✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

करोना विषाणू COVID-19 (Coronavirus disease 2019)

स
सुबोध खरे यांनी
Wed, 03/04/2020 - 18:55  ·  लेख
लेख
करोना विषाणू हा एक साध्या सर्दीपासून मर्स आणि सार्स (Middle East Respiratory Syndrome (MERS) and Severe Acute Respiratory Syndrome (SARS) सारख्या श्वसनसंस्थेला सूज आणणाऱ्या विषाणूंच्या गटातील एक विषाणू आहे. COVID-19 (Coronavirus disease 2019) हे या विषाणूंचे नाव आहे आणि याचा आपल्याला शोध हा आता हि साथ आल्यामुळे लागला आहे. यामुळे होणाऱ्या रोगाची लक्षणे -- ताप, कोरडा खोकला आणि थकवा येणे. काही रुग्णांना सर्दी, अंग मोडून येणे, नाक बंद होणे, घसा दुखणे आणि काही रुग्णांना डायरिया पण होतो. हि सर्व लक्षणे हळूहळू दिसू लागतात. बऱ्याच लोकांना या विषाणूचा प्रादुर्भाव झाला तरी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत कि कोणताही त्रास होत नाही. ८५ टक्के रुग्ण कोणताही इलाज न करता स्वतःहून बरे होतात. १५ % रुग्णांमध्ये हा रोग गंभीर होतो आणि १ ते २% रुग्ण यात दगावतात. गंभीर आजार आणि मृत्यू हा साधारणपणे वृद्ध, प्रतिकारशक्ती कमी असणारे किंवा मधुमेह, रक्तदाब हृदयविकाराचे रुग्ण यांमध्ये दिसून येतो. रोग प्रसार -- या रोगाने आजारी रुग्ण जेंव्हा खोकतो किंवा शिंकतो तेंव्हा त्यातुन जो फवारा उडतो त्यात असलेल्या सूक्ष्म थेंबातुन हे विषाणू आजूबाजूच्या वस्तूंवर जाऊन बसतात. या वस्तुंना हात लावल्यावर जेंव्हा निरोगी माणूस आपल्या चेहऱ्याला डोळ्यांना नाकाला हात लावतो तेंव्हा हा विषाणू त्याच्या शरीरात शिरतो. यासाठीच आपण बाहेर जाऊन आल्यावर आपले हात साबणाने आणि भरपूर पाण्याने धुतले पाहिजेत आणि सारखा चेहऱ्याला हात लावणे बंद केले पाहिजे. आणि ज्याला खोकला किंवा सर्दी आहे त्याने मोठा हातरुमाल जवळ बाळगून त्यातच आपले खोकणे किंवा शिकणे नियंत्रित करणे आवश्यक आहे. अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझर हा साबणासारखेच काम करतो. (खरं तर साबण जास्त चांगला आहे). कोणताही साबण चालतो. डेटॉल किँवा सॅवलॉन सध्या साबणापेक्षा जास्त परिणामकारक असतो असा कोणताही पुरावा आढळलेला नाही. बहुसंख्य लोकांना हा रोग अतिशय कमी प्रमाणात होतो परंतु हे विषाणू त्यांच्या श्वसन मार्गात असल्यामुळे कोणीही( वारंवार निरोगी दिसणाऱ्या माणसानेही) खोकताना किंवा शिंकताना हातरुमालातच शिंकणे आवश्यक आहे. करोना विषाणू पासून आपला बचाव-- १) बाहेर जाऊन आलयावर प्रत्येक वेळेस आपण आणि आपल्या घरच्यांना साबण आणि पाण्याने हात धुण्याची सवय लावणे २) खोकला किंवा सर्दी असलेल्या माणसापासून १ मीटर दूर उभे राहणे ३) ज्याला खोकला किंवा सर्दी आहे त्याने मोठा हातरुमाल जवळ बाळगून त्यातच आपले खोकणे किंवा शिकणे नियंत्रित करणे. हि गोष्ट आपल्या माहितीतील सर्व लोकांना सांगणे आपल्याला हा रोग होण्याची शक्यता --आपण चीन इटली किंवा तशा रोगप्रसार झालेल्या देशात जाऊन आला नसाल तर हा रोग होण्याची शक्यता सध्या तरी फारच कमी आहे. हा विषाणू जन्य रोग असल्यामुळे या रोगावर प्रतिजैविके ( Antibiotics) काम करत नाहीत. अजून तरी यावर लास तयार झालेली नाही परंतु लवकरच ती उपलब्ध होईल अशी आशा आहे. आरोग्य कर्मचारी आणि ज्यांना खोकला किंवा सर्दी आहे अशानीच तोंडावर मुखवटा घेणे आवश्यक आहे. सामान्य माणसांनी मुखवटा घेणे हे अगोदरच कमी असलेल्या साधनसामग्रीचा अपव्यय आहे. चीन मधून आलेल्या पॅकेटमधून हा विषाणू येण्याची शक्यता फारच कमी आहे कारण शरीराच्या बाहेर हा विषाणू फार तर ४८-७२ तास जिवंत राहू शकतो ते सुद्धा थंड तापमानात अत्यंत महत्त्वाची गोष्ट --या रोगापासून काळजी घेणे हे योग्य आहे परंतु याबद्दल चिंता करणे(ANXIETY) किंवा घबराट पसरवणे ( PANIC) हे चूक ठरेल सार्स(२००३) मध्ये मृत्यूची शक्यता १० % होती . स्वाईन फ्लू( २००९) मध्ये मृत्यूची शक्यता ४.५ % होती इबोला(२०१४) मध्ये मध्ये मृत्यूची शक्यता २५ % होती तर करोना मध्ये हि १-२ % आहे मग आज इतकी भीती का पसरली आहे ? सार्स स्वाईन फ्लू किंवा इबोलाच्या वेळेस सोशल मीडियाचा ( आणि त्यामुळे गैरसमज आणि अफवांचा) प्रसार इतका झालेला नव्हता. आज जगात सोशल मीडिया ३०० कोटी लोक वापरतात. त्यामुळे अफवा दोन दिवसात जगभर पसरल्यामुळे या बद्दल अफवा आणि त्यामुळे घबराट फार लवकर पसरली आहे. भारतात या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता खूपच कमी आहे कारण हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जसे तापमान वाढते तसे लोक अतिथंडीमुळे घरात बसून राहतात त्याऐवजी बाहेर पडतात जेथे तापमान जास्त असते यामुळे विषाणूची वाढ कमी होते. वरील लेखातील बहुतेक साहित्य हे जागतिक आरोग्य संघटनेच्या अद्ययावत पत्रकातून घेतलेले आहे. यावर अजून संशीधन चालू आहे आणि अजून बरीच माहिती मिळणे बाकी आहे. हा लेख माझ्या नावासाहित किंवा नावा शिवाय पाठवले तरी चालेल. ही माहिती मी जागतिक आरोग्य संघटनेच्या अद्ययावत पत्रकावरूनच घेतलेली आहे. त्यात माझे कर्तृत्व काही नाही. पण जर लोकांना माहितीच्या स्रोता बद्दल खात्री वाटत नसेल तर खाली डॉ सुबोध खरे एम डी असे लिहिले तरी चालेल. लोकांमध्ये निर्माण होणारा "भयगंड"दूर करणे आणि आरोग्याची योग्य काळजी घेणे एवढाच माझा हेतू आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
147816 वाचन

