लेखकाचे मानधन : कथा आणि व्यथा
लेखनप्रकार
साहित्याच्या प्रांतात लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. मुळात एखादे साहित्य निर्माण होण्यासाठी लेखक हा मूलभूत स्त्रोत आहे. त्याने काही लिहिल्यावरच अन्य तीन घटकांचा प्रश्न उपस्थित होतो. लेखक स्वतःच्या प्रतिभेने लिहितो आणि मग ते लेखन लोकांनी वाचावे या आशेने निरनिराळ्या माध्यमांत प्रकाशित केले जाते. लेखन करताना लेखकाची बुद्धी आणि कष्ट खर्ची पडतात. त्याच्या लेखनातून वाचकांचे रंजन होते आणि त्यांना अन्य काही फायदेही होऊ शकतात. त्याचा मोबदला म्हणून लेखकाला काही मानधन मिळावे अशी प्रथा पडली. जे लेखक बाजारात यशस्वी ठरतात ते व्यावसायिक म्हणून गणले जातात. त्यांच्या वकुबानुसार ते यथायोग्य मानधन मिळवत राहतात. याउलट हौशी लेखकांचे असते. त्यांचा चरितार्थाचा अन्य उद्योग असतो आणि केवळ लेखनाच्या हौसेपोटी ते लिहीत असतात. त्यांना साहित्यविश्वात ‘नाव’ वगैरे मिळालेले नसले तरी त्यांचा ठराविक असा चाहता वाचकवर्ग असतो. असे लेखकही त्यांच्या परीने बुद्धी आणि कष्ट पणाला लावतात. अशा लेखकांना प्रस्थापित व्यावसायिक प्रकाशकांकडून मानधन मिळते का, हा या लेखाचा विषय आहे. त्याच बरोबर एकंदरीत लेखक-प्रकाशक यांच्यातील व्यवहारावर थोडा प्रकाश टाकेन.
या संदर्भात अनेक हौशी लेखकांचे भलेबुरे अनुभव मी जाणून घेतले आहेत. त्यातून प्रकाशकांचा अशा लेखकांकडे बघण्याचा दृष्टीकोन दिसून येतो. हे अनुभव वाचकांना समजावेत या उद्देशाने हा लेख लिहीत आहे. ते लिहिताना संबंधितांचा नामनिर्देश मी करणार नाही हे उघड आहे. या अनुभवांतून काही मानवी वृत्तीप्रवृत्तींचे दर्शन वाचकांना व्हावे इतकाच हेतू आहे. लेखाची व्याप्ती अर्थातच विविध छापील नियतकालिकांतील मराठी लेखनापुरती मर्यादित आहे.
………..
सुरवात करतो एका भूतपूर्व मासिकापासून. दोन दशकांहून अधिक काळ ते चालू होते आणि त्यात चांगल्या अभिरुचीचे साहित्य प्रकाशित झालेले आहे. त्याच्या प्रकाशकांचे धोरण खूप चांगले होते. ते प्रस्थापित लेखकांबरोबरच हौशी आणि नवोदितांचे देखील साहित्य स्वीकारत असत. त्यांची संपादकीय शिस्त वाखाणण्याजोगी होती. कुणाही लेखकाने त्यांना लेखन पाठविल्यानंतर एक महिन्याचे आत ते त्यासंबंधीचा निर्णय लेखकास लेखी कळवत. जर ते लेखन स्वीकारले गेले असेल तर त्याचे मानधन किती मिळेल याचा स्पष्ट उल्लेख त्या पत्रात असायचा. पण याही पुढे जाऊन ते अधिक काही लिहीत. तो मजकूर असा असायचा, “जर आपणास ही मानधनाची रक्कम अपुरी वाटत असेल, तर तसे स्पष्ट कळवा. त्यावर आम्ही विचार करून आपणास कळवू”. अत्यंत पारदर्शक असा हा दृष्टीकोन लेखकांना नक्कीच सुखावत असे. पुढे तो मासिक अंक प्रकाशित झाल्यावर ते त्यातील सर्व लेखकांना मानधनाचा धनादेश आणि अंकाच्या दोन प्रती कुरिअरने पाठवीत. ही सर्व प्रक्रिया त्या महिन्याची १ तारीख उजाडण्यापूर्वीच पूर्ण होत असे. म्हणजे वाचकाच्या हाती जर तो अंक १ तारखेस पडणार असेल, तर त्यापूर्वीच ते लेखकाला तृप्त करीत ! इतका सहृदय दृष्टीकोन बाळगणारे प्रकाशक विरळा असतात, हे हौशी लेखकांनी अनुभवलेले आहे. अशी सुरेख संपादकीय शिस्त असलेले हे मासिक कालौघात बंद पडले याचा खेद वाटतो.
