहिती माहिती दिली तर ते आचरणात आणता येतील. म्हणजे, केवळ COVID-19 च्या प्रतिकारासाठीच म्हणून नाही तर सर्वसाधारणपणे, आपण शक्य तितक्या कमी वेळा आजारी पडावे म्हणून दिनचर्येत काय बदल करता येतील?

In reply to by वामन देशमुख

आपल्या आहारात भाज्या फळे सुका मेवा सारखे पदार्थ वाढवावेत. वेळेवर चौरस आहार जेवण म्हणून घ्यावा. प्रक्रिया केलेल्या पदार्थांपेक्षा प्रक्रिया न केलेले पदार्थ खा, तेल तूप मैद्याचे पदार्थ कमी खा सिगरेट तंबाखू दारू बंद करा. नियमित व्यायाम करा निदान 7 तास तरी झोप घ्या. वजन प्रमाणात ठेवा. मिताहार घ्या. या त्रिकालाबाधित गोष्टी सर्व पॅथी चे डॉक्टर सांगतात. पण तहान लागल्यावर विहीर खणण्या ची मानवी वृत्तीच आहे. कर वाचवण्यासाठी फेब्रुवारी मार्च मध्ये माणसं जागी होतात ती याच कारणामुळे

च..... यानी केद्र सरकारला विनन्ति केली की काही पेशण्ट तुम्ही मला द्या मी त्याना तीन दिवसात बरे करून दाखवतो केवळ न्युट्रीशन चा जोरावर ! डॉ हर्शवर्धन यानी त्याना नकार दिला व कारण असे सान्गितले की हा आंतर राष्ट्रिय मामला असल्याने तसे करता येणार नाही. डॉ रायचौधरी यान्च्या माहितीनुसार ( सन्दर्भ लॅन्सेट ) दरवर्षी इन्फेक्शन मुळे एक कोटी २० लाख लोक मरत असतातच .जगाच्या लोकसंख्याच्या तुलनेत १०००० मृत्यू स्वाभाविक आहे. डब्लू एच ओ चाच हा एक फ्रॉड आहे ज्यामुळे त्यांचे महत्व अधोरेखित होऊन त्यांना देणग्या मिळतात . हा सारा भयगंड निर्मितीचा खेळ आहे असे त्यांचे ठाम मत आहे !

In reply to by चौकटराजा

चौकटराजा, मलाही करोनासंबंधी जरा जास्तंच अतिशयोक्ती होतेय असं वाटतंय. इटलीत केवळ लोम्बारडी प्रांतात सर्वोच्च लागणी २५०००+ झाल्यात आणि द्वितीय क्रमांकावर रोम प्रांती ६७०० आहेत. हा फरक बराच व्यस्त आहे. लोम्बारडीस व त्यास चिकटून असलेल्या प्रांतांची आकडेवारी येणेप्रमाणे : -------------------------------- प्रांत : लागणी / मृत्यू -------------------------------- ओस्ता खोरे : ३१३ / ८ लिगुरीया : १४३६ / १५२ पिदेमाँत : ३७५२ / २३८ लोम्बारडी : २५५१५ / ३०९५ -------------------------------- स्रोत : https://en.wikipedia.org/wiki/2020_coronavirus_pandemic_in_Italy#Statis… इथेही लोम्बारडीचं प्रमाण इतरांपेक्षा खूप म्हणजे खूपंच जास्त आहे. जो कोणी मेला तो करोनामुळे अशी अफवा उठवून दिलेली वाटते. लागण व मृत्यूदर यांचं प्रमाण कमी असेल तोवर दिसायला ठीक दिसतं. मात्र ते व्यस्त होऊ नये म्हणून लागण झालेली नसतांनाही लागण झाल्याची बतावणी केलेली असू शकते. आ.न., -गा.पै.

डॉक्टर साहेब, या कोरोनाचे पुढे म्यूटेशन होऊन मानवास हितकारक होऊ शकते का? अथवा याचेच म्यूटेशन करून anti कोरोना तयार करता येऊ शकतो का ?

