मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

HSBC बंद पडायची काही शक्यता आहे का ?

हस्तर · · काथ्याकूट
HSBC बंद पडायची काही शक्यता आहे का ? अस्मादिकांचे २०११ मध्ये hsbc ला सॅलरी अकाउंट होते २०१२ ला बंद केले ,पण क्रेडिट कार्ड ला ६०००० , साठ हजार फक्त पेंडिंग आहेत जे काही कारणामुळे देता नाही आले रिकव्हरी वाल्यांचे कधीच कॉल वगैरे आले नाही व थोडेसे गुगल मारले तरी दार वर्षी hsbc India बंद पडतेय म्हणून बातम्या येत आहेत मुख्य प्रश्न सिबिल चा आहे ,६ वर्षांपासून वाट लावलीये बाकी काही घोडे अडले नाही कोणी जाणकार सांगू शकेल ? ट्रॉलकरांचे रिप्लाय ढुंकून पण बघणार नाही ह्याची नोंद घ्यावी

वाचने 9332 वाचनखूण प्रतिक्रिया 18

बोलघेवडा 09/03/2020 - 15:22
समजा तुमचे वार्षिक उत्पन्न कोटी रुपये जरी असेल तरी, सी बिल स्कोअर खराब असेल तर कोणत्याही बँकेकडून एक रुपया सुद्धा लोन मिळणार नाही. हे चालणार असेल तर पुढे जा.

आदेश007 09/03/2020 - 16:23
मुख्य प्रश्न सिबिल चा आहे, ६ वर्षांपासून वाट लावलीये बाकी काही घोडे अडले नाही असं म्हणता आणि बोलघेवड्यानी तुमच्या मुख्य प्रश्नाचं उत्तर दिलं तर नवीन काहीतरी सांगा म्हणता. नक्की काय अपेक्षित आहे? ६०,००० डिफॉल्टचे आज किती झालेत ते बघा. उद्या वसुली प्रक्रिया सुरू होऊ शकते.

In reply to by हस्तर

नितिन थत्ते 10/03/2020 - 10:33
>>साधी गोष्ट ,बँक बंद पडली तर सिबिल ची पीडा जाईल लोल हे कोणी सांगितले? बँक बंद पडली तर लिक्विडेटर असेल. तो तुमच्या मागे रिकव्हरी लावेल. आणि सिबिल स्कोअर कधीही सुधारणार नाही. सिबिलमध्ये तुम्ही डिफॉल्टर म्हणून नोंदले गेले आहात. तो स्टेटस तुम्ही लोनचा भरणा केल्याशिवाय बदलणार नाही. बँकेने तुमचे क्रेडिट कार्ड बॅलन्स राइट ऑफ केला तरी जोपर्यंत बँकेकडून पैसे भरल्याचा मेसेज/सिग्नल जात नाही तोपर्यंत सिबिल स्कोअर सुधारणार नाही.

In reply to by हस्तर

तेच म्हणत होतो, बॅंकेला काही फरक पडत नाही, काळजी तुम्हाला पाहिजे, *जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे *

मास्टरमाईन्ड 10/03/2020 - 15:35
बँक बंद पडली तर लिक्विडेटर तुमच्या मागे रिकव्हरी लावेल सिबिलमध्ये तुम्ही डिफॉल्टर म्हणून नोंदले गेले आहात. तो स्टेटस तुम्ही लोनचा भरणा केल्याशिवाय बदलणार नाही. बँकेने तुमचे क्रेडिट कार्ड बॅलन्स राइट ऑफ केला तरी जोपर्यंत बँकेकडून पैसे भरल्याचा मेसेज/सिग्नल जात नाही तोपर्यंत सिबिल स्कोअर सुधारणार नाही. थत्ते सरांचं एकदम बरोबर आहे.

मदनबाण 10/03/2020 - 17:13
HSBC चे माहित नाही, मात्र स्वामी काही पुटपुटले आहेत... TVs showing PC blasting Namo Govt on Yes Bank collapse it means”Chor machaye shor”.I had warned it was coming since 2015, because of the cartel of Pucca Chor, R3 and Shakuni. All chelas of Anil Ambani. Next will be another “A” induced. Now the queue is double digit. another “A” म्हणजे बँक का माणुस ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Lahu Munh Lag Gaya... :- Goliyon Ki Rasleela Ram-leela