.......
आता एका दिवाळी अंकाबद्दल लिहितो. याचे प्रकाशन फक्त वार्षिक असे आहे. ही मंडळी अनाहूत लेख स्वीकारतात. लेखकाला लेखस्वीकृतीबद्दल काही कळवत नाहीत. लेखकाने दिवाळीच्या दिवसांत वाट पाहत बसायचे ! काहीही उत्तर आले नाही तर लेख नाकारल्याचे समजून घ्यायचे. जर लेख स्वीकारला गेला असेल, तर तो अंक टपालाने लेखकास मिळतो. त्यासोबत संपादकांचे पत्र असते. त्यात स्पष्ट लिहिलेले असते, की हा अंक ना नफा ना तोटा तत्वावर प्रसिद्ध होतो. त्यामुळे ते लेखकास काहीही मानधन देऊ शकत नाहीत. या अंकात व्यापारी जाहिराती सहसा दिसत नाहीत; साहित्यविश्वाशी संबंधित लोकांच्या आर्थिक पाठबळावर हा अंक निघत असतो. त्यामुळे मानधन न देण्याची प्रामाणिक कबुली ही योग्य वाटते. फक्त हेच धोरण त्यातील प्रस्थापित लेखकांनाही लागू आहे की नाही, हे गुलदस्त्यात राहते.
.......................................................
वरील दोन सभ्य अनुभवांच्या नंतर आता पाहूया एक अशिष्ट अनुभव. हे मासिक एका शिक्षणसंस्थेतर्फे चालवले जाते. ही संस्था नाकासमोर सरळ चालणाऱ्या कडक शिस्तप्रिय मंडळींची आहे. त्या मासिकातील लेखन संस्कारप्रधान असते. एका हौशी लेखकाचा इथला अनुभव पाहू.
अन्य एका प्रथितयश मासिकात या लेखकाचा एक लेख प्रकाशित झालेला होता. तो खूप वाचकप्रिय ठरला. तो या मासिकाच्या संपादकांच्या वाचनात आला. तो आवडल्याने त्यांनी या लेखकाशी संपर्क साधला. त्यांनी त्याला त्यांच्या मासिकात लिहिण्याची फोनवरून विनंती केली. मानधनाचे बोलणे काही झाले नाही. लेखकही जरा हरखून गेल्याने भिडस्त राहिला. अर्थात ही त्या लेखकाकडून झालेली मोठी चूक ठरली, हे पुढे लक्षात येईल.
