भाग १७ - कादंबरीतील व्यक्तींचा, स्थानांचा चित्रमय परिचय

Primary tabs

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
5 Feb 2020 - 7:28 pm

• चित्रमय परिचय


Figure 1माधवनगरचा गुरूवार पेठेतला आमचा त्या वेळचा बंगला व बागेचा भाग. जिथे हे नाट्य घडले. बागेचे कालांतराने रिंग टेनिसचे कोर्ट बनले होते. शशी मोठा झाल्यावर आपल्या मित्रांसह तिथे खेळताना...


Figure 2 त्याच जागेतील नव्या बंगल्याचे रूप


Figure 3 प्रज्ञानानंद सरस्वती - आई व वडिलांचे गुरू. यांनी इस्लामपुराच्या वास्तव्यात श्रीराम चरितमानसाचे मराठीत रुपांतर केले.


Figure 4 जुन्या माधवनगर रेल्वेस्टेशन पलिकडील विठोबाचे मंदीर


Figure 5 तेंव्हाचे लक्ष्मी टॉकीज. इथे माझ्या वडिलांचा कापडाचा व्यवसाय होता. नंतर ते झाले अनंत टॉकीज. प्रेक्षकांसाठीच्या खुर्चां काढून मोकळ्या जागी तागे व मालाच्या गाठी रचलेल्या असत. पडद्याजवळच्या स्टेजवर वडिलांचे ऑफिस असे.. श्रीलक्ष्मी पुन्हा चित्रपटगृह सुरू झाले व सध्या बंद पडले.


Figure 6 बंद माधवनगर कॉटन मिलच्या गेटचे सध्याचे रूप


Figure 7 एके काळी माधवनगरची शान कॉटन मिल व साखर कारखाना काळाच्या ओघात आपले अस्तित्व गमावून बसलेत.


Figure 8 दादा व आई त्यांच्या लग्नाच्यावेळी सन १९४८.


Figure 9 सन १९६० -६२ सालात दादा असे दिसत


Figure 10 सन १९६१- ६२ सालात आई अशी दिसे.


Figure 11 २०१४मधे अशा दिसतात बेबी व मंगला


Figure 12 सध्याच्या अवतारात लता व शशी


Figure 13 बेबीचे बंधू सुभाष व श्रीकांत

मांडणीअनुभव

प्रतिक्रिया

विनिता००२'s picture

6 Feb 2020 - 11:04 am | विनिता००२

दादा व आई फारच मस्त दिसतात :)

बंगला जुनाच छान वाटला, दगडी बांधकाम असलेला.
छान फोटो!

सिरुसेरि's picture

6 Feb 2020 - 6:15 pm | सिरुसेरि

आपल्या सत्य घटनेवर आधारीत कथेमधील पात्रांचा चित्रमय परिचय करुन दिल्या बद्दल धन्यवाद . या सर्व कुटुंबियांना , विशेष करुन बेबीताईंना , त्यांची कसलीही चुक नसताना बराच त्रास सहन करावा लागला . सर्वजण या त्रासाला खंबीरपणे सामोरे गेले . अनेक सलाम .

शशिकांत ओक's picture

6 Feb 2020 - 6:17 pm | शशिकांत ओक

आपल्या प्रतिसादाने आनंद झाला.

कानडाऊ योगेशु's picture

6 Feb 2020 - 8:48 pm | कानडाऊ योगेशु

आधीच्या सगळ्या भागांची लिन्क देता येईल काय?

कानडाऊ योगेशु's picture

6 Feb 2020 - 8:48 pm | कानडाऊ योगेशु

आधीच्या सगळ्या भागांची लिन्क देता येईल काय?

गामा पैलवान's picture

7 Feb 2020 - 6:52 pm | गामा पैलवान

शशिकांत ओक,

मालिका उत्कंठावर्धक आहे. अशा अनेक गोष्टी आधीपासनं माहित असल्याने शेवट साधारणत: कळला होता. पण तरीही तुमच्या लेखणीनं कुतूहल जागृत ठेवलं. धन्यवाद! :-)

आपला नम्र,
-गामा पैलवान

शशिकांत ओक's picture

7 Feb 2020 - 8:55 pm | शशिकांत ओक

जेव्हा ही कादंबरी लिहून झाली तेंव्हा हवाईदलातील नोकरीमुळे घरच्यांना पत्र लेखनातून मराठीशी संबंध राहिला होता.
गुरुचरित्राचे पारायण करत असताना एकदम हे लेखन व्हायला सुरू झाले. जणूकाही ते लिहायला कोणी तरी मला प्रेरित करत होते. अन्यथा अशा घटना जशाच्या तश्या आठवून लिहिणे शक्य नव्हते.
कथानक आत्मनिवेदनातून फुलत जावे हेही मला नवीन होते. असो.