डॉक्टर साहेब, थोडी गल्लत होतेय का? व्हायरस चे नाव SARS-CoV-2 असे आहे. ( severe acute respiratory syndrome coronavirus 2 ) त्यातून होणर्‍या आजाराला COVID-19 म्हणतात. सन्दर्भः https://www.who.int/emergencies/diseases/novel-coronavirus-2019/technic…

In reply to by भुजंग पाटील

आपले म्हणणे बरोबरच आहे. पण बोली भाषेत जसे radiograph ला Xray म्हणतात तसंच आहे. (मिपा वर संपादनाची सोय नाही म्हणून मी काही केले नाही)

खूप corona ग्रस्त रुग्णांत ताप,खोकला,ही लक्षणं दिसत नाहीत . पण चव न समजणे आणि वास न येणे ही दोन्ही लक्षण सर्व corona grast रुग्णांत दिसतात. अशा व्यक्तींनी 8 दिवस स्वतःला वेगळे ठेवावे

आता एक सुधा चीन विषयी बातमी येत नाही. पाहिले औषध नव्हती तरी साथ आपोआप जात असे . आता सुध्दा तीच अवस्था आहे. दोन तीन महिन्यात नैसर्गिक रित्या साथ निघून जाईल .

Lysol is a cationic surfactant and quaternary ammonium compound. हे सर्व तर्हेच्या जिवाणू विषाणू आणि बुरशी साठी उपयुक्त आहे. आपण त्यांनी सांगितलेल्या तर्हेने पाण्यात द्रावण करून फरशी पुसण्यासाठी वापरले तर धुळीतून येणाऱ्या सर्व जंतूनपासून आपल्याला संरक्षण मिळते. घरात रांगणारी दात येऊ घातलेलीकिंवा चालायला लागलेली लहान मुले असतील जी जमिनीवरची कोणतीही वस्तू तोंडात घालतात अशा घरात तर रोज एकदा याने फरशी पुसून घ्यावी.

दुधाची पिशवी आपण साबण आणि पाण्याने धुवून घ्यावी. उत्तम म्हणजे दूध आणण्यासाठी एक मोठ्या तोंडाची कापडी पिशवी घेऊन जा आणि त्यात दुकानदाराला दुधाच्या पिशव्या टाकायला सांगा घरी आल्यावर दोन्ही साबण आणि पाण्याने धुवून घ्या

दुधाची पिशवी आपण साबण आणि पाण्याने धुवून घ्यावी. उत्तम म्हणजे दूध आणण्यासाठी एक मोठ्या तोंडाची कापडी पिशवी घेऊन जा आणि त्यात दुकानदाराला दुधाच्या पिशव्या टाकायला सांगा घरी आल्यावर दोन्ही साबण आणि पाण्याने धुवून घ्या

या संपूर्ण प्रकरणात जागतिक आरोग्य संघटनेने बऱ्याच बाबतीत घुमजाव केलेले आहे. आधी सांगितले हा रोग हवेतून पसरत नाही आता म्हणतात पसरू शकतो. आधी सांगितले सोशल डिस्टंसिंग हाच उपाय आहे आता म्हणतात नाही ते उत्तर नाही. भरपूर टेस्ट करा आणि रोगींचे अलगीकरण करा . लॉकडाउन हा बचावात्मक पवित्रा आहे. वुहान मधे हा रोग पसरुन तो आता आटोक्यात यायला लागला तरी हे नक्की समजत नाही आहे की रोग कसा पसरतो. भारतासारख्या जपान या देशाने सुद्धा फार टेस्ट नाही केल्या. त्यांच्या इथे सुद्धा चीनचे लोक येत होते. जपानमधे वृद्धांची संख्या खूप जास्त आहे तरी आजतागायत तेथील रुग्णांची संख्या कमी आहे. तीच गोष्ट तायवानची. दक्षिण कोरीयाने खूप टेस्ट केल्या. आपल्या इथे टेस्ट तयार झाली. चीन कुठलीतरी अॅसिड टेस्ट करते. या साऱ्या टेस्ट सारख्याच आहेत की वेगळ्या. जानेवारी फेब्रुवारीमधे भारतात कितीतरी मंडळी चीनमधून आले. संपूर्ण महिन्यात पॉझिटिव्ह केसेस कमी आल्या आता मात्र रोज वाढत आहेत. असे का व्हावे.

खरे डॉक्टर,
यात मी तोंडघशी पडलो आहे.
अगदी अगदी. जागतिक आरोग्य संघटना ( = वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) स्वत:स जगाची डॉक्टर मानते. पर्यायी दृष्टिकोनाचा आदर सोडा, विचारही नाही. हिच्या प्रमुखांनी करोनाच्या संसर्गाविरुद्ध आक्रमक रणनीतीची शिफारस केली आहे. या 'आक्रमक हाताळणी'मध्ये प्रत्येक संशयितांची सखोल चाचणी करून त्यांना बळेच विलग करायचं म्हणताहेत. संदर्भ : https://newsbaba.in/who-chief-said-rapidly-growing-epidemic-but-with-th… विषाणूविषयी व्यवस्थित माहिती नसतांना इतकं टोकाचं पाऊल उचलावं का? यावरनं नाझी जर्मनीची आठवण होते. आ.न., -गा.पै.

