Skip to main content

फिटेल का हे ऋण माझे

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 31/12/2019 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
फिटेल का हे ऋण माझे विवंचना आत दाटली याच काळजीने मीच माझी वर जागा शोधली रोप मीच लावले बघून स्वप्न उद्याचे काय ठावं , याच जागी इथेच सुळी चढायचे रोज रोज तोच सूर्य तीच आग ओकतो रोज रोज मीच का पण ? तेच तेच भोगतो मीच जर का अन्नदाता रिक्त का रे चूल माझी ? घेतला नांगर हाती हीच का रे भूल माझी ? ऐकतो सरकारनामे अभय कर्जांना दिले फासली पाने पुन्हा ती भाव तैसेच राहिले ===================== सिद्धेश्वर विलास पाटणकर
लेखनविषय:

वाचने 6913
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

आवडली असे म्हणवत नाही. भावना पोचल्या इतकेच म्हणू शकतो. शेतकर्‍यांच्या प्रश्णांवर सगळे पोटतिडकीने बोलतात पण त्यांच्या समस्यांचे मूळापासून निराकारण करण्यात कोणालाही रस नसतो. (अगदी स्वतः शेतकर्‍याला सुध्दा) आणि याच कारणाने इतकी वर्षे होउन सुध्दा शेतकर्‍यांचे प्रश्ण सुटत नाहीत. उलट भावनिक आणि सहानुभूती देण्याच्या / मिळवण्याच्या नादात प्रकरण जास्त गुंतागूंतीचे होत चालले आहे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

भावनिक आणि सहानुभूती देण्याच्या / मिळवण्याच्या नादात प्रकरण जास्त गुंतागूंतीचे होत चालले आहे.

धन्यवाद सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे .. पैंबुकाकांशी पूर्णतः सहमत है .. पण या शीघ्र ओळी ( त्या राबणाऱ्या आणि परिस्थितीला कंटाळून वर गेलेल्या बळीराजांना मानवंदना ) डकवल्याशिवाय पर्याय नव्हता .....