💬 प्रतिसाद (253)

प्रतिक्रिया

धन्यवाद

आवडाबाई
Sat, 03/21/2020 - 22:03 नवीन
सालासकट खातो ती पण फळे कधी साबणाने धुवून खात नव्हतो. चला अजून एक लाईफस्टाईल बदल ह्या निमित्ताने . खूप आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

गुन्हेगारीचे मोजमाप

नमकिन
Sat, 03/21/2020 - 19:34 नवीन
आजचा दिवस हा प्रत्येक देशाच्या हलगर्जीपणामुळे पहावा लागतो आहे असे आढळले. इथे रोग हवेमार्फत पसरता आजचे निर्बंध योग्य ठरते पण परदेशी पर्यटक वा प्रवासी यांना अटकाव केला नाही, घरी जाऊन झोपा एकटेच असे नुसत्या सूचनेवर विसंबून स्मार्ट सरकारने झोपा केला. स्मार्ट सुशिक्षीत, ऊच्च आर्थिकदृष्ट्या सक्षम जनतेला सरकार आवरू शकले नाही. आज त्या उद्दाम, मुद्दाम वागण्याचे गंभीर परिणाम सर्व जनता भोगतेय. १२ मार्च रोजी बाहेरच्या विमान वाहतूक प्रतिबंध केला तोच महीनाभर आधी केला असता तर साधारण १०लाख परदेशी वा देशी लोकांना थोडी गैरसोय झाली असती पण संपूर्ण भारत देशात १२५कोटी लोकसंख्या सुरक्षित रहाती. गेला बाजार फक्त देशी नागरिक जे बाहेरच्या देशातून आलेले होते त्यांना सक्तीने विलगीकरण कक्षात सरकारने सोय करून ठेवले असते १४ दिवस तरी चालले असते. पण श्रीमंतांच्या यादीत मोडणारा मोकाट रोग घेऊन फिरताना दिसतात पण गरीबांना कामधंदा सोडून घरी बसवतात हे सरकारी अधिकारी व नेते. निव्वळ निष्कलंक राहिले सर्व रोगी व राजकीय सत्ताधारी निर्धास्त. काय वाट्टेल ते चालले आहे भाऊ इतकं टरकून ठेवले आहे आमची धडगत नाही कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी बळजबरीने डांबण्यात आले आहे. बिनडोक पणा सगळा, एखाद्या राजकीय पक्षाने बंद पुकारला तर देशाचं किती लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले, दंगलखोर पकडून भरपाई वसूल करण्यात येते. कोरोना पसरविणारे व पसरवू देणारे सरकार विरोधात भरपाई वसूल केली पाहिजे. श्रीमंतांच्या गुर्मीचा भुर्दंड सहन करतेय गरीब बिचारी जनता.
  • Log in or register to post comments

हा विशय

शकु गोवेकर
Sun, 03/22/2020 - 23:16 नवीन
हा विषय नमकीन यांनी बरोबर सांगितलं असे वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नमकिन

खापर का फोडताय ?

चौकस२१२
Mon, 03/23/2020 - 09:22 नवीन
" इतकं टरकून ठेवले आहे "... कोणी? सरकारने? उगाच सगळं खापर का फोडताय सरकारवर? अश्या प्रसंगी जनतेने आणि माध्यमाने सरकार काय करत आणि नाही याच्यावर लक्ष ठेवले पाहिजे हे मान्य .. सिंहावलोकन करून सल्ला देना सोप्पं असतं जगभर च्या सरकारांना आज याला सामोरे जावे लागतंय... सरकार चालवणारे, मोठे उद्योग किंवा मोठ्या संस्था चालवणारे नेते/ अधिकारी यांचा काम अश्याप्रसन्गी सोप्पं आहे असे वाटते का? किती गोष्टी एकावेळी सांभाळाव्या लागत असतील अश्यावेळी याची यादी केली तर चक्कर येईल स्वतःला त्याखुर्चीत बसवा क्षणभर... आणि मग टीका करा... मी बसवले क्षणभर त्या खुर्चीत मला आणि माझी वीतभर फाटली ( चड्डी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नमकिन

