मला नेहमीच असे वाटत आले आहे की आपल्या हिंदू धर्मातील कित्येक श्रद्धा, समजुती, रितीरिवाज, रूढी, परंपरा ह्यांना शास्त्रीय बैठक होती. कालांतराने त्यातील शास्त्रीय किंवा तार्किक बैठक विस्मृतीत गेली व पुढील पिढी त्या गोष्टी एक परंपरा किंवा श्रद्धा, समजुती म्हणून पाळत आली. अशी शास्त्रीय बैठक विस्मृतीत जाण्यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, फारसे प्रश्न विचारलेले पूर्वी आवडत नसत. दुसरे कारण हे ही असू शकते की समोरच्याचे समाधान होईल असे उत्तर त्यांच्याकडेही कदाचित नसावे. अशा वेळी काहीतरी अगम्य कारण देऊन अथवा धर्माची, देवाची किंवा काहीतरी अघटित (वाईट) घडू शकेल अशी भीती दाखवून प्रश्नकर्त्याला गप्प बसविण्यात येई. त्यामुळे अमुक एक गोष्ट आपण का करता? असे विचारले तर "आमच्यात तशी प्रथाच आहे" असेच उत्तर बहुतेक वेळा ऐकायला मिळते.
ह्या धाग्याचा विषय म्हणजे ‘आपण पाळत आलेल्या किंवा आसपास दिसण्यात येणाऱ्या श्रद्धा, समजुती, रूढी, परंपरा व त्या मागचे संभाव्य शास्त्रीय कारण, तर्क अथवा लॉजिक.
आपण आपल्या आसपास दिसणार्य काही श्रद्धा, समजुती, रूढी मांडून त्या मागचे शास्त्रीय अथवा तार्किक कारण मांडायचे आहे. असे केल्याने अनेक श्रद्धा, रूढी, परंपरा ह्याविषयी शास्त्रीय किंवा पटेल अशी माहिती गोळा होऊ शकते.
तर सुरुवात मी करतो.
सुर्यास्तानंतर किंवा दिवेलागणीनंतर घरातला केर काढू नये - आमची आजी म्हणायची असे केल्याने दारिद्र्य येते. (एक समजूत)
संभाव्य तार्किक कारण - पूर्वी ज्यावेळी विजेच्या दिव्यांचा शोध लागला नव्हता किंवा खेडोपाडी वीज पोहोचली नव्हती त्यावेळी बहुतेक विविध प्रकारच्या तेलाचे दिवे वापरत असत. त्या दिव्यांचा प्रकाश अतिशय मंद असे व ते सर्वत्र प्रकाश पसरावा म्हणून उंचावर ठेवले जायचे त्यामुळे जमिनीवर तसा कमीच प्रकाश पडायचा. अशावेळी घरातील एखादी मौल्यवान वस्तू, दागिना (नथ, अंगठी वगैरे) किंवा पैसे जर जमिनीवर पडले असतील तर कमी प्रकाशामुळे केराबरोबर ते घराबाहेर लोटले जाऊ शकत होते.
दुसरे संभाव्य कारण म्हणजे गावातली घरे जमिनीलगत असायची, पुढे मागे अंगण-परसदार असायचे, घराभोवती बाग असायची. घरात जर साप, विंचू, किंवा तत्सम सरपटणारे जनावर शिरले व एखाद्या कोपऱ्यात लपून बसले तर दिवेलागणीनंतर केर काढताना ते दिसणार नाहीत व अनावधानाने त्यांना डिवचले जाऊन, त्यांचा दंश होण्याचा धोका होता.
अंगणात रांगोळी काढणे (एक परंपरा) -
संभाव्य कारणे - १) पूर्वीची घरे जमिनीलगत असल्याने सरपटणारे जीव घरात शिरकाव करू शकत होते. दारासमोर रांगोळी घातली असल्याने, रांगोळीच्या खरखरीत कणांमुळे अश्या सरपटणार्या जीवजंतूना एक प्रकारचा अवरोध होत असे. २) तरीदेखील एखादा सरपटणारा जीव रांगोळी ओलांडून घरात शिरलाच तर विस्कटलेल्या रांगोळीमुळे असं काही घरात शिरले असावे हे पाहणार्याला कळत असावे. ३) घरातल्या स्त्रीला तिचे कलागुण दाखवायला एक दालन मिळत असे. ४) घराला सौंदर्य लाभत असे.
चला तर मंडळी, तुम्हाला ज्ञात असलेल्या रूढी, श्रद्धा, परंपरा व त्यामागची संभाव्य कारणे येऊ द्यात.
वर्गीकरण
वाचने
20297
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
हो अशा समजुती चहुकडे दिसतात खर्या...
:) धागा शतक होणार असे दिसते
In reply to हो अशा समजुती चहुकडे दिसतात खर्या... by ज्ञानोबाचे पैजार
धुमसती कांडी देताना देणार्
In reply to हो अशा समजुती चहुकडे दिसतात खर्या... by ज्ञानोबाचे पैजार
चैतन्यचूर्णाचा विडे वाटावेत,
In reply to धुमसती कांडी देताना देणार् by गवि
मस्त प्रतिसाद
In reply to हो अशा समजुती चहुकडे दिसतात खर्या... by ज्ञानोबाचे पैजार
मस्त माहिती
In reply to हो अशा समजुती चहुकडे दिसतात खर्या... by ज्ञानोबाचे पैजार
१
२
पलेल्या अवस्थे पेक्षा केर
In reply to २ by माहितगार
समाजात दोन टोके
छान धागा..
अंशतः सहमत. अगदीच
In reply to छान धागा.. by योगी९००
अनेक कालबाह्य रुढी व परंपरा
हम्म
In reply to अनेक कालबाह्य रुढी व परंपरा by प्रकाश घाटपांडे
ध्वजवन्दन, दीपप्रज्वलन
In reply to हम्म by मूकवाचक
३
In reply to अनेक कालबाह्य रुढी व परंपरा by प्रकाश घाटपांडे
मयतीच्या वेळी मडक्यात विस्तव
ज्या काळात सहज अग्नी प्रज्वलन
In reply to मयतीच्या वेळी मडक्यात विस्तव by प्रकाश घाटपांडे
* एखादी नवी अंधश्रद्धा
In reply to ज्या काळात सहज अग्नी प्रज्वलन by माहितगार
तळहातावर तंबाखू
.
.
एका मुद्द्यावर डॉक्टर मंडळींचे मत प्रशस्त ठरावे
साधारण ८० अंश सेल्सियस ला
In reply to एका मुद्द्यावर डॉक्टर मंडळींचे मत प्रशस्त ठरावे by माहितगार
माहितीपूर्ण प्रतिसाद देऊन
In reply to साधारण ८० अंश सेल्सियस ला by सुबोध खरे
हिंदू धर्मातील सगळ्यात अशास्त्रीय परंपरा म्हणजे. ...
मी सुद्धा व्यक्तिपुजांचा
In reply to हिंदू धर्मातील सगळ्यात अशास्त्रीय परंपरा म्हणजे. ... by मुक्त विहारि