लेखकाने लेख पाठवला. काही दिवसांत त्याला फोनवरून स्वीकृती कळवण्यात आली आणि प्रकाशनाचा अंदाजे महिनाही सांगण्यात आला. यथावकाश अंक प्रकाशित झाला आणि तो लेखकास टपालाने मिळाला. सोबत वेगळे पत्रही होते. या लेखकाने मोठ्या उत्सुकतेने ते उघडले. त्यात त्यांनी मानधनाची अल्प रक्कम नमूद केली होती आणि ती जमा करण्यासाठी लेखकाच्या बँक खात्याची माहिती मागवली होती. लेखकाने ती कळवली. रक्कम किरकोळ असल्याने निदान त्याचा धनादेश न पाठवून तो भरण्याची आपली हमाली तरी वाचली, असे लेखकाने समाधान करून घेतले. आता पुढचा किस्सा भारीच आहे. या घटनेला महिना उलटला तरी लेखकाच्या खात्यावर ती रक्कम काही जमा झालेली नव्हती. तरी तो शांत होता. अचानक एके दिवशी त्याला त्या मासिकाकडून पत्र आले. या पत्रात धनादेशासोबत “तुम्हाला *** इतके रुपये मानधन धनादेशाने देण्यात येत आहे“, असे वाक्य लिहिलेले होते आणि त्यातील रकमेचा आकडा (दिसत राहील असा) खोडून त्याच्या डोक्यावर कमी केलेल्या रकमेचा आकडा टाकला होता ! यावर लेखकाने कपाळावर हात मारला. आता त्याला या रकमेत शून्य रस होता. त्याने तो धनादेश सपशेल फाडून टाकला आणि त्या प्रकाशकास एक खरमरीत इ-मेल पाठवली. मानधनाचे बोलणे आगाऊ न केल्याची चूक त्याला महाग पडली होती आणि वर मनस्तापही झाला. आजच्या काळात अत्यल्प रक्कम आपल्याला कोणी धनादेशाने पाठविल्यास तो बँकेत भरून यायची हमाली खरोखर महाग पडते हे उघड आहे. शिस्तप्रिय म्हणवणाऱ्या या संस्थेकडून लेखकास मिळालेली ही वागणूक अशिष्ट आणि अजब होती. खाडाखोड करून पत्रलेखनातील किमान सभ्याताही त्यांना पाळता आली नाही याचे सखेद आश्चर्य वाटते.
.........................................................
पुढचा किस्सा एका दिवंगत नामवंत साहित्यिकाबाबत घडलेला आहे आणि तो मी एका मासिकात वाचलेला आहे. तो रोचक आणि चालू विषयाशी संबंधित असल्याने लिहितो.
हे लेखक त्यांच्या अजोड साहित्यकृतींमुळे तमाम मराठी वाचकांच्या हृदयात प्रेमाचे आणि आदराचे स्थान मिळवून बसले आहेत. एकदा एका दिवाळी अंकाचे संपादकांकडून त्यांना लेखासाठी विचारणा झाली. मग त्यांनी तो पाठवला. हे संपादक महोदय देखील नामांकित, साक्षेपी वगैरे. त्यांनी तो लेख ३-४ वेळा वाचला पण त्यांना काही तो अजिबात पटला नाही. लेखात सुधारणा वगैरे सुचवायचे काही त्यांना धाडस झाले नाही. मग त्यांनी तो लेख नाकारून या लेखकांना साभार परत पाठवला. पण गंमत पुढेच आहे. या परतीच्या लेखासोबत चक्क मानधनाचा धनादेश जोडलेला होता !! “सदर लेख आम्ही तुमच्याकडून मागवून तुम्हास कष्ट दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही मानधन देणे लागतो, पण तुमचा लेख पसंत नसल्याने साभार परत करीत आहोत”, असा सुरेख मजकूर या पत्रात लिहिलेला होता. लेखकाचा यथोचित आदर केलेले यासारखे प्रसंग मराठी साहित्यविश्वात घडू शकतात, यावर क्षणभर खरेच विश्वास बसत नाही !
..................................................
आता पाहूया एका लेखकाने प्रकाशकावर कशी कुरघोडी केली ते. हे लेखक बऱ्याच नियतकालिकांत लिहीत. एकदा एका दिवाळी अंकाच्या संपादकांनी या लेखकांना लेख मागितला. तो प्रकाशित केला आणि चांगले मानधनही दिले. तो लेख बऱ्यापैकी गाजला. एक वर्षाने त्या मंडळींनी यांचेकडे पुन्हा लेख मागितला. पण या खेपेस प्रकाशकांनी लेखकास चाचरत विचारले की मानधन जरा कमी घ्याल का? आता यावर लेखक बरे ऐकतील? त्यांनी सरळ सांगितले, “ लेख तुम्ही पुन्हा मागत आहात. तेव्हा मानधन कमी तर होणारच नाही, उलट याखेपेस ते वाढवले जावे !” प्रत्येक लेखकास असा आपल्या लेखनक्षमतेचा अभिमान जरूर असावा.
…………………………………
नियतकालिकांकडून लेखकांना दिले जाणारे मानधन हा एक संवेदनशील विषय आहे. याबाबतीत आढळणाऱ्या तऱ्हा आपण वर पाहिल्या. लेखकाला मानधनाची आगाऊ कल्पना देणे आणि त्याप्रमाणे नंतर खरोखर देणे, पूर्वकल्पना न देता एकदम अंकाबरोबर मानधन देणे, अथवा ते अजिबात न देणे असे सर्व प्रकार दिसतात. एकंदरीत पाहता मराठी साहित्यविश्वात मानधनाची रक्कम ही ‘मान’ अधिक व ‘धन’ कमी या प्रकारात मोडते ! किंबहुना आपल्या देशात हिंदी व इंग्लीश वगळता बहुतेक प्रादेशिक भाषांची हीच स्थिती असावी. जिथे मानधन दिले जात नाही तिथे प्रकाशकांनी लेखकाला भेट अंक पाठवला तरी अगदी धन्य वाटते. लेखन स्वीकारून अंकही नाही आणि मानधनाचे तर नावही नाही, असे देखील अनुभव काही लेखकांना आलेले आहेत.
या संस्थळावर लिहिणारे माझ्यासारखेच अन्य काही लेखक अन्यत्रही लिहीत असतात. त्यांनाही व्यावसायिक प्रकाशकांकडून असे काही अनुभव आलेले असणार. या अनुभवांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने हा लेख लिहीला आहे. संबंधित प्रतिसादांचे तसेच निव्वळ वाचकांच्या मतांचेही स्वागत आहे.
********************************************
वाचने
36834
वाचनखूण
प्रतिक्रिया
65
तसा लिखाणाचा काही अनुभव नाही
शा वि कु,
In reply to शा वि कु, by हेमंतकुमार
चांगदेव आणि नारायण
माझे दोन अनुभव चांगले, एक वाईट ......
In reply to माझे दोन अनुभव चांगले, एक वाईट ...... by सुधीर कांदळकर
छान !
मी एका मराठी सनस्थळाचा एक किस्सा देतो
सुखद आणि मजेशीर अनुभव
जॉन व मित्रहो, +१
बरं झालं...नशिबाने वाचलो या सगळ्यातून
लेखनाचे मानधन ? ते काय असते ?
माझे पण दोन चार लेख कोणत्या
+१
In reply to +१ by हेमंतकुमार
प्रथितयश झाल्याशिवाय कोणत्याही लेखकाला....
In reply to +१ by हेमंतकुमार
प्रथितयश झाल्याशिवाय
In reply to प्रथितयश झाल्याशिवाय by मित्रहो
लेखनावर पोट...
In reply to लेखनावर पोट... by हेमंतकुमार
जाणकारांनी प्रकाश टाकावा....
In reply to जाणकारांनी प्रकाश टाकावा.... by Nitin Palkar
नि पा,
In reply to लेखनावर पोट... by हेमंतकुमार
निरंजन घाटे हे लेखनावर
In reply to निरंजन घाटे हे लेखनावर by प्रकाश घाटपांडे
गुरुनाथ नाईक
अनेक ठिकाणी लेखकाला भीड
काही लेखकच पुस्तक
In reply to काही लेखकच पुस्तक by प्रकाश घाटपांडे
:-) आहेत. माझ्या ओळखीत आहेत.
+१११
घासाघीस या व्यावहारिक पातळीवर येणं संकोचजनक होत असावं>>> बरोबर, व्यवहार शिकायला लेखकाला वेळ लागतो.प्रथितयश प्रकाशकाला जास्त मानधन मिळत असावे :)>>> अगदी ! अशा बऱ्याच हौशी लेखकांनी प्रकाशकाला श्रीमंत केले आहे !आहेत. माझ्या ओळखीत आहेत. फोटो, सत्कार ... >>> खरंय, अगदी उबग येतो अशा कार्यक्रमाचा.एक जुना अनुभवप्रकाशनातील
प्रकाश,
अब्दालीची पिलावळ
आशादायक बातमी !
सुहास शिरवळकर सुध्द्दा पूर्ण
बघता बघता
In reply to बघता बघता by हेमंतकुमार
गोपाळ नीळकंठ दांडेकर. मात्र
In reply to बघता बघता by हेमंतकुमार
वपु?
In reply to वपु? by चौकस२१२
त्यांनी
मानधन आणि साभार परत !
रहस्यकादंबरीकार बाबुराव अर्नाळकर ......
In reply to रहस्यकादंबरीकार बाबुराव अर्नाळकर ...... by सुधीर कांदळकर
+१
In reply to रहस्यकादंबरीकार बाबुराव अर्नाळकर ...... by सुधीर कांदळकर
अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती घोस्ट
In reply to अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती घोस्ट by गवि
घोस्ट रायटिंग एकदाच केले आहे
In reply to घोस्ट रायटिंग एकदाच केले आहे by सर टोबी
सर टोबी,
In reply to रहस्यकादंबरीकार बाबुराव अर्नाळकर ...... by सुधीर कांदळकर
बाबूराव अर्नाळकर...
In reply to रहस्यकादंबरीकार बाबुराव अर्नाळकर ...... by सुधीर कांदळकर
गिनीज बुकात
आणि हो .....
काही नामवंतांचे मानधन-किस्से
@गवि ....
In reply to @गवि .... by सुधीर कांदळकर
घोस्ट रायटिंगबाबत प्रतिसाद
मराठी शब्द ?
In reply to मराठी शब्द ? by हेमंतकुमार
घोरा = क्रीतलेखक, पटलेखक
In reply to मराठी शब्द ? by हेमंतकुमार
लेखनिक
In reply to मराठी शब्द ? by हेमंतकुमार
शब्दांकन या शब्दाला बहुधा
In reply to शब्दांकन या शब्दाला बहुधा by गवि
क्रीतलेखन
In reply to मराठी शब्द ? by हेमंतकुमार
उपरा लेखक
धन्यवाद ,
गा पै,
पटलेखक>>>> हा नाही पटला. समजा, एखाद्याने स्वतः 'पटकथा' लिहीली, तर तोच पटलेखक ठरेल. @ गवि, बरोबर. अलीकडे अनेक वलयांकित व्यक्तींच्या वतीने अनेक लेखक शब्दांकन करीत आहेत आणि त्यांना पुस्तकाच्या मुखपृष्ठावर ही स्थान मिळते. मागे एका दिवाळी अंकात शब्दांकन या कलेवर लेख आला होता.In reply to गा पै, by हेमंतकुमार
पटलेखक व पटकथाकार
गा.पै.
लेख संदर्भ
अजून एक मराठीतले प्रसिद्ध
In reply to अजून एक मराठीतले प्रसिद्ध by टर्मीनेटर
टर्मि.,
In reply to अजून एक मराठीतले प्रसिद्ध by टर्मीनेटर
" मिश्रवापर इमारत "
In reply to " मिश्रवापर इमारत " by चौथा कोनाडा
चौको,
अभिनंदन !
मोलें घातले खरडाया…
मानधन नको मूल्य म्हणूया.
In reply to मानधन नको मूल्य म्हणूया. by कंजूस
प्रकाशकांना त्याची काही
In reply to प्रकाशकांना त्याची काही by अहिरावण
+१
हजारो रुपये खर्च करून पुस्तक