फाडू

नमकिन
Mon, 03/23/2020 - 15:39 नवीन
मास (मास्क) हिस्टेरिया चार प्रकार आहे हा. अहो आज विमानतळ बंद करून काय उपयोग, विषाणू शरीरात घेऊन १०लाखावर प्रवासी शिरले पूर्ण देशातील जनतेला संसर्ग वाटायला. उगीचच सगळ्यांच्या उल्लेखाने विषय भरकटत जातो. सिंहावलोकन नाही तर पुढच्यास ठेच मागचा शहाणा हे तत्व शिकवण आहे. पंचतंत्र इसापनीती बोधकथा आठवा. १२५ कोटी घरी बसवतात जनतेला. कारखाने, उत्पादन, वितरण ठप्प करून हूकूमशाही चे प्रयत्न करत आहेत सरकार. दूरदृष्टी अभावामुळे होणारे आजार असे वर्णन करताना दोषी मात्र भयभीत झालेल्या भाबड्या जनतेला टाळ्या, ताटल्या बडवायला लावून कर्मचारी कौतुक केले ही भावना प्रबळ करण्याचे चलाख महापुरुष आहे. इथे भावनांना कुरवाळत भ्रमिष्ट केले जात आहे. विषाणू पसरवण्यास पूरक धोरण राबवले म्हणजे मंदी, अर्थव्यवस्था, कर ऊत्पन्न, परराष्ट्र नीती वगैरे गोष्टी बाजूला पडल्यात आपोआप. मूळात जिथे संसर्ग पोचले ते परदेशातून आलेल्या लोकांनी जाणते -अजाणतेपणी हे तरी खरं आहे ना. संपूर्ण १ महिना वेळ होता आपल्या सरकारला. चीन येथे लागण पसरल्याच्या बातम्या आपण २०-२५ जानेवारी पासून वाचतोय. तेथील प्रतिबंधक उपाय, शहरे बंद करणे हे व इतर प्रकार आज २ महिन्यांनी आपण भारतात करतोय हे मोठा कालावधी हातात असूनही सरकार नाकर्तेपणा चा परिणाम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

बरोबर आहे.

Rajesh188
Mon, 03/23/2020 - 17:41 नवीन
विमान सेवा २ महिन्ाभरापूर्वी बंद केली असती तर आता ही वेळ आलीच नसती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नमकिन

11 मार्च रोजी जागतिक आरोग्य

सुबोध खरे
Mon, 03/23/2020 - 19:58 नवीन
11 मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेने विमान प्रवासावर बंदी घालण्याची गरज नाही असे वूहान च्या साथीबद्दल केलेल्या शिफारशीत म्हटलेले आहे. यानंतर इतक्या दिवसांनी आता त्यांना असेवाटते आहे की हवेतील सूक्ष्म कणांमध्ये करोनाचा विषाणू जिवंत राहू शकतो त्यामुळे आपल्याला कदाचित मुखवट्याचा फायदा होईल. इतके दिवस मुखवट्या चा फायदा होणार नाही अशीच शिफारस होती. जसे जसे रोगाबद्दल जास्त समजत जाते तसे आपण त्याबद्दल आपली माहिती अद्ययावत करत जातो. Retrospectively all are wise.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

शिफारस

नमकिन
Wed, 03/25/2020 - 09:20 नवीन
शिफारस करून त्यांनी त्यांचे काम केले. आपण जागरूक राहून आपल्या देशातील सोयी, सवयी माहीतच असलेल्या सरकारने वेळेत योग्य प्रतिबंधक उपाय केले नाही. २१ दिवस देशं बंद केला, २५मार्च पासून. २०जानेवारी वूहान चार विषाणू प्रसार सर्व जगाला कळला होता, इटली प्रकोप मार्च सुरूवात झाली तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणवला पण केंद्रीय मंत्री व नेतृत्व इतर स्थानिक राजकीय घडामोडीत गुंतलेले होते. ६० दिवस होते सरकार कडे. चूका होतात पण त्या मान्य केल्या तरंच पुढे सुधारणा होईल अन्यथा तेच योग्य ठरवण्याची धडपड ही अशी मारक ठरत असते, सर्व सामान्य जनतेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

परदेशातून आलेले

नमकिन
Wed, 03/25/2020 - 09:41 नवीन
आता हरेक छोट्या शहरात कोरोना पसरविणारे शिरले ते परदेश प्रवास केलेले आहेत हे वारंवार दिसले तरी सरकारने रोज जुजबी तपासणी करून घरी सोडले. लोकशाही जनता एवढी आज्ञाधारक आहे का नुसत्या विनंती चा मान ठेवून घरीच राहील या भाबड्या आशेवर सरकार विसंबून राहीले ही दुसरी चूक. जनता कर्फ्यू लावून हेच चालू होते. संशयित मोकाट, सामान्य जनता घरात. टाळ्या वाजवत. २३मार्चला विमान प्रवास वाहतूक थांबवली जेव्हा संसर्ग ३०० लोकांना झालेला. कहर केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

जागतिक आरोग्य संघटनेने इतके

सुबोध खरे
Wed, 03/25/2020 - 12:20 नवीन
जागतिक आरोग्य संघटनेने इतके पुढे मागे (FLIP FLOP) केले आहे कि नक्की त्यांच्यावर विश्वास ठेवावा कि नाही हे कठीण आहे. ११ जानेवारीला त्यांच्या साईट वर होते कि वूहान मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांवर काही विविक्षित खबरदारी घ्यायची गरज नाही १४ जानेवारीला होते कि विमान सेवा बंद करण्याची गरज नाही. १६ जानेवारीला लिहिले होते कि एका माणसाकडून दुसऱ्याला संसर्ग होण्याची शक्यता फारशी नाही. १० फेब्रुवारी ला होते कि लॉक डाऊन करून काही फायदा होणार नाही. इतके दिवस सांगत होते कि तोंडावर मुखवट्याची गरज नाही आता सांगत आहेत कि मुखवटा आवश्यक आहे कारण खोकले किंवा शिंकले कि सूक्ष्म कण हवेत धुरळले(AEROSOL) जातात आणि त्यापासून पण हा रोग होउ शकेल. त्याच संघटनेचा दुजोरा देत मी हा लेख लिहिला आहे. यात मी तोंडघशी पडलो आहे. सामान्य माणसे तर सोडाच आमच्या सारखे अनेक वैद्यकीय क्षेत्रात आहेत ते पण तोंडघशी पडत आहेत. सरकारने एकदम एखादं मोठं पाऊल उचललं आणि नंतर जागतिक आरोग्य संघटनेने घुमजाव केले तर सरकार ची अवस्था फार बिकट होईल. शेवटी शाहीन बागच्या लोकांना हाकललं. त्यांची मागणी होती कि आम्हाला मुखवटे आणि हॅन्ड सॅनिटायझर द्या. आंदोलन यांनी करायचं आणि सरकारकडून अशा मागण्या करायच्या. याबद्दल काही बोलायचं तर सगळे लिब्रान्डु अंगावरच येतात. सरकारला शिव्या देणं फार सोपं आहे. ज्यांनी तेथे काम केलेलं असतं त्यांना प्रत्यक्ष काय समस्या आहेत ते लक्षात येतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नमकिन

जागतिक आरोग्य संघटना.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/25/2020 - 12:42 नवीन
जागतिक आरोग्य संघटनेने इतके पुढे मागे (FLIP FLOP) केले आहे कि नक्की त्यांच्यावर विश्वास ठेवावा कि नाही हे कठीण आहे. ११ जानेवारीला त्यांच्या साईट वर होते कि वूहान मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांवर काही विविक्षित खबरदारी घ्यायची गरज नाही १४ जानेवारीला होते कि विमान सेवा बंद करण्याची गरज नाही. १६ जानेवारीला लिहिले होते कि एका माणसाकडून दुसऱ्याला संसर्ग होण्याची शक्यता फारशी नाही. १० फेब्रुवारी ला होते कि लॉक डाऊन करून काही फायदा होणार नाही. इतके दिवस सांगत होते कि तोंडावर मुखवट्याची गरज नाही
जागतिक आरोग्य संघटना देशभराकडून प्रचंड डोनेशन मिळवत असते, मला वाटतं असेच असेल तर आवरलं पाहिजे यांना. जागतिक नागरिकांच्या आरोग्यासाठी अशी संघटना धोकादायक वळणावर उभी आहे, असे वाटते. -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

या सगळ्यातलं आंतरराष्ट्रीय

मराठी कथालेखक
Wed, 03/25/2020 - 14:51 नवीन
या सगळ्यातलं आंतरराष्ट्रीय राजकारण कुणीतरी उलगडून समोर ठेवायला हवं.. खूप भयंकर आहे हे सगळं... सामान्य लोकांना वेठीस धरुन खेळ खेळले जात आहेत असं मला वाटतं.. पुर्वी बंदूका तोफांनी युद्ध व्हायची आता राजकारण, अर्थकारण, व्यापारयुद्ध आणि कदाचित व्हायरस-व्हायरस खेळून समोरच्याला जेरीस आणायचे प्रयत्न चालत असावेत अशी शंका मनात येते... एकूणातच या प्रकरणात खच्चून नाट्य भरलेले आहे. आणि अर्थकारणही.. लस आली की तिची किंमत काय असेल ? ती कंपनी किती बिलियन्स कमवेल याचा काही अंदाज ? बाकी ब्लॉक ब्लस्टर चित्रपट, खळबळजनक माहितीपटे, बेस्ट सेलर पुस्तके यांना खूप मटेरियल मिळेल हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त संधी आहे राजकारण खेळण्याची

चौकस२१२
Wed, 03/25/2020 - 15:25 नवीन
सरकारला शिव्या देणं फार सोपं आहे. सहमत पण काय आहे कि हि मस्त संधी आहे राजकारण खेळण्याची थोडे महिने नंतर तर आगडोंब उसळणार आहे ...या वैद्यकीय साथीचा परिणाम अर्थव्यवस्थेवर तर होणारच आणि मग फक्त भारत ह एक देश असेल कि सगळं खापर फक्त सरकारवर फोडला जाईल... जगात जणू काही अर्थव्यवस्थेवर परिणाम झालाच नाहीये जिथे हेल्मेट सक्ती वर विरोध होतो तिथे काय बोलायचे.. मरा लेको ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

GDP 1.3% ने कमी

नमकिन
गुरुवार, 03/26/2020 - 16:28 नवीन
भारतीय अर्थव्यवस्थाGDP 1.3% = 3.3 लाख कोटी रुपये कमी होईल असे भाकीत काल झी मीडिया हिंदी वाहिनी वर सांगितले. पण रोजचा इंधन व देखभाल खर्च वाचतोय की. त्यात इंधन दर गडगडले आहे ती बचत फार मोठी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

जागतिक कट!

चौकस२१२
Wed, 03/25/2020 - 15:20 नवीन
हो बरोबर , मोदी. सीआयए आणि ट्रम्प दादा आणि जगातील बलाढ्य भांडवलशी उद्यानगी यांनी काहीतरी जागतिक कट रचूनच हे सगळं केलाय.. आणि आता बारामतीचा जाणता राजा आणि पप्पू राजकुमार हे यातून वाचवणार हात टेकले ह्या मोदी द्वेषाला ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नमकिन

रोगप्रतिकारशक्ती वाढवावी

वामन देशमुख
Sun, 03/22/2020 - 08:01 नवीन
रोगप्रतिकारशक्ती वाढवावी यासाठी कोणकोणते प्रॅक्टिकल उपाय / इलाज आहेत? डॉक्टरांनी / तज्ज्ञांनी इथे माहिती माहिती दिली तर ते आचरणात आणता येतील. म्हणजे, केवळ COVID-19 च्या प्रतिकारासाठीच म्हणून नाही तर सर्वसाधारणपणे, आपण शक्य तितक्या कमी वेळा आजारी पडावे म्हणून दिनचर्येत काय बदल करता येतील?
  • Log in or register to post comments

आपल्या आहारात भाज्या फळे सुका

सुबोध खरे
Mon, 03/23/2020 - 20:05 नवीन
आपल्या आहारात भाज्या फळे सुका मेवा सारखे पदार्थ वाढवावेत. वेळेवर चौरस आहार जेवण म्हणून घ्यावा. प्रक्रिया केलेल्या पदार्थांपेक्षा प्रक्रिया न केलेले पदार्थ खा, तेल तूप मैद्याचे पदार्थ कमी खा सिगरेट तंबाखू दारू बंद करा. नियमित व्यायाम करा निदान 7 तास तरी झोप घ्या. वजन प्रमाणात ठेवा. मिताहार घ्या. या त्रिकालाबाधित गोष्टी सर्व पॅथी चे डॉक्टर सांगतात. पण तहान लागल्यावर विहीर खणण्या ची मानवी वृत्तीच आहे. कर वाचवण्यासाठी फेब्रुवारी मार्च मध्ये माणसं जागी होतात ती याच कारणामुळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

डॉ रायचौधरी .....

चौकटराजा
Sun, 03/22/2020 - 10:37 नवीन
च..... यानी केद्र सरकारला विनन्ति केली की काही पेशण्ट तुम्ही मला द्या मी त्याना तीन दिवसात बरे करून दाखवतो केवळ न्युट्रीशन चा जोरावर ! डॉ हर्शवर्धन यानी त्याना नकार दिला व कारण असे सान्गितले की हा आंतर राष्ट्रिय मामला असल्याने तसे करता येणार नाही. डॉ रायचौधरी यान्च्या माहितीनुसार ( सन्दर्भ लॅन्सेट ) दरवर्षी इन्फेक्शन मुळे एक कोटी २० लाख लोक मरत असतातच .जगाच्या लोकसंख्याच्या तुलनेत १०००० मृत्यू स्वाभाविक आहे. डब्लू एच ओ चाच हा एक फ्रॉड आहे ज्यामुळे त्यांचे महत्व अधोरेखित होऊन त्यांना देणग्या मिळतात . हा सारा भयगंड निर्मितीचा खेळ आहे असे त्यांचे ठाम मत आहे !
  • Log in or register to post comments

अतिशयोक्ती

गामा पैलवान
Sun, 03/22/2020 - 19:16 नवीन
चौकटराजा, मलाही करोनासंबंधी जरा जास्तंच अतिशयोक्ती होतेय असं वाटतंय. इटलीत केवळ लोम्बारडी प्रांतात सर्वोच्च लागणी २५०००+ झाल्यात आणि द्वितीय क्रमांकावर रोम प्रांती ६७०० आहेत. हा फरक बराच व्यस्त आहे. लोम्बारडीस व त्यास चिकटून असलेल्या प्रांतांची आकडेवारी येणेप्रमाणे : -------------------------------- प्रांत : लागणी / मृत्यू -------------------------------- ओस्ता खोरे : ३१३ / ८ लिगुरीया : १४३६ / १५२ पिदेमाँत : ३७५२ / २३८ लोम्बारडी : २५५१५ / ३०९५ -------------------------------- स्रोत : https://en.wikipedia.org/wiki/2020_coronavirus_pandemic_in_Italy#Statistics इथेही लोम्बारडीचं प्रमाण इतरांपेक्षा खूप म्हणजे खूपंच जास्त आहे. जो कोणी मेला तो करोनामुळे अशी अफवा उठवून दिलेली वाटते. लागण व मृत्यूदर यांचं प्रमाण कमी असेल तोवर दिसायला ठीक दिसतं. मात्र ते व्यस्त होऊ नये म्हणून लागण झालेली नसतांनाही लागण झाल्याची बतावणी केलेली असू शकते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

ह्या. मध्ये पण तथ्य असावे

Rajesh188
Mon, 03/23/2020 - 17:43 नवीन
खरे आकडे कधीच बाहेर येत नाहीत. मीडिया करवी फक्त भीती पसरवली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

कोरोना19

दीपक११७७
Sun, 03/22/2020 - 22:46 नवीन
डॉक्टर साहेब, या कोरोनाचे पुढे म्यूटेशन होऊन मानवास हितकारक होऊ शकते का? अथवा याचेच म्यूटेशन करून anti कोरोना तयार करता येऊ शकतो का ?
  • Log in or register to post comments

COVID-19 हे आजाराचे नाव आहे.

भुजंग पाटील
Mon, 03/23/2020 - 06:17 नवीन
डॉक्टर साहेब, थोडी गल्लत होतेय का? व्हायरस चे नाव SARS-CoV-2 असे आहे. ( severe acute respiratory syndrome coronavirus 2 ) त्यातून होणर्‍या आजाराला COVID-19 म्हणतात. सन्दर्भः https://www.who.int/emergencies/diseases/novel-coronavirus-2019/technical-guidance/naming-the-coronavirus-disease-(covid-2019)-and-the-virus-that-causes-it
  • Log in or register to post comments

आपले म्हणणे बरोबरच आहे.

सुबोध खरे
Mon, 03/23/2020 - 20:08 नवीन
आपले म्हणणे बरोबरच आहे. पण बोली भाषेत जसे radiograph ला Xray म्हणतात तसंच आहे. (मिपा वर संपादनाची सोय नाही म्हणून मी काही केले नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भुजंग पाटील

हे काय आहे ...?

चौकटराजा
Mon, 03/23/2020 - 08:49 नवीन
https://www.youtube.com/watch?v=ox4dJB7SSoU करोना को करो बदनाम ... ?
  • Log in or register to post comments

वास न येणे आणि चव न समजणे

Rajesh188
Mon, 03/23/2020 - 09:07 नवीन
खूप corona ग्रस्त रुग्णांत ताप,खोकला,ही लक्षणं दिसत नाहीत . पण चव न समजणे आणि वास न येणे ही दोन्ही लक्षण सर्व corona grast रुग्णांत दिसतात. अशा व्यक्तींनी 8 दिवस स्वतःला वेगळे ठेवावे
  • Log in or register to post comments

२, महिन्यांनी सर्व शांत होईल

Rajesh188
Mon, 03/23/2020 - 17:45 नवीन
आता एक सुधा चीन विषयी बातमी येत नाही. पाहिले औषध नव्हती तरी साथ आपोआप जात असे . आता सुध्दा तीच अवस्था आहे. दोन तीन महिन्यात नैसर्गिक रित्या साथ निघून जाईल .
  • Log in or register to post comments

Lyzol हे कोरोनासाठी उपयुक्त आहे का?

