विरह X शब्दकथा
लेखनविषय (Tags)
रात्रीचे तीन वाजले होते, तिच्या डोळ्यात झोप मात्र काही केल्या येत नव्हती.
नवऱ्याची फ्लाईट 2 वाजता पोचणार होती अमेरिकेला, अजून का बरे फोन नाही आला. नक्कीच फ्लाईट डिले असणार कारण आपला नवरा आपल्यावर किती जास्त प्रेम करतो हे तिला माहीत होते.
किती काळजी करतो आपण, काही नाही येईल नक्की फोन.तिने स्वतःलाच समजावले.
विचार करत करत किती वेळ गेला तिलाही कळले नाही.
अचानक 4 वाजता अलार्म वाजू लागला.
बेडवरून उजव्या साईडला ती वळली तेवढ्यात तो कपडे घालत घालत म्हणाला-
बाईसाहेब निघतो आता मी, दूध घालायला जायचा वखत झाला. आज रातच्याला फोन करा परत मूड असला तर.
प्रतिक्रिया
याहू गृप बंद झालेत. त्याचा
दुधाचा वखत म्हणून निघतो म्हणतो
आता प्लंबर, मिस्त्री, कपडे
दूधवाल्याच्या पत्नीचे स्वप्न,