एकदा कोरोनो होऊन गेला (सौम्य /तिव्र) व त्यातून बरं झालेल्या व्यक्तीला परत कोरोनाची लागण होऊ शकते का ?

In reply to by उगा काहितरीच

एकदा कोरोनो होऊन गेला (सौम्य /तिव्र) व त्यातून बरं झालेल्या व्यक्तीला परत कोरोनाची लागण होऊ शकते का ? बहुसंख्य विषाणूमुळे होणाऱ्या आजारात आपल्या शरीरात प्रतिपिंडे(antibodies) तयार होतात आणि या प्रतिपिंडाची आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशींमध्ये त्याची स्मरणशक्ती राहते. यामुळे दुसऱ्यांदा परत याच विषाणूंचा प्रादुर्भाव झाला तर याच पांढऱ्या पेशी परत ती प्रतिपिंडे वेगाने तयार करतात आणि त्या विषाणूंचा होणारा प्रादुर्भाव रोखतात. यामुळेच आपल्याला गोवर कांजिण्या सारखे आजार परत होत नाहीत. एच आय व्ही सारख्या आजारात हि प्रतिपिंडे तयार करणाऱ्या पेशींवरच विषाणू हल्ला करतात त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती लुळी पडते. अशीच स्थिती केमोथेरपी मध्ये होत असल्याने रुग्णाची प्रतीकारशक्ती खच्ची होते. सध्याच्या या विषाणू बद्दल तो नवीन असल्याने आपल्याला पूर्ण माहिती नाही परंतु बाकी करोना गटाच्या विषाणूंमध्ये हा आजार परत होत नाही त्यामुळे या विषाणूत एकदा झाला तर पुन्हा होणार नाही असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. कांही शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की जे रोगी या आजारातून बरे झाले आहेत त्यांना परत होण्याची शक्यता नसल्यामुळे त्यांना बैद्यकीय चमू मध्ये सामील करून घ्यावे.परंतु यात सर्व तज्ज्ञांत एकवाक्यता नाही आणि बरेच तज्ज्ञ असा धोका स्वीकारण्यास तयार नाहीत. .

In reply to by सुबोध खरे

पण हा विषाणू SARS प्रकारातला आहे. सर्दी खोकला ताप आदी विकार मनुष्याला नेहमीच होत असतात आणि ते बहुतांशी आपोआप बरेही होतात त्याप्रकारेच हा मनुष्याला पुनः बाधित करू शकतो का आणि आपोआप बरा होऊ शकेल का?

सध्या तरी या रोगावर नक्की असे औषध नाही आणि 95 टक्के लोक स्वतःहूनच बरे होतात. उरलेले 5 % याना काही गुंतागुंती होतात म्हणजे न्यूमोनिया किंवा श्वास घ्यायला त्रास किंवा हृदयाचे काम अनियमित होणे. हे बहुधा अशा लोकांना होते ज्यांचे वय 70 पेक्षा जास्त आहे मधुमेह रक्तदाब किंवा हृदय विकार असे आजार आहेत किंवा सिगरेट पिणारे आहेत. अशा लोकांना कृत्रिम श्वासोच्छवासाची गरज पडू शकते. जर भारतभरात 60 कोटी लोकांना या गुंतागुंती एकत्र झाल्या तर आपल्याकडे 3 कोटी लोकांना एकत्र कृत्रिम श्वासोच्छवास देणें शक्य होणार नाही आणि यातील अगदी 30-33 टक्के लोक बाहेर आले नाहीत तरी आपल्याकडे 1 कोटी लोकांचा मृत्यू होईल. याच ऐवजी आपण या आजाराचे प्रसारण थांबवले तर एप्रिल मे मधील गरमी मुळे हा आजार आपोआप बराच कमी होईल. अर्थात हे विषाणू नाहीसे होणार नाहीत म्हणजे हा आजार उरलेल्या लोकांना पुढच्या काही वर्षात होईलच पण तेंव्हा त्यांना गुंतागुंत झालीच तर कृत्रिम श्वासोच्छवास देणें शक्य होईल आणि त्यातील बऱ्याच माणसांना वाचवणे शक्य होईल.