कळस
Mon, 03/23/2020 - 21:30 नवीन
घरच्या घरी दुधाची पिशवी बाहेरुन कशी Disinfect करावी, याबद्दल कोनी सन्गु शकेल का?
  • Log in or register to post comments

Lysol is a cationic

सुबोध खरे
Tue, 03/24/2020 - 11:17 नवीन
Lysol is a cationic surfactant and quaternary ammonium compound. हे सर्व तर्हेच्या जिवाणू विषाणू आणि बुरशी साठी उपयुक्त आहे. आपण त्यांनी सांगितलेल्या तर्हेने पाण्यात द्रावण करून फरशी पुसण्यासाठी वापरले तर धुळीतून येणाऱ्या सर्व जंतूनपासून आपल्याला संरक्षण मिळते. घरात रांगणारी दात येऊ घातलेलीकिंवा चालायला लागलेली लहान मुले असतील जी जमिनीवरची कोणतीही वस्तू तोंडात घालतात अशा घरात तर रोज एकदा याने फरशी पुसून घ्यावी.
  • Log in or register to post comments

दुधाची पिशवी आपण साबण आणि

सुबोध खरे
Tue, 03/24/2020 - 11:19 नवीन
दुधाची पिशवी आपण साबण आणि पाण्याने धुवून घ्यावी. उत्तम म्हणजे दूध आणण्यासाठी एक मोठ्या तोंडाची कापडी पिशवी घेऊन जा आणि त्यात दुकानदाराला दुधाच्या पिशव्या टाकायला सांगा घरी आल्यावर दोन्ही साबण आणि पाण्याने धुवून घ्या
  • Log in or register to post comments

दुधाची पिशवी आपण साबण आणि

सुबोध खरे
Tue, 03/24/2020 - 11:19 नवीन
दुधाची पिशवी आपण साबण आणि पाण्याने धुवून घ्यावी. उत्तम म्हणजे दूध आणण्यासाठी एक मोठ्या तोंडाची कापडी पिशवी घेऊन जा आणि त्यात दुकानदाराला दुधाच्या पिशव्या टाकायला सांगा घरी आल्यावर दोन्ही साबण आणि पाण्याने धुवून घ्या
  • Log in or register to post comments

धन्यवाद ...

कळस
Fri, 03/27/2020 - 16:49 नवीन
खरेसाहेब, माहीतीबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

माहितीपूर्ण लेख

टर्मीनेटर
Tue, 03/24/2020 - 13:21 नवीन
माहितीपूर्ण लेख आणि चर्चा!
  • Log in or register to post comments

जागतिक आरोग्य संघटना

मित्रहो
Wed, 03/25/2020 - 13:36 नवीन
या संपूर्ण प्रकरणात जागतिक आरोग्य संघटनेने बऱ्याच बाबतीत घुमजाव केलेले आहे. आधी सांगितले हा रोग हवेतून पसरत नाही आता म्हणतात पसरू शकतो. आधी सांगितले सोशल डिस्टंसिंग हाच उपाय आहे आता म्हणतात नाही ते उत्तर नाही. भरपूर टेस्ट करा आणि रोगींचे अलगीकरण करा . लॉकडाउन हा बचावात्मक पवित्रा आहे. वुहान मधे हा रोग पसरुन तो आता आटोक्यात यायला लागला तरी हे नक्की समजत नाही आहे की रोग कसा पसरतो. भारतासारख्या जपान या देशाने सुद्धा फार टेस्ट नाही केल्या. त्यांच्या इथे सुद्धा चीनचे लोक येत होते. जपानमधे वृद्धांची संख्या खूप जास्त आहे तरी आजतागायत तेथील रुग्णांची संख्या कमी आहे. तीच गोष्ट तायवानची. दक्षिण कोरीयाने खूप टेस्ट केल्या. आपल्या इथे टेस्ट तयार झाली. चीन कुठलीतरी अॅसिड टेस्ट करते. या साऱ्या टेस्ट सारख्याच आहेत की वेगळ्या. जानेवारी फेब्रुवारीमधे भारतात कितीतरी मंडळी चीनमधून आले. संपूर्ण महिन्यात पॉझिटिव्ह केसेस कमी आल्या आता मात्र रोज वाढत आहेत. असे का व्हावे.
  • Log in or register to post comments

नाझीकालस्मरण

गामा पैलवान
Wed, 03/25/2020 - 14:05 नवीन
खरे डॉक्टर,
यात मी तोंडघशी पडलो आहे.
अगदी अगदी. जागतिक आरोग्य संघटना ( = वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) स्वत:स जगाची डॉक्टर मानते. पर्यायी दृष्टिकोनाचा आदर सोडा, विचारही नाही. हिच्या प्रमुखांनी करोनाच्या संसर्गाविरुद्ध आक्रमक रणनीतीची शिफारस केली आहे. या 'आक्रमक हाताळणी'मध्ये प्रत्येक संशयितांची सखोल चाचणी करून त्यांना बळेच विलग करायचं म्हणताहेत. संदर्भ : https://newsbaba.in/who-chief-said-rapidly-growing-epidemic-but-with-this-football-technique-we-can-beat-it/ विषाणूविषयी व्यवस्थित माहिती नसतांना इतकं टोकाचं पाऊल उचलावं का? यावरनं नाझी जर्मनीची आठवण होते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

एकदा कोरोनो होऊन गेला (सौम्य

उगा काहितरीच
Wed, 03/25/2020 - 16:01 नवीन
एकदा कोरोनो होऊन गेला (सौम्य /तिव्र) व त्यातून बरं झालेल्या व्यक्तीला परत कोरोनाची लागण होऊ शकते का ?
  • Log in or register to post comments

