✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

विरह X शब्दकथा

प
पुनप्पा यांनी
Tue, 12/10/2019 - 07:13  ·  लेख
लेख
रात्रीचे तीन वाजले होते, तिच्या डोळ्यात झोप मात्र काही केल्या येत नव्हती. नवऱ्याची फ्लाईट 2 वाजता पोचणार होती अमेरिकेला, अजून का बरे फोन नाही आला. नक्कीच फ्लाईट डिले असणार कारण आपला नवरा आपल्यावर किती जास्त प्रेम करतो हे तिला माहीत होते. किती काळजी करतो आपण, काही नाही येईल नक्की फोन.तिने स्वतःलाच समजावले. विचार करत करत किती वेळ गेला तिलाही कळले नाही. अचानक 4 वाजता अलार्म वाजू लागला. बेडवरून उजव्या साईडला ती वळली तेवढ्यात तो कपडे घालत घालत म्हणाला- बाईसाहेब निघतो आता मी, दूध घालायला जायचा वखत झाला. आज रातच्याला फोन करा परत मूड असला तर.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती

प्रतिक्रिया द्या
3865 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

याहू गृप बंद झालेत. त्याचा

पाषाणभेद
Tue, 12/10/2019 - 20:21 नवीन
याहू गृप बंद झालेत. त्याचा फायदा घ्यायचा का? ह्यो धोबी हाय का गवळी हाय का नाईट वाचमन हाय? लय रहस्य हाय व्बॉ. आन मी पयला.
  • Log in or register to post comments

दुधाचा वखत म्हणून निघतो म्हणतो

जॉनविक्क
Tue, 12/10/2019 - 21:24 नवीन
म्हणजे दूधवाला असावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

आता प्लंबर, मिस्त्री, कपडे

पाषाणभेद
Wed, 12/11/2019 - 18:57 नवीन
आता प्लंबर, मिस्त्री, कपडे धुणारा अशा अंगमेहनतींचे वर्शन येवू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

दूधवाल्याच्या पत्नीचे स्वप्न,

गवि
गुरुवार, 12/12/2019 - 07:19 नवीन
दूधवाल्याच्या पत्नीचे स्वप्न, की तिचा कर्तबगार पती भविष्यात दुग्धव्यवसायाची भरभराट करुन परदेशातही व्यवसायानिमित्त भराऱ्या घेतो आहे.. चार वाजता गजर झाल्याने मोडलं. अरेरे. पती अजून झोपेतच दिसतो. त्याने स्वप्नातल्या मॅडमला उद्देशून बडबड केली.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा