'स्त्री' शब्द ऐकल्यावर तुम्हाला कोण आठवते? सतत आपली काळजी घेणारी आई, सतत आपल्याशी भांडणारी पण इतरांशी भांडताना ठामपणे आपल्या बाजूने उभी राहणारी बहीण, पारावरच्या खाऊ देणाऱ्या आजी की चेष्टा करणारी मैत्रीण? अगदी ऐतिहासिक किंवा पौराणिक आख्यायिकांतील एखादी स्त्री व्यक्तीरेखा सुद्धा नजरेसमोर तरळून जात असेल कदाचित. कोणीही आठवले तरी मनात भावनांचा ओलावा हा पसरतोच.
अश्याच मनात ठसलेल्या स्त्री व्यक्तीरेखेबद्दलच्या
तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करा कवितेतून, लेखातून अथवा कथेतून. आणि पाठवून द्या आमच्या email address वर:
facebookalwayson@gmail.com
आवाहनास कारण की, आम्ही, शब्दांकुर ग्रूप काढत आहोत E- महिला विशेषांक!
तुमच्या मनाला भिडलेल्या स्त्री व्यतिरेखा केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या कथा, कविता आणि लेखांची आम्ही आतूरतेने वाट पाहतो आहोत.
अगदी 'ओ स्त्री कल आना' हे वाक्य आठवून तुम्ही 'स्त्री' सारख्या चित्रपटाची समीक्षा लिहिलीत तर ती ही स्वागतार्ह आहे आणि रुद्रम मालिकेतल्या रागिणी बद्दल लिहिलेत तर ते सुद्धा!
चाफेकळी नाकाची मस्तानी शब्द बद्ध करा किंवा शब्दांच्या पल्याडचे कर्तुत्व गाजवणारी झाशीची राणी तुमच्या लेखणीतून उमटू द्या.
आम्ही आतूर आहोत तुम्हाला समजलेल्या स्त्री व्यक्तीरेखे बद्दल किंवा व्यक्तीमत्वाबद्दल जाणून घ्यायला.
महत्त्वाच्या बाबी:
१. साहित्य स्वरचित हवे.
२. कुठल्याही ठिकाणी प्रकाशित झालेले नको.
या संदर्भात आम्हाला मिळालेले साहित्य E-अंकात समाविष्ट करण्याची परवानगी साहित्यिक स्वेछेने देत आहे, असे गृहीत धरले जाणार आहे. त्याच बरोबर, आम्ही स्वयंसेवी साहित्य संघ असल्या कारणाने अंक विनामूल्य वाचण्याकरिता उपलब्ध करून देत असतो. म्हणूनच साहित्यिकानेही कुठल्याही आर्थिक व्यवहाराची अपेक्षा ठेवू नये, ही नम्र विनंती आहे.
साहित्य पाठवायची अंतिम तारीख : १५ जानेवारी २०२०
वर्गीकरण
मिसळपाव
मराठीत वाचन लेखन चळवळ
In reply to मराठीत वाचन लेखन चळवळ by पाषाणभेद
धन्यवाद!
आम्ही फक्त प्रतिसाद साद देउ शकतो म्हणून लिखानास पास
In reply to आम्ही फक्त प्रतिसाद साद देउ शकतो म्हणून लिखानास पास by जॉनविक्क
अरे हो द वुमन म्हणून शरलोक ज्यांचा उल्लेख आदराने करतो
In reply to आम्ही फक्त प्रतिसाद साद देउ शकतो म्हणून लिखानास पास by जॉनविक्क
:)
विषय छान आहे....
In reply to विषय छान आहे.... by मुक्त विहारि
धन्यवाद!
नक्की प्रयत्न करतो.
In reply to नक्की प्रयत्न करतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खूप छान!
हा उपक्रम
In reply to हा उपक्रम by नूतन
नाही.
अरे वा! अंकाची वाट पाहत आहे.
In reply to अरे वा! अंकाची वाट पाहत आहे. by एस
धन्यवाद