एकदा कोरोनो होऊन गेला (सौम्य

सुबोध खरे
Wed, 03/25/2020 - 19:29 नवीन
एकदा कोरोनो होऊन गेला (सौम्य /तिव्र) व त्यातून बरं झालेल्या व्यक्तीला परत कोरोनाची लागण होऊ शकते का ? बहुसंख्य विषाणूमुळे होणाऱ्या आजारात आपल्या शरीरात प्रतिपिंडे(antibodies) तयार होतात आणि या प्रतिपिंडाची आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशींमध्ये त्याची स्मरणशक्ती राहते. यामुळे दुसऱ्यांदा परत याच विषाणूंचा प्रादुर्भाव झाला तर याच पांढऱ्या पेशी परत ती प्रतिपिंडे वेगाने तयार करतात आणि त्या विषाणूंचा होणारा प्रादुर्भाव रोखतात. यामुळेच आपल्याला गोवर कांजिण्या सारखे आजार परत होत नाहीत. एच आय व्ही सारख्या आजारात हि प्रतिपिंडे तयार करणाऱ्या पेशींवरच विषाणू हल्ला करतात त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती लुळी पडते. अशीच स्थिती केमोथेरपी मध्ये होत असल्याने रुग्णाची प्रतीकारशक्ती खच्ची होते. सध्याच्या या विषाणू बद्दल तो नवीन असल्याने आपल्याला पूर्ण माहिती नाही परंतु बाकी करोना गटाच्या विषाणूंमध्ये हा आजार परत होत नाही त्यामुळे या विषाणूत एकदा झाला तर पुन्हा होणार नाही असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. कांही शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की जे रोगी या आजारातून बरे झाले आहेत त्यांना परत होण्याची शक्यता नसल्यामुळे त्यांना बैद्यकीय चमू मध्ये सामील करून घ्यावे.परंतु यात सर्व तज्ज्ञांत एकवाक्यता नाही आणि बरेच तज्ज्ञ असा धोका स्वीकारण्यास तयार नाहीत. .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

पण हा विषाणू SARS प्रकारातला

प्रचेतस
Wed, 03/25/2020 - 19:56 नवीन
पण हा विषाणू SARS प्रकारातला आहे. सर्दी खोकला ताप आदी विकार मनुष्याला नेहमीच होत असतात आणि ते बहुतांशी आपोआप बरेही होतात त्याप्रकारेच हा मनुष्याला पुनः बाधित करू शकतो का आणि आपोआप बरा होऊ शकेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

धन्यवाद डॉक्टर !

उगा काहितरीच
Wed, 03/25/2020 - 22:44 नवीन
धन्यवाद डॉक्टर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

Mystery In Wuhan: Recovered

मदनबाण
Sat, 03/28/2020 - 09:45 नवीन
Mystery In Wuhan: Recovered Coronavirus Patients Test Negative ... Then Positive

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Raftaara... :- Lucifer
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सध्या तरी या रोगावर नक्की असे

सुबोध खरे
Wed, 03/25/2020 - 22:08 नवीन
सध्या तरी या रोगावर नक्की असे औषध नाही आणि 95 टक्के लोक स्वतःहूनच बरे होतात. उरलेले 5 % याना काही गुंतागुंती होतात म्हणजे न्यूमोनिया किंवा श्वास घ्यायला त्रास किंवा हृदयाचे काम अनियमित होणे. हे बहुधा अशा लोकांना होते ज्यांचे वय 70 पेक्षा जास्त आहे मधुमेह रक्तदाब किंवा हृदय विकार असे आजार आहेत किंवा सिगरेट पिणारे आहेत. अशा लोकांना कृत्रिम श्वासोच्छवासाची गरज पडू शकते. जर भारतभरात 60 कोटी लोकांना या गुंतागुंती एकत्र झाल्या तर आपल्याकडे 3 कोटी लोकांना एकत्र कृत्रिम श्वासोच्छवास देणें शक्य होणार नाही आणि यातील अगदी 30-33 टक्के लोक बाहेर आले नाहीत तरी आपल्याकडे 1 कोटी लोकांचा मृत्यू होईल. याच ऐवजी आपण या आजाराचे प्रसारण थांबवले तर एप्रिल मे मधील गरमी मुळे हा आजार आपोआप बराच कमी होईल. अर्थात हे विषाणू नाहीसे होणार नाहीत म्हणजे हा आजार उरलेल्या लोकांना पुढच्या काही वर्षात होईलच पण तेंव्हा त्यांना गुंतागुंत झालीच तर कृत्रिम श्वासोच्छवास देणें शक्य होईल आणि त्यातील बऱ्याच माणसांना वाचवणे शक्य होईल.
  • Log in or register to post comments

करोंना विषाणू वर तपमानाचा परिणाम

Vidyadhar1974
Wed, 03/25/2020 - 22:59 नवीन
डॉक्टरसाहेब जालावर काही ठिकाणी करोंना विषाणू वर तपमानाचा परिणाम फारसा होत नाही असेही वाचलेले आढळले. नक्की सत्य काय आहे कृपया मार्गदर्शन करा.
  • Log in or register to post comments

Warm, humid climate linked to

सुबोध खरे
Sat, 03/28/2020 - 12:25 नवीन
Warm, humid climate linked to slower COVID-19 transmission: MIT Study https://www.thehindubusinessline.com/news/science/warm-humid-climate-linked-to-slower-covid-19-transmission-mit-study/article31170541.ece https://economictimes.indiatimes.com/news/science/warm-humid-climate-linked-to-slower-covid-19-transmission-mit-study/articleshow/74825064.cms?from=mdr
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vidyadhar1974

परिचयकाठिन्य = हार्ड इम्युनिटी

गामा पैलवान
गुरुवार, 03/26/2020 - 14:10 नवीन
खरे डॉक्टर, तुमचं हे विधान वाचलं :
जर भारतभरात 60 कोटी लोकांना या गुंतागुंती एकत्र झाल्या तर
यावरनं इथे ब्रिटनमध्ये एक विधान प्रसृत झालं होतं ते आठवलं :
.... the Oxford results would suggest the country had already gained substantial herd immunity through the unrecognised spread of Covid-19 over more than two months.
या लेखानुसार जर करोना गेले दोनतीन महिने ब्रिटनमध्ये गुपचूप रीत्या पसरला असेल तर आजपावेतो निम्म्या ब्रिटिशांना लागण झालेली असायला हवी. मात्र लेकासंख्येच्या मानाने प्रत्यक्ष रोगी आढळण्याचं प्रमाण नगण्य आहे. याचा अर्थ बहुसंख्य ब्रिटीश जनतेची शरीरं आपोआप प्रतिकारसज्ज झालीत असाही काढता येऊ शकतो. विषाणूशी परिचय झाल्याने ही प्रतिकारक्षमता उत्पन्न झालेली आहे. हिला परिचयकाठिन्य म्हणजेच हार्ड इम्युनिटी म्हणतात (चूभूदेघे). काही जण म्हणतील की द सन हे वृत्तपत्र नसून चघळपत्र आहे. मात्र तरीही उपरोक्त मत ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधनातनं पुढे आलेलं आहे. मग भारतातही हेच घडायला हवं ना? चीनमध्येही हेच घडलं असणार ना? इतका गोंधळ कशासाठी? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

आपण म्हणताय ते बरोबर आहे

सुबोध खरे
Sat, 03/28/2020 - 12:23 नवीन
आपण म्हणताय ते बरोबर आहे परंतु जोवर प्रतिपिंडांच्या(ANTIBODY) चाचणीचा अहवाल येत नाही तोवर असे काही खात्रीने म्हणता येणार नाही. भारतात सुद्धा अशी परिस्थिती असें शक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

ह्या धाग्यावरही राजकारण आलं

तेजस आठवले
गुरुवार, 03/26/2020 - 17:06 नवीन
ह्या धाग्यावरही राजकारण आलं हे बघून भरून आले. मिपा परत पहिल्यासारखे झाले असे मानायचे का ? खायला जास्त काही मिळत नसताना सुद्धा काही लोकांना पानात नमकीन हवंच असतं ह्या प्रवृत्तीला कोण काय करणार. सरकारला जे जे शक्य होईल ते ते सरकार करणारच आहे. आधी का नाही केलं आणि नंतर का नाही केलं ह्या घरी बसून करायच्या गप्पा आहेत. अजून दोन दिवसांनी समजलं कि हा रोग वाहत्या पाण्यातून पसरतो तर सरकारने आमच्या घरात पाणीपुरवठा अजून का चालू ठेवला आहे असं ओरडत लोक पुढे येतील. नंतर एका दिवसाने सरकारने पाणी बंद केलं आता आम्ही तहानेने तडफडून मरु म्हणून ओरडा चालू होईल. करोनाग्रस्त लोकांचा आकडा वाढतच जाणार आहे. त्यातून किती जण सुखरूप बाहेर येतात हा आकडाही आपल्या डोळ्यांसमोर यायला हवा. सध्यातरी घरी राहा, सुरक्षित राहा. जगलात तर सरकारला शिव्या घालायला भरपूर संधी शिल्लक आयुष्यात येतीलच.
  • Log in or register to post comments

बरोबर

चौकस२१२
Fri, 03/27/2020 - 06:10 नवीन
बरोबर बोललात ... आणि यात कोस्पारेसी थेअरी वाले पण ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले

ज्येष्ट नागरिक ..

चौकटराजा
गुरुवार, 03/26/2020 - 18:41 नवीन
मी जगलो वाचलो तर पुढच्या हिवाळ्या पूर्वी व नन्तर नियमित पण अर्थात डॉ च्या सल्याने न्युमोनिया व फ्लू ची लस घेणार आहे. ही मधुमेही प्लस ६५ याना अत्यन्त आवश्यक आहे असे सान्गितले जाते ! मी एक व्हिडिओ पाहिला त्याचा सारान्श असा की माणूस आपल्या पेशीवरचे रिसेप्टरचे डिझाईन जन्मात बदलू शकत नाही. विषाणू ज्यावेळी शरीरात प्रवेश करतो त्यावेळी नट म्हणजे आपल्या पेशीचा रेसेप्टर व पाना म्ह्ण्जे विषाणू चे काटेरी टोक.असे जिथे जुळते त्याच अवयवाला सन्सर्ग होतो. मग त्याचे अनुशन्गिक परिणाम इतर अवयवाकडून होतात. विषाणूला ही जुळणी जमली नाही तर विषाणू त्याच्या मेमरीत साठवून पाना बदलायचा प्रयत्न करतो . ही त्याची क्रिया मानवी शरीरातील बदलापेक्शा उदा अन्टोबोडी ( या आपण निर्मिलेला पाना )पेक्षा जलद होऊ लागल्या तर लढा विषाणू जिकतो .दरम्यान विषाणू बदलण्याचा प्रक्रियेला परिसराचा अड्सर उदा तापमान ई झाला तर साथ आटोक्यात येते.
  • Log in or register to post comments

मृत्यूचे कारण

Rajesh188
गुरुवार, 03/26/2020 - 23:34 नवीन
Corona grast लोकांचे जे मृत्यू होत आहेत ते फक्त कोरोना नी च होत आहेत हे नक्की आहे का. नाही तर इन्फ्लुब्झा नी मरायचे आणि corona positive निघाला म्हणून बिचारा corona विषाणू बदनाम व्हायचा. Corona बरोबर प्रतेक रुग्णाची influenza,flue ह्याची पण टेस्ट केली पाहिजे
  • Log in or register to post comments

विषाणूचं अस्तित्व व लागण यांत फरक आहे

गामा पैलवान
Fri, 03/27/2020 - 13:37 नवीन
Rajesh188, अगदी बरोबर म्हणालांत पहा. करोनाची प्रत्यक्ष लागण झालेले ( = infected) आणि शरीरात केवळ करोना सापडलेले ( = tested positive) या दोहोंत महदंतर आहे. माझ्या अंगात करोना सापडला म्हणजे मला त्याची लागण झालेली असेलंच असं नाही. या बाबतीत वार्तांकन करतांना माध्यमांनी पारदर्शकता व सावधगिरी बाळगणं जरुरी आहे. पण बातम्यांवरून दिसतं की, घबराट माजवणं हाच माध्यमांचा हेतू आहे. लोकांना अकला नाहीत म्हणून बराच ओरडा झाला आहे. पण प्रसारमाध्यमांनी जो बेजबाबदारपणा दाखवला त्याविरुद्ध म्हणावा तसा निषेधाचा सूर उमटलेला दिसून येत नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

https://m.economictimes.com

सुबोध खरे
Fri, 03/27/2020 - 17:41 नवीन
https://m.economictimes.com/news/science/warm-humid-climate-linked-to-slower-covid-19-transmission-mit-study/articleshow/74